लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:23

HowToGiveImageLink.GIF

"माझे सदस्यत्व" या विभागांतर्गत असलेल्या "खाजगी जागा" या उपविभागात तुम्हाला प्रकाशचित्रांना साठवण्याची सोय आहे. लेखन करताना जिथे प्रकाशचित्र हवे असेल, तिथे मजकुराच्या खिडकीखाली "मजकुरात image किंवा link द्या" असा दुवा आहे त्यावर टिचकी मारा. उघडलेल्या नवीन खिडकीत वरील भागात तुम्ही साठवलेली सर्व प्रकाशचित्रे दिसतील. त्यातील हवे ते निवडून अगदी उजवीकडील 'Send to text' हा दुवा वापरा.

आता तुमच्या मजकुरात Image tag येईल. लेखाचे अवलोकन [preview] करताना किंवा लेख साठवून ठेवल्यावर (Save केल्यावर) तुम्हाला प्रकाशचित्र दिसेल.
खाजगी जागेत साठवलेली प्रकाशचित्रे काढून टाकली तर ती ज्या लेखात टाकली आहेत तिथून दिसेनाशी होतात. यावर उपाय शोधणे चालू आहे.

खाजगी जागेत २० एम्बीपर्यंत जागा उपलब्ध आहे. २० एम्बी भरल्यावर अजून प्रकाशचित्रे चढवण्यासाठी नको असलेली प्रकाशचित्रे उडवून जागा रिकामी करणे आवश्यक आहे.

प्रकाशचित्रांचा आकार हा शक्यतोवर ४०० पिक्सेल असावा, जेणे करून फोटोंचे पान लगेच दिसेल, तसेच मायबोलीवरच्या जाहिराती दिसतील.

पिकासा लिंक कशी द्याल

पिकासामधील चित्राची लिंक येथे देण्याबद्दलच्या अधिक माहितीसाठी गुगलच्या माहिती संकलनात पहा

फ्लिकरवरून येथे लिंक देण्यासाठी फ्लिकर FAQ मध्ये पहा

फोटोंचा साईझ कमी करण्यासाठी mspaint, irfanview, acdsee ते फोटोशॉप पर्यंत अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. तसेच मायक्रोसॉफ्टची पॉवरटॉय सिरीजदेखील आहे. फ्लिकरसारखी संकेतस्थळे ही सुविधा विनामूल्य देतात. आपल्याला जे सोयीचे वाटते ते आपण वापरू शकता.

सूचना: शक्यतोवर ८०० पिक्सेलच्या प्रकाशचित्रांची लिंक देऊ नका. असे प्रकाशचित्रांचे पान दिसण्यात वेळ लागतो, [डायल अप कनेक्शन असेल तर जास्तच ...] आणि मायबोलीच्या जाहिरातींवर प्रकाशचित्र पसरते.

सध्या ही link (दुवा) फक्त मुळ लेखनात दिसतेय. प्रतिसादामध्ये सध्या तरी फोटो देता येत नाही आहेत.

धन्यवाद मदत समिती

लेखात किती फोटो देता येतात? मी ललित मध्ये लेख लिहिला त्यामध्ये फक्त एकच फोटो दिसत आहे? फोटोतर व्यवस्थित अपलोड झाले होते व दिसतही होते. आज दिसत नाहीत.

आता प्रतिसादामध्ये देखिल फोटो देता येतील.

किशोर
लेखात तुम्हाला हवे तेवढे फोटो देता येतील.

मी गेले काही दिवस खाजगी जागेत प्रकाशचित्र टाकण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मला No files were uploaded असाच मेसेज येत आहे. मी Browse करुन चित्र upload करत आहे पण तरी चित्र माझ्या खाजगी जागेत जात नाही.

>>मी गेले काही दिवस खाजगी जागेत प्रकाशचित्र टाकण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मला No files were uploaded असाच मेसेज येत आहे. मी Browse करुन चित्र upload करत आहे पण तरी चित्र माझ्या खाजगी जागेत जात नाही.>> हेच माझ्या सोबत होत आहे ..

मी प्रतिसादात फोटो अपलोड करायचा प्रयत्न करत होते, पण खाजगी जागेमध्ये त्या फोटोवर अ‍ॅड हा ऑप्शन येत नाहीये. माझे काही चुकतयं का करताना?

प्रकाशचित्रा मध्ये चित्र कसे टाकायेचे?

आपल्या प्रोफाइल मध्ये मला स्वता:चा फोटो आपलोड करायचा आहे. मी बर्‍याच वेळा प्रयत्न केला पण होत नाही.कृपया लवकर मार्गदर्शन करावे

वैयक्तिक मधे प्रकाशचित्र upload करताना The selected file water-lily-MINI.jpg could not be uploaded. The image is too large; the maximum dimensions are 300X400 pixels. असा संदेश येतो आहे. माझे प्रकाशचित्र 100 X 102 5KB size आहे. पण हा संदेश वारंवार येत आहे. हेच प्रकाशचित्र खाजगी जागेत upload करता आले. कृपया मार्गदर्शन करावे.

ते पण १-२ दिवसात वरच्या पोष्टीत जोडतो.
पिकासावेब अल्बममध्ये उजव्याबाजूला 'link to the photo' असा चौकोन येतो. त्यामधून लिंक कॉपी करून ती < img src="paste the link here" / > अशा प्रकारे देता येते.

<< उघडलेल्या नवीन खिडकीत वरील भागात तुम्ही साठवलेली सर्व प्रकाशचित्रे दिसतील. त्यातील हवे ते निवडून अगदी उजवीकडील 'Send to text' हा दुवा वापरा.>> पूर्वी मी माझी चित्रं ही पद्धत वापरून मा.बो.वर टाकू शकत होतो.पण, आता मी हवे ते चित्र निवडल्यावर "Send to Text" हा दुवाच कां येत नाही ?

>>अगदी उजवीकडील 'Send to text' हा दुवा वापरा
तो उजवीकडे म्हणजे खिडकीत सगळ्यात वर उजवीकडे आहे आता. अपलोड, थम्बनेल, डीलीट, सेन्ड टू..

<<भाऊ नक्की कसे दिसते त्याचे चित्र इथे डकवणार का?>> प्रयत्न केला पण कॉपी+पेस्ट होत नाही !
<<तो उजवीकडे म्हणजे खिडकीत सगळ्यात वर उजवीकडे आहे आता. अपलोड, थम्बनेल, डीलीट, सेन्ड टू..>>लालूजी, "अपलोड, थम्बनेल, डीलीट," दिसतं पण "सेंड टू.. "नाही.
मदतीबद्दल मनःपूर्वक आभार .

<<... "अपलोड, थम्बनेल, डीलीट," दिसतं पण "सेंड टू.. "नाही.>>ही माझी अडचण अजून दूर झालेली नाही.

नेटवर अन्यत्र असलेल्या फोटोन्ची लिन्क फोटो लेखातच दिसण्यासाठी कशी द्यायची?
(जरा यच्टीयेमेल शिकवा बोवा! आम्हाला त्यातल ओ की ठो कळत नाही Sad )

लिंबूटींबू - वरती मी लिहीले आहे नुसती ईमेज कशी द्यावी ते.

भाऊ, प्रिंट स्क्रीन वापरून स्क्रीनचा फोटो अपलोड करून लावणार का?

<<भाऊ, प्रिंट स्क्रीन वापरून स्क्रीनचा फोटो अपलोड करून लावणार का?>>नंदूसाहेब, मी "काँपुटर इललीटरेट" नसलो तरी "काँपुटर सावी" नक्कीच नाही ! स्च्रीन प्रींट घेतला पण वांदा तर अपलोडचाच आहे ना. यावर काही उपाय ?

बरं, अजून एक प्रश्न भाउ, जेव्हा तुम्ही चित्रांचा मेन्यू आणता तो कुठल्या दुव्यावर टिचकी मारून आणता ?

माझे सदस्यत्व --> खाजगी जागा
का
मजकुरात लिंक द्या

मी पिकासाची लिंक इथे द्यायचा प्रयत्न केला पण नाही जमलं. शेवटी इमेज रिसाईझ करूनच टाकावी लागली.

नंद्या, वर तू लिहीलंयस की पिकासाची लिंक देता येते. पण कोणती लिंक द्यायची? एम्बेडेड की साधी लिंक? प्लीज जरा मला इथे टाकून दाखवशील कां?

<<माझे सदस्यत्व --> खाजगी जागा
का
मजकुरात लिंक द्या>> नंदूसाहेब, दोन्ही पद्धति वापरून पाहिल्या. "टूल्स"मध्ये जावून "सीक्रसी" व "प्रायव्हसी"चे पर्यायही तपासून पाहिले. आता, सायबर कॅफेत जावून प्रॉब्लेम माझ्या पी.सी.चा आहे कीं माझ्या अज्ञानाचा, ते एकदा पडताळून घेतो व मगच पुन्हा तुम्हाला त्रास देतो.[ मी पूर्वी बरीच चित्रं माबोवर पोस्ट केली आहेत त्यामुळे जरा संभ्रमात पडलो, इतकंच] धन्यवाद.

माझे सदस्यत्व --> खाजगी जागा

या पद्धतीमध्ये सेंड टू टेक्स्ट हा मेन्यू दिसणार नाही. पण दुसरी पद्धत वापरून दिसतो.
मी प्रशासकांशी बोलतो.

आडो, टाकतो माहिती.

LinkIngFromPicasa.JPG पिकासा लिंक
१. ईमेज साईझ [थंब, ४०० पिक्सेल, ८०० पिक्सेल] ठरवा. अल्बम लिंक द्यायची नसेल तर हाईड अल्बम लिंक च्या समोरच्या चौकोनात क्लिक करा.
अ. नुसतेच चित्र द्यायचे असेल, ज्यावर टिचकी मारता येणार नाही , मोठे चित्र बघण्यासाठी, तर "image only , no link " ह्या ऑप्शनसमोरील चौकोनात टिचकी मारा.

२. १अ, वापरले नसेल तर Embed Image या खालील चौकोनात लिंक येते, ती मजकूरात जशीच्या तशी डकवा [cntrl+c आणि cntrl+v वापरून] .
१अ वापरले असेल तर Embed Image या खालील चौकोनात जी लिंक येते ती < img src="/paste/your/link/here" / > अशा प्रकारे द्या. [ < आणि image व / आणि > यामध्ये जागा सोडू नका. ते नीट दिसावे यासाठी मी जागा सोडली आहे]

सूचना: शक्यतोवर ८०० पिक्सेलच्या प्रकाशचित्रांची लिंक देऊ नका. असे प्रचि लोड होण्यास वेळ जातो, [डायल अप कनेक्शन असेल तर जास्तच ...] आणि मायबोलीच्या जाहिरातींवर प्रचि पसरते.

प्रकाशचित्र देताना उजवीकडे चित्र डावीकडे मजकूर किंवा डावीकडे चित्र उजवीकडे मजकूर (आपल्या दिवाळी अंकात असतं तसं) देता येतं का? ते कसं करायचं कळलं नाही अजून..

Pages