गुंतवणुक

निफ्टी नॉर्मल डिस्ट्रिब्युशन

Submitted by बोकलत on 8 March, 2021 - 04:11

मी मागे एकदा महाबळेश्वरला गेलो होतो. महाबळेश्वरची बाजारपेठ माझ्या आवडत्या बाजारपेठांपैकी एक आहे. खरं तर थंड हवेच्या सगळ्याच बाजारपेठा मला आवडतात. तर या बाजारपेठेत फिरताना एका दुकानाजवळ आलो तिथे विविध खेळ होते. ते नाही का असतात पन्नास रुपये देऊन रिंग टाका, बंदुकीने फ्रुटी पाडा, फुगे फोडा वैगरे वैगरे. त्यात एक खेळ होता ज्यामध्ये एक लाकडी बॉक्स असतो त्याच्या तळाला दहा एक खाचे केलेले असतात. आपण वरून लहान चेंडू सोडायचा तो घरंगळत खाली जातो ठराविक खाच्यात गेला कि पैसे दुप्पट तिप्पट होतात. तर मनात नसतानाही तो खेळ खेळलो आणि ते पन्नास रुपये गमावून बसलो.

Index Investing भाग ३:- P/E Ratio

Submitted by अतरंगी on 7 December, 2020 - 05:40

“Be Fearful When Others Are Greedy and Greedy When Others Are Fearful” :- Warren Buffett  

कोणत्याही व्यवहारात जर जास्त फायदा मिळवायचा असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खरेदी. मार्केट सुद्धा त्याला अपवाद नाही. जर उत्तम  स्टॉक पण चुकीच्या वेळेस घेतला तर  त्यात खूप वेळ अडकून पडावे लागू शकते किंवा मिळणारे रिटर्न Significantly कमी होऊ शकतात. मार्केट वर जाईल कि खाली हे आपल्या हातात नाही. पण आपल्याला हवा असलेला स्टॉक आपल्याला पाहिजे त्या किमतीला येई पर्यंत शांत बसून राहणे नक्कीच आहे.

प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यावर्षी साजरा करूया मेणबत्ती विरहित ख्रिसमस. 

Submitted by ताजे प्रेत on 6 November, 2020 - 06:14

मधमाश्या नष्ट झाल्या कि चार वर्षात मानव नष्ट होईल अस म्हटलं कि लोक विचारतात कस बर... हे वाक्य आहे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन याचं, ते सांगतात कि मधमाशी विविध प्रकारचा वनस्पतीचे परागीभवन करीत असतात, बरीच फळझाड, फुलझाड, भाजीपाला, धान्य पिके याचं परागीभवन फक्त मधमाश्याच करू शकतात. जर याचं प्रमाण कमी होत गेल तर आपल्या खाद्यातील अनेक घटक नष्ट होतील आणि मग वनस्पतीच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन भूकबळी वाढतील आणि मग अन्नही मिळणार नाही. 

आणी या मधमाशा कशाचे घर बनवतात ? मेणाचे - आणि मेणबत्ती कशाने बनते मेणापासून !

Index Investing भाग २:- क्या म्युच्युअल फंड सही है?

Submitted by अतरंगी on 5 October, 2020 - 15:09

आजमितीला मध्यमवर्गीय माणसाकडे असलेले विविध गुंतवणुकीचे पर्याय दिवसेंदिवस कमी होत आहेत. FD चे रेट ५ ते ६ टक्क्यात आले आहेत आणि महागाई त्याच्यापेक्षा जास्त पटीने वाढत आहे. FD मध्ये पैसे ठेऊन निवांतपणे व्याजावर दिवस काढणे अतिशय अवघड होता जाणार आहे. विशेषतः शहरात राहणाऱ्या लोकांना त्याची जास्त झळ बसते, बसणार आहे. 

तुम्हालाही डिप्रेशन आलंय का?

Submitted by ताजे प्रेत on 22 September, 2020 - 13:31

गाभा:
तुम्हालाहीडिप्रेशनआलंय_का?
**

प्रचंड निराशेनं ग्रासल्यावर म्हणजे डिप्रेशनमध्ये गेल्यावर ५३ वर्ष वयाच्या रमेशने एका समुपदेशकाची भेट घ्यायचं ठरवलं. त्यानं शहरातील एका नामांकित समुपदेशकांना फोन करुन त्यांची अपॉईन्टमेन्ट घेतली. ठरलेल्या दिवशी दिलेल्या वेळेतच रमेश समुपदेशकांकडे पोहोचला. समुपदेशकांना भेटून त्यानं आपली बेहाल अवस्था वर्णन केली आणि "मी सध्या प्रचंड निराशेनं ग्रासलो आहे, त्रासलो आहे" असं स्पष्टच सांगीतलं.
रमेशचं बोलणं समुपदेशकांनी लक्षपूर्वक ऐकून घेतलं होतं.

आताच्या परिस्थितीमधे गुंतवणुकीला सुरक्षित कसे ठेवावे?

Submitted by sneha1 on 21 September, 2020 - 15:16

मंडळी,
Covid मुळे मार्केट volatile झालेले आहेच. गेले चार दिवस तर चागलेच डाऊन आहे. त्यात आता अमेरिकेत निवडणूक जवळ येते आहे. Recession ची पण शक्यता आहे. अशा वेळी आपल्या गुंतवणुकी कशा सांभाळाव्यात? जसे म्युचुअल फंड्स, IRA, 401 K वगैरे सगळे?
धन्यवाद!

शब्दखुणा: 

Index investing

Submitted by अतरंगी on 10 September, 2020 - 04:40
index investing

मी गेले काही महिने मी सातत्याने शेअर मार्केट मध्ये वेगवेगळ्या कालावधी साठी गुंतवणूक कशी करावी या विषयी वाचन आणि अभ्यास करत आहे. सगळ्यात अवघड प्रकार म्हणजे वेल्थ क्रिएशनच्या दृष्टीने दीर्घकालीन गुंतवणूक कशी आणि कुठे करावी. त्यासाठी  सर्वात उत्तम मार्ग म्हणजे चांगले  fundamental असलेली कंपनी अभ्यास करून निवडणे आणि त्यात दर महिन्याला काही रक्कम टाकत राहणे. पण स्ट्रॉंग  fundamental असलेली कंपनी निवडणे आणि त्यात उतार चढाव होत असताना संयम बाळगून शांत बसून राहणे हे प्रत्येकाला जमेलच असे नाही.

सोन्याची किंमतीत अमेरिकन व युरोपियन मार्केटची भर..

Submitted by विश्वजीत बा. म्हमाणे on 1 August, 2020 - 14:48

विषय - सोन्याची किंमतीत अमेरिकन व युरोपियन मार्केटची भर
लेखक - विश्वजीत बाबुराव म्हमाणे

प्रधानमंत्री आवास योजना LIG आणि वैवाहिक स्थिती.

Submitted by भैया पाटील on 8 July, 2020 - 02:24

तर झालंय असं कि
१. मी PMAY (प्रधानमंत्री आवास योजना) च्या LIG म्हणजे light income ग्रुप (वार्षिक उत्पन्न तीन ते सहा लाख) मध्ये येतो.
२. माझं लग्न ठरलंय, डिसेंबर २०२० मध्ये लग्न होईल.
३. सध्या मी एक घर बुक केलंय (कार्पेट एरिया : ६७४ स्क्वेअर).
४. माझ्या नावावर/ होणाऱ्या बायकोच्या नावावर कोणतीही मालमत्ता नाही.

Pages

Subscribe to RSS - गुंतवणुक