भुते असतात का?
मायबोलीवर देवाधर्माचे भरपूर धागे आहेत. पण भुतावर एकही नाही. म्हणून हा धागा.. भुते खरोखरच असतात का? ती काही ठराविक लोकानाच का दिसतात? अतृप्त इच्छा राहिल्या तर भूत होते म्हणे. बहुतांश लोकांच्या इच्छा अपुर्याच रहतात.. मग या सगळ्या लोकांची भुतेच होतात का? भुतांचे कुणाला अनुभव आलेले आहेत का?
.............
जे जे भेटिजे भूत.. ते ते मानिजे भगवंत 
मुंज, मौंजीबंधन, व्रतबंध अथवा तत्सम नावांनी ओळखला जाणारा विधी करावा का? आणि का करावा?
'आपण' ('आपल्यात' हे करतात) आणि 'ते' ('त्यांच्यात' हे करत नाहीत; इथे एक विशिष्ट जात सोडून बाकी सर्व जाती आणि धर्म एकत्र 'त्यांच्या'त ढकलले जातात) असा फरक त्या कळत्या-नकळत्या वयातच मनावर बिंबवण्याखेरीज त्या विधीतून काय साध्य होते?
संक्रांतीचे वाण
संक्रांतीचे वाण देताना दिल्या जाणार्या वस्तूंची यादी.. सर्वाना संक्रांतीच्या शुभेच्छा.
मातीची बोळकी, हळद कुंकू, लोणी, खोबरेल तेल, तीळ, गूळ, तिळगूळ, उसाचे तुकडे, गाजर, कांद्याची पात, सोलाणा-हरबरा, हिरवा वाटाणा-मटार शेंगा, कापूस...

काहि दिवसापुर्वी धुंधुरमास हा शब्द कळला.हा नक्की कुठला महिना आहे ? पंचांगात हा महिना सापडला नाहि.क्रुपया माहिति द्या.
पंच महाभुत,
आपण पंचमहाभुतां बद्द्ल ऐकतो की सर्व सजिव व नि र्जिवांचे अधिष्ठान ही पंचमहाभुत आहेत.
ह्या विषयाला ईतके पदर आहेत की एकच पदर उलगडत न्यायलाच आयुष्य पुरणार नाही.
हस्तमुद्रा ही भारताची खुप प्राचिन व सर्वात महत्वाची देणगी आहे व ह्या हस्तमुद्रा ही पंचमहाभुता वर आधारीत असतात.
आज आपण पंच महाभुताचे हाताच्या बोटातील आधिष्ठान बघू !
हाताच्या पाच बोटा पैकी प्रत्येक बोटाला एका पंच महाभुताचे आधिष्ठान असते.
उदा. हाताचा आंगठा म्हणजे अग्नी महाभुत, प्रथमा म्हणजे वायु.
या महिन्यात १० तारखेला चन्द्रग्रहण आहे.ग्रहणात काहि खाउपिउ नये,जप करावा असे पन्चान्गात लिहिलेले असते.तसेच स्त्रियान्नि ग्रहण पाहु नये,सर्वान्नि जप करावा असे म्हणतात.हे खरे अस्ते का ? ग्रहण काहि राशिन्ना चान्गले अस्ते,काहिन्ना वाइट असे म्हणतात.तरि ग्रहणाविशयि पुर्ण माहिति द्या.
शनिवारी केस्,नखे कापू नयेत,नवीन काम सुरु करु नये,लोखंड घरी आणू नये असे काही पुस्तकात लिहिलेले असते.त्याचे कारण काय असेल?
साडेसाती
अजून काय लिहायचं? हे नावच इतकं महान आहे..
धार्मिक विभाग चाळत असताना लक्षात आले की इथे साडेसातीवर माहिती देणारा धागा नाही. म्हणून हा धागा उघडला. इथे साडेसातीबद्दल सगळी चर्चा असावी.
वैश्वदेव करणे म्हणजे काय? वैश्वदेव न करणार्या लोकांचा ( ब्राह्मणांचा) अनेक साधुसंतानी धिक्कार केला आहे, ते कसे करावे, कुणी, कुठे करावे? त्याने नेमके काय साध्य होते? ऋग्वेदात विश्वदेवांचा उल्लेख येतो, ते हेच का?
अमावास्या , नारळ आणि मनोविकार
अमावास्येला नारळ का फोडतात ? यामागचे धार्मिक कारण काय आहे?
तसेच या दिवशी लिंबु आणि मिरची गाडीला, घराला बांधायचीही प्रथा आहे.
अमावास्येला कोणतेही काम सुरु करु नये असे म्हणतात.. ते का? काही लोक ( उदा. दत्तपंथीय शंकर महाराज) अमावास्येला शुभ मानतात आणि नवे काम करावे असेही मानतात. असे का?
अमावास्या ( आणि पौर्णिमा) या दिवशी मानसिक विकार उफाळून येण्याचे प्रमाण जास्त आहे, असेही काही लोक मानतात, ते खरे आहे का?
( सर्व जिवंत आणि मृत व्यक्तीना सर्वपित्री अमावास्येच्या शुभेच्छा.)