डिशवॉशर चा अनुभव, तुम्ही कोणता ब्रँड वापरता

Submitted by अनामिका२१ on 26 December, 2020 - 08:50

मी गेल्या ५ वर्षा पासून सीमेन्स डिशवॉशर वापरत आहे पण कधीच महिनाभर ही न बिघडता मशीन चालली नाही, आत्ताच ९००० खर्च करून परत ७००० चा पार्ट लागेल असे सांगितले. डिशवॉशर वापरत असल्यामुळे आता बाईच्या हातचे घासलेले भांडे नको वाटतात. इथे कोणी डिशवॉशर वापरत आहे का? वापरत असाल तर कोणता ब्रँड? तुमचा aftersales अनुभव कसा आहे? LG व Bosch कोणता ब्रँड घ्यावा? भारतातले अनुभव हवेत कारण बाहेर देशात टेकनॉलॉजि इथल्यापेक्षा चांगली आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

We are using Bosch for last 6 years. Only once we replaced heater. No other issues. I think Siemens and Bosch service is common in India.

LG चा वाईट अनुभव आहे. Whirlpool आवडले. Bosch चांगले आहे असे ऐकलयं. (अमेरिकेत)
LG....
हो मी वापरले पण परत केले , सारखे काही तरी प्रोब्लेम्स होतं होते.

थँक्स चिडकू , mandard , अस्मिता.
IFB चे जुने मॉडेल्स चांगले होते, नवीन मध्ये प्रॉब्लेमआहे असं ऐकलंय, आणी आफ्टर सेल्स चा ही प्रॉब्लेम आहे आमच्याकडे

LG तुम्ही वापरलेत का?

Siemens and Bosch service common आहे, पण पार्टस availability नाही machine बंद पडले की १०-१५ दिवस दिवस पार्ट ची वाट पाहायला लागते , खूप confusion आहे कदाचीत आम्हाला faulty machine मिळालाय siemens च, आत्तापर्यन्त heatpump ७५००, waterjacket ५५० आणी दरवेळी सर्विस फीस ८०० असे जवळपास १०००० खर्च झाले आणी machine अजून बंद आहे आता पॉवर module खराब आहे price ६९०० approx आणी जुने machine exchange चे फक्त २०००-३००० मिळतात, जर चालू नाही झाले तर सगळे पैसे पाण्यात. सीमेन्स bosch चे पार्टस खूप महाग आहेत.

माझ्याकडे IFB डिशवॉशर आहे. गेले 5 वर्षे सतत वापरले आहे. पाहुणे आले की दिवसात 3 वेळा देखील लावते. एखादा देखील प्रॉब्लेम आलेला नाही. भांड्याला कामवाली बाई लावलेली नाही!

सिमेन्स डिश वॉशर आम्ही 10 दहा वर्ष वापरत आहोत दहा वर्षानंतर त्याची फक्त एकदा दुरुस्ती करावी लागली आमचा अनुभव खूपच चांगला आहे प्रसंगी दिवसातून दोन वेळा सुद्धा वापरला जातो

मला डिशवॉशरचा अनुभव नाही, माहिती नाही.
पण दर महिन्याला काही ना काही समस्या येत असतील तर:
तुमचा पीस खराब निघाला असावा. वॉरंटी काळातही समस्या येत होत्या का?
तुमच्या वापरात काही चुका होतात का? पाणी कसे आहे अतिक्षारयुक्त आहे का? त्याने समस्या येत आहेत का? घरातील विद्युत प्रवाहात दोष नसावा अन्यथा इतर उपकरणेही खराब झाली असती पण डिश वॉशरला पुरवठा करण्याऱ्या पॉईंट मध्ये काही दोष आहे का, अर्थींंग नीट नाही, लूज कॉन्टॅक्ट वगैरे? हे नीट तपासून पहा. अन्यथा नवा घ्याल आणि त्यालाही सतत समस्या असे नको व्हायला.

भारतात खूप कमी वापर होतो dish washer च.
गरम पाण्याचे फवारे आणि डिटर्जंट ह्याचा वापर करून भांडी साफ होतात.

थँक्स मीता71, प्रसाद70, प्रणवंत, मानव पृथ्वीकर , Hemant 33

हो कदाचित faulty piece मिळाला आम्हाला, आधी हार्डवॉटर होते बोअरिंग चे आता आम्ही म्युनिसिपल वॉटर वापरतो, stabilizer पूर्ण घरासाठी लावून घेतला आहे आणि वायरिंग न्यू आहेत, सध्या नवीन पार्ट टाकून बघतो जर नशिबाने machine चालली तर ४०-४५ हजार काही वर्ष वाचतील Happy २०१४ मध्ये घेतली होती machine.

देवकी Machine चालली तर खूप छान आहे, सगळी भांडी छान घासली जातात, bosch चे टॅबलेट मिळतात त्या वापरल्या की फक्त भांडी खरकटे काढून व्यवस्थित रचून ठेवली की झाले. १ तासात सगळी भांडी (८-१० डिश, आम्ही इडली डिश वापरतो जेवायला, मोठी ताट नाही बसत यात, mediun साईझ चालतात, १०-१२ वाट्या, १०-१५ चमचे, ४-५ छोटी ताटली (नाश्ता प्लेट) १०-१२ ग्लास, एक ५ लिटर चा विनोद चा कुकर+झाकण, एक छोटी पॅन (स्टील), १ कढई (स्टील), एक पातेले, छोटे १-२ भांडी अँप्रोक्स इतके एकावेळी धुतले जाते ते ही गरम पाण्यात, स्टीम सहित. नवीन घेतली machine तेंव्हा माझे ८-१० वर्षा पूर्वीचे स्टील चे रोजचे भांडे ८-१० दिवसात नवीन आनल्यासारखे चमकायला लागले, आणी अजूनही रोज घासून झाले की नवीनच वाटतात. एकदा डिशवॉशर वापरले तर बाईच्या आणी स्वतःच्या हातचे घासलेले भांडे ही क्लीन वाटत नाही. आणी दिवसातून ३-४ वेळा ही वापरता येते, भांडे घासायची नो कटकट.

डिशवॉशर कन्सेप्ट नवीन आहे म्हणून मी एक्सप्लेन केले, पण यात coated, अलुमिनियम, आणी पातळ प्लास्टिक नाही चालत. मी aluminum आणी नॉनस्टिक नाही वापरत फक्त स्टील वापरते आणी बेकिंग साठी glassware डिशवॉशर safe घेते. प्लास्टिक ही dishwasher सेफ मिळते.

पण हार्डवॉटर असेल तर प्रॉब्लेम येतो machine ला, आणी वॉटर pressure १० लिटर पर मिनिटे लागतो नाहीतर machine नाही चालत

माझ्याकडं बॉषच डिशवॉशर आहे, आणी ४-५ वर्षात २-३ वेळा रिपेअर केले पण चांगले चालत आहे.

नाही देवकी नॉन स्टिक आणी anodized coatings निघून जातात, कमी तापमानावर चालतील कदाचित पण भांड्यांच्या वर लेबल असते ते बघून घ्या आजकाल बर्याच companies डिशवॉशर safe प्रॉडक्ट्स बनवतात