बजेट आयफोन सुचवा आयफोन vs अँड्रॉईड

Submitted by अनिळजी on 18 October, 2020 - 04:20

अँड्रॉईड फोन वापरून खूपच कंटाळा आलाय. आता मला एक आयफोन घ्यायचा आहे. बजेट पंचवीस हजाराच्या आत आहे. आयफोन घेतल्यास त्याचे काय फायदे होतात तसेच अँड्रॉईडपेक्ष्या तो कुठल्या बाबतीत सरस आहे हे ही सांगा. तुम्ही आयफोन वापरत असाल तर का वापरता ते ही सांगा.

Group content visibility: 
Use group defaults

मी आत्तापर्यंत कधी आयफोन वापरला नाही आणि वापरेन असे वाटतही नाही. पण तुमची शंका बऱ्यापैकी बेसिक / कॉमन आहे. गुगल केल्यास ढिगावारी लिंक्स (सोप्या / सर्वसामान्य माणसाला कळतील अश्या भाषेतील, फर्स्ट हॅन्ड अनुभव वाल्या) मिळतील.

आयफोन ७ ....२४९९९ अ‍ॅमेझॉनवर सेल चालु आहे. सध्या इतके पुरे.
पैसा जपा कारण "ते" घर सोडताना आणी नवीन घर घेताना पैसा हातात राहु द्या.

तुमचा धागा वाचून, मी पण 'सिरी'ला विचारलं: सिरी, माझा बँक बॅलन्स बघ आणि सांग की मी कुठले अ‍ॅपल प्रॉडक्ट घेऊ?
तर 'सिरी'ने मला उत्तर दिलं "अ‍ॅपल ज्यूस"

आयफोन घेणारे दुकानात जातात, सगळ्यात नविन मॉडेल द्या सांगतात आणि क्रेडिट कार्ड पुढे करतात.

कितीला आहे असे विचारत नाहीत.

मी नाही वापरत आयफोन, अँड्रॉइड चा साधासुधा मोबाईल वापरते कारण माझ्या पेक्षा मुलांच्या हातात जास्त असतो मोबाईल म्हणून..मुलगी मोबाईल दिल्याशिवाय जेवत नाही आणि तीला राग आला कि फेकू पण शकते मोबाईल,त्यामुळे मी आयफोन नाही वापरत.
नवर्याचा आहे आयफोन.. विचारून सांगते का वापरतो ते Proud

मुलिला मागच्या वर्शि आय्फोन ६ स घेतला, तिच iphone se चार्ज होत नव्हता. माझ्याकडे पण तोच आहे ४ वर्श झाले, नवर्‍याकडे आय्फोन ७ आहे अजुन उत्तम आहे,
एकहाति वापर आणि गेम खेळत नसाल तर उत्तम चालतो.
सगळ्यात मोठ्ठा इशु ( प्राइझ व्यतिरिक्त) म्हणजे बॅटरि आहे.
प्रेत्येक अप्डेट ला बॅटरि लाइफ कमि होत जाते अस नवर्‍याच निरिक्षण आहे. त्यामुळे तो अप्डेट करत नाहि.
माझ्या फोनला आता ईषु येत आहेत पण १२ बरोबर चार्जिन्ग केबलहि देणार नाहियेत याचा तत्वतः राग आला आहे.

आयफोन उत्तम चालतात. कधीही हँग होत नाहीत. अगदी २/४ वर्शे वापर झाल्यानन्तर ही. ऑनलाईन डील्स मध्ये किंवा फ्लॅश सेल्स मध्ये एखाद वर्शन मागचा आयफोन तोड मिळतो. आयफोन १०आर, वगैरे ऊत्तम किंमतीत मिळू शकतील.
१० च्या पुढ्ल्या आयफोन्स मध्ये ड्युअल सिम वगैरे सगळं आहे.

न चालायला काय झालं? चाललाच पाहिजे. कचकून दमड्या घेतात.
माझ्या नोकिया २७०० क्लासिकला दहा वर्षं झाली. X2-00 ला नऊ वर्षं. 5 मेगा पिक्सेल क्याम्रा अजूनही चालतो मस्त. शिवाय युएसबी ओटिजी सुद्धा आहे.