तळलेले (कुरकुरीत) सुके बोंबील.

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 May, 2009 - 03:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहीत्य :
७-८ सुके बोंबील (तुकडे करुन)
दोन चिमुट मिठ (कमीच घालावे कारण आधीच हे खारट असतात)
थोडी हळद, हिंग, मसाला, पाव चमचा लिंबाचा रस, तळण्यापुरते तेल.

क्रमवार पाककृती: 

बोंबील धुवून घ्यावेत. त्याला हिंग, हळद, मिठ, मसाला, लिंबाचा रस चोळावा
तवा गरम करून त्यात २ चमचे तेल टाकुन बोंबील टाकावे. गॅस मंद ठेवावा.
मधून मधून हलवावेत. साधारण ५ मिनीटांत हे तळून होतात मग गॅस बंद करावा.

वाढणी/प्रमाण: 
२ ते ३ जणांसाठी.
अधिक टिपा: 

हे थंड झाले की कडक होऊन कुरकुरीत लागतात.

माहितीचा स्रोत: 
स्वत:
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोन्डाला पाणि सुटल अगदी वाचुन्..मस्त

thanks jaagu ,, मला हि कृती हवीच होती , बोंबील फक्त धुवून घ्यायचे का पाण्यात थोडावेळ ठेवायचे ?

****************************************
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटि समप्रभ|| निविघ्नंकुरूमोदेव सर्वकार्येषुसर्वदा||||

नुतन जर तुला नरम हवे असतील तर थोडा वेळ पाण्यात ठेव. आणि कडक व्हायला हवे असतील तर नुसते धुवून काढ.

मी करुन पाहिले असे.. जे कुरकुरीत झाले त्यांची तर बातच वेगळी...:) पण काही जरा चिवट राहिले. थोडा वेळ झाकण वगैरे ठेवायची गरज पडते का गं???? थोडे उरलेत ते आज करणार आहे रात्री.

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

झाकण ठेवलेस तरी चालेल पण त्याची वाफ पडून जरा नरम होतील. अग गॅस मंद ठेउन जरा जास्त वेळ तळ.

ठिक. आज करते, उद्या सांगते Happy

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

हा उद्या आला नाही वाटते अजून ? Proud

उद्या आला, बोंबील पोटात गेले आणि पचले सुद्धा.. तुला पाहिजे होते तर आधी सांगायचे, पाठवले असते थोडे.

आहेत अजुन ४-५ शिल्लक.. (पुरवुन पुरवुन खातेय ना Happy ) ते करते आणि पाठवते.

साधना

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

जागु, काल केले होते मस्त कुरकुरीत झाले. नाहितर मी कधी सुके बोंबिल खात नाही पण काल खाल्ले.

मी dry fish चा tremendous fan आहे
मला एक गोश्ट विचारयचि आहे.......I live in brussels......can we carry dry fish by air with us on flight? any experiences?

फोटो फोटो फोटो....
टाका टाका टाका....
लवकर लवकर लवकर... Rofl Rofl तुका कित्या होये मेल्या शेवटी तू कोबीचीच भाजी खातलस. थय गजालेर बोंबलाचो फोटो टाकलो तो बघ.

नीलग्या माका कमी लेखूचो काय्येक काम नाय..
आता रेसिप्या वाचूक सुरू केलंय, वायच थांब मगे मासे पाडूक (रेशिप्या) सुरू करतलंय मगे टेस्ट Wink

मस्त गं जागू! आमच्याकडे वालाच्या डाळीचे मस्त लसणाच्या फोडणीचे वरण-भात आणि जोडीला असे बोंबिल करतात.

जागू, तोंपासु हे असे तळलेले बोंबिल. याबरोबर नुसता वरण भातही छान लागतो. सुका बांगडाही तळतेस का तु?
बरीच वर्षे झाली, सुके बोंबिल्/बांगडा खाऊन.
नाना फडणवीस, काहीजण आणतात पण रिस्क आहे. त्यामुळे मी आणत नाही. पण सुकट्,सोडे तुम्हाला चायनीज्,कोरीअन दुकानात मिळतील.

सुका बांगडा म्हणजे माझा आवडीचा. पुर्वी आम्ही चुलीत भाजायचो. चुलीत भाजला की त्याचा वास आजूबाजूच्या घरांनाही जायचा. इतर कोणी भाजला की आम्हालाही यायचा आणि तोपासु व्हायचे. आपोआप भुक लागाय्ची.

तळताही येतो सुका बांगडा घुवुन घ्यायचा आणि इतर मासे तळतो त्याप्रमाणे तळायचा. फक्त मध्यम आचेवर थोडा जास्त तळायचा. सुका असल्याने शिजायला वेळ लागतो.

वल्लरी हे बोंबील, बांगडे कोळणी मोठ्या प्रमाणावर सुकवतात. आतुन साफ केलेले नसतात. आपण कापताना तो भाग काढून टाकायचा.

पूर्वी सुके बांगडे मिळायचे ते खरच सुके असायचे.आमच्याकडे कोकणातून यायचे. भाजलेल्या बांगड्यावर खोबरेल तेल टाकून किंवा त्याची किसमूर (कोशिंबीर) अफलातून लागायची. काही वर्षांपूर्वी परळच्या कोकण खाद्यजत्रेतून
सुका बांगडा घरी नेऊन भाजला.पण वासही बेकार आला.तसेच खडखडीत सुकाही नव्ह्ता.कित्येक वर्षे झाली
सुका बांगडा न खाऊन!

मी dry fish चा tremendous fan आहे>>> १००% सहमत! फक्त सुका बांगडा , बोंबील ,करंदी व सोडे!

हो वजनात भरण्यासाठी आमच्याइथेही पाणी मारतात सुक्या माशांवर, त्यामुळे विकत घ्यावे वाटत नाहीत.

पुण्याचीविनिता
पाणी मारलेल्याबद्द्ल नाही म्हणत मी. हे सुके बांगडे पूर्वी चपटे असायचे.कोकण खाद्यजत्रेतून घेतलेला बांगडा जाडजूड होता.

आमच्या घरी बोंबिल धुऊन ,,फडक्यात गुंडाळुन पाटाखाली ठेवतात... जास्तीचे पाणी निघुन गेल्यावर मसाला लावुन मग तळतो.. तळताना जास्त उडत नाही आनि जास्त कुरकुरीत होतात Happy

ड्रिमगल मी करुन बघेन.

अंकु तू ओल्या बोंबला बद्दल म्हणतेस की सुक्या?

हो सुके मासे निट पडताळूनच घ्यावे लागतात. बांगडे, बोंबिल, वाकट्या निट सुकलेत की नाहीत ते पाहूनच घ्यायचे. तसेच सोडे घेतानाही निट खात्री करुन घ्यायची कोलंबीच आहे का, काही ठिकाणी माकळीचे छोटे तुकडे करुन सोडे म्हणुनही विकतात.