वेणी-फणीला.....

कुणी नसणार आई....

Submitted by वैवकु on 16 October, 2012 - 12:33

कसा दिसणार होतो म्हणा मी साजणीला
बिलगला चंद्र होता तिच्या त्या चाळणीला

तुला जाऊन आता किती वर्षे उलटली
अजुनही गंध येतो तुझा या पैठणीला

इथे दुःखेच दुःखे कुठे जागाच नव्हती
तसे मग सूख बसले मनाच्या वळचणीला

'तुझा' मी शेर जेंव्हा मुळी केलाच नाही
गझल मुकलीच माझी खर्‍या साकारणीला

कसा जाऊ पुण्याला नि शोधू नोकरी मी
कुणी नसणार आई तुझ्या वेणी-फणीला

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - वेणी-फणीला.....