टॉप सिक्रेट अमेरिका

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

सप्टेंबर ११ नंतर अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षायंत्रणेतील बदल, वाढलेले बजेट, अनेक एजन्सीज, त्यांच्यासाठी काम करणार्‍या कंपन्या याबद्दल रोचक माहिती देणारी मालिका वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रसिद्ध होत आहे.वॉशिंग्टन पोस्ट्च्या काही पत्रकारांनी गेली २ वर्षे काम करुन 'टॉप सिक्रेट अमेरिका' प्रोजेक्टमधली माहिती गोळा केली आहे.

मुख्य पान-
http://projects.washingtonpost.com/top-secret-america/

काल यातला पहिला लेख आला होता.
A hideen world growing beyond control

हा दुसरा-
National Security Inc.

तिसरा लेख
The Secrets Next Door

वॉशिन्ग्टन आणि जवळपासच्या भागातील इकॉनॉमी, नोकर्‍या, माणसे, कल्चर याच्याशी थेट संबंधित आहे. इथे कोणाला इंटरेस्ट असल्यास वाचता यावे म्हणून ही माहिती आणि लिन्क्स देत आहे.

फोटो गॅलरीज ,व्हिडिओज, इन्टरॅक्टिव्ह ग्राफिक्स, मॅप्स इ. भरपूर गोष्टी त्या साईटवर आहेत. उद्याचा लेख आला की मी लिन्क देईन पण तिथल्या मुख्य पानावरच्या मधल्या कॉलममध्ये ते तारखेप्रमाणे लिन्क देतीलच.

मला दुसरा लेख इन्टरेस्टिन्ग वाटला. 'जनरल डायनॅमिक्स' चा केस स्टडी वाचण्यासारखा आहे. ७५० पेक्षा जास्त IT कंपन्या 'टॉप सिक्रेट अमेरिका' ला सपोर्ट पुरवतात. जॉब हवा असल्यास 'Find Companies' क्लिक करा. Happy

या प्रोजेक्टबद्दलची न्यू यॉर्क टाईम्समधली न्यूज -
http://mediadecoder.blogs.nytimes.com/2010/07/19/the-washington-post-aim...

प्रकार: 

लालु, छान लिंक दिलीये...बरच आहे वाचायला....निंवांत वाचीन...पण एकच गोष्ट खटकते...हे रिपब्लीकन्स नेहमी बिग गव्हर्नमेंट म्हणुन खडे फोडतात...पण ह्या सगळ्या गोष्टींमुळेच ९-११ नंतर ह्या देशात एकही घातपाती कारवाई होउ शकलेली नाही.....वायफळ खर्च वाचवावा वगैरे खरं आहे, पण गेल्या ९ वर्षाच्या होमलँड सेक्युरीटी चं क्रेडीट होमलँड सेक्युरीटी ला दिलंच पाहीजे....

झक्की, नाही.

विनायक, ९/११ नंतर बुशच्या काळातच म्हणजे रिपब्लिकन असतानाच या एजन्सीज फोफावल्या. आधी ज्या होत्या त्या स्वतंत्र काम करायच्या, एकमेकांशी माहिती शेअर केली जात नव्हती. त्यांना एका छत्राखाली आणायला होमलॅन्ड सिक्युरिटी डिपार्ट्मेंट आले. पण आता असं झालंय की अनेक एजन्सीज तेच काम करत आहेत, म्हणजे काम रिपीट होतंय. तसं होत असेल तर खर्च फुकट नाही का? खूप इन्फो मिळते ती सगळी पहायलाही वेळ नाही. बरेच काम काँट्रॅक्टर करतात. या काँट्रॅक्ट घेणार्‍या कंपन्या पैसा अक्षरशः ओढतात. आणि सुरक्षेचा प्रश्न असल्याने तिथे कोणी कपात करायला जात नाही. दुसर्‍या लेखात गेट्सच्या मुलाखतीचा भाग वाच.

>वायफळ खर्च वाचवावा वगैरे खरं आहे, पण गेल्या ९ वर्षाच्या होमलँड सेक्युरीटी चं क्रेडीट होमलँड सेक्युरीटी ला दिलंच पाहीजे....
हे जरी खरं मानलं तरी ती नाण्याची एक बाजू आहे.. paying the price for staying safe is the other side. या लेखात नेमके यावरच बोट ठेवले गेले आहे की जी किंम्मत मोजली जात आहे ती अवाजवी आहे. तो पैसा अमेरीकेच्या ईतर अंतर्गत सुधारणा व कार्यक्रमांवर खर्च केला जाऊ शकतो.
डेट्रॉईट च्या विमानात चढलेला अतिरेकी dhs मुळे नाही पकडला गेला हा मुख्ख्य मुद्दा आहे. as they say for an information it can be "garbage in- garbage out".
अजूनही ऊस्गावच्या बर्‍याच विमानतळावरील सुरक्षा तपासणी निव्वळ हास्यास्पद आहेत. बेसिकली लोकांच्या मनात अतीरेकी/गुप्त कारवाया/wmd च्या भितीचा बागुलबुवा पसरवून त्यावर पैसे ऊकळण्याचे हे सरकारी धंदे आहेत.
विरोधाभास पहा: तिकडे क्लिंटन बाई चक्क थेट बोलून आल्या- ओसामा आणि क. पाक मध्ये आहे, नव्हे ते कुठे आहेत हे पाक सरकारलाच ठाऊक आहे. एव्हडे थेट माहित आहे तर हा देखावा कशाला? त्याच्या नावाखाली अमेरिकेने चालवलेल्या आंतर्राष्ट्रीय कारवाया जोवर अमेरीकेच्या स्ट्रॅटेजिक हिताच्या आहेत तोवर हा भिकार्-सावकार खेळ अमेरिका चालू ठेवेल. एकदा त्यातला उद्देश संपला की रातोरात पाक ला कसे भिकारी करतात ते पहा. मग आहेच ईराण कडे कूच!
एकीकडे हे करायचे अन दुसरीकडे हे अंतर्गत सुरक्षा ढोंग पोसायचे- या contractors मध्ये किती अमेरिकन काँग्रेस मधले लोक गुंतले आहेत हे बाहेर आले की सर्व हिशोब स्पष्ट होईल.

असो. पुढचा लेख वाचायला ऊत्सुक.

आजच्या तिसर्‍या लेखाची लिंक वर टाकली आहे. मी अजून पूर्ण वाचला नाही. पण तिथे काम करणारे लोक, कम्युनिटीज, 'सिक्रेट' वाल्या बिल्डिन्ग्स इ. बद्दल 'सुरस कथा' ऐकलेल्या ओळखीच्या गोष्टी आहेत.

आज फॉक्स न्यूजवर सांगत होते की इतक्या एजन्सीमधून इतके रिपोर्ट बाहेर येतात की एकंदर पाच हजार रिपोर्ट होतात!! शोधा त्यातून खरे काय नि खोटे काय?
असे का? तर, जसे विमान एका इंजिनवर सुद्धा चालते, पण सुरक्षिततेसाठी दोन इंजिने असतात. तसेच 'कुठेहि काही नजरेखालून सुटू नये म्हणून एकापेक्षा जास्त एजन्सीच तेच काम करतात! '

शिवाय फॉक्स न्यूज असल्याने अपेक्षेप्रमाणे त्यांनी सांगितले की २००७ मधे डेमोक्रॅट्स आले, त्यांनी केले हे असे!

कोण म्हणतो लोकप्रतिनिधी लोकांच्या कल्याणाचा विचार करतात?

<एकीकडे हे करायचे अन दुसरीकडे हे अंतर्गत सुरक्षा ढोंग पोसायचे- या contractors मध्ये किती अमेरिकन काँग्रेस मधले लोक गुंतले आहेत हे बाहेर आले की सर्व हिशोब स्पष्ट होईल.>

ते नाही कधी बाहेर येणार. सर्व पक्षांचे हात यात गुंतलेलेच असतात. "अहो तुम्ही का विरोध करता? तुमच्या कंपनीला पण देऊ की एक काँट्रॅक्ट!" असे झाले की Bipartisan निर्णय होतो. मग 'I am a uniter, not divider' असे म्हणायला बुशबाबा मोकळा.

ओबामाने पण नवीन आरोग्यविमा कायद्यात रिपब्लिकनांना पण काही मिळेल असे केले की त्यांचा विरोध नाहीसा होईल.

सारा स्वार्थीपणा, पैशाचा कारभार. आपण फक्त बघत बसायचे. "If you can't beat them, join them".

काय उगाच लोक भारताच्या 'गरिबी हटाव' योजनेला नावे ठेवतात? बघा बरे, शरद पवार, लालू यांची गरिबी केंव्हाच 'हटवली'! इथेहि तसेच.

लालू, लिंक्स अतिशय इंटरेस्टींग आहेत. वाचून मग लिहीते. इथे टाकल्याबद्दल धन्यवाद.

योग, लालु, वायफळ खर्च टाळावा ह्यात दुमत असण्याचं कारणच नाही....पण नकळत मनात भारतीय आणि महाराष्ट्र सरकार च्या नाकर्ते पणाची आणि इथल्या ओवर रिअ‍ॅक्शन ची तुलना झाली आणि असं वाटलं की शेकडो लोकांचे प्राण वाचत असतील तर खर्च होणारच....सर्व एजन्सींमधे समन्वयाची आवश्यकता तर आहेच.....
योग, डेट्रॉईट च्या विमानात चढलेला अतिरेकी dhs मुळे नाही पकडला गेला हे मान्य आहेच...पण त्याच बरोबर इतर काही जण काही कारवाइ करु शकण्या आधी पकडले गेले आहेत...जसे तो टॅक्सी ड्रायवर...ते मिनेसोटातले नायजेरीया मधे गायब झालेले तरूण....

हे जरी खरं मानलं तरी ती नाण्याची एक बाजू आहे.. paying the price for staying safe is the other side. या लेखात नेमके यावरच बोट ठेवले गेले आहे की जी किंम्मत मोजली जात आहे ती अवाजवी आहे.>>अशी concrete statements नाही करता येणार रे कोणालाच. मूळात ह्या प्रकारांमूळे किती हल्ले टाळले गेले हे न कळेतो त्याचे valuation करता येणे कठीण आहे. आणि ते कळले तरी ह्या गोष्टी एव्हढ्या qualitative आहेत कि त्याचे मूल्यमापन कसे करणार हा प्रश्न आहेच.

या सर्वामागे मूळ सुरक्षा किंवा माहिती गोळा करणे किती महत्वाचे नि आपल्या नातेवाइकांच्या खोट्या कंपन्या काढून त्यांना बोगस काँट्रॅक्ट्स देऊन जनतेचा जास्तीत जास्त पैसा स्वतःच्या खिशात कसा घालता येईल, हे पहाणे, महत्वाचे?

माझ्या मते सुरक्षा व माहिती गोळा करणे हे दोन्ही उद्देश साध्य करायला इतक्या निरनिराळ्या एजन्सीज ची गरज नाही. कारण प्रत्येक एजन्सीजच्या हजार कर्मचार्‍यात अर्धे निव्वळ इकडचे कागद तिकडे करणारे नि मूळ कामाशी अजिबात संबंधित नसलेली इतर कामे करण्यात वेळ घालवणारी माणसे असतात. अर्थात् तश्या नोकर्‍या मिळवायला तुम्हाला सिनेटर किंवा काँग्रेसमनचे नातेवाईक असावे लागते. न्यू जर्सीतल्या अश्या एक दोन एजन्स्या मला माहित आहेत.

एव्हढे हार्वर्डचे नि एन वाय यू चे एम बी ए, त्यांना हे कळत नाही का? पण तसे नसतेच. अक्कल आहेच, फक्त तिचा दुरुपयोग, स्वार्थासाठी करायचा. कुणि प्रश्न विचारला की भीतीचा बागुलबुवा उभा करायचा!

जोपर्यंत एखाद्या गोष्टीवर भाराभर पैसे खर्च होत नाहीत, तोपर्यंत ते काम महत्वाचे समजले जात नाही. शिवाय भाराभर पैसे खर्च केले म्हणजे 'आम्ही काम केले' असेच समजतात.

You can't beat them, you have to join them'.