Submitted by अजिंक्यराव पाटील on 3 September, 2020 - 03:56
नमस्कार,
माझ्या DSLR कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये फंगस ग्रोथ झाली आहे. नव्या लेन्सचा बजेट नाहीये सध्या. कोरावरील श्रीमंत फोटोग्राफर्स म्हणतात लेन्स बदलण्याशिवाय पर्याय नाही. काय करावे? सध्या तरी कॅमेरातून जवळचे फोटो नीट येत आहेत पण पूर्वी चंद्राचा फोटो काढला तर त्यावरचे डागदेखील स्पष्ट दिसत होते, आता फक्त प्रकाशाचा गोळा दिसतोय. काय करू?
कॅमेरा: निकॉन D५१००,
लेन्स: टॅमरॉन १८-२००
कमाल व्यय मर्यादा (बजेट): ५०००-७०००
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
टॅमरॉनचं सर्व्हिस सेंटर असतं
टॅमरॉनचं सर्व्हिस सेंटर असतं का? Camera च्या चांगल्या दुकानात विचारून बघा सर्व्हिस करतात का ते. नक्की लेन्सला फंगस आहे की Camera च्या सेन्सरला हे कन्फर्म केलंच असेल तुम्ही.
लेन्स कॅमेरा पासून वेगळा करून
लेन्स कॅमेरा पासून वेगळा करून उजेडात पाहिल्यावर web दिसतंय कोळिष्टकासारखं..
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/16834
हे एकदा वाचून बघा.
thanks वावे..
thanks वावे..
पूर्वी चंद्राचा फोटो काढला तर
पूर्वी चंद्राचा फोटो काढला तर त्यावरचे डागदेखील स्पष्ट दिसत होते, आता फक्त प्रकाशाचा गोळा दिसतोय. काय करू?>>>>
हे असं असेल तर तुम्ही सर्विस सेंटरला देऊन लेन्स स्वच्छ करुन घ्या. अन्य उपाय नाही.
एक ड्राय कॅबिनेट घ्या. त्यात कॅमेरा आणि लेन्स ठेवत जा म्हणजे भविष्यात परत कधीच असं होणार नाही.
फंगस जात नाही. खटाटोप सोडा.
फंगस जात नाही. खटाटोप सोडा. कारण खरवडून काढत नाहीत. कोटिंगही जाते.
बरं सोलूशनने जाईल एवढी काढली तरी राहिलेलं झाड पुन्हा वाढतं.
मुंबईत सेंट्रल क्याम्रा, मागच्या गल्लीतला एक क्यानन ओथराइज्ड रिपेरर, रेमेडिओज करायचे पण खूप वाढलेली नाही काढत.