२४ तास मराठी बातम्या

Submitted by मित on 6 March, 2011 - 23:42

भारतात टेलिव्हिजन क्रांती झाल्यानंतर थोड्याच दिवसांत विविध वाहिन्यांचे अक्षरशः पेव फुटले. २४ तास बातम्यांची सुरुवात हिंदी-इंग्रजी वाहिन्यांपासून होऊन मग मराठी मध्ये पण झी-२४ तास, स्टार माझा अश्या वाहिन्या आल्या. पण यामधल्या बातमीदारांची आणि निवेदकांची उच्चारांची, व्याकरणाची काही तरी मुलभूत गोची आहे (काही सन्माननीय अपवाद वगळून) असे माझे मत झाले आहे.

काल-परवाचीच बातमी... बेहरामपाड्यात लागलेल्या आगीसंबंधी निवेदक आणि वार्ताहर यांच्यातील संवादः

नि: काय परिस्थिती आहे सध्या?
वा: ही जी आग लागलेली आहे, त्याचे कारण जे आहे ते अजून स्पष्ट नाही झालेले. इथले स्थानिक जे आहेत ... वगैरे...वगैरे
आता प्रत्येक बातमी देताना ही 'ज' ची बाराखडी का वापरावी ?

अजून एक खटकणारी गोष्ट म्हणजे, काही काही निवेदक तर चक्क अभिनय करतात बातम्या देताना.. काय गरज? खून, हिंसा किंवा तश्या स्वरुपाची बातमी असेल तर आता बातमी देता देता रडणार की काय असे वाटते. तसेच एखादी मॅच वगैरे जिंकली असेल तर ती बातमी देताना चेहर्‍यावर आनंदाच्या उकळ्या फुटताना चक्क जाणवतात.

याबाबतची माबोकरांची मते वाचायला आवडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दूरचित्रवाणीवरच्या बातम्यांचे चॅनेल बघू नये, बघायचेच झाले तर फक्त सरकारी दूरदर्शन बघावे असा धडा मी खूप आधीपासून घेतलाय.
मराठी वृत्तवाहिन्या तर लपवून ठेवल्यात. मागे एकदा 'इथे पाणीला जायला जागा नाही' असे दिव्य मराठी ऐकल्यापासून.

'आनी-पानी-लोनी' च्या चुका तर अतिशय सर्रास दिसतात... @भरत.. सह्याद्री ही खरच त्या बाबतीत आदर्श म्हणावी (अर्थात अनेक वर्षांत तिथल्या बातम्या बघितल्या नाहीत !)

माझी शंका अशी आहे की या गोष्टी मुलाखतीमध्ये बघत नाहीत का?
बर... नंतरसुद्धा रीतसर प्रशिक्षण देत नसतील का?

का फक्त TRP एवढाच मुद्दा महत्त्वाचा वाटतो यांना ?

* ग्रोस / किळस / संताप / असहाय्यता अलर्ट *

मी तर झी २४ तासवर 'प्रियकराने भोसकलेल्या मुलीचा' - 'ममी' झालेला, आणि तरीही पांघरूण रक्ताळलेला क्लिपचा शॉट पाहिल्यापासून नाव टाकलंय त्या न्युज चॅनल्सचे !!

किती अमानुषपणा ?? Angry

मध्यंतरी मी आइकले होते.....

१. "साक्शरता निर्मुलन".... (सह्याद्री)
२. भांडणाचे पुनर्वसन्............मारामारीत झाले. (लोकमत)

आता अजून काय राहिले.

मराठी वृत्तनिवेदक "संचालनालय" हा शब्द उच्चारतात तेव्हा तो ऐकायला मजा येते, आणि मग त्यांची कीव करावीशी वाटते!
मूर्ती चं अनेकवचन मूर्त्या वगैरे..

रच्याकने, इतर कार्यक्रमातही मराठीचा खूनच होतो!
"मला मदत कर" ऐवजी हिंदीतून सहीसही उचलून "माझी मदत कर", दर्शक-प्रेक्षकचा महान घोटाळा,
"तुम्हा सर्वांचं स्वागत" ऐवजी "तुमच्या सगळ्यांचं स्वागत.." तुमच्या सगळ्यांचं काय डोंबल स्वागत!!

जड मराठीच बोलायचं असं काही नसतं, साधं, सोपं, सुटसुटीत मराठी बोललेलं "प्रेक्षकांना" चालतं. ("दर्शकांना" चालत नसेल म्हणून ही गत झाली असेल! न कळे काय ते!!)

.

हल्लीच एका news चानेल वर पाकिस्तानी बोटींना आपल्या तटरक्षक दलाने पकडायचे कसे प्रयत्न केले वैगरे सांगत होती पण ती रिपोर्टर बोट, बोटी, बोटींना, ह्या शब्दासाठी एकच शब्द वापरात होती "बोट" उदा. बोटला, बोट ना Happy Happy Happy Happy Happy Happy Happy मला ती बातमी पाहताना हसायला येत होते.