विश्वास नाही बसत माझा

Submitted by वैवकु on 25 March, 2013 - 12:10

अशाने घोर पडतो सतत माझा
म्हणुन नाही मला मी म्हणत माझा

तुझ्या प्रेमात असल्याचे समजले
स्वतःवर जीव नव्हता जडत माझा

जगाच्या सरळधोपट पायवाटा
असा का पाय आहे वळत माझा

तुझे सांगून झाले हरतर्‍हेने
मला मुद्दाच नाही पटत माझा

कुणासाठीतरी जगलो सदा मी
अता मरणार आहे जगत माझा

तुझ्या विश्वामधे स्वारस्य नाही
मला माझेपणा दे परत माझा

जसा मी विठ्ठलाचा होत जातो
तसा मग शेर जातो बनत माझा

मला सोडून तू गेलीस आई ......
अजुन विश्वास नाही बसत माझा



________________________________

विठठलाचाच शेर... बदल आवश्यक वाटल्यास ...........

जसा आणीन विठ्ठल मी मनाशी
हिबेहुब शेर जातो बनत माझा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई जाण्याच्या पर्वातले तुमचे सर्वच शेर जिव्हारातून आलेले. त्यांच्याभोवती लिहिलेल्या या रचना.. गझल नेहमीप्रमाणेच कमिटेड, आवडली.

फक्त
>>अता मरणार आहे जगत माझा >>
या ओळीकडे जरा पुनः बघाल का ?

अप्रतिम शेरांची गझल वैवकु! (विश्वास नाही बसत माझा - की सगळेच शेर प्लस प्लस झाले आहेत) Happy

अशाने घोर पडतो सतत माझा
म्हणुन नाही मला मी म्हणत माझा

तुझ्या प्रेमात असल्याचे समजले
स्वतःवर जीव नव्हता जडत माझा

तुझे सांगून झाले हरतर्‍हेने
मला मुद्दाच नाही पटत माझा

कुणासाठीतरी जगलो सदा मी
अता मरणार आहे जगत माझा

तुझ्या विश्वामधे स्वारस्य नाही
मला माझेपणा दे परत माझा <<<

व्वा वा

तुझ्या विश्वामधे स्वारस्य नाही
मला माझेपणा दे परत माझा............व्वा.

मला सोडून तू गेलीस आई ......
अजुन विश्वास नाही बसत माझा...नि:शब्द.

आवडली गझल.

तुझ्या विश्वामधे स्वारस्य नाही
मला माझेपणा दे परत माझा

अधी मी विठ्ठलाचा होत जातो
तसा मग शेर जातो बनत माझा

मला सोडून तू गेलीस आई ......
अजुन विश्वास नाही बसत माझा>>> वाह मतलाही आवडला

चांगली गझल.

दोन तीन गोष्टी वगळता सर्व शेर उत्तम.

मतल्यातली पहिली ओळ, जगत माझा आणि विठ्ठलाचा शेर खटकणारे!

अनेक शुभेच्छा!

तुझे सांगून झाले हरतर्‍हेने
मला मुद्दाच नाही पटत माझा
.
तुझ्या विश्वामधे स्वारस्य नाही
मला माझेपणा दे परत माझा
.
मला सोडून तू गेलीस आई ......
अजुन विश्वास नाही बसत माझा

मस्त. आवडले. Happy

भारती ताई .....ते......... मुटे सर सर्व प्रतिसादकांचे खूप खूप आभार

विठ्हलाच्या शेरात मला अजिबात अपेक्षित नसलेला पण खरे पाहता तोच चटकन लागत असलेला अर्थ की... ' तो शेर "माझा" बनत जातो' .... आहेच ही तृटी राहिली असल्याचे आधी पासूनच मान्य होतेच

पण मला अपेक्षित अर्थ असा होता की .....................

आधी मी विठ्ठलाचा होत जातो तसा(च) मग माझा शेर(ही) ( विठ्ठलाचा) बनत [आपोआप /स्वतःहुन हा भाव]जातो !!!

....असा अर्थ निघण्यासाठी वाचकही माझ्याप्रमाणे "तसा मग" वर भर देतील हे मी गृहीत धरले आणि हीच माझी चूक झाली त्याबद्दल सपशेल..गुडघे टेकून ..नाक घासत... क्षमस्व !!!!!

मी आता हा अशेर असा बदलू पाहत आहे ...

जसा आणीन विठ्ठल मी मनाशी
हुबेहुब शेर जातो बनत माझा

(यात काही चुका असतील तर प्लीज सांगा मग मी हा शेरच फायनल करीन व आधीचास गाळून टाकेन
...कारण हा शेर विठ्ठलासाठीचा आहे आणि यात मी अशा चुका करून बसणे मला अजिबातच मान्य नाही की मला नको असलेला अर्थच सांगीतला गेला आहे असे होईल )

बाकी आक्षेपार्ह बाबींचा उल्लेख पाहिला पण मला ते म्हणणे नीटसे पोचले नाही क्षमस्व !!

पुनश्च धन्स सर्वाना

कणखरजी विशेष आभार

वैभव,

मला व्यक्तिशः 'अधी' ही सूट वगळता शब्दयोजना योग्य वाटत आहे.

'आ' चा सर्रास मात्रेसाठी 'अ' करणे बरोबर नाही असे मला वाटते. तो अधी काढून टाकण्याच्या दृष्टीने विचार करशील....

.......असे होते होय !!! Happy
असो आता एक नवीनच शेर बनला यातच काय तो आनंद

तो अधी , आधी नव्हताच कणखरजी तो आधी "जसा" होता .................

जसा मी विठ्ठलाचा होत जातो
तसा मग शेर जातो बनत माझा

माझा अनेकदा प्रॉब्लेम होतो ....उगाचच आहे ते बदलावे वाटते त्यामागे नेमके करण असे काहीच नसते

जसा मी ..........करू का कणखरजी आपले काय मत आहे ....की नवा शेर जास्त छान आहे ??
Happy

मला सोडून तू गेलीस आई ......
अजुन विश्वास नाही बसत माझा
अप्रतिम शेर!

अशाने घोर पडतो सतत माझा
<<<<<<<<<<<

घोर लागणे म्हणतात!
घोर पडणे........खटकले!

कुणासाठीतरी जगलो सदा मी
अता मरणार आहे जगत माझा
माझा रदीफ इथे कानाला खटकतो!

तुझ्या विश्वामधे स्वारस्य नाही
मला माझेपणा दे परत माझा

छान.

तिलकधारी या गझलेची प्रशंसा करत आहे.

वा वा! छान गझल लिहिलीत वैवकु...

पटत आणि परत हे शेर आवडले. आणि आईचा शेर तर अगदी जिव्हारी भिडतो.

गझलप्रेमीजी ,तिलकधारीजी ,पुलस्तीजी धन्यवाद

गझलप्रेमीजी आपण सुचवलेले मुद्दे मला आधी अजिबात सुचले नव्हते त्यामुळे नवीन असल्याने पाहताक्षणीतरी विचारात पाडणरे नक्कीच वाटत आहेत मी त्यावर अवश्य विचार करणार आहे
त्यातल्यात्यात 'जगत माझा'तली "कानाला खटकणारी रदीफ" हा मुद्दा मलातरी पटला नाही
क्षमस्व !! व विशेष आभार

़झ्क्कास !

निवड्क १० त !

माझा रदीफ शेरातिल आशय स्पष्ट होण्यास सहाय्यभूत ठरतेय ! (स्वानुभव )