केल्याने भाषांतर - प्रवेशिका १ (साधना)
मायबोली आयडी - साधना
पी जी वुडहाउस यांच्या 'द मॅन विथ टु लेफ्ट फिट' या कथासंग्रहातील 'अॅट गिसेनहेमर्स' या कथेचा अनुवाद.
--------
त्या दिवशी गिसेनहेमरला जाताना माझा मुड पार बिघडलेला. सगळ्याचा वीट आलेला, न्युयॉर्कचा, डान्सचा, जगण्याचा एकुण सगळ्याचा म्हणजे सगळ्याचाच. ब्रॉडवे लोकांनी फुललेला होता. रस्त्यावरुन गाड्या पळत होत्या. जगातले सगळे दिवे गोळा करुन इथे लावल्यासारखा लखलखाट रस्त्यावर पसरला होता. आणि मला हे सगळे आता नकोसे झाले होते.
गिसेनहेमर नेहमीसारखे भरलेले होते. एकही टेबल रिकामे नव्हते, डान्स्फ्लोअरही आताच भरुन ओसंडत होता. बँडवर गाणे वाजत होते
जावे वाटतसे परतुनी


