Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी सुद्धा हे लिहिणार तितक्यात
मी सुद्धा हे लिहिणार तितक्यात आईने हाक मारल्याने तेवढेच पोस्ट केले Happy
पनीर घोटाळा सुद्धा छान दिसतोय..
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 29 June, 2025 - 20:45>>>>>>
धन्यवाद...
तुमच्या आणि आमच्या घरचे बरेच पदार्थ सेम असतात...
कोंबडी वडे, पनीर, मटण, बरिटो
कोंबडी वडे, पनीर, मटण, बरिटो बोल सगळे मस्त आहेत फोटो.
अल्पना, मटणाची रेसीपी आली की इथे नक्की टाक.
तुमच्या आणि आमच्या घरचे बरेच
तुमच्या आणि आमच्या घरचे बरेच पदार्थ सेम असतात...
>>>>
कोकण इफेक्ट असेल. अर्थात त्यातही गावागावात घराघरात फरक असतो म्हणा. माझ्याच मामाच्या घरी चिकनमध्ये खोबरे आमच्या तुलनेत जास्त असते त्यामुळे मला ते चवदार असूनही गुळमुळीत लागते. तर आमचे त्यांना हाईहुई करत खावे लागते.
मला बायकोच्या हातची अंडा भुर्जी बिलकुल आवडत नाही. ती मी आईकडेच खातो. नुकतेच मुलाला सुद्धा तो फरक कळला. आता त्यानेही घरची खायची सोडली आणि आज्जीकडे गेले की रोज दिवसातून एकदा हवी असते.
शेवटी चारच दिवसांपूर्वी आईने बायकोला आमचा मालवणी मसाला आणून दिला ते स्पेशली भुर्जी करण्यासाठी
अंडा भुर्जी मुद्दाम असा फोटो कधी काढला नसता.
पण हा गेल्या महिन्यात मुद्दाम काढलेला फोटो आहे.
झाले असे, आईकडे गेलो होतो. चपाती भात होता पण घरात दोनच अंडी शिल्लक होती. ज्यात मी आणि आई दोघांचे पोट भरायचे होते.
बायको असती तर ऑनलाईन पाच दहा मिनिटात अंडी आली असती. पण आईकडे खाली उतरावे लागले असते ज्याचा मला कंटाळा आलेला. म्हणून आईने आयडिया केली. एका अंड्याची भरपूर कांदा घालून भुर्जी केली आणि थोडेसे कालवण बनवून त्याला उकळी आल्यावर दुसरे अंडे फोडून मिक्स केले ज्याने कालवणाला सुद्धा चव आली. चपाती भुर्जीसोबत त्या कालवणात बुडवून इतकी भारी लागली की त्याचा फोटो काढून बायकोला पाठवला.
वरील एकूण एक प्रकारांतून मला
वरील एकूण एक प्रकारांतून मला श्रीखंड -पुरी देण्यात यावी
अल्पना मटन मस्त. रेसिपी हवी.
अल्पना मटन मस्त. रेसिपी हवी. मॅरी मी चिकनची पण डिटेल्ड रेसिपी असेल तर हवी आहे.
कोंबडीवडे खाऊन दीड दशके तरी
कोंबडीवडे खाऊन दीड दशके तरी लोटली असतील.
मुंबईत कोंबडीवडे चांगले मिळण्याच्या ठिकाणांपैकी एक होते GPO चे कँटीन.
माझी आई होती आधी GPO मध्ये
माझी आई होती आधी GPO मध्ये नंतर CTO मध्ये. मला अध्येमध्ये म्हणजे वर्षातून एकदा घेऊन जायची ऑफिसला. आठवणी फार जुन्या आणि धूसर आहेत. टाईपरायटर म्हणजे कॉम्प्युटर असल्यासारखे वाटावे त्या काळातील आहेत. दोन्हीकडच्या कॅन्टीन मध्ये काय खायचो ते आठवत नाही. पण मजा यायची इतके आठवते. कधी कधी आई संध्याकाळी कॅन्टीन मधून पार्सल सुद्धा घेऊन यायची. पण तो नाश्ता असायचा. कोंबडी वडे नाही. अर्थात त्याची गरज सुद्धा नव्हती. तेव्हा आजी होती. आणि मी माझ्या आयुष्यात आजवर तिच्यापेक्षा भारी नॉनव्हेज कुठे खाल्ले नाही. अर्थात हे मीच नाही तर आमच्या घरचे सगळेच म्हणतात. ती या काळात असती तर नक्कीच तिला घेऊन एखादे हॉटेल काढले असते. आजही कोकणी मालवणी ऑथेंटिक जेवण मिळणारे फेमस हॉटेल म्हणून कुठे खायला गेलो की तेथील खाद्यपदार्थांचे मी त्या बेंचमार्कवर मूल्यमापन करतो.
मॅरी मी चिकन नावा मागची कहाणी
मॅरी मी चिकन नावामागची कहाणी = 👌
“मॅरी मी कुकीज“ च पेटेंट घ्यायचं म्हणतो, असअप
दिसली उसळ केली मिसळ
दिसली उसळ केली मिसळ
हाहाहा दिसली उसळ केली मिसळ
हाहाहा दिसली उसळ केली मिसळ

अभिनंदन सामो...!
अभिनंदन सामो...!
तुमचा प्रतिसाद हजारावा होता..
तुम्ही जिंकला आहात तीन दिवस आणि दोन रात्र
या धाग्यावर येणारे सारे पदार्थ!
अर्रे!! धन्यवाद आणि तुमचेही
अर्रे!!
धन्यवाद आणि तुमचेही अभिनंदन 

३ दिवस २ रात्र पदार्थ
मुगाच्या डाळीचा हेल्दी डोसा
सगळेच पदार्थ मस्त दिसत आहेत
सगळेच पदार्थ मस्त दिसत आहेत पण तो व्हेज बरिटो बोल फोनमधून बाहेर कसा काढता येईल याचा विचार करतेय.
@ जुई आणि ॠन्मेष सगळ्याच कोकणी / मालवणी घरात सारखेच पदार्थ बनतात ( including me)
काय छळतो हा धागा
काय छळतो हा धागा
तोंडाची चव गेली असल्यास ह्या धाग्यावर यावे..
अल्पना एक से बढकर १ पदार्थ. मोरोबो रोस्टेड चिकन चा रंग १ नंबर आलाय. मटन तर माझी कमजोरी. फूडकोर्टात हमखास असते भारतिय स्टॉल वर, पण कोलेस्ट्रॉल मुळे कमी केलेय खाणे.
कुठली बाहेरची डिश आशू>>> अर्रे ऋन्मेषा, मी १०-१२ पानं एकदाच वाचली ना तुझं अंड पॅटीस दिसलं कुठे तरी.
बाकी तुझ्या घरच्या पोळ्या किती मऊसूत दिसतात, फोटोतून पण कळते.
इथे कोणी बोंबील घरी बनवते का?
इथे कोणी बोंबील घरी बनवते का? कसे बनवता? धागा आहे का?
पोळ्या बायकोने केल्यास मऊसूत
पोळ्या बायकोने केल्यास मऊसूत बनतात.
बाईंनी केल्यास नाही. पण खातो तरी काय करणार..
अंडा किंवा कुठलेही पॅटीस कोणी घरी बनवत असेल सहज असं वाटत नाही.. त्यामुळे तिथे घरचा हट्ट सोडावा.
बोंबील मला फार आवडत नाहीत पण कधी बाहेर मित्रांसोबत चकणा म्हणून कुरकुरीत बनवले असल्यास खायला मजा येते. घरच्यांना फार कुरकुरीत आवडत नाही, कारण त्यांना बोंबील ची मूळ चव आवडते.
सुके बोंबील मात्र मला भन्नाट आवडतात. असेच भाजा किंवा बोंबील बटाटा करा.. यातही बटाटा नसलेले ड्राय (घट्ट चटणी) वर्जन फार आवडते.
घरचे तूप लावलेली केळ्याच्या
घरचे तूप लावलेली केळ्याच्या पिठाची भाकरी आणि ठेचा..

मस्त जुई! कशा करतात या
मस्त जुई! कशा करतात या केळ्याच्या भाकरी?
माझी आई बोंबील मासा मच्छी
माझी आई बोंबील मासा मच्छी बाजारातून आणते व त्याचे हिरवे सार व तळून ( shallow fry) असे दोन प्रकाराने करते. . हिरवे सार मध्ये कोथिंबीर, ओल खोबरे, हिरवी मिरची, कांदा हे मुख्य घटक. Shallow
Fry करण्यापूर्वी आई बोंबील पाट्या खाली ठेवते व पाणी पूर्णपण निथळले की तांदळाचं पिठी लाल तिखट ( माशांसाठी असत ते ) मीठ हळद मध्ये घोळवून कमी तेलात टळते. नवऱ्याची आई पाट्या खाली ठेवत नाही. व तांदळाच्या पिठी ऐवजी बारीक रवा वापरते. बाकी सर्व पाककृती तीच. अधिक तपशिलात लिहिण्यासाठी त्यान विचारावं लागेल.
पाट्याखालचे बोंबील बेस्ट
पाट्याखालचे बोंबील बेस्ट लागतात..
बोंबलाची मीरकांजी कोणी करतं का..?
❝इथे कोणी बोंबील घरी बनवते का
❝इथे कोणी बोंबील घरी बनवते का? कसे बनवता? धागा आहे का?❞
तळलेले(कुरकुरीत) सुके बोंबील
मासे ६. बोंबील
बोंबील बटाटा पीठ लावून कालवण
- जागू यांच्या रेसिपीज.
@मेघा मी खूप दिवस बोंबलाच्या
@मेघा मी खूप दिवस बोंबलाच्या हिरव्या साराची पाकृ शोधतेय. डीटेलमध्ये देशील का प्लीज?
बोंबलाची मीरकांजी कोणी करतं का..?
>>>>
मीरकांजी नावच ऐकून छान वाटते आहे. रेसिपी द्या.
बोंबलाच्या हिरव्या साराला
बोंबलाच्या हिरव्या साराला बोंबलाचे भुजणं म्हणतात.. मला आवडत होतं आणि मी बनवत पण होते.. आता फक्त नयनसुख घेते..
बोंबलाच्या हिरव्या साराला
बोंबलाच्या हिरव्या साराला बोंबलाचे भुजणं म्हणतात
>>>>
हो मी एका लांबच्या आज्जींकडे खाल्लंय ते भुजणं. पण त्यावेळी रेसिपी टिपून घ्यावी ही अक्कल नव्हती. नंतर त्या वारल्या. मी किती दिवस रेसिपी शोधते आहे. प्लीज डिटेल रेसिपी दे ना.
@jui.k
@jui.k
केळीची भाकरी हा प्रकार नवीन वाटतो. रेसिपी सांगाल का?
केळ्याच्या पिठाची भाकरी
केळ्याच्या पिठाची भाकरी पहिल्यांदाच पाहिली. मस्त दिसते आहे.
आमच्याकडे पालक पनीर बरेच दिवसांनी.
प्लेट बघून पोस्ट कळली कोणाची
प्लेट बघून पोस्ट कळली कोणाची ते.. मस्त आहे हा रंग
आमच्या शेजारी एक जण जळगाव
आमच्या शेजारी एक जण जळगाव कडचे आहेत.. त्यांनी एकदा ही भाकरी बनवून दिलेली तेव्हापासून आमच्याकडे पण व्हायला लागली... त्यांचा गावी कच्च्या केळीचे पीठ बनवतात त्यातलेच आमच्यासाठी थोडे आणतात... बाजारात कुठे दिसले नाही मला हे पीठ..
भाकरीची रेसिपी- केळीच्या पिठात चमचाभर तूप, मीठ, थोडासा ओवा आणि गरम पाणी टाकून मळून घ्यायचे नेहमीच्या भाकरीसारखे आणि भाजायची... गरम भाकरीवर तूप लावायचे.. थंड झाली की चिवट होते.. ओवा नाही टाकला तरी चालतो..
ठेचा बनवायला मिरच्या लसूण गरम तेलावर चांगले डाग येईपर्यंत परतायचे त्यात शेंगदाणे, कोथिंबीर, मीठ टाकून भरड वाटायचे...
तुम्हाला मिळाले पीठ तर नक्की बनवून बघा खूप छान लागते... उपवासाला पण चालते ही भाकरी...
मागच्या पानावरचे मेदुवडे
मागच्या पानावरचे मेदुवडे आत्ता नीट पाहिले. काय परफेक्ट गोल झाले आहेत. बोट घालून सुदर्शनचक्रासारखे फिरवावेसे वाटतायत
Pages