धुंधुरमास म्हंजे कुठला महिना

Submitted by पुरोगामी on 12 December, 2011 - 10:22

काहि दिवसापुर्वी धुंधुरमास हा शब्द कळला.हा नक्की कुठला महिना आहे ? पंचांगात हा महिना सापडला नाहि.क्रुपया माहिति द्या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धुंधुरमास हा मार्गशीर्ष महिन्यात आणि त्यानंतरच्या (पौष की माघ?) महिन्याच्या सुरुवातीला असतो. तो पंचांगात सापडत नाही. जसा चातुर्मास तसा धुंधुरमास. थंडीच्या दिवसात प्रामुख्याने. या काळात देवळांमध्ये विशेष कार्यक्रम असतात. पहाटेच्या काकड आरत्या आणि रात्रीची कीर्तनेही. आजोबा कसबा गणपतीच्या देवळात जात असत म्हणून आठवली तेवढी माहिती दिली. बाकी जाणकार सांगतीलच.

धुंधुरमास कालनिर्णय मधे सापडणार नाहीच. हा प्रकार अधिकाधीक शेतकरी लोक पाळायचे. म्हणजे थंडीच्या दिवसात लवकर सूर्य उगवायच्या सुमारास पूर्ण आवरून शेतात जायचं आणि शेकोटीच्या उबेत मूगाच्या डाळीची खिचडी, बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी/भरीत, कांदा, लोणी किंवा लोणकढं तूप असा बेत जेवायचा. वांग, लोणी पचायला जड असतं तर बाजरीची भाकरी उष्ण असल्याने थंडीत चालते. खिचडी पचायला हलकी असते म्हणून त्याबरोबर मुगाच्या डाळीची खिचडी असते. शेतात या सुमारास नविन हुर्डा आणि वांगी आलेली असतात. म्हणून वांगी अधिक खपतात, नाहीतर गवार, मटार, गाजर, वांग अशी मिश्र भाजीही बनवतात. त्याला लेकुरवाळी भाजी असंही म्हणतात. साधारणपणे थेंडीच्या दिवसात (आयुर्वेदाप्रमाणे) जठराग्नी व्यवस्थीत पेटलेला असतो (पावसाळा आणि उन्हाळ्याच्या तुलनेत). त्यामुळे जड पदार्थ खाल्ले तरी सहज पचतात आणि अंगी लागतात. आणि जेवण तसं जास्तही जातं. म्हणूनच थंडीत म्हणजे जानेवारी महिन्यात संक्रांत, भोगी च्या काळात धुंधुरमास करतात. अनेक ठीकाणी धुंधुरमासात गुळाच्या पोळ्याही खातात. त्याही पचायला जड असतात.

धुंधुरमासाचा आणि काकड आरतीचा संबंध ऐकण्यात किंवा वाचण्यात आला नाही. कार्तीक महिन्यात जेव्हा थंडीला सुरूवात होते तेव्हा पहाटे अभ्यंग करून काकड आरतीला जाण्याची प्रथा आहे.

(आवांतर) मला नेहमी हा प्रश्न पडतो की थंडीतल्या त्या पहाटेच्या आरतीला काकड आरती का म्हणतात? मी समाधनासाठी शोधलेलं उत्तर म्हणजे "थंडीत पहाटे काकडत किंवा कुडकुडत आरतीला जातात म्हणून त्याला काकड आरती म्हणत असावेत". कृपया तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा. Happy

पूर्वी काठीला चिंध्या गुंडाळून त्यावर तेल ओतून ते पेटवायचे. याला काकड म्हणतात. त्याने केलेली आरती ती काकड आरती. हल्ली बहुतेक वेळेला काकड आरती पण निरांजन लाऊनच केली जाते.

हा प्रकार अधिकाधीक शेतकरी लोक पाळायचे. म्हणजे थंडीच्या दिवसात लवकर सूर्य उगवायच्या सुमारास पूर्ण आवरून शेतात जायचं आणि शेकोटीच्या उबेत मूगाच्या डाळीची खिचडी, बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी/भरीत, कांदा, लोणी किंवा लोणकढं तूप असा बेत जेवायचा
>>>
असले चैनबाज शेतकरी कुठे असतात कोण जाणे Uhoh

दाते पंचागानुसार, मार्गशीर्ष महिन्यात धनुर्मासारंभ होतो (त्याचि नेमकी तिथी/गणतीची पद्धत मला माहित नाही, पंचागात दिलेले असते आरंभ व समाप्ती दिलेली असते) व तो मकरसंक्रांती पर्यन्त पाळला जातो. रोज तांदुळमुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवुन सकाळी लवकर भोजन करतात. यास धुंधुरमास असेही म्हणले जाते.
यावर्षीचा १७ डिसेम्बर रोजी सुरू होतो आहे.

>>"थंडीत पहाटे काकडत किंवा कुडकुडत आरतीला जातात म्हणून त्याला काकड आरती म्हणत असावेत" Lol
मला पण असच वाटायचं. "काकडा झाला आता मुख प्रक्षाळा" अशी ओळ आहे एका आरतीत, त्यामुळे माधव यांनी दिलेले स्पष्टीकरण जास्त योग्य वाटते आहे.

>>>>>असले चैनबाज शेतकरी कुठे असतात कोण जाणे <<<
बाजो, ते तसे करतात म्हणजे तुम्हां पुणेकरान्प्रमाणे कुठेतरी "अभिरुची" वा तत्सम पेठी हॉटीलात जाऊन टेबलखुर्च्यान्वर बसून (नैतर भाड्याच्या सतरन्ज्या/बारदानान्वर बसून) बक्कळ दमडा मोजून करतात असे वाटले की क्वॉय तुला? Proud

सुर्याचा धनु राशीत प्रवेश झाला कि धनु मास/धुण्दुरमास सुरु होतो. बहुतेक वेळा हा महिना १४/१५ डिसेम्बरला सुरु होतो. हा महिना झाला कि मकर मास सुरु होतो. धनुमास हा सेमी श्रावणासारखा मानतात.

ज्यांच्याकडे झुंजुमुंजू होतं त्यांच्याकडे धुंधुर्मास येत असावा. मायान कॅलेंडर , माया दिनदर्शिका मधे पहा .

अनेक ग्रामीण शब्द लोप पावत चाललेत.

या वर्षी अजुन धुंधुर मास आला नाही. १७ डिसेंबरला सुर्य धनु राशीत प्रवेश करेल, तेव्हापासुन मकर संक्रांती पर्यंत धुंधुरमास (धनुर्मास ) असेल.