Submitted by sneha1 on 21 September, 2020 - 15:16
मंडळी,
Covid मुळे मार्केट volatile झालेले आहेच. गेले चार दिवस तर चागलेच डाऊन आहे. त्यात आता अमेरिकेत निवडणूक जवळ येते आहे. Recession ची पण शक्यता आहे. अशा वेळी आपल्या गुंतवणुकी कशा सांभाळाव्यात? जसे म्युचुअल फंड्स, IRA, 401 K वगैरे सगळे?
धन्यवाद!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तहान लागल्यावर विहीर खंदू नये
तहान लागल्यावर विहीर खंदू नये. वय, लक्ष्य, व जोखीम घेण्याची वृत्ती इ. घटक लक्षात घेवून पोर्टफोलियो जर व्यवस्थित बनवलेला असेल तर सध्या फार काही न करणे इष्ट. नाहीतर योग्य ते आर्थिक सल्लागार गाठून बदल करावे (उदा: रॉथ कन्व्हर्जन).
अजून एक वर्ष सामाजिक, आर्थिक उलथापालथ चालू रहाणार आहे. ते लक्षात घेता सध्या आर्थिक आवक असेल तर इमर्जन्सी फंड्/आपत्कालीन पूंजी अधिक बळकट करावा.
सीमंतिनी +१
सीमंतिनी +१
पुंजी असेल तर रिस्की बेट्स लावायचा विचार करू शकता.
https://www.bogleheads.org
https://www.bogleheads.org/forum/viewtopic.php?f=10&t=79939
I read the first post at this link if I feel the compulsion to do something when the market is down. It was made in 2011 but the content applies anytime including today.
धन्यवाद, सीमंतिनी, अमितव आणि
धन्यवाद, सीमंतिनी, अमितव आणि त्रिशंकू.
त्रिशंकू, लिन्क बघते मी.
अमेरिकेन टेक कंपन्या आजुनही
अमेरिकेन टेक कंपन्या आजुनही खाली येण्याची शक्यता आहे. अॅपल , गुगल, फ़ेसबुक ई. कंपन्याचा P/E ३० पेक्षा जास्त आहे. ह्या कंपन्याचे भाव आशियातिल. गुंतवणुकीमुळे आणि सट्टेबाजी मुळे वर गेला आहे. तर ह्या स्टॉक मध्ये जप्नुन गुंतवणुक करणे. काही दिवसापुर्वी Softbank ह्या जापनीज बॅकेने अमेरिकन स्टॉक मध्ये सट्टा खेळुन ४ बिलियन डॉलर गमवले आणि स्वताची आर्थिक स्थिति सुधारण्यासाठी arm नावाची कंपनी विकावी लागली.
401k , म्युचुअल फंड्स चालु रहु देणे उत्तम. जर एखाद्या फंड मध्ये जास्त फायदा झाला असेल तर ते काढुन घेणे. ४०१क diversified नसेल तर ज्यात खुप फायदा झाला आहे तो फंड थोडा कमी करुन दुसर्या फंड मध्ये टाकणे.
पण वर दिलेल्या सल्ले प्रमाणे इमर्जन्सी फंड् बाजुला ठेउनच गुंतवणुक करणे. ४०१क मध्ये कंपनी मॅच करत असल्यास चालु ठेवावा.
मला नेहमीच एक प्रश्न पडलेला
मला नेहमीच एक प्रश्न पडलेला असतो.
समजा तुम्ही १०० डॉलर्स म्युच्युअल फंड/ ४०१ के अशा ठिकाणी गुंतवले. चार पाच वर्षांनी ते १३० झाले. तर, जेव्हा मंदी येते, तेव्हा खालील पैकी कोणता पर्याय चांगला?
१) ते आहे तसे राहू द्या. मार्केटबरोबर कमी होतील आणि जेव्हा सगळे सुरळित होईल तेव्हा पुन्हा वाढतील.
२) ते काढून दुसर्या सुरक्षित अशा ठिकाणी, म्हणजे साधी सीडी किंवा अगदी conservative funds अशा ठिकाणी हलवावे, आणि परिस्थिती सुरळीत झाली की पुन्हा इन्व्हेस्ट करावे.
मला प्रश्न असतात, पण त्यांचे उत्तर येण्याइतके ज्ञान नाही
धन्यवाद साहिल. आताच तुमची
धन्यवाद साहिल. आताच तुमची पोस्ट बघितली.
खालील पैकी कोणता पर्याय
खालील पैकी कोणता पर्याय चांगला?
= >> हे तुमचे वय, ध्येय आणि गुंतवणूकीतील अनुभव किती ह्यावर अवलंबून आहे.
निवृत्ती वेतनासाठी गुंतवणूक असेल आणि अजून निवृत्त व्हायला २५-३० वर्षे असतील तर पर्याय १ चालेल. पण पर्याय २ करायचा असेल तर आधी "रिबॅलन्सिंग" बद्दल वाचून बघा. ते दर वर्षी/ठराविक बदल घडल्यावर (उदा: ५% वाढ्/घट) करावे लागते. केले असेल तर सामान्य गुंतवणूकदाराला अशा उलथापालथीच्या काळात फार काही करावे लागत नाही.
(मी तज्ञ नाही, तज्ञ व्यक्तीकडे जावे इतका मोठा पोर्टफोलियो ही नाही. त्यामुळे मी लिहीलेलं मनावर घेऊ नका. इतर कुणी "रिबॅलसिंग" बद्दल काही लिहीले/दुवे दिले तर बरे होईल. स्नेहा१ ह्या धाग्यासाठी धन्यवाद. )
सीमंतिनी, माझा पोर्ट्फोलिओ पण
सीमंतिनी, माझा पोर्ट्फोलिओ पण काही मोठा नाही, आणि मी तज्ञ तर बिलकुलच नाही
पण तुमची पोस्ट वाचूनच कळते की तुम्हाला चांगली माहिती आहे !
ते लेखन कौशल्य झालं, गुंतवणूक
ते लेखन कौशल्य झालं, गुंतवणूक कौशल्य नाही. थांब जरा, देईल इथे कुणीतरी माहिती.
खोखो: खो खो
:-))
आपंण सर्व जण अमेरिकेतील
आपंण सर्व जण अमेरिकेतील गुंतवणूकींबद्दल बोलत आहात.
भारतातील परिस्थिती बद्दल काय सल्ला द्याल?
उदा. खाजगी कंपन्यांची एफ डी ( श्रीराम फायनान्स, महिंद्र, बजाज फायनान्स) इ.
म्युच्युअल फंड्स, सरकारी ७.४५ % बॉन्ड्स, पोस्ट ऑफिस सिनियर सिटिझन्स स्कीम इ.
भारतातील शेअर बाजार पण खुप
भारतातील शेअर बाजार पण खुप जास्त वर आहे. सगळ्या कंपन्याचे P/E पण खुप जास्त आहे. मार्केट मध्ये थोडे करेक्सन झाले आहे. पण तरी देखिल खुप जास्त आहेत. सरकारी बॉड , पोस्ट ऑफिस सिनियर सिटिझन्स स्कीम इ. चांअग्ले वाटतात. Index 11000 च्या खाली आल्यास माझ्या मते वाढीला स्कोप आहे.
कुठल्या सरकारी बॉड मध्ये ७.४५% मिळतात ते सांगाल का ?
माझ्या माहितीनुसार पोस्ट ६.८%, RBI Bond ७.१५% (floating जो कमी जास्त होउ शकतो ) आणि येस बॅक सिनियर सिटिझन्स ७.७५% हे सगळ्यात जास्त व्याज दर आहेत.
खाजगी कंपन्यांची एफ डी मध्ये RBI न्चे नियंत्रण कमी असल्याने धोका असतो. पण त्यातल्या त्यात बजाज फायनान्स आणी HDFC ह्या कंपन्या फायद्यात असल्याने आणि NSE main index मध्ये असल्याने सध्या यात जोखिम कमी आहे. पण ह्या कंपन्यात मर्यादित पैसे गुंतवावेत
भारतात
भारतात
Ppf - 7.1 %
NPS - 9 to 12%
पण हे लॉंग टर्म आहेत
Bank FDs - 6 - 7%
One good trade 20%-30%
One good trade 20%-30% returns (with 10x leverage) in 5 min.
भारतातील परिस्थिती बद्दल काय
भारतातील परिस्थिती बद्दल काय सल्ला द्याल?>>>>
https://www.maayboli.com/node/76601
रिक्षा....