सोळा आण्याच्या गोष्टी - लाट - रत्न
धोधो पाऊस पडत होता... तासभर फोनमध्ये रमलेल्या जोशीकाकुनी स्तब्ध नजरेने डोके वर करुन जोशीकाकांकडे पाहिले.. जोशीकाकांना म्हणाल्या - लाट आली आहे..!
जोशीकाकांनी ऐकले आणि चष्मा ठिक करुन तडक शेजारच्या विनुताईना जाऊन म्हणाले -विनुताई जपुन रहा बरे! लाट आली आहे..!
वेंधळी विनुताई बावळट सुनेला जाऊन लगेच म्हणाली, अग लाट आली आहे..! माझ्या समीर बाळला सारखे फोन करुन तो नीट असल्याची खात्री कर बरे...!