मना मनात श्रावण...
थेंब धरेवरी येता
झाले हिरवे पिकून
पाना फुलात ओलावा
येई पुन्हा उमाळून
थेंब जरतारी साज
रंगारंगात न्हाऊन
पाचूवाणी झालं रान
दिठी गेली खुळावून
थेंब अलगद पाती
खुणावती कोणा कोण
असा लाजरा साजरा
मना मनात श्रावण...
थेंब धरेवरी येता
झाले हिरवे पिकून
पाना फुलात ओलावा
येई पुन्हा उमाळून
थेंब जरतारी साज
रंगारंगात न्हाऊन
पाचूवाणी झालं रान
दिठी गेली खुळावून
थेंब अलगद पाती
खुणावती कोणा कोण
असा लाजरा साजरा
मना मनात श्रावण...
काळी मैना
किती साजिरी ती किती कृष्णवर्णा
कसे नाम साजे तिये काळि मैना
बहू वर्णी शोभे जरी मोहनाही
वदे लोक तीते परि ब्लॅकबेरी
उन्हाळ्यातचि भूवरी येत होती
अता शोभते ती सदाचिच राणी
असे व्यापूनी ती जनाच्या मनाते
तियेवीण सर्वा अती खंत वाटे
जनाच्या सदा अंजुळी शोभताहे
कुणाचा खिसा भार तीचाच वाहे
असे व्यापुनी सर्व विश्वासि राहे
तियेवीण तो व्यर्थ संसार पाहे
भाग एक http://www.maayboli.com/node/37250
भाग दोन http://www.maayboli.com/node/37349
नानु गुरवाला लगेचच तालुक्याच्या दवाखाण्यात नेण्यात आले. ईकडे गावभर चर्चांना नुसते उधान आलेलं यात्रा हप्त्यावर आलेली असताना गावात हे असे चमत्कारी प्रकार घडु लागले होते. त्यात गावच्या गुरवाचीच दातखिळी बसली म्हणजे नक्की भोलागडीत काहीतरी उलथा पालथ चालु आहे असे भरपुर जणांना वाटु लागले.संध्याकाळ झाली की गावातल्या बाया-बापड्या लहाण पोर हिंडेणासी झाली.त्यात झाला प्रकारावर चर्चा करण्यासाठी आबा आणि पंचांच्या पुढाकाराने रात्री सर्वांनी केदारनाथाच्या मंदीरासमोरील पटांगणात जमण्याचे ठरवले.
खळखळणारा अद्भुत श्रावण
नाचत येतो ओला होऊन
रंग फुलांचे अंगी लेवून
गाणे गाई झर्याझर्यातून
हिरवा मरवा गंधित साजण
कृष्ण घनांना थोडे सारून
उन्हात वेडा रंग उधळतो
सप्तरंग देतो फिस्कारून
रेशीम कोवळ हिरवी कांती
सळसळ अंगी किती हा नवथर
रंगबिरंगी हसू ओठींचे
मनामनावर नाजुक फुंकर
असाच वेडा सुखवून जाई
कधी कळेना याचे अंतर
वसुंधरा का राधा वाटे
कृष्ण मोहिनी ही कोणावर
"मी जर आहे बाळाची ताई
बाळाला माझ्याकडे दे की गं आई "
"हो तर ताई
रुसु नका बाई
अजून हे बाळ छोटं कि नै
मान पण नीट धरतंच नै
मोठ्ठं होईल जरासे किनाई
हाकही मारेल तुला ते "ताई"
मग काय मजा ताईची बाई
बाळ आणि तै, बाळ आणि तै
आम्ही तर मधे कुणीचच नै"
"आई गंss... आईss..."
बाबाच्या खोलीतून आवाज आला तशी निमा हातातलं ठेऊन चटकन उठली. तिनं आरशात बघून कुंकू ठीक केलं आणि खोलीच्या दारात येऊन उभी राहिली.
कमरेला एका हाताचा आधार देत बाबा पाय उंच करून शेल्फच्या वरच्या फळीवरलं पुस्तक काढण्याच्या प्रयत्नात होता. तिची चाहूल लागताच वळला. तिला भेटण्याच्या अगदी क्षण आधी बाबाची नजर रिकामी झालेली तिला जाणवली.
आणि निमाला वाटलं, देवा... आपल्या पायातलं बळ जाणार आता... बाबा आपल्याला ह्या वेषातही विसरतोय...
तोच, चष्म्याच्या आडून डोळे मिचकावत बघण्याच्या त्याच्या नेहमीच्या सवयीने तिच्याकडे बघतानाच बाबाच्या नजरेत ओळख आली.
मण्णी मण्णी
चिव् चिव् चिमणी
टपटप टिपते
तांदूळ मणी
थेंब थेंब पिते
वाकून पाणी
इकडे तिकडे
बघत म्हणते
आहे का कुणी
मी तर चिमणी
पायावर कशी
थुई थुई नाचते
नाचत म्हणते
चिव् चिव् चिमणी
इटुकलं मिटुकलं
बाळ कसं पिटुकलं
मऊ मऊ दुपट्यात
छानसं गुंडाळलं
टुळुटुळु बघतंय
गोडुलं छोटुलं
आईच्या कुशीत
मुठी चोखत विसावलं
शाहरुख हा माझा आवडता हिरो. अगदी 'फौजी' ह्या TV सीरिअल पासून. तेव्हा फक्त दूरदर्शन हे एकाच channel होत. आम्ही त्या अभिमन्युसाठी अगदी डोळ्यात प्राण आणून वाट बघत असायचो. तो केव्हा सिनेमात येतो अस झाल होत ते सीरिअल बघून. 'दिवाना' हा त्याचा पहिला सिनेमा. पण मध्यंतरापर्यंत शाहरुख ची एन्ट्रीच झाली नाही. त्या रोल मध्ये तो फारसा आवडला नाही. मग आला 'बाजीगर'. शाहरुख भावला पण ते कॅरक्टर मात्र आवडल नाही. नंतर १९९५ मध्ये आला 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' आणि शाहरुखचा 'राज' खूप खूप आवडला. अजूनही तितकाच आवडतो. एक तर मला यश चोप्रा/ आदित्य चोप्रा चे सिनेमे खूप आवडतात.