Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आप्प्यांचे प्रेझेंटेशन तर
आप्प्यांचे प्रेझेंटेशन तर एकदम झकास !! लगेच उचलून तोंडात टाकावे असे.>> +१
पिहु, मंचुरियन आहे का?
दाल बाकी मस्त!
एका मैत्रिणीने भरपूर शेवया आणून दिल्यात ... लवकरच करीन
ममोची कांदे नवमी जोरदार!
तसेच हिराच्या काडीत दुधी
तसेच हिराच्या काडीत दुधी भोपळ्याच्या जून बिया टोचून त्याची माळ तयार करायची, ती माळ चुलीत भाजायची आणि गरम असतानाच तूप मीठ लावून त्या बिया खायच्या. >>> चुलीतल्या नाही पण गॅसवर भाजलेल्या खाल्ल्या आहेत. हेमाताई, याकरता धन्यवाद.
ऋतुराज, आप्पे मस्तच
वाव.. आप्पे एकदम बदाम बदाम
वाव.. आप्पे एकदम बदाम बदाम बदाम आहेत
आज अलमोस्ट निम्मा महाराष्ट्र
आज अलमोस्ट निम्मा महाराष्ट्र साबुदाणा खाऊन असला तरी इथे एकही फोटो नाहीए साबुदाणा वड्याचा / खिचडीचा 😀
ऋतुराज , अप्पे आणि चटणी मस्तच
ऋतुराज , अप्पे आणि चटणी मस्तच !!
आज अलमोस्ट निम्मा महाराष्ट्र
आज अलमोस्ट निम्मा महाराष्ट्र साबुदाणा खाऊन असला. >>>
घ्या, अनिंद्य, साखिचा फोटो
घ्या, अनिंद्य, साखिचा फोटो
साबुदाणा वडे
साबुदाणा वडे

साखि व वडे मस्तच..
साखि व वडे मस्तच..
मला साबुदाणा वडे म्हटले की दादर-शिवाजी पार्कातल्या प्रकाशचेच वडे आठवतात. आधी मोठ्या मोसंबीसारखे असणारे वडे आता लहान झालेत पण चव तीच. सोबत दाण्याची चटणी देतात. ती तर खुपच आवडती.
सोयाबीन चिली आहे .
सोयाबीन चिली आहे .
साबुदाणा वडे, खिचडी दोन्ही
Thanks rmd
साबुदाणा वडे, खिचडी दोन्ही आवडते प्रकार.
काल दोन्हीं चा लाभ घेतला, फोटो नाही दिले कारण आधी दिले आहेत
आमच्याकडे द्वादशीला सुरनळी
(No subject)
(No subject)
आज एकादशीला दुपारी साखी, मठ्ठा,चटणी, आमटी, काकडी, सिझनचा पहिला आमरस.
रात्रिसाठी वडे केले पण तळायला सुरवात करतानाच दणादण फडशा पडत होता त्यामुळे फोटो काढायला उरतिल का हा विचार करुन तळतानाच एक फोटो काढुन घेतला..चार उरले.
श्रवू सुरनळी म्हणजे काय? घावन
श्रवू सुरनळी म्हणजे काय? घावन / धिरडी असे काही आहे का? आणि बरोबर काकवी आहे का?
प्राजक्ताची थाळी मस्त दिसते आहे. वडे एकदम प्रो!
सुरनळी बरोबर मध आणि तूप आहे..
सुरनळी बरोबर मध आणि तूप आहे..
सुरनळी हि गोड धिरडी / डोसे आहेत.. ( तांदूळ.. मेथी.. ओले खोबरे , पोहे, हळद, गूळ ) मंगलोर स्पेशल.. त्याला छान जाळी/नळी पडते..
व्हेजिटेबल स्ट्राटा. > पटकन
व्हेजिटेबल स्ट्राटा. > पटकन काढून खावासा वाटतो..
ऋतुराज. > प्लेटसकट आप्पे एकदम सुबक आहेत.. तुम्ही भारी निगुतीने करता बाबा.. एकदम मस्त टम्म आहेत..
माझे अप्प्ने असे टम्म नाही होत.
उपवास थाळी पण मस्त.. मी सगळे
उपवास थाळी पण मस्त.. मी सगळे बघूनच खाऊन टाकते..
प्राजक्ताची थाळी
प्राजक्ताची थाळी = 👌
असा मेन्यू असेल तर उपास धरायला अजिबात हरकत नाही माझी 😀
श्रवु् , सुरनळी नवीन पदार्थ माझ्यासाठी. सोबत मध हेसुद्धा नाविन्यपूर्ण आहे. जय हो !
श्रवु, ही अशीच रेसिपी आहे का
श्रवु, ही अशीच रेसिपी आहे का?
https://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93071.html?1134039795
श्रवु आणि प्राजक्ता, भारीच
श्रवु आणि प्राजक्ता, भारीच आहेत मेन्यू.
सॉटीड सॅलड !
सॉटीड सॅलड !

मस्त रेसीपी आहे श्रवू. आणि
मस्त रेसीपी आहे श्रवू. आणि अनया पण धन्यवाद.
साखी साबु वडे मस्त आहेत.
साखी साबु वडे मस्त आहेत.
प्राजक्ता, मस्त ताट
सुरनळी नवीन आहे माझ्यासाठी.
सॅलड, रंगीबेरंगी दिसतंय.
श्रवु, ही अशीच रेसिपी आहे का?
श्रवु, ही अशीच रेसिपी आहे का? > हो.
टोमॅटो मसूर पुलाव - वन डिश
टोमॅटो मसूर पुलाव - वन डिश मील
.
वरती आलेल्या पदार्थांचं कौतुक
वरती आलेल्या पदार्थांचं कौतुक राहून गेलं होतं.
ऋतुचे आप्पे, श्रवुच्या सुरनळ्या, प्राजक्ता आणि जुईचे साबुदाणा वडे झकास दिसतायत.
अलिकडच्या पानांवरचे अस्मिता आणि अल्पनाचे मेन्यूज एकदम तोंपासु.
बाकी सगळ्यांचे फोटो एकसे एक अगदी!
खिचडी यमी.
खिचडी यमी.
@ टोमॅटो मसूर पुलाव
@ टोमॅटो मसूर पुलाव
Looks like Lebanese Mujadara.
छान दिसतोय.
@ सॉटीड सॅलड
आवडता प्रकार. फक्त कॉली निवडून बाजूला केला असता 😀
आज दहीभात
आज दहीभात
# दहीभात
# पेरुगन्नम
# मोसरन्ना
# थाईर सादम
मी थाईर सादम म्हणतो कारण तोच शब्द तोंडात बसलाय तमिळ मित्रांमुळे. तिकडेच जास्त खाल्ला.
जर पंचतारांकित रेस्तरांमधे मेन्यूकार्डवर लिहायचा असता तर हा पदार्थ असा लिहिला असता :
Famous South Indian rice delicacy made with probiotic yogurt and locally sourced elements. A rich and wholesome homely melody of Soft, tender rice grains in creamy, tangy curd laced with citrusy, herbaceous curry leaves, nutty dals, peppery mustard seeds and buttery fried cashews वगैरे वगैरे
फारच हेल्दी नको व्हायला म्हणून मग चार-दोन-सहा सात बटाट्याची भजी तेव्हढी घेतली सोबतीला 😀
Pages