शनिवारी केस का कापत नाहित

Submitted by पुरोगामी on 27 November, 2011 - 07:18

शनिवारी केस्,नखे कापू नयेत,नवीन काम सुरु करु नये,लोखंड घरी आणू नये असे काही पुस्तकात लिहिलेले असते.त्याचे कारण काय असेल?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शनिवारी केस्,नखे कापू नयेत,नवीन काम सुरु करु नये,लोखंड घरी आणू नये असे काही पुस्तकात लिहिलेले असते.त्याचे कारण काय असेल?<<<

विचार करायला लावणारा प्रश्न.....:फिदी:

वैताग....वैताग..

शनिवारी केस्,नखे कापू नयेत,नवीन काम सुरु करु नये,लोखंड घरी आणू नये असे काही पुस्तकात लिहिलेले असते.त्याचे कारण काय असेल?

विकांताची सुरवात ज्या दिवशी होते त्या दिवशी कोणतेही काम न करता सुस्त झोपुन देता यावे म्हणुन शनिवारी कुठलेही काम सुरू न करण्याची पद्धत पडली असावी. पुस्तकाचा लेखक आधी आयटी फिल्डमध्ये काम करत असावा.

शनीवार हा शनीचा वार. म्हणून या दिवशी असे करु नये...

( हा धागा धार्मिक विभागात हवा.. Proud धाग्याचे नाव बघून लोकाना उगाच वाटायचे हा जामोप्याचाच धागा आहे की काय! Proud )

http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-should-be-bites-nails-on-mon... शनिवारी नख कापले की आयुष्य सात वर्षानी घटते आणि सोमवारी कापले की ७ वर्षानी वाढते.

एका हाताची नखे सोमवारी आणि एकाची शनिवारी कापल्यास वय आहे तितकेच राहील का???? Proud

वावा! दिव्य मराठी :फिदी:!!!!

>एका हाताची नखे सोमवारी आणि एकाची शनिवारी कापल्यास वय आहे तितकेच राहील.
कोणी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे का?

>पुस्तकाचा लेखक आधी आयटी फिल्डमध्ये काम करत असावा.
निषेध Proud

धाग्याचे नाव बघून लोकाना उगाच वाटायचे हा जामोप्याचाच धागा आहे की काय! >>>> हे तू लिहिल्यावर मग लक्षात आलं माझ्या की धागा तुझा नाहिये ते..

बाकी तो दिव्यभास्कर धागा भारीये एकदम.. सोमवारी कुठली किरणे येतात आणि गुरुवारी कुठली येतात ते बघायला पाहिजे..

JAMOPYA.....TUMCHA VISHAY HIGHJACK KELA GELAA... Sad TUMHALA HI SPARDHAK AALAA... Happy

<< कदाचित समस्त नाभिकांना एक हक्काची सुट्टी असावी म्हणुन हा नियम असावा >> पण निदान मुंबईत तरी शनिवारी नव्हे तर सोमवारी सलून बंद असतात. शेवटी याबाबतीतल्या तथाकथित शास्त्राधारापेक्षां नाभिकांचा नियम अधिक सन्मान्य ठरावा, नाही का !

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी दासबोधात एका ठिकाणी शिष्याला उपदेश करतांना असं म्हटलंय की शनिवारी नखे-केस कापून ये...पण छापतांना ते...शनिवारी नखे-केस कापू नये...असं छापलं गेलं..तेव्हापासून लोक शनिवारी नखं-केस कापू नये...असे मानायला लागली...असं भागवत पुराणात लिहून ठेवलंय.

mazaa kaka la kes nahi aahet...... pan te shanivari ch kes kaapataat..... tyanna kahich nahi zale ajun. Happy

@udayone
तुमच्या काकानां केसच नाहीत तरी ते शनिवारी केस कापतात, म्हणूनच त्यांना काही झाले नसावे.
धन्य ते काका आणि धन्य तो पुतण्या....:हहगलो:.

मी शनिवारीच कापतो

शनिवारी नख कापले की आयुष्य सात वर्षानी घटते >>> एक मस्त कल्पना आलीये डोक्यात. पाकिस्त्यान्यांची आणि मा.बो.वर नकारात्मक प्रतिसाद देणार्‍यांची आणि कंपुगीरी करणार्‍यांची नखे जर प्रत्येक शनिवारी कापता आली तर काय बहार येईल ना Happy

दिवे घ्या

मी शनिवारीच कापतो

शनिवारी नख कापले की आयुष्य सात वर्षानी घटते >>> एक मस्त कल्पना आलीये डोक्यात. पाकिस्त्यान्यांची आणि मा.बो.वर नकारात्मक प्रतिसाद देणार्‍यांची आणि कंपुगीरी करणार्‍यांची नखे जर प्रत्येक शनिवारी कापता आली तर काय बहार येईल ना Happy

दिवे घ्या

एखाद्या राजाची दाढी करायला न्हावी विसरला असेल.. मग देहदंडाची शिक्षा नको म्हणून एखाद्या ब्राह्मणाला राजापुढं खोटंच सांगायला लावलं असेल कि ज्या दिवशी न्हाव्याने सुट्टी घेतली त्या दिवशी केस कापू नयेत असं मीच त्याला सांगितलं म्हणून... नेमका तो वार शनिवार असावा

अंदाज करायला काय जातंय ?

जामोप्या, तुमचा या नावाचा डुआय मला अज्जाबात आवडला नाय....... Proud

रचकने: शनीवारी शनीवारच कसाकाय येतो...श्या?????

लोखंड न आणण्यामागे काय कारण असेल ?

शनिवारी चुंबकीय क्षेत्र वाढलेलं असतं का ?
(चुंबकीय हा शब्द काळजीपूर्वक वाचावा :फिदी:)

झक्की काका

तुम्ही अमेरिकेत शनिवारी केस कापणा-या लोकांचा सर्व्हे कराल का प्लीज ? कुणावर काही संकट आलं का ? अकालीच म्रुत्यू आलेली एखादी व्यक्ती शनिवारी केस कापत होती का ? शनिवारी लोखंड खरेदी केल्याने काही पीडा मागे लागली का ?

तिथल्या लोकांमध्येही या प्रश्नांमुळे जागृती निर्माण होईल..

अमेरीकेत शनीवार असतो तेंव्हा भारतात रविवार असतो, त्यामुळे काही फरक पडत नाही. पण शुक्रवारि मात्र इथे pay day loans च्या बाहेर गर्दी दिसते. भारतात शनीचा वार म्हणुन अनेक लोक गाड्यांमधेही तेंव्हाच तेल भरतात. Saturn गाडी असेल तर विचारायलाच नको. (तिला तेल लागतेही खूप)

नखं वाढली असली आणि लोखंड आणले तर जो कोणता आकार असेल त्यानी नखांवर प्रयोग करुन पहावासा वाटत असेल (शनिची परिक्षा?) म्हणुन लोखंड आणत नाहीत.

मी ऐकलंय की क्षत्रियांनी केव्हाही केस वा नखे कापलेली चालतात. अगदी शनिवारच्या अमावस्येलाही!

तुम्ही अमेरिकेत शनिवारी केस कापणा-या लोकांचा सर्व्हे कराल का प्लीज ? कुणावर काही संकट आलं का ? अकालीच म्रुत्यू आलेली एखादी व्यक्ती शनिवारी केस कापत होती का ? शनिवारी लोखंड खरेदी केल्याने काही पीडा मागे लागली का ?

चालेल. मी तासाला २०० डॉ. नि कमीत कमी १०४० तासाचे काँट्रॅक्ट घेतो! (३ महिने. ४० तास आठवड्याला.) शनिवारी काम करण्याचा दर दुप्पट!!
पैसे वगैरे द्यायचे असतील तरच मला सांगा काम करायला, नाहीतर मी करत नाही!

आपला हिंदू धर्मच छान. त्यात फक्त अमुक दिवशी हे करू नका, तमुक दिवशी ते करू नका असे आपले कामे टाळण्याचे नियम आहेत. नि उपास, नि पूजा! तिकडे शत्रु बायको, मुलीसकट घरदार लुटून नेतो आहे नि हा अभिषेक करत बसला आहे!!

एरवी कितीहि मुसलमानधार्जिणे असले तरी हा हिंदू धर्माचा नियम बरोब्बर पा़ळतात!!

खालिल माहिती उपरोधाने लिहली नसून, माझ्या माहितीत तरी पूर्णपणे खरी आहे.
शनिवारी तेल आणत नाही याचे कारण धार्मिक आहे आणि ते शनी किंवा हिंदू ध्रर्माशी निगडीत नसून यहुदी (ज्यू )धर्माशी निगडीत आहे.

ख्रीस्तपूर्व २ र्‍या शतकात काही यहुदी जहाज वादळात सापडल्याने कोकण किनार्‍याला लागले. हे लोक तेलाच्या व्यवसायात शिरले (कदाचित ते जिथून आले तिथे आधीच या व्यवसायात होते) आणि भारतातल्या जातीव्यवस्थेप्रमाणे पिढ्यान पिढ्या त्यात व्यवसायात राहिले. यहुदी धर्माप्रमाणे ते शनिवार सुट्टीचा दिवस पाळत असत (sabbath). त्यामुळे त्यांना आपल्याकडे शनिवार तेली म्हणत असत. गमतीची गोष्ट म्हणजे १८ व्या शतकात एका युरोपियन प्रवाश्याच्या भेटीअगोदर त्यांना आपण यहुदी आहोत हे माहिती नव्हते. पण कोकणात रहात असल्याने सगळे अस्खलीत मराठी बोलत आणि कोकणातल्या इतर धर्माच्या लोकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. किंवा आपल्या जातीव्यवस्थेमुळे (त्या त्या जातीला वेगळे ठेवून त्यांचा मार्ग त्यांना आखू द्यायचा) भारत हा एकच असा देश होता कि जिथे त्यांचा छळ झाला नाही किंवा मुद्दाम वेगळे वागवले नाही.
ख्रीस्ताच्या अगोदर २ र्‍या शतकापासून जर हिंदू आणि यहुदी धर्मियांचा निकटचा संबंध आला असेल तर त्या देवाणघेवाणीतून असे विचार प्रचारात आले असतील असे समजायला नक्कीच जागा आहे. आणि नक्कीच कोकणात पूर्वी माझे आजोबा म्हणत असत असे कुणी म्हटले तर त्याला समाजशास्त्रीय कारण आहे.

माझ्या काही पंजाबी मित्रांना विचारले तर त्यांच्याकडे असे शनिवारला वेगळे महत्व नाही (त्यांना तरी हे माहिती नव्हते). हे मराठी भाषिकांत जास्त माहितीत आहे. या आणखी एका गोष्टीमुळे वर दिलेले समाजशात्रीय कारण योग्य असावे.

आजही इस्राईल मधे कट्टर सब्बाथ पाळणार्‍यांची संख्या खूप मोठी आहे. तिथे शनिवारी कुठलीही उर्जा चालू किंवा बंद करत नाहीत. त्यामुळे मोठ्या हॉटेलमधे एक लिफ्ट असते ती शनिवारी २४ तास सतत चालू असते आणि प्रत्येक मजल्यावर थांबते. (बटन दाबून थांबवता येत नाही)
विकीपीडियाच्या या पानावर हे यहुदी लोक कोकणात कसे आले याची माहिती आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Bene_Israel

इतकेच नाही तर सब्बाथ मधे ज्या अनेक गोष्टी करू नये असे सांगितले आहे त्यात तुम्ही वर दिलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे. थोडक्यात हा रिवाज आपण यहुदी धर्मातून घेतला आहे असे मानायला बरेच पुरावे आहेत.
http://en.wikipedia.org/wiki/Shabbat

वर दिलेल्या सब्बाथच्या पानावर शेवटी शेवटी, शनिवारी काय करावे (विशेषतः नवरा-बायकोंने) हे ही लिहले आहे ते वाचायला विसरू नका ! Happy

अजय, चांगली माहिती Happy
हे एक कारण असू शकते, पण याचबरोबर भारतातील बारा बलुत्याची व खेड्यापाड्यातील सामुहिक जीवनाची विशिष्ट अशी शिस्त पूर्वापारच होती, ती देखिल कारणीभूत आहे. प्रत्येक व्यावसायिकास, आठवड्यातील एकेक वार सुट्टि असावी वा विशिष्ट तिथिला विशिष्ट कामे न करणे इत्यादीद्वारे नियमन व्हावे जेणेकरुन त्यास त्याची इतर कामे निपटवता येतिल अशी योजना धार्मिक रुढी माध्यामातुन होती, आजही बर्‍याच अंशी ती पाळली जाते. आजही मी लिम्बीच्या गावी गेलो, पिढीजात न्हावी जर घरी आला, तर त्यास पैसे दिले जात नाहीत तर वर्षाचे धान्य वगैरे दिले जाते. कालौघात, याचे प्रमाण कमी झाले असले तरीही, प्रथा/रुढी म्हणून हे पाळले जाते (म्हणजे धान्य देण्याचे व वर्षातील विशिष्ट दिवशी तरी हजामतीस येण्याचे) (शिवाय, आजच्यासारखी दाढीची ब्लेडवाली खोरी त्याकाळी नसायची, पूर्णपणे न्हाव्यावर अवलम्बुन रहावे लागे. - बघा इन्ग्लन्डमधल्या औद्योगिक क्रान्तीमुळे भारतातील बलुतेदारीच्या पोटावर कशी टाच आली ते Proud )
असो.

>>>>धाग्याचे नाव बघून लोकाना उगाच वाटायचे हा जामोप्याचाच धागा आहे की काय! ) <<<<
पण धाग्याचा आयडी बगितल्यावर मात्र मला वाटले की दाभोळकरान्नी कशाला उगीच या साळसुदपणे Wink माहिती वगैरे विचारण्याच्या फन्दात पडावे? सरळ आन्दोलनच करावे ना! Wink Proud
त्यान्ना कुणाची भिती आहे?

Pages