Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ 
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या 
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मानसी, दुसऱ्या फोटोत
मानसी, दुसऱ्या फोटोत किल्ल्याची भजी आहेत का? नेवैद्याचे ताट सुंदर!
इडली, चटणी,सांबार तोंपासू!
बाई दवे, ती बादली फक्त एखाद
बाई दवे, ती बादली फक्त एखाद लिटरची आहे हं!
>>>>>>>
ही सुद्धा बरे पैकी मोठी साईज आहे. हॉटेलमध्ये ज्या बादल्या देतात त्या मानाने..
घरात दोन माणसे आजारी आणि दोन
घरात दोन माणसे आजारी आणि दोन माणसे ठणठणीत असतानाचा आदर्श पावसाळी मेनू
नैवेडद्या चे ताट खूप सुंदर
नैवेडद्या चे ताट खूप सुंदर दिसतेय...
त्याच्या खाली काय आहे
वरची भजी मस्त कुरकुरीत दिसत
वरची भजी मस्त कुरकुरीत दिसत आहेत..
To dodkyacha dosa aahe
To dodkyacha dosa aahe
खरपूस पावांना तेवढी tempting
खरपूस पावांना तेवढी tempting भाजी पुरेल का?>> नाहि ना ! पण मला गरमच आवडते पावभाजी मग एकदाच जास्त वाढुन घेतली की भाजी गार आणी घट्ट होणार मग शेवटी शेवटी बटर टाकल्यावर ते सर्र्कन वितळत नाही म्हणून वॉर्म सेटिन्ग वर ठेवुन थोडी थोडी वाढुन घ्यायची.
Herekayi dosa .hebbars
Herekayi dosa .hebbars kitchen recipe
Dodkyacha dosa... Vegla pan
Dodkyacha dosa... Vegla pan chhan distoy
आलू-मटर आवडले. रेसिपी द्या.
आलू-मटर आवडले. रेसिपी द्या.
मश्रुम फ्राईड राईस
मश्रुम फ्राईड राईस
फारच छान. रंगसंगती तर एकदम
फारच छान. रंगसंगती तर एकदम खास…. रेसिपी द्या लगेच.
अगदी
अगदी
मश्रुम फ्राईड राईस = कलरफुल
मश्रुम फ्राईड राईस = कलरफुल एकदम !
धन्यवाद
धन्यवाद
रेसीपी सोपी आहे.
गार भात थोडा मोकळा हवा.
पॅन वर थोड्या तेलात अंडी फ्राय करून घ्या. थोडे मीठ आणि मिरपूड टाकून. ते बाजूला काढून ठेवा.
मग एक मोठा चमचा बटर पॅन मध्ये टाका. त्यात मश्रुम टाका. त्यांच्यावर पण मीठ मिरपूड टाका. बटर मध्ये मीठ असेल तर इथे मीठ कमी घाला. मश्रुम चे पाणी सुटून आणले आणि बटर दिसायला लागले की ते पण बाहेर काढून ठेवा.
आता पॅन मध्ये थोडे तेल टाकून त्याच्यावर कांदापातीचे पांढरे कांदे परतून घ्या आणि मग त्यावर भात टाका. भात थोडा परतला की मश्रुम आणि अंडी टाका. सगळे मिक्स करा.
वाढताना वरतून कांदापातीचे हिरवे टाका.
Oil plus mohri and fry potato
Oil plus mohri and fry potato.once cooked add haldi and red chilli and salt .add boiled matar from top and stir fry
मानसी, ऋ, धनि मस्तच दिसतायत
मानसी, ऋ, धनि मस्तच दिसतायत सगळे पदार्थ.

सातारला आमच्या अंगणात शेवगा आहे. त्याच्या पानांची भाजी केली होती. पाला अगदी कोवळा आणि ताजा होता. एवढा ताजा की पाला काढला, निवडला आणि भाजी केली. भाजी अप्रतिम लागत होती. चव शब्दात सांगता नाही येणार पण जेवण झालं तरी चव जिभेवर रेंगाळत होती. ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य करून बघा.
चव शब्दात सांगता नाही येणार
चव शब्दात सांगता नाही येणार पण >>>> फोटोत दिसतेय
आमच्याकडे काल शेवग्याच्या शेंगा होत्या. (बटाटा आणि ग्रेव्हीवाली) कदाचित वेज भाज्यात माझी सर्वाधिक आवडीची.
शेवग्याच्या पाल्याची भाजी
शेवग्याच्या पाल्याची भाजी माझी नेहमीच आवडती आहे. तुमची कांदा घालून परतलेली भाजी अगदी खमंग दिसतेय; सोबत भाकरी होती ना?
---
तरवंटा / तरोटा / टाकळा ही आता पावसाळ्याच्या दिवसांत येणारी एक भाजी मराठवाड्यात आढळते. कुणी खाल्लीय का?
ममो, भाजीचा खमंगपणा फोटोतही
ममो, भाजीचा खमंगपणा फोटोतही कळतोय.
वारा, हो खाल्लीये.. पावसाळ्यात खावी म्हणतात म्हणजेच जे जे ज्या ऋतूत येतं ते खावं ... विदर्भात आषाढी द्वादशीला करतातच.
देगा देवा मजला
देगा देवा मजला

पिझ्झा भाकरीचा
# भाकरीचा Pizza
# जोंधळकरणीने ल्यायला इटालियन साज
Mast distoy bhakricha pizza
Mast distoy bhakricha pizza
अरे वाह.. भारी
अरे वाह.. भारी
चपाती पिझ्झा आणि ब्रेड पिझ्झा आमच्या कडे हिट आहेच..
कधी भाकरी करून हे ट्राय करायला हवे
वरचे सगळेच फोटो अगदी मस्त
वरचे सगळेच फोटो अगदी मस्त आहेत.

आजचे आमचे डिनर..
मश्रूम पास्ता -अल्फ्रेडो सॉस मध्ये, स्टर फ्राय व्हेजिटेबल्स, थोडे अगदी साधे सलाड (आईसबर्ग + काकडीवर मीठ -मिरेपुड) आणि कांदा- बटाटा घातलेला फ्रिटाटा
भाकरी पिझ्झा मस्त दिसतोय,
भाकरी पिझ्झा मस्त दिसतोय, अनिंद्य.
अल्पना, रविवारचा पांढरा मेन्यू मस्त. पूर्वी पांढर्या बुधवारचे व्रत असायचे त्याची आठवण झाली.
फोन मध्ये अजून काही फोटो
फोन मध्ये अजून काही फोटो सापडले.

शिळ्या फुलक्याचे ग्रील्ड सँडविच ( स्वीट कॉर्न, पनीर, शिमला मिरची आणि गाजर अशी भाजी करून त्यावर चीज स्लाइस स्टफ केलं होते फुलक्यामध्ये), चिकन फ्राईड राईस ( लाल तिखट, बालस्मिक व्हिनेगर, सोया सॉस आणि चिली फ्लेक्स असा सॉस वापरला आहे फ्राईड राईस मध्ये + एक अंडे स्क्रॅम्बल करून) आणि एशियन काकडी सलाड.
बटाटा घातलेला फ्रिटाटा मला
बटाटा घातलेला फ्रिटाटा मला द्या 😋
प्लेटिंग सुंदर आहे तुमचे अल्पना
इकडच्या स्वारींना शिळे काहीच चालत नाही, म्हणून मग फ्रेश भाकरी बडवून पिझ्झे करावे लागतात. सासुरवास कुणाला चुकलाय ? 😁
Ratatouille open sandwich (
Ratatouille open sandwich ( with 50% wheat sourdough bread) with roasted bell pepper hummus, greek salad with feta cheese and cottage cheese stake. ( ब्रेड घरी बनवलेला आहे.) घराजवळच्या एका कॅफे मध्ये असे सँडविच मिळते.ते इन्स्पिरेशन होते. तेवढं सँडविच जेवायला पुरेसे वाटलं नाही म्हणून मग बाकी सलाड आणि पनीर वाढवलं.

.. ब्रेड घरी बनवलेला आहे…
.. ब्रेड घरी बनवलेला आहे… 👍
हे करायला आवडेल. योग्य जागी रेसिपी टाका प्लीज.
In fact, होम बेकिंग, रेसिपी, टिप्स, प्रयोग, फोटो आणि खटाटोपाचा धागाच काढा कुणीतरी
तुम्ही काढा धागा, मी लिहिन
तुम्ही काढा धागा, मी लिहिन तिथे. ब्रेडची रेसेपी माझी स्वतःची नाहीये. कधी युट्युब, कधी एखादा ब्लॉग कधी माझ्या ब्रेड बेकिंग च्या मेंटॉरने दिलेली रेसिपी फॉलो करते मी. थोडे मायनर बदल करत असते, ते कधी नोंदून ठेवते कधी नाही.

साधा ब्रेड हल्ली फारसा केला जात नाही, सावरडो स्टार्टर वापरूनच ब्रेड बनवते नेहेमी. टिप्स लिहू शकेन थोड्याफार.
हा मध्यंतरी केलेला सावर्डो स्टार्टर वापरून केलेला सँडविच लोफ (बहूतेक २५% खपली गहू कणिक आणि बाकी मैदा वापरला होता यासाठी)
Pages