शिक्षण

दोन टोकाच्या बुद्धिमत्तेच्या मुलांना कसे वाढवावे

Submitted by प्रचिती on 10 December, 2018 - 03:23

माझ्या मुलीचा आयक्यू कमी आहे. तिला mild प्रमाणात dislexia आहे. त्यामुळे ती अभ्यासात मागे पडत आहे.
तर धाकटा मुलगा हुशार आहे. ग्रासपिंग पॉवर चांगली आहे. थोरलीचा आक्रस्ताळेपणा बघून वयाच्या मानाने जास्तच समजूतदार बनला आहे.
मला थोरलीकडे जास्त लक्ष द्यावे लागते. पण त्यामुळे धाकट्याकडे दुर्लक्ष होते अशी गिल्टी फिलिंग येते.
त्याच्या हुशारीमुळे त्याचे सगळीकडे कौतुक होते, घरात नाही पण बाकीचे अजाणता करतातच. पण ते लेकीला सहन होत नाही. ती त्याचा jealous करते खूप.
तिच्यासमोर मला त्याचे लाड /कौतुक करता येत नाही.

Bhangda ( panjabi) dance कोणत्या गाण्यांवर basavava?

Submitted by Mi Patil aahe. on 6 December, 2018 - 00:33

5/6 varshachya mulancha bhangda dance kontya bollywood ganyavar basavava v kasa?
इथे मी फक्त माहिती विचारली आहे.
माहिती देता आली तर द्या.मायबोली ला तुम्ही इतके कमी लेखता का, की अशा प्रकारच्या माहिती
मायबोलीवर,मायबोलीकर देऊ शकणार नाही, असे नाही ना!!! मग जमेल तशी माहिती द्या!
अर्थात ते प्रत्येकाला जमणार कसे? म्हणजे
(एखाद्याला सविस्तर माहिती देणं/मार्गदर्शन करणं वा मार्गदर्शक बनणे अन् कुणालाही भांगडा येणं किंवा शिकवणं-------)

मार्क्स यांना बुद्धी देवो

Submitted by Nayan@144 on 8 October, 2018 - 06:29

मानवीय समाजामध्ये विचारधारा हि लहानपणा पासून रेखाटली जाते, यामध्ये त्या निरागस चेहऱ्याचा काहीही दोष नसतो. कोणाचे विचार कितपत योग्य किंवा वाईट आहे याचे मापदंड नको ठरवायला. भारतामध्ये सद्या ‘लाल सलाम’ च्या घोषणा जोर-जोरात सुरु आहे आणि JNU च्या प्रसंगा नंतर त्या￰￰ला अत्त्याधिक पाठिंबा मिळाला . यामध्ये सर्वाधिक हे विध्यार्थी दशेतील तरुण होते. ते नैसर्गिकच आहे कारण जेव्हा पण मार्क्स यांचं नाव ऐकायला येते तेव्हा धमन्यांतील रक्त खळवंडल्या शिवाय राहणार नाही . मार्क्स यांचं व्यक्तिमत्व अत्त्यंत प्रभावशाली आणि संघर्ष्याच्या लेखणी मधून उभरून आलय.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

मायबोली गणेशोत्सव २०१८ - माझी युक्ती (उपक्रम)

Submitted by संयोजक on 14 September, 2018 - 02:13

आजकालची लहान लहान मुले भलतीच स्मार्ट, आपण त्या वयात होतो तेव्हा आपल्याला जितकं कळत होतं त्याच्या पाच पावलं पुढे आजची पिढी आहे. त्यांना असलेल्या शंकाना, प्रश्नांना उत्तरे देताना आपलयालाच नाकीनऊ येतात. प्रत्येक वेळेस मुलांना एखादा विषय सोप्प्या आणि समजणार्‍या उदाहरणातून शिकवणारे शिक्षक पण आजकाल कमी होत चालले आहेत. अशा वेळेस आपल्यालाच पालक म्हणून ही जबाबदारी उचलावी लागते. मुलांना शिकवता शिकवता अनेक गोष्टी आपण सुद्धा शिकत असतो. एखादी संकल्पना, विषय शिकवताना आपल्याला अनेकदा सोप्प्या पद्धती सापडतात ज्या कोणत्याही पुस्तकात, पाठ्यक्रमात दिलेल्या नसतात.

स्मार्टफोन

Submitted by अतुल असवले on 18 August, 2018 - 09:40

सकाळी 7 चा मोबाईल गजर वाजला विवेक ने डोळे बंद ठेवूनच तो बंद केला ह्याला कला म्हणावी की सवय पण ठीक आहे ना माणूस वेळेवर काम करू लागला. विवेक उठला मोबाईल घेतला आणि त्याला सलाईन लावायला घेऊन गेला म्हणजे चार्जिंग ला माणूस एक वेळेस स्वतः पाणी पिण्याचे विसरेल पण मोबाइल ला चार्जिंग लावायला नाही.

जिंदगी

Submitted by कल्पेश. on 12 July, 2018 - 07:51

आज संकष्टी म्हणून
उपवास होता बिचाऱ्याचा
गर्लफ्रेंडच्या किसमुळे
मोडला तो जर
काय दोष आता त्या
समुद्र किनाऱ्याचा

दोस्ताची पार्टी म्हणून
दोन पेग ज्यादा मारले
गळ्यात गळे घालून
नंगे फोटो व्हायरल झाले
इज्जतीचा पंचनामा करून
आता रे पोलिसांचे पाय धरले

पॉकेटमनी पुरेना म्हणून
भुरटेगिरी सुरु केली
सीसीटीव्हीत पकडला तेव्हा
बोलती का रे तुझी
अशी बंद झाली

मैत्री शाळा – मेळघाट २०१८ –१९ मैत्री गणित विज्ञानाशी

Submitted by हर्पेन on 9 July, 2018 - 05:14

नमस्कार मंडळी

मैत्रीची सुरुवात मेळघाटातल्या कुपोषण निर्मूलन आणि आरोग्य विषयक कामांपासून झाली असली तरी गेली काही वर्षे आपण मेळघाटातल्या शाळा आणि मुलांचे शिक्षण सातत्य या मुलभूत बाबींकडे आवर्जून लक्ष पुरवत आहोत.

पुण्यातील या शिक्षणसंस्थेतील पीडीत विद्यार्थ्यांसाठी काही करता येणे शक्य आहे का ?

Submitted by मधुरांबे on 4 July, 2018 - 12:48

पुण्यातील एका खासगी शाळेबाबतची बातमी भयंकर आहे. बातमी ज्या प्रमाणे विविध वाहीन्यांवरून समोर येतेय त्यावरून तरी प्रथमदर्शनी तुघलकी फर्मान काढून पालकांना आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरल्याचे दिसून येत आहे. या अटी भयानक आहेत. आणि जर पाळल्या नाहीत तर पोलीसी कारवाई करण्याची धमकी दिलेली आहे.

खालील लिंकवर आपण पाहू शकता.
https://www.facebook.com/abpmajha/videos/10160779103170271/

आजच्या घडीला आपल्याकडेजी आहे ती शिक्षण पद्धती ( EDUCATION SYSTEM ) आहे कि परीक्षा पद्धती (EXAMINATION SYSTEM)आहे.

Submitted by अदित्य श्रीपद on 30 June, 2018 - 10:25

९८१ भागिले ९ किती होतात रे? कंपनीत आमच्या सेक्शनमध्ये नव्यानेच जॉईन झालेल्या ट्रेनी पोराला विचारले. कितीही वेळ लागुदे, मनात कर किंवा कागदावर. पण calculator, कॉम्प्यूटर किंवा इतर कुणाची मदत नाही घ्यायची.स्वत;चे स्वत: करायचे. ( डिप्लोमा-ट्रेनी म्हणजे डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला आहे हा पोरगा.)
“ह्या! त्याची काय गरज आहे? ९८१ भागिले ९ ना... सोप्पे तर आहे उत्तर ९९.”
मी शांतपणे म्हटले “कागदावर कर. तुला हवा तेवढा वेळ घे. म्हटलंय ना...”

विषय: 

Pages

Subscribe to RSS - शिक्षण