अमावास्या , नारळ आणि मनोविकार

Submitted by जागोमोहनप्यारे on 26 September, 2011 - 10:18

अमावास्या , नारळ आणि मनोविकार

अमावास्येला नारळ का फोडतात ? यामागचे धार्मिक कारण काय आहे?

तसेच या दिवशी लिंबु आणि मिरची गाडीला, घराला बांधायचीही प्रथा आहे.

अमावास्येला कोणतेही काम सुरु करु नये असे म्हणतात.. ते का? काही लोक ( उदा. दत्तपंथीय शंकर महाराज) अमावास्येला शुभ मानतात आणि नवे काम करावे असेही मानतात. असे का?

अमावास्या ( आणि पौर्णिमा) या दिवशी मानसिक विकार उफाळून येण्याचे प्रमाण जास्त आहे, असेही काही लोक मानतात, ते खरे आहे का?

( सर्व जिवंत आणि मृत व्यक्तीना सर्वपित्री अमावास्येच्या शुभेच्छा.)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिव्यासकट उत्तरे वाचावीत अशी विनंती!

अमावास्येला नारळ का फोडतात ?>>>> नारळाचा दुसरा उपयोग मानवाला ज्ञात नाही.

यामागचे धार्मिक कारण काय आहे?>>>> अमावास्येला नारळ फोडणार्‍याला नारळ फोडताना 'मागचे' दिसत नाही त्यामुळे 'मागचे' कारण कोणीच सांगू शकणार नाही.

तसेच या दिवशी लिंबु आणि मिरची गाडीला, घराला बांधायचीही प्रथा आहे.>>>>

नेमकी अमावास्येच्या दिवशी घरातल्या भाजीच्या परडीत जागा उरलेली नसल्यास असे करतात.

अमावास्येला कोणतेही काम सुरु करु नये असे म्हणतात.. ते का? >>>> मी पितृपक्षात घराचे पेंटिंग सुरू केले आहे.

काही लोक ( उदा. दत्तपंथीय शंकर महाराज) अमावास्येला शुभ मानतात आणि नवे काम करावे असेही मानतात. असे का?>>>> अच्छा, त्याचमुळे आमच्या ऑफीसमधला एक जण फक्त अमावास्येलाच काम करत असावा.

अमावास्या ( आणि पौर्णिमा) या दिवशी मानसिक विकार उफाळून येण्याचे प्रमाण जास्त आहे, असेही काही लोक मानतात, ते खरे आहे का?>>>> होय, आमच्या मित्रवर्तुळातील एक स्त्री अमावास्येला विचित्र वागते. भांडणे काढते, रडते, सर्वांशी अबोला धरते, खोलीत जाऊन दार लावून बसते, नवर्‍याला वस्तू फेकून मारते. हे अमावास्येला होते. 'इतर तिथींना' काय होईल ते काही सांगता येत नाही.

( सर्व जिवंत आणि मृत व्यक्तीना सर्वपित्री अमावास्येच्या शुभेच्छा.)>>>> आपल्यालाही! मृत व्यक्ती येथे येऊन शुभेच्छा घ्यायला लागल्या तर जिवंत सदस्य थरथर कापतील असा एक बालिश विचार मनात आला.

(दिवे)

-'बेफिकीर'!

c.JPG

मा. जागोमोहनप्यारे

इतक्या गंभीर अन समाजाच्या ऐहिक अन अधिभौतिक वाटचालीवर व एकंदरीतच प्रगतीवर दूरगामी परिणाम करू शकणार्‍या, परंतू त्याच वेळी तितक्याच उपेक्षित अशा या प्रश्नाला तुम्ही सर्वपितरी अमावस्येच्या मूहूर्तावर हात घातलात, याबद्दल सर्वप्रथम मंडळातर्फे मी तुमचे हार्दिक अभिनंदन करतो!

मुळातच नारळ फोडणे हा विषय गहन अन गंभीर आहे. अमावस्येचा अंधार हा अतीव काळा असल्याने, नारळ फोडल्याचे कुणास समजून येत नसावे म्हणून अमावस्या ही नारळ फोडण्यासाठी वापरतात असे एक संशोधन मध्यंतरी प्रसिद्ध झाल्याचे वाचनात आले आहे. इतर दिवशी नारळ हा फोडत नसून 'वाढविला' जातो असेही नमूद केल्याचे आठवते.

आता नारळच का? अन तो ही शेंडी सकट का?

तर याचे उत्तर पूर्वी नरबळी देत असावेत त्यावरून नंतर नंतर नरबळी दिला तर देहांत शासन होईल म्हणून 'सरोगेट' नरबळी अशी युक्ती असावी. रक्ता सारखे पाणी, मांसासारखे खोबरे, फोडण्यासाठी क(र्)वटी, वर त्यात २डोळे अन १ मुख असावे असा दिसतो तो नारळ! ही नारळ फोडण्या मागची दुसरी थेअरी प्रचलित असल्याचेही ऐकिवात आहे.

(आता कुणी हमरीतुमरीने संपूर्ण फळ वगैरे कृपया सांगू नये. बाकी दुसरी फळे ही देता येतात. पण ती 'फोडून' दिल्याचे वाचनात / पहाण्यात / ऐकिवात नाही.)

अमावस्या ही एकंदरितच अघोरी, शाक्त पंथियांशी संबंधीत असल्याचे सर्वविदित आहेच. त्यामुळे या पार्श्वभूमीवर नारळाचा नरबळी हे संशोधन जरा जास्त खात्रिलायक वाटते. अघोरी, शाक्त इ. धर्माचेच प्रकार असल्याने हे धार्मिक कारण पुरेसे असावे असे वाटते. आता बळी देण्याचे कारण हे प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकते. (उदा. लिंबूकाका सुळी ऐवजी बळी जास्त prefer करतात.)

संकर काळात एकमेकांच्या प्रथा पद्धती सामावून घेण्याच्या काळात बहुधा हा अमावस्येला नरबळी प्रकार 'टोन्ड डाऊन' करून प्रतिकात्मक नारळ फोडून अघोरी पंथियांकडून घेतला गेला असावा, व तो आजही तसाच साजरा करीत असावेत. (या विषयावर अधिक संशोधन / काथ्याकूट पुढे होईलच.)

---

आता नारळ फोडलेलाच आहे, मग खोबरे आयते आहे. त्यात मिरची घालून मस्त लिंबू पिळून चटणी करावी या हेतूने तो मिरची लिंबू प्रकार असावा असे आमचे मत आहे.

---

वेगवेळे लोक, बहुधा कारागिर अमावस्येला काम बंद ठेवून सुटी साजरी करतात. कुणी घर बांधणे वगैरे केले असेल तर याचा अनुभव असेलच. तमाम डॉक्टर / सर्जन आदि मंडळींना मा़झी विनंती राहील की या दिवशी त्यांनीसुद्धा आपापली कामे बंद ठेवावीत. कारण शेवटि ते ही कारागिरच आहेत.

---
८:२४ वा. अमावस्या प्रारंभ झालेला असल्याने अन माझे उपरनिर्दिष्ट मौलिक विचार वाचूनच सर्वांनी अमावस्येस उफाळून येणार्‍या मनोविकारांबद्दल आपापले मत बनवावे ही विनंती.

क.लो.आ.

अमावास्येला सुर्य आणि चंद्र जवळ जवळ एका रेषेत असतात (शुन्य डिग्री) त्यामुळे पृथ्वीवर त्यातिथीला सर्वात जास्त गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते. याचा काही मानसिक विकारांशी संबंध असु शकतो.

फोटोमधे नारळ फोडलेले दिसत नाही आहे कारण फोडलेले ओबडधोबडच असते. नारळ फोडणे आणि नारळावर आधी एक बारिक काप (pre defined groove) तयार करुन नंतर त्यावर हलकीशी टिचकी मारुन दोन भाग वेगळे करणे यांत फरक आहे.

मन हे जरी दृष्य अंग नसले तरी एक सुश्म अंग आहे. त्यावर सभोवतालीच्या अनेक गोष्टींचा परिणाम होत असतो जसे मळभ आल्यावर उदास वाट्णे ई.

तसाच ईलेल्ट्रो - मेगनेटीक क्षेत्र, गुरुत्वाकर्षण यांचा देखिल परिणाम होतो. अर्थातच त्या व्यक्तीचे मन तेवढे संवेदनशील असायला हवे.

वज्र३००
नारळ 'वाढविताना' त्याच्या शेंड्या काढल्यानंतर जिथे फुटणे अपेक्षित आहे तिथे पाण्याने एक रेघ काढली तर असा सरळ रेषेत फुटतो असा अनुभव आहे.

(पाणी वाया जाउ नये म्हणून मी तो 'डोळा' भेदून आधीच पाणी काढून घेतो.)

अमावास्या ( आणि पौर्णिमा) या दिवशी मानसिक विकार उफाळून येण्याचे प्रमाण जास्त आहे, असेही काही लोक मानतात, ते खरे आहे का? >>>>>>>>>>>>>>>>. तुम्ही हे असले धागे नेमके पौर्निमा आणि अमावस्येला का काढतात...... Happy

( सर्व जिवंत आणि मृत व्यक्तीना सर्वपित्री अमावास्येच्या शुभेच्छा.)>>>> आपल्यालाही! मृत व्यक्ती येथे येऊन शुभेच्छा घ्यायला लागल्या तर जिवंत सदस्य थरथर कापतील असा एक बालिश विचार मनात आला. >>>>>>>>> Biggrin

आज अवस असल्याने, धार्मिक प्रश्नान्चे शन्कानिरसन करणे वर्ज्य आहे. Proud
आज दक्षिणा घेणे देखिल वर्ज्य असल्याने शन्कानिरसन केल्यावरच दक्षिणा पाठवुन देणे ही नम्र विनन्ती.
अ‍ॅडव्हान्स मधे दक्षिणा घेण्याची आमची पद्धत नाही.
आमच्या सगळीकडे, अगदी जाल तिथे, शाखा आहेत. Wink

थोडे शीर्‍यस
पूर्वी पाठशाळा, कार्यशाळा असायच्या तेव्हा(इंग्रजी अंमल येण्यापूर्वी) दर सात/आठ दिवसांनी सुट्टी असायची. अमावास्या,पौर्णिमा आणि अष्टमी. 'अष्टम्यां अनध्यायः' अष्टमी ही तिथी सुद्धा काही लोक अशुभ तर काही अत्यंत शुभ मानतात.
(कुठल्याही कार्यारंभी आणि अमावास्येला) नारळ फोडण्याची प्रथा ही प्राचीन काळच्या नरबळी प्रथेचा अवशेष आहे. नारळ हे मानवी मस्तकाचे प्रतीक मानले आहे. कोप्रा/खोबरे/खोबडी/खोपडी/कवड/कवटी हे शब्द तेच सुचवतात. आपल्यावर येणारं/येऊ शकणारं/येऊ घातलेलं संकट दुसर्‍या कुणावर जावं आणि आपलं संकट टळावं ही भावना त्यामागे असते. अशाच रीतीने कोहाळाही फोडतात. आणि हो, नारळ किंवा कोहाळा हा फोडायचाच असतो, 'वाढवायचा' नसतो.आपण कुंकू,बांगड्या ह्यांच्या बाबतीत वाढवणे किंवा अधिक होणे हा शब्द वापरतो. याचे कारण कुंकू पुसणे,बांगडी फुटणे हे आपण अशुभसूचक समजतो.कुंकू, बांगड्या ही सौभाग्य लक्षणे आहेत.ती नाहीशी होणे म्हणजे सौभाग्याचा नाश होणे. पण नारळ फुटण्याच्या क्रियेत अशुभसूचक असे काहीच नाही. उलट ती क्रिया शुभसूचक आहे कारण त्याद्वारे,प्रतीकात्मक रीत्या का होईना, संकट टाळले किंवा पिटाळले जाते.
यामुळेच जुन्या मराठी साहित्यात 'मुहूर्ताचा नारळ फुटला' असे शब्दप्रयोग आढळतात.

...

अमावस्या आणी पौर्णिमा या तिथीना कर्क राशीच्या आणी ज्यांचे नक्षत्र चंद्राचे आहे ( म्हणजे वृषभेतील रोहिणी, कन्येतील हस्त, मकरेतील श्रवण इ. ) किंवा ज्यांच्या पत्रिकेतील चंद्र बिघडलाय असे लोक आणी गोचरीने येणारा अशुभ चंद्र असेही लोक फार विचित्र वागतात. गोचरीचा चंद्र म्हणजे त्या दिवशी त्यांच्या राशीला येणारा ६ वा, ८ वा किंवा १२ वा चंद्र. मग या लोकांची अवस्था उदास, चिडकी, सनकी अशी असते, कारण त्या दिवशी यान्चे एकतर घरी दारी कुणाशी तरी बिनसलेले असते नाहीतर कामच झालेले नसते. आनी मुळातच चंद्र बिघडलेला असेल तर अशी माणसे अती हळवेपणामुळे हिस्टेरीक वागतात. तळहातावर जर मस्तक रेषा चंद्र पर्वताकडे अती झुकलेली असेल तर अशी निराशावादी माणसे आत्महत्या पण करतात, किंवा तसा कायम विचार करतात.

पाश्च्यात्य हस्ततज्ञ किरो याच्या पुस्तकात याचा उल्लेख आढळेल.

हा ज्योतिष्याचा विषय नाहिये, पण वरील प्रश्न त्याच्याशीच निगडीत आहे. बादवे, किरोचे म्हणणे इथल्या स्सोक्कॉल्ड हुश्शार लोकांना पटेल कारण तो भारतीय किंवा हिंदुत्ववादी नाहिये ना!

मायला, आपली पण रास कर्क आहे न राव !
टुनटुन भाऊंनी लिहिलेले वाचून तर टरकलीच आपली.
इतके दिवस काय समजत नव्हते पण आता अमावास्या पौर्णिमेला जपून राहायला पाहिजे Happy

पत्रीकेत राहु, केतु काल्पनिक ,हस्तसामुद्रीक म्हणजे काल्पनिक ठोकताळे,सगळेच काल्पनिक तरीही हे महानशास्त्र.या असल्या थोतांडामुळेच आपण मागे पडलो.जरा बुद्धीप्रामाण्यवादाने वागा.

तुम्ही वागताय ना बुद्धीप्रामाण्यवादाने (?) मग झालं तर !
सगळेच तुमच्यासारखे हुशार झाले तर तुम्ही कोणाला सल्ले देणार ? Sad

महेश अशा लोकांकडे ( संग्राम ) लक्ष देऊ नये, कारण प्रत्येकाची विचारसरणीच वेगळी असते. काही माणसे खरोखर नास्तिक असतात, अर्थात तो त्यांचा अधिकार आहेच, कारण जसे आस्तिक असण्याचा अधिकार आपला आहे, तसेच.

माझ्या ओळखीतील एक व्यक्ती ( जिच्या घरात सासरी धार्मिक लोक जास्त आहेत अशी ) गणपती सोडुन बाकी सारे देव, संत, साधु वगैरे झुट आहेत असे म्हणते, आता गणपती जर सत्य ( मी तर आधी श्री गणेशपुजन करुनच गणपती स्तोत्राने सुरुवात करते ) तर इतर सर्व देव झुट कसे हे कळलेच नाही तेव्हा पापना म्हणून गप्प बसले ( पापना म्हणजे पादा पण नांदा ).

सो, दुर्लक्ष करा.

हिप्पो मी भाऊ नाही हो, बहिण आहे. आणी वर लिहिलेले प्रत्येकाला लागु होतेच असे नाही, कारण पत्रिकेत मंगळ पॉवरबाज असेल तर अशी व्यक्ती मनाने खंबीर असते,फक्त राशीच्या हळवेपणामुळे ते दाखवत नाही इतकेच, कारण कर्क रास ही अतिशय हळवी आहे ( वृश्चिक आणी मीन सुद्धा ).

Pages