प्रधानमंत्री आवास योजना LIG आणि वैवाहिक स्थिती.

Submitted by भैया पाटील on 8 July, 2020 - 02:24

तर झालंय असं कि
१. मी PMAY (प्रधानमंत्री आवास योजना) च्या LIG म्हणजे light income ग्रुप (वार्षिक उत्पन्न तीन ते सहा लाख) मध्ये येतो.
२. माझं लग्न ठरलंय, डिसेंबर २०२० मध्ये लग्न होईल.
३. सध्या मी एक घर बुक केलंय (कार्पेट एरिया : ६७४ स्क्वेअर).
४. माझ्या नावावर/ होणाऱ्या बायकोच्या नावावर कोणतीही मालमत्ता नाही.

मी वाचलंय त्यानुसार LIG मध्ये येणाऱ्यांना pmay चा फायदा घ्यायचा झाल्यास सह-अर्जदार म्हणून स्त्री सदस्याची (बायकोची) आवश्यकता आहे. घराची बुकिंग रक्कम भरली असून अग्रीमेंट करतानाच विवाह झालेला असणे आवश्यक आहे का? कारण विवाह इतक्या लवकर होऊ शकणार नाही. एखादे प्रतिज्ञापत्र वगैरे करून सध्या वेळ मारून नेता येऊ शकेल का? इतर काही मार्ग आहेत का या संदर्भात? इथल्या कुणी ह्या स्कीमचा उपयोग केला आहे का?

Group content visibility: 
Use group defaults

Bayko ajun zali nahi tar swatachya aaiche naav ghalu shakata. Aamchya olakhit eka natevaikane unmarried mulasathi flat ghetana kele hote. Baykoche naav nantar pan add karata yete.

नाही मिळत,

बायको नसेल तर आईचे चालू शकते

माझ्या माहितीनुसार आई हि आपल्या वडिलांच्या कुटुंबाचा भाग समजल्या जाते, आणि वडिलांच्या किंवा आईच्या नावावर आधीच प्रॉपर्टी- म्हणजे जमीन किंवा घर असेल तर आईला को- एप्लिकेन्ट नाही करता येणार.