"केल्याने भाषांतर...."

Submitted by संयोजक_संयुक्ता on 27 January, 2011 - 18:29

mbs_kelyane_bhasha.jpg

भाषा हे मूलत: संवादाचं माध्यम असलं तरी तो एक संस्कृतीचं प्रतिबिंब दर्शवणारा आरसाही असतो. अनुवादित साहित्याचं मोल म्हणूनच मोठं आहे. एका बाजूला आपल्या हाडीमांशी मुरलेल्यांहून निराळ्या जाणिवा, चालीरीती, जीवनपद्धती आणि विचारधारांची ओळख त्यातून होते, तर दुसर्‍या बाजूला जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी माणसाच्या मूळ अंतःप्रेरणा अगदी तशाच असल्याचं भानही येतं.

मराठी भाषा दिवसाच्या निमित्तानं म्हणूनच यावर्षी आपण "केल्याने भाषांतर" हा कार्यक्रम करायचं ठरवलं आहे. इतर कोणत्याही भाषेतील कथा, कवितांचं मराठीत भाषांतर करुन आम्हाला पाठवा.

ही स्पर्धा नाही.

१. ज्या साहित्याचे भाषांतर केले जाणार आहे ते प्रताधिकारमुक्त असावे. इंग्रजी भाषेतील असे काही साहित्य आंतरजालावर उपलब्ध आहे. प्रताधिकारमुक्त साहित्य असल्यास परवानगीची गरज नाही. परंतु याशिवाय मूळ लेखकाची अथवा प्रकाशकांची परवानगी घेऊन भाषांतर करता येईल. मूळ लेखकाची/प्रकाशकाची परवानगी मिळवण्याची कायदेशीर जबाबदारी भाषांतरकाराची आहे. मायबोली या गोष्टीला जबाबदार असणार नाही.

२. मूळ साहित्याचे शीर्षक, लेखक, भाषा यांचा स्पष्ट उल्लेख असावा.

३. "स्वैर" भाषांतर नसावे.

४. प्रवेशिका लिखीत (स्कॅन स्वरुपात) किंवा ई-पत्रामध्ये देवनागरीत पाठवता येतील. आलेल्या प्रवेशिकेतील साहित्य प्रकाशित करताना त्यावर कोणतेही संस्करण केले जाणार नाही.

५. एका आयडीला एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठवता येतील

६. प्रवेशिका marathibhasha@maayboli.com या पत्त्यावर पाठवावी.सोबत आपला मायबोलीवरचा आयडी कळवावा. प्रवेशिका पाठवताना ई-पत्राच्या विषयात कृपया Marathi Bhasha : kelyaane bhaaShaaMtar असे नमूद करावे.

७. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीखः २० फेब्रुवारी २०११

अधिक माहितीसाठी संयोजक समितीशी marathibhasha@maayboli.com इथे संपर्क करावा किंवा ह्याच बातमीफलकावर आपला प्रश्न लिहावा.

मराठी भाषा दिवस २०११ च्या इतर कार्यक्रमांसाठी इथे बघा.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यात आधी - वरची भाषांतरीत कविता खुप खुप आवडली. वाचतावाचताच असे सहजसुंदर भाषांतर, जे भाषांतर आहे हेच न कळावे, असे मला जमणार नाही याची जाणिव झाली Happy

तरीही एक कथा भाषांतरीत करुन पाठवतेय.

स्वाती, अप्रतिम भाषांतर... Happy

शोधतेच एखादं प्रताधिकारमुक्त लेखन... भाषांतराची फारा दिवसांची इच्छा, हौस भागेल Wink
तसंही, स्वातीच्या भाषांतरासमोर आमचं म्हणजे सूर्यासमोर काजवा... (स्वाती, ही चेष्टा नव्हे, खरंच.)

एखादे साहित्य प्रताधिकारमुक्त आहे की नाही हे कसे कळणार ?
कारण आजकाल महाजालामुळे काही कळेनासे झाले आहे.
एकच साहित्य अनेक लोक आपल्या मर्जीनुसार प्रकाशित करीत असतात,
त्यांनी लेखकाची परवानगी घेतलेली असते की नाही देव जाणे.

स्वाती यांचे भाषांतर वाचुन दोन तर्‍हेचे प्रतिसाद येतील..
एक - असे आम्हाला जमणार नाही मग कशाला उगाच प्रयत्न करा..
आणि दुसरा..यापेक्षा चांगले नाही तरी या तोडीचे भाषांतर करायलाच हवे..
मायबोलीकर दुसरा पर्याय स्वीकारुन आम्हाला चांगले साहित्य वाचायला देतील ही आशा.

स्वाती, फारच सुंदर भाषांतर(रुपांतर)
धन्यवाद!

क्या बात है !!!
स्वाती, अतिशय सुंदर झालंय हे !
: असंच आणखी दर्जेदार साहित्य वाचायला उत्सुक बाहुली : Happy

स्वाती, मस्त जमलंय भाषांतर.
खरंतर भाषांतर न वाटता एक कविताच वाटतेय, ओरिजनल.

अहाहा. स्वाती , काय सुंदर लिहिलयस गं. मुळच्या कवितेत जितके सुरेख भाव उतरले नसतील ,तितके तुझ्या अनुवादात उतरलेत.

Pages