दिर्घकालीन गुंतवणूकीसाठी कोणते शेअर्स घ्यावेत?

Submitted by अतरंगी on 24 March, 2020 - 14:49

शेअर मार्केटशी ओळख झाल्यापासून मी हर्षद मेहता स्कॅम, २०००,२००८ मधे पडलेले मार्केट त्यानंतर मार्केटने घेतलेली भरारी याबद्दल ऐकत आलो आहे. मी मार्केट मधे आल्यापासून मी मार्केट वर जातानाच बघीतले होते. या मार्च मधे पहिल्यांदा मार्केट पडणे काय असते ते अनुभवता आले. याची देही याची डोळा दोन वेळा लोअर सर्किट लागल्याचे पहायला मिळाले.

मार्केट पडायला लागल्यापासून सगळीकडे एकच चर्चा चालू आहे की लाँग टर्म साठी कोणते शेअर्स घ्यावे, कुठे गुंतवणूक करावी? मला लाँग टर्म, फंडामेंटल अ‍ॅनेलेसिस मधले काहीच कळत नाही. शेअर मार्केटची ओळख झाली तेव्हा वेगवेगळे ratios , Balance Sheet या विषयी वाचले होते. पण आता त्यातले फारसे काही लक्षात नाही.

या महिन्यात पडलेल्या मार्केटने चांगल्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. मार्केट ३ महिन्यात जवळ जवळ ३६ टक्के पडले आहे. बरेच चांगले स्टॉक्स खाली आले आहेत. शेअर मार्केट मधे फारसे काही न कळणारे आमच्या सारखे सामान्य लोक संभ्रमात आहेत. पडणार्‍या मार्केट मधे वेगवेगळे मत प्रवाह ऐकू येत आहेत. मार्केट अजून पडेल, निफ्टी ५५०० ते ६००० च्या घरात गेल्यावर खरेदी करावी, मार्केट चा तळ ( बॉटम ) अचूक सापडणे अवघड असते आता पासूनच थोडी थोडी खरेदी करत रहा, कधीही बँक्सचे/ FMCG सेक्टर मधील कंपन्यांचे शेअर्स घ्यावे ते लवकर वर येतात, मागच्या रॅली मधे जे शेअर्स मार्केट वर घेऊन आले तेच या वेळेस पण चालतील असे नाही, आता ऊगीच हातातले पैसे मार्केट मधे टाकू नका, सगळ्या अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या बेतात आहेत, मंदी आली तर अवघड परिस्थीती येईल वगैरे वगैरे....

जितके लोक तितके मत प्रवाह. माझे स्वतःचे मत असे झाले आहे की आता खरेदीला सुरुवात करावी. पण स्टॉक्स कोणते घ्यावे हे मात्र ठरत नाही Lol

माबोवर मार्केट संबंधीत ज्ञान असणारे, काम करणारे बरेच आहेत. त्यांचे सध्याच्या मार्केट बद्दल मत काय आहे ? गुंतवणूक कुठे करावी, कोणते स्टॉक्स चांगले किंवा चांगले स्टॉक्स कसे शोधावे, कसे शॉर्टलिस्ट करावे, कोणत्या Price range मधे खरेदी करावी, या बद्दल त्यांच्याकडून माहिती व मार्गदर्शन हवे आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी अभ्यासत असलेला पहिला मार्ग.

www.screener.in वरुन zero debt असलेल्या कंपन्या शोधल्या. ६३१ आल्या.

त्यात ROE, ROCE, ROIC above 15 , mkt cap above 1500 cr हे अ‍ॅड केले. ३१ कंपन्या आल्या. आता त्या एक एक करुन बघत आहे. त्याच वेब साईट वर दिलेले त्याचे pros and cons बघतोय.

ते झाले की marketsmojo या वेबसाईटवर जाऊन तेच सर्व स्टॉक्स परत बारकाईने पाहणार.

स्क्रीनर कसा लावलात?>>

screener.in वर गेलात की तिथे screens हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केले की उजव्या बाजूला new stock screen दिसेल.

तिथे मग तुम्हाला वेगवेगळे ratios वापरुन स्क्रिन करता येईल.

त्या 31 कोणत्या कंपन्या आहेत?>>>>>>

new stock screen मधे गेलात की

Return on capital employed >15 AND
Average return on capital employed 3Years >15 AND
Average return on capital employed 5Years >15 AND
Average return on capital employed 7Years >15 AND
Average return on capital employed 10Years >15 AND
Return on equity >15 AND
Average return on equity 3Years >15 AND
Average return on equity 7Years >15 AND
Average return on equity 10Years >15 AND
Average return on equity 5Years >15 AND
Return on invested capital> 15 AND
Market Capitalization >1500 AND
Debt to equity =0

ही क्वेरी टाकून तुम्हाला ३१ स्टॉक्स मिळतील.