फेसबुककडून फसवणूक होते का ?

Submitted by Kiran.. on 20 February, 2012 - 19:19

ऑर्कुटचं अकाऊंट डिलीट करून दोनेक वर्ष झाली तरी मी फेसबुक जॉईन केलं नव्हतं. मित्रांच्या एका ग्रुपने ओपन करायला लावलं म्हणून हल्लीच फेसबुक वर आलो. अकाऊंट ओपन करताना जीमेल मधले सगळे कॉण्टॅक्ट्स फेबुने वापरले. काही दिवसांनी पाहतो तो मी आपोआपच कवितांच्या काही ग्रुप्सचा मेंबर झालो होतो. माझं जीमेल अकाऊंट या सगळ्या कवितांनी भरून गेलं होतं. हे सगळे मेल डिलीट करता करता भरपूर वेळ गेला. पण पुन्हा त्याच वेगाने ते भरत गेलं.

म्हणून मग ज्यांच्या कविता नेहमी येतात त्यांना फ्रेंडलिस्टमधून काढून टाकलं. पण फारसा उपयोग झाला नाही. काही दिवसांपूर्वी ग्रुपमधे इमेल सेटींग्ज सापडले. त्याचा उपयोग करून ईमेल नोटिफिकेशन्स बंद करून टाकली. मग काही दिवस आराम मिळाला. फेसबुक ओपन केलं कि लॅपटॉप हँग होतो या कारणाने तिथे फारसं जाणं होत नाहीच. पण हल्ली ज्या ग्रुप्सचं सेटींग मी बदलून टाकलं होतं त्याच ग्रुप्समधून पुन्हा कविता, रिमाईंडर्स आणि इतर मेल्स येऊ लागले आहेत.

हे सेटींग्ज कुणी बदलले असावेत ? ग्रुप्सच्या चालकांकडून घडलं म्हणावं तर सगळे एकाच वेळी असं करतील असं वाटत नाही. फेसबुक आपले सेटिंग्ज बदलतं का ? असल्यास ही फसवणूक म्हणावी का ? यावर फेसबुकचं अकाऊंट डिलीट करणे हाच एक उपाय दिसतोय. पण एका ठिकाणी वाचल्याप्रमाणे आपलं अकाऊंटही डिलीट होत नाही. फेसबुक कडे त्याचा बॅक अप असतो असं वाचनात आलंय. फेबुशी भांडण करण्यात काहीच इंटरेस्ट नाही. पण यावर उपाय काय ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रुप्सचं सेटींग बदलल्यावर असे काहि झाल्याचे अनुभवले नाहिये.

यावर फेसबुकचं अकाऊंट डिलीट करणे हाच एक उपाय दिसतोय.>> तुम्हाला डिलीत करायचाय ना, मग करुन टाका, gmail मधे सगळे spam मधे टाका, पुढे त्या FB account चे काय होतेय त्याची चिंता कशाला करता ? Happy

प्रायव्हसी सेटींग्ज लावली आहेत का? मध्यंतरी तुमचे काँटॅक्ट्स बाकीच्या सोशल साईट्सशी शेअर केले जातील तेव्हा ते थांबवा असं वाचल्याचं आठवतं. मी सगळे फिल्टर्स लावले आहेत तेव्हा हा वैताग अनुभवला नाहीये.

फेसबुकवर नवीन असतांना मलाही ही समस्या आली होती. यावर उपाय म्हणजे आपल्याला आलेल्या ईमेलमधेच 'चेंज नोटिफिकेशन सेटिंग्ज' असा (किंवा यासम) ऑप्शन असतो. त्यावर क्लिक करून फेसबुकवर जाऊन मेल पाठवण्याची रिक्वेस्ट बंद करावी. असे दरवेळी करत गेल्यास ईमेल येणे बंद होईल.
मात्र तुम्ही एखादा नवा गृप जॉईन केल्यास, किंवा मित्रांचा गृप सुरू केल्यास (उदा. क्लोज फ्रेन्ड्स) त्यासंबंधी मेल्स लगेच (ऑपॉप !) सुरू होतात. पुन्हा त्याच पद्धतीने ते बंद करावे लागते.
फेसबुक काही फसवणूक वगैरे करत नाही. आपण अशा साईट्स जॉईन करतांना त्यांची प्रायव्हसी पॉलिसी न वाचताच " I accept" वर click करतो, त्यामुळे आपल्याला असे वाटते.
या मेल्सचा, किंवा कोणाचीही काहीही माहिती आपल्या वॉलवर झळकत राहण्याचा मला आधी त्रास होत असे. ऑर्कुटच्या तुलनेत फेबु जास्तच अंगचटीला येणारे आहे असे वाटे. आता सवय झाली. Happy

अगदी स्ट्रीक्ट प्रायव्हसी सेटींग करता येणे हा फेसबूकचा अ‍ॅडव्हान्टेज आहे असे मला वाटते.

किरण, प्रायव्हसी सेटींगमध्ये जाऊन सर्वात आधी तुझा जगाला असलेला अ‍ॅक्सेस 'फ्रेन्डस ओन्ली' असे कर. अगदी 'फ्रेन्डस फ्रेन्डस' असेही करू नको.

मग हा वैताग होणार नाही ह्याची खात्री बाळग.

माझ्या बाबतीत असा काहीसा प्रकार झाला होता. मी फेसबुक वापरणे बंद केले होते. पण ते डिलीट करता येत नसल्याकारणाने त्याच्यापासून पूर्ण सुटका होणे कठीण होते. नंतर एके दिवशी डिलीट कसे करायचे ते कळले.. इथे बघा..

सध्या एकूणच या सोशल साईट्सच्या प्रायव्ह्सी सेटिंग्स बद्दल बराच दंगा चालू आहे. येथे एक लेख आहे फेसबुक बद्दल
http://www.zdnet.com/blog/facebook/not-just-google-facebook-also-bypasse...

गूगलबद्दलही अशीच चर्चा चालू आहे. गेल्या काही दिवसांत "पाथ" नावाच्या कंपनीच्या सीईओ ला जाहीर माफी मागावी लागली होती लोकांचे कॉण्टॅक्ट्स अपलोड केल्याबद्दल.
http://blog.path.com/post/17274932484/we-are-sorry

किरण्यके, एकदा शक्य तितकी प्रायव्हेट सेटिंग करून ४-५ दिवसात फरक पडला नाही तर त्यांच्या सपोर्टला मेल कर. शक्यतो उत्तर येते.

अकाऊंट ओपन करताना जीमेल मधले सगळे कॉण्टॅक्ट्स फेबुने वापरले. >> हे काँटॅक्टस् वापरायच्या आधी तुमची परवानगी विचारली जाते. तुम्ही जर 'Yes' म्हटले तरच ते वापरले जातात.
बरेच जण कुठल्याही सोशल नेटवर्किंग साइटवर रजिस्टर करताना अशा ऑप्शनला काहीही न वाचता Yes करतात आणि अ‍ॅड्रेस बुकमधल्या सगळ्यांना निमंत्रण पाठवले जाते.