Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.. फायदा पोस्ट स्किप करून उडी
.. फायदा पोस्ट स्किप करून उडी मारायलाही होतो…
😂
सगळेच पदार्थ मस्त आहेत.
सगळेच पदार्थ मस्त आहेत.
अस्मिता काय काय मस्त खाऊ केलाय. एखाद्या मारवाडी लग्नाला लाजवतील एवढे पदार्थ आहेत
अस्मिताची फोटो धाड मस्त!
अस्मिताची फोटो धाड मस्त!
मारवाडी लग्नाला लाजवतील >>>
मारवाडी लग्नाला लाजवतील >>>

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे मंगल कार्यालयच उघडलेय.
आजचा डिनर मेन्यू -
आजचा डिनर मेन्यू - स्वातीताईंच्या रेसेपीने व्हेजिटेबल स्ट्राटा. हल्ली मी त्यात थोडेफार बदल करते, पण हा पदार्थ मला स्वातीताईमुळे कळाला, त्यामुळे त्यांच्याच नावाने लक्षात राहतो. आजच्या स्ट्राटामध्ये पालक, मशरूम, चिकन सॉसेजेस, कांदा, लसूण, इटालियन हर्ब्ज आणि मिक्स चीझ घातलं होते. घरी केलेल्या सावरडो सँडविच लोफमधला उरलेला ब्रेड वापरला. आख्खे स्लाईस न ठेवता मी त्याचे तुकडे ठेवते.
अस्मिता, पुराणकाळात कसे देव /
अस्मिता, पुराणकाळात कसे देव / देवी यांच्या नुसत्या दर्शनानेच राक्षस / दैत्य ई च्या हातात्ली शस्त्रे गळून पडायची, तशी तुझ्या पोस्टने मायबोलीकरांची अवस्था होते. अशा भरभक्कम मेन्यूपुढे इतर कुणाचे मेन्यू काय तग धरणार? त्या पहिल्या फोटोतल्या शिमला मीरचीच्या भाजीत कणभरही हिरवा रंग न दिसता नुसता लाल रंग दिसतोय, ते कसं काय?
@अनिंद्य, आलू पुरी मस्तच.
@वामनराव, फोटो मस्त. पण इतका बीटचा रस प्यायची कल्पना करणेही कठीण जातय मला.
लाल आणि केशरी रंगांच्या शिमला
अस्मिता, फोटो धाड आवडली.
अस्मिता, फोटो धाड आवडली.
हो, इथे सवयीने आता सगळ्यांच्या घरातील भांडी पण ओळखीची झाली आहेत.
काल कांदे नवमी म्हणून कांदाभजी केली पण फोटो काढायचा राहून गेला.
अस्मिता मस्त फोटो सगळेच.
अस्मिता मस्त फोटो सगळेच.
फोटो मात्र एका ही नाही.
काल आम्ही पण कांदे मय झालो होतो. सकाळी कांदे पोहे, दुपारी तेल तिखट मीठ मसाला कांदा, चार वाजता कांदा भजी आणि चहा आणि रात्री जेवताना पंधरा कांदा गॅसवर भाजून.
कांदे पोहे आणि कांदा भजी एकाच
कांदे पोहे आणि कांदा भजी एकाच दिवशी हे बेस्टाय !! मज्जानु लाइफ.
… पंधरा कांदा गॅसवर भाजून…
हे मात्र नाही समजले
शनिवार हा सुस्तपणा घेऊन येतो.
शनिवार सुस्तपणा घेऊनच येतो. शनैः शनै दिवसाची सुरुवात.
आज न्याहरीला 👆
# शेवयांचा उपमा (आमचा शब्द)
# शाविगे बाथ (बंगलुरुकरांचा/ अहो आईंचा शब्द)
# वळवट (वामन रावांचा / मराठवाडी शब्द, मेन्यू इंस्पिरेशनबद्दल त्यांचे आभार)
… पंधरा कांदा गॅसवर भाजून…>>>
… पंधरा कांदा गॅसवर भाजून…>>> ते कदाचित पांढरा कांदा गॅसवर भाजून असावे.
होय होय, सॉरी , auto correct
होय होय, सॉरी , auto correct झालय लक्षात नाही आलं, अल्पना करेक्ट आहे, ते पांढरा च आहे अनिंद्य...
इथले सगळे पदार्थ भारी .
इथले सगळे पदार्थ भारी .
अस्मिता ची फोटो धाड तोंपासू .
अल्पनाचा स्ट्राटापण लाळगाळू दिसतोय . रेसिपी द्या प्लिज .
कसले लाळगाळू फोटो आहेत.
कसले लाळगाळू फोटो आहेत.
शनैः शनैः शनिवारच्या शेवया
शनैः शनैः शनिवारच्या शेवया शानदार!
>>> काल कांदे नवमी म्हणून
>>> काल कांदे नवमी म्हणून कांदाभजी केली पण फोटो काढायचा राहून गेला.
काल आमची कांदेनवमीच करायची राहून गेली!
..कांदेनवमीच करायची राहून
..कांदेनवमीच करायची राहून गेली …
आज करा, कांदा भजी खायला मुहूर्ताची वाट कशाला ? करा भजी आणि जाफत करा 👍
… पांढरा कांदा गॅसवर भाजून…
ओके. मग पुढे त्याचे काही करतात का ? की ते Barbecued white onion with chef’s secret spices वगैरे टाकून खायचे ?
(No subject)
ओके. मग पुढे त्याचे काही
ओके. मग पुढे त्याचे काही करतात का ? की ते Barbecued white onion with chef’s secret spices वगैरे टाकून खायचे ? >> नुसताच मीठ लावून खाल्ला जेवताना. कांदे नवमी होती कांदा हवा जेवणात म्हणून. दिवसभर एवढ झाल्यावर कांद्याची थालिपीठं वगैरे खायला भूक नव्हती म्हणून अशी आयडिया केली.
आम्ही लहान असताना आमची आजी असे पांढरे कांदे, बटाटे, रताळी, आठळ्या, वगैरे चुलीत भाजून द्यायची आम्हाला, अप्रतिम लागायचं ते सगळं.
तसेच हिराच्या काडीत दुधी भोपळ्याच्या जून बिया टोचून त्याची माळ तयार करायची, ती माळ चुलीत भाजायची आणि गरम असतानाच तूप मीठ लावून त्या बिया खायच्या. काय काय आठवतंय आज.. असो.. वाचा आणि सोडून द्या.
इथले सगळे तोंपासू फोटो बघून
इथले सगळे तोंपासू फोटो बघून जेवण झाले असले तरी परत भूक चाळवते.
>>हिराच्या काडीत दुधी भोपळ्याच्या जून बिया टोचून त्याची माळ तयार करायची, ती माळ चुलीत भाजायची आणि गरम असतानाच तूप मीठ लावून त्या बिया खायच्या. काय काय आठवतंय आज.. >> ममो, यु मेड माय डे! माझ्या लहानपणातली सेम आठवण! एक वर्ष दुधी भोपळ्याचे इतके वेड्यासारखे पीक आले होते की बस्स! भरपूर जून बीया खाल्याचे आठवतय.
चुलीत भाजलेल्या भुईमुगाच्या
चुलीत भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा, बटाटे, रताळी आम्हीही खाल्ली आहेत भरपूर. कांदा मात्र नव्हता खाल्ला नुसता. दुधी भोपळ्याच्या जून बियाही कधी नाही.
असा आगीवर भाजलेला कांदा/ टोमेटो/ लसूण काही विशिष्ट भाज्यांच्या ग्रेव्हीला वापरतो.
दाल बाटी.
दाल बाटी.
संज्योत कीर च्या रेसिपीने.
त्या चुलीत भाजुन खायच्या
त्या चुलीत भाजुन खायच्या लिस्टमध्ये कच्ची केळी पण लिहा ना.
आंबोलीत हमखास कोणा न कोणाची केळ पावसाळ्यात जमिन्दोस्त व्हायची आणि कच्ची बोटभर् केळी घरी यायची. आजी ती व बटाटे एकत्र भाजुन द्यायची. आहाहा लागतात. ही केळी इतक्यांदा खाल्लीत की कच्च्या केळ्यांचा जन्म चुलीत भाजण्यासाठीच झालाय असे वाटले होते. कच्च्या केळ्याची भाजी आयुष्यात खुप उशिरा खाल्ली. पहिल्यादा खाल्ली तेव्हा काय हा गाढवपणा, केळी कच्ची काढुन भाजी का केली असे वाटले होते
भाजीची केळ वेगळी असते हेही माहित नव्हते.
अस्मिताने आठवड्याचा मेन्यु दिलाय. मी पदार्थ असे भांड्यात काढुन वगैरे ठेवत नाही. जास्तीची भांडी घासणार कोण
बीटाचा रस काढुन उरलेल्या चोथ्याचीही गुलाबो बनेल. मला गाजर बीट रस खुप आवडतो.
वरीचे अप्पे आणि शेंगदाण्याची
वरीचे अप्पे आणि शेंगदाण्याची चटणी...
व्वा फारच टेम्प्टिग दिसतायत
व्वा फारच टेम्प्टिग दिसतायत अप्पे आणि चटणी दोन्ही ही... लाल हिरवी मिरची भारीच...
दाल बाटी आवडता मेन्यू. बाटी
दाल बाटी आवडता मेन्यू.
बाटी अशीच खरपूस भाजलेली हवी, सोबत वाफा निघत असलेली moderately spicy पचमेल दाल (मला तरी तीच वाटतेय फोटोत) 😋
वरीचे आप्पे नाविन्यपूर्ण.
दोन्ही पदार्थांची वाढणी सुंदर आहे @ ऋतुराज.
@ पिहू१४, काय पदार्थ आहे ?
लाल आणि केशरी रंगांच्या शिमला
लाल आणि केशरी रंगांच्या शिमला मिरच्या आहेत माधव >>> ओह ओके. माझ्या डोक्यात लाल्/पिवळ्या शिमला मिरच्या सलादमध्येच (किंवा अनकुक्ड पाकृमध्ये) वापरायच्या हेच समिकरण फिट्ट झालय.
>>> वरीचे अप्पे आणि
>>> वरीचे अप्पे आणि शेंगदाण्याची चटणी...
एक नंबर!
तो वेटोळे घालत वर चढत जाणारा हिरवा सर्प व बाजूला तेजस्वी उभा कुंकुम तिलक
_/\_
अप्पे आणि दाल बाटी दोन्ही
अप्पे आणि दाल बाटी दोन्ही भारी दिसत आहेत.
आप्प्यांचे प्रेझेंटेशन तर एकदम झकास !! लगेच उचलून तोंडात टाकावे असे.
Pages