द बूक थीफ

Submitted by केदार on 18 April, 2017 - 15:56

* * * Here is a small fact * * *
You are going to die.

* * * Reaction to the aformentioned fact * * *
Does this worry you? I urge you - don't be afraid. I am nothing but fair.

बार्न्स अन नोबल्स मध्ये रिकमंडेड फॉर स्कुल रिडिंग सेक्शन मध्ये मला "बूक थीफ" दिसले, ते मी उचलून सहज चाळले. अन पहिल्या पानातच शॉक लागला.
मार्कस झुझॅक बद्दल मी वाचले होते, अगदी बूक थीफ बद्दलही ऐकले / वाचले होते. बाबा, अजून तुम्ही हे वाचले नाही? असे मागे कधी तरी मला माझ्या मुलीने विचारल्यावर मी अजून नाही, असे म्हणालेले आठवले. आणि लगेच हे पुस्तक घेतले.

लहाणपणी कधीतरी मराठीत अनुवादित केलेले, "माईन काम्फ" वाचले होते. खरे तर आता कबूल करायला लाज वाटणार नाही, पण मला ते पुस्तक आवडले होते. नेताजी जर्मनीत जाऊन, ब्रिटीश राजला हरवू पाहत होते, त्यामुळे शत्रूचा शत्रू तो मित्र, ह्या भूमिकेतून मला हिटलर बद्दल ना चीड होती, ना आस्था. पण तरूण वयात आल्यावर जागतीक इतिहासाबद्द्ल जे काही वाचले, त्यातून मग चीड निर्माण होत गेली. मध्येच कधीतरी " नाझी भस्मासूराचा उदयास्त" ही वाचले. त्यानंतर कधीतरी "नाईट" हे एका जर्मन ज्यू चे पुस्तक वाचले अन हादरून गेलो.

एक मिनिट .. मी हे का सांगत आहे? हे तर कॉमन नॉलेज .. मग?

तर ह्या कथेची पार्श्वभूमी ही नाझी जर्मनी, ज्यूंचे शिरकाण आणि दुसरे महायुद्ध अशी आहे. ह्या पुस्तकातील ऑलमोस्ट सगळी पात्र ( एक दोन सोडले तर) हे जर्मन आहेत. नाझी जर्मनीमधील कॉमन जर्मन लोकं, त्यातील काही नाझी असणारे, काही नसणारे, काही इन्डिफरंट तर काही नाझी विरोधी तर काही जन्माने ज्यू आहेत. सर्व घटना हा म्यूनिक जवळील मोल्शिंग नावाच्या गावातील हिमल नावाचा रस्त्यावर आहे. योगायोगाने जर्मनीतील 'हिमल' म्हणजे 'स्वर्ग' तर ह्या घटना हिमल स्ट्रीट वर घडतात. १९३९ ते १९४४ पर्यंतच्या घटना. आणि पुस्तकाची भाषा इतकी प्रभावी आहे की, वाचक २०१७ मध्ये वाचताना देखील १९३९ ते १९४४ प्रवास करतो.

लिझल, ही एक ९ वर्षाची मुलगी ह्या पुस्तकाचे मुख्य पात्र आहे. तिच्याभोवती पुस्तक फिरते. लिझल, तिची जन्मदाती आई आणि तिचा लहान भाऊ रेल्वेने प्रवास करत असतात. तिघेही अनेक दिवसांचे उपाशी वगैरे, भाऊ बिमार. तिची आई लिझल अन तिच्याभावाला एका दुसर्‍या गावी, मोल्शिंगला, नेत असते. तिथे लिझल अन तिच्याभावाला ती एका जोडप्याकडे सुपूर्त करणार असते. कारण तिला त्यांचे पालनपोषण करणे अशक्य असते. प्रवासात एका स्टेशनला तिचा लहान भाव मृत्यू पावतो. आई व ती एका एका स्टेशनवर उतरतात आणि तिच्या भावाला दफन करतात. तिथे "कबर कशी खोदावी" अश्या नावाचे एक छोटेखानी पुस्तक तिला दिसते, ती ते तिच्याही नकळत उचलते. .. हेन्स द बूक थीफ !

पुढे लिझल एकटीच तिच्या फोस्टर पेरेंट्स कडे येते. रोझा न हॅन्स हुबरमन कडे येते. हॅन्स हा एक हरहुन्नरी माणूस आहे. पहिल्या महायुद्धात त्याने भाग घेतला, तिथे तो वाचतो आणि परत येतो. आल्यावर तो पेंटींगचा धंदा सुरू करतो. रोझाही श्रीमंत लोकांचे कपडे धुवून, इस्त्री करून देणारी स्त्री आहे. थोडक्यात हुबरमन कुटूंबिय हे निम्न मध्यमवर्गीय आहे. फोस्टर केअरचे काही पैसे त्यांना सरकार देत असते. ( कारण लिझल ही त्यांच्याकडे फोस्टर कीड म्हणून आलेली आहे.) हातातोंडाशी घास. पण हॅन्स हा दिलदार माणूस. अगदी एक तीळ सात जणात वाटून खाणारा!

पण मग वरच्या "I am nothing but fair" चे काय? हा कोण? तर हा यमदूत ! हो यमदूतच. त्याचे कामच मेलेल्या लोकांचे आत्मे काढून घेणे हे आहे. पूर्ण कथेचा हा सूत्रधार ! वेळोवेळी आपल्याला वाचता वाचता जमिनीवर दाणकन आपटणारा ..

उदा हे बघा.

A small but noteworthy note. I've seen so many young men over the years who think they're running at other young men. They are not. They are running at me. किंवा Humans, if nothing else, have the good sense to die.

पण तो रूक्ष नाही. त्याचे एक वाक्य,

People observe the colors of a day only at its beginnings and ends, but to me it's quite clear that a day merges through a multitude of shades and intonations with each passing moment. A single hour can consist of thousands of different colors. Waxy yellows, cloud-spot blues. Murky darkness. In my line of work, I make it a point to notice them" इन माय लाईन ऑफ वर्क !! वॉव. शब्द हे जादू असतात. मध्येच हा सूत्रधार आपल्याला हसवतो, दिलासा देतो पण माणुसकीवर विश्वास पण ठेवायला सांगतो.

लिझलचे दिवस ओके असतात, पण रात्री कठिण ! लिझलला रात्री स्वप्न पडत असतात, रोज रात्री तिला स्वप्नात भाऊ अन आई दिसते. झोप येते नसते, तेंव्हा हॅन्स हुबरमन तिला कवेत घेतो, गोष्टी सांगतो, तिचा आधार बनतो. एके दिवशी त्याला ते कबर कशी खोदावी हे पुस्तक दिसते, लिझल म्हणते, वाचून दाखव. तर तो ते वाचून दाखवतो. तिला वाचायला अन लिहायला शिकवतो. तो खरे तर तिचा कुणीच नाही, पण तोच तिला हळू हळू "पापा" वाटायला लागतो. कुठल्याही झोपडपट्टीत शिव्या दिल्याशिवाय बोलणे पूर्ण होत नसते. हिमल स्ट्रीट तरी कसा अपवाद? रोझा हुबरमन ही प्रत्येक वाक्याची सुरूवात व शेवट हॅन्स न लिझलला शिव्या देऊनच करत असते. पण रोझाच्या बोलण्यावर नका जाऊ. ती देखील एक प्रेमळ पण प्रेम व्यक्त न करता येणारी बाई आहे. हॅन्स न रोझाला दोन मुलं असतात, पण ते दोघेही त्यांच्यासोबत राहत नाहीत. मुलगी पूर्णवेळ मोलकरीण म्हणून म्युनिक मध्ये करत असते, तर मुलगा मिल्ट्रीत असतो. नाझी जर्मन !

लिझलची हिमल स्ट्रीट वरील झोपडपट्टीत राहणार्‍या मुला/ मुलींशी हळूहळू ओळख होते. त्यातील एक रूडी ! रुडी स्वतःला व्हाईट जेसी ओव्हेन्स समजत असतो. त्याचे स्वप्न जेसी सारखे धावून, धावण्याच्या शर्यतीत मेडल मिळविण्याचे असते. एके दिवशी तो सर्वांगाला कोळश्याने रंगवतो आणि पळतो. ( कारण जेसी ओव्हेन्स हा काळा होता.) नाझी जर्मनीमध्ये हे असे करणे म्हणजे महापाप !
रुडी, टॉमी, लिझल हे जवळचे मित्र होतात. रुडीला लिझल अन लिझलला रुडी आवडत असतात, पण कोणीही तसे व्यक्त करत नाही. रुडी लिझलला नेहमी किस मागत असतो, पण लिझल त्याला उडवून लावत असते. त्यांच्यातील हळूवार प्रेम हे पुस्तकातील शब्दांतून अप्रतिमरीत्या व्यक्त होत जाते. युद्ध सुरू असते, राशनिंगमुळे अन्न मिळत नसतं. भुकेने जीव व्याकुळ होतो, अश्यावेळी रुडी न त्याचे मित्र सफरचंदांची चोरी करायचा विचार करतात, रुडी अन लिझल मिळून काही वेळेस ब्रेड, सफरचंद असे चोरत असतात.

हॅन्सने हळूहळू लिझलला वाचायला शिकविले. तिला शब्द आवडायला लागतात, एके दिवशी नाझी जर्मनीत पुस्तकांची होळी असते, त्यातून लोकांच्या नकळत ती दुसरे पुस्तक चोरते. ते मेयरची बायको पाहते, पण तिलाही पुस्तक आवडत असतात, त्यामुळे ती काही करत नाही. सफरचंदांसोबतच ते मेयरच्या घरून पुस्तक चोरी पण करत असतात. मेयरच्या बायकोला तिच्या घरातून पुस्तकांची चोरी होत असते हे माहिती असते, आणि पुस्तक कोण चोरत आहे हे ही. तिचे कॅरेक्टर पण चांगले उतरले आहे. पण ती ते चोरीला जाणे थांबवत नाही, उलट लायब्ररीमध्ये कधी कधी कुकीज ठेवून अप्रत्यक्षपणे लिझलला मदत करत असते.

पहिल्या महायुद्धात हॅन्स सहभागी असतो, तिथे त्याला एक संगीतकार सैनिक भेटतो. ते दोघे मित्र होतात. पण दुर्दैवाने तो मित्र युद्धात मारल्या जातो. हॅन्स त्याचे वाद्य ( अ‍ॅकॉरडीयन) घेऊन परत येतो आणि त्याच्या बायकोला भेटतो. "तुला काय हवे आहे ते सांग, मी पूर्ण करीन असे एक छोटेखानी पत्र अन वचन देतो." त्या वचनाची गरज दुसर्‍या महायुद्धात त्या बाईच्या मुलाला भासते, त्याचे नाव मॅक्स व्हॅनडेनबर्ग. अर्थातच तो ज्यू !

मॅक्सच्या त्याच्या घरापासून ते हुबरमानच्या घरापर्यंतचा प्रवासही जीवघेणा. अनेक दिवस उपाशी राहणे, ही त्यातल्या त्यात सोपी बाब, पण ज्यू ने नाझी जर्मनीत जिंवत राहणे ही एक फारच मोठी बाब. तो प्रवास, ते वर्णन हे पुस्तकातूनच वाचावे असे आहे. पिक्चर ते सगळे उभे करू शकत नाही, अगदी शिंडर्लस लिस्ट सारखा पिक्चरही नाही. त्याला त्याच्या लहानपणीचा ज्यू नसणारा मित्र मदत करतो.

एके दिवशी अचानक हिमल स्ट्रीट वरील ३३ नं च्या घरात रात्री मॅक्स येतो आणि त्या घरातील जीवन बदलून जाते. रोझा ही, "ज्यू फिडर" मध्ये परावर्तीत होते. मॅक्स हा मरायला टेकलेला आहे, असे म्हणणे देखील त्याच्या अवस्थेला पूर्ण न्याय देत नाही. इतर ज्यू फॅमिलीसारखेच त्याचेही सर्व नातेवाईक कॅम्प मध्ये गेलेले असतात, त्याला त्याच्या एका जर्मन मित्राने वाचवलेले असते, रोज रात्री त्यालाही लिझल सारखीच स्वप्न पडतात, पण ह्या वेळी हॅन्स ऐवजी लिझल त्याच्या मदतीला धावून येते. मॅक्स आणि लिझल मध्ये एक वेगळाच बंध निर्माण होतो. ३३ हिमल स्ट्रीट वरील रस्त्यावरच्या घरातील बेसमेंट मध्ये पेंटच्या डब्याआड मॅक्स जिंवत राहण्याचा प्रयत्न करतो. मॅक्स आणि लिझल मधील सर्व प्रसंगातील संवाद ( मे बी ३०० एक पानं ) हे नुसतेच वाचण्यासारखे नाहीत , तर मनन करण्यासारखे आहेत.

हॅन्स जसे तिला, तिच्या कठिण काळात पुस्तक वाचून दाखवतो, तसेच ती मॅक्सला पुस्तक वाचून दाखवते. एके दिवशी मॅक्स म्हणतो, "words are life Liesel" लिझलला भेट देण्यासाठी मॅक्स, स्केचेसचे एक छोटेखानी पुस्तकच पुढे तयार करतो. त्या पुस्तकात तो त्याची कथा लिहितो. स्टॅन्डओव्हर मॅन, पासून सुरूवात होते. वाचताना असे वाटते तो स्टॅन्डओव्हर मॅन म्हणजे त्याचे वडील आहेत, मग पुढे वाटते की तो हिटलर आहे

standover_1.jpg

पण हळू हळू कथा बदलत जाते. आणि तो लिहितो, की तो मॅन हा मॅन नसून एक गर्ल आहे. त्या छोटेखानी स्केच बुक मध्ये " भय ते माणुसकी" हा प्रवास आहे. शब्दांची किमया !

Standover_man_2.png

ह्या सर्व वर्षांमध्ये रूडी अन लिझल हे जवळचे मित्र होतात. रुडीला देखील नाझी युथ ब्रांच मध्ये भरती व्हावे लागते, पण त्यालाही ती लोकं आवडत नसतात. रुडी अन लिझलच्या चोर्‍या ( खान्यासाठी अन कधी कधी पुस्तकासाठी) चालूच असतात. पण तरीही रुडीला, लिझलच्या घरी ( खरेतर बेसमेंट मध्ये) मॅक्स राहत आहे, हे माहीत नसते.

अश्यातच दोस्त राष्ट्र जर्मनीवर बॉम्ब वर्षाव सुरू करतात. लोकांना "सुरक्षित" ठेवण्यासाठी नाझी लोकं ज्यांच्या घराचे बेसमेंट चांगले आहेत त्यांच्याकडे गटागटाने लोकांना पाठवते. तिथेही, त्या तणावामध्ये लिझल पुस्तक वाचून दाखवून तो तणाव सुसह्य करते.

हिमल स्ट्रीट वरून काही ज्यू लोकांची वरात जवळच्या गावात नेली जाते, अन हॅन्सला ते बघवल्या जात नाही, तो एका ज्यूला ब्रेड देतो आणि मग सैनिक हॅन्सला मारतात. ह्या भितीमुळे, त्याला असे वाटते की आता नाझी लोकं त्याच्या घरी येणार अन मॅक्स पण मारला जाणार. तो मॅक्सला हे सांगतो, आणि सर्व गोष्टींमुळे मॅक्सला ३३ हिमल स्ट्रीट सोडून जाणे आवश्यक होते. तो जातो !

पुढे हॅन्सला नाझी लोकं युद्धकामावर जवळच्या शहरात पाठवतात. कुटूंबियांची तुटातुट होते. मॅक्सही जातो. पण जाताना भेट म्हणून तो लिझलला एक पुस्तक देतो.

"द वर्ड शेकर"

THERE WAS once a strange, small man. He decided three important details about his life.
1. He would part his hair from the opposite side to everyone else.
2. He would make himself a small, strange mustache.
3. He would one day rule the world.
........

Yes, the Führer decided that he would rule the world with words. “I will never fire a gun,” he devised. “I will not have to.” Still, he was not rash.
.......
He planted them day and night, and cultivated them....
.......
He invited his people toward his own glorious heart, beckoning them with his finest, ugliest words, handpicked from his forests. And the people came.
.......
The people who climbed the trees were called word shakers.
.......
हिटलरच्या राज्यक्रांतीबद्दल मॅक्स लिहितो. पण इथेही तो त्याच्या लिखाणात पॉझिटिव्हिटी आणतो.

THE BEST word shakers were the ones who understood the true power of words. They were the ones who could climb the highest. One such word shaker was a small, skinny girl. She was renowned as the best word shaker of her region because she Knew how powerless a person could be WITHOUT words.

She had desire. She was hungry for them.

-- अ‍ॅन्ड वेट फॉर इट ...

One day, however, she met a man who was despised by her homeland, even though he was born in it. They became good friends, and when the man was sick, the word shaker allowed a single teardrop to fall on his face. The tear was made of friendship—a single word—and it dried and became a seed, and when next the girl was in the forest, she planted that seed among the other trees. She watered it every day.

.....
The tree grew every day, faster than everything else, till it was the tallest tree in the forest. Everyone came to look at it. They all whispered about it, and they waited . . . for the Fuhrer. Incensed, he immediately ordered the tree to be cut down.
......
Führer’s ax could not take a single bite out of the trunk. In a state nearing collapse, he ordered another man to continue.

..... वेल, पुढचे तुम्ही पुस्तकात वाचा.

ज्यूंच्य शिरकाणाबद्दल प्रत्यक्ष पुस्तकात काही नाही, आहे ते सटल लेव्हल वरचे सत्य. आणि म्हणूनच ते पचायला अवघड आहे. ऑश्विस मध्ये १००० लोकांना एका रूम मध्ये कोंडून मारले, हे वाचायला रुक्ष वाटते, पण she met a man who was despised by her homeland, even though he was born in it. हे वाचाताना अंगावर शहारे येतात.

प्रत्येक ज्यूंच्या मिरवणूकीत लिझलला मॅक्स असेल असे उगाच वाटत असते, आणि एके दिवशी मॅक्स तिला दिसतो. ती नाझी सैनिकांवर चिडते, मॅक्सला बोलायचा प्रयत्न करते, पण ते नाझी सैनिकच ..

त्या मधल्या काळाचे वर्णन आपला सूत्रधार असे करतो.

She was the book thief without the words. Trust me, though, the words were on their way, and when they arrived, Liesel would hold them in her hands like the clouds, and she would wring them out like rain.

१९४४ येंत.

लिझल एक पुस्तक लिहायला घेते.

महायुद्धाच्या शेवटी शेवटी, एके दिवशी हिमल स्ट्रीटवर बॉम्ब पडतात. आणि जेंव्हा हे बॉम्ब पडतात, तेंव्हा सगळेजण झोपलेल असतात आणि आपली लिझल, ही बेसमेंट मध्ये पुस्तक लिहित बसलेली असते. तिच्या बेसमेंट मध्ये ती असते, त्यामुळे ती वाचते आणि रुडी, पापा, ममा, सगळे अगदी झाडून सगळे मरतात.

तिला रुडीचे प्रेत दिसते. She leaned down and looked at his lifeless face and Leisel kissed her best friend, Rudy Steiner, soft and true on his lips. He tasted dusty and sweet. He tasted like regret in the shadows of trees and in the glow of the anarchist's suit collection. She kissed him long and soft, and when she pulled herself away, she touched his mouth with her fingers...She did not say goodbye. She was incapable, and after a few more minutes at his side, she was able to tear herself from the ground. It amazes me what humans can do, even when streams are flowing down their faces and they stagger on.

इथे तर सुत्रधारही कळवळतो आणि म्हणतो, "I carried [Rudy] softly through the broken street...with him I tried a little harder [at comforting]. I watched the contents of his soul for a moment and saw a black-painted boy calling the name Jesse Owens as he ran through an imaginary tape. I saw him hip-deep in some icy water, chasing a book, and I saw a boy lying in bed, imagining how a kiss would taste from his glorious next-door neighbor. He does something to me, that boy. Every time. It's his only detriment. He steps on my heart. He makes me cry."

पुढे मॅक्सचे काय होते? लिझल जिंवत राहते का? हे सर्व मी इथे देणे योग्य नाही. त्यासाठी तुम्ही पुस्तक वाचायला हवे.

मार्कस झुझॅक, शब्दखेळ करून हसवता हसवता, रडवणारा आहे. पापा, ममा, रुडी, मॅक्स, लिझल ही कॅरेक्टर अफलातून आहेत. ही उभी करणे आणि त्यांच्यामार्फत जर्मनीमधील बदल दाखवणे हे काम मार्कस ने फारच सुंदररीत्या केले आहे. ह्याच नावाचा पिक्चरही आहे, पण पिक्चर मध्ये असे अनेक डिटेल्स टिपायचे राहून जाते. पुस्तक वाचणार्‍याला हे सर्व डिटेल्स, त्याच्या स्वतःच्या विश्वात उभे करता येतात, अनेकदा रिपिट मोड मध्ये मनातल्या मनात बघायला मिळतात.

शेवटची ४० एक पानं राहिली होती म्हणून मी हे पुस्तक प्रवासात वाचायला घेतले होते. पुस्तक संपले. जाडजुड पुस्तक मिटून मी शून्यात बघत असतानाच अचानक डोळ्यातून पाणी यायला लागलं.

The Book Thief by Markus Zusak.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त पुस्तक आहे हे माहिती आहे... यावर फिल्म सुद्धा बनलीए पन मुद्दाम जवळ असुनही बघीतली नाहीए..
मागे दिनेशदांनी सुद्धा यावर धागा काढलेला तो वाचला होता आणि एकंदर कल्पना असल्यामुळे पुस्तक वाचल्याबगैर याबद्दल कुठलही डिस्कशन वाचणार नाही असा मी पन केलाय.. Happy
आता पुस्तक वाचल्यावर इथं येईल..

छान लेख केदार, माझ्याकडे आहे हे पुस्तक व मुलीने अतिशय सेन्सि टिव्ह वयात वाचून त्याबद्दल डिस्कस केले आहे. मी अजून पुस्तक प्रत्यक्ष वाचले नाही. पण अनेक मृत्यू अनुभवले आहेत त्याम्मुळे आय कॅन टोटली रिलेट टू धिस. तेव्हा मला चीअर फुल पॉजिटिव्ह माइंडसेट ठेवणे गरजेचे होते म्हणून तिच्या समोर वाचले नाही. डिस्कशन मध्ये भाग घेउन तिला इतरांच्या व घरातील मृत्यूंशी रिलेट करायला मदत केली. आता एकटीच असते तेव्हा वाचून घेइन एकदा. भाषा खरेच अतिशय पॉवर फुल आहे. शेवटचे प्रसंग मुलीने तिच्या डोक्यातून ते जाई परेन्त सांगून त्याबद्दल बोलून नॅरेट केले होते. जिनो साइड हा विषयच मला भयानक वाट्तो. त्याचे अश्या द्रूष्टिकोणातून चित्रण क्या बात!

धन्यवाद सर्वांना.

ओळख आवडली ही त्या पुस्तकाची किमया आहे. मार्कस झुझॅक हा शब्दांची किमया करणारा माणुस आहे. पूर्ण पुस्तकात निगेटिव्हिटी फारच कमी आणि पॉझिटिव्हिटी जास्त आहे. आणि हे सर्व मांडणारा लेखक स्वतः ज्यू आहे.

मॅक्स अन समकालीन ज्यू बद्दल एवढेच म्हणावेसे वाटते, जे जॉन स्टाईनबेकने ग्रेप्स मध्ये लिहून ठेवले आहे.

I ain't scared no more ! It was tough, for a while, it looked though we was beat. Good and beat. Looked like we didn' have nobody in the world but enemies, like nobody was friendly no more. It feel kinda bad and scared too.

मी पिक्चर अजून पाहिला नाही. कारण पुस्तक वाचायचे होते. पण आता पाहिला पाहिजे.

मी पुस्तक नाही वाचले, पण चित्रपट बघितला आहे आणि त्याबद्दल टिना ने उल्लेख केल्याप्रमाणे
इथे लिहिलेही होते.

हा चित्रपट एक सुंदर सकारात्मक अनुभव देतो. माझी स्वतःची कुवत किंवा मर्यादा म्हणा, मला
पुस्तक वाचताना, शब्दांच्या पलिकडचे कल्पायची सवय आहे. सुरवातीचाच प्रसंग घ्या,
मी कदाचित त्या लहान भावाच्या जाण्याचे भायावह कल्पनाचित्र मनात बघितले असते.
पण चित्रपटात येतो तो त्याचा फक एक क्लोज अप.. तो किती क्यूट आहे असा विचार करेपर्यंत,
तो हयात नाही हा धक्का बसतो, पण क्षणभरच. ज्यांनी बघितला नाही, त्यांनी नक्की बघा,
सगळीच पात्र चपखल आहेत.

छान परिक्षण. खूप ऐकलंय या पुस्तकाबद्दल. वाचावं लागेल.

केदार आता ऑल द लाईट व्ही कॅनॉट सी वाचून पहा.

मस्त ओळख लिहिली आहेस केदार. बार्क्याने वाचलेय अलिकडेच. पण मी वाचले नव्हते. आता त्याच्याकडून घेउन वाचावे लागणार

वाह... मस्त लिहिलयं... वाचावं लागेल आता...माईन काम्फ,नाझी भस्मासूराचा उदयास्त आवडले होते...

गेल्या वर्षी auschwitz ला जाऊन आलो.
भयानक आहे खूप. हे सगळे खरच घडले असेल ह्यावर विश्वास बसत नाही लवकर,
विश्वास बसल्यावर मन सुन्न होते.
४ दिवस नीट झोप येत नव्हती.