खाऊगल्ली - आजचा मेनू - (६)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ Happy

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415

तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर मेनू, अनिंद्य.
Happy
आणि त्याहून सुंदर डिस्क्रिप्शन!!
भारी क्रिएटिव्ह आहात!

Looks like Lebanese Mujadara >>> शोधून पाहते.

आयला, बटाटा भजी!! भयंकर आवडतात. थाईर सदमच्या आधी तीच आणा इकडे Proud

मसूर पुलाव
दहीभात
बटाटा भजी

एकदम मस्तच

यम्म्म साबू वडे Sad मला कधी मिळतील Sad
मस्त दही भात & बटाटा भज्जी.
कुणी गिलक्याची/घोसाळ्याची भज्जी केलीत तर फोटो टाका.

मी परवा लाल तांदुळाचा खिचडा केला होता, चव & पोषण्मुल्य उत्तम आहेत. फोटो राहिला काढायचा. पाव भाजी मसाला घातला होता. दिसायला फार ग्रेट नाही वाटत पण.

काहीतरी AI / technology वापरून सर्व पदार्थ डाउनलोड करण्याची सोय हवी !

Mix Veg Soup for lunch
झणझणीत - नाक कान डोळे उघडणारे

c2329c1a-bfee-4557-83e6-9322162f2586.jpeg

हे अर्थातच होम मेड नव्हते Happy

Screenshot_2025-07-10-01-09-23-99_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg
घरी बनवलेला पिझ्झा.. कॅप्सिकम, पनीर, कॉर्न टाकले आहे.. पिझ्झा बेस घरीच बनवला...
बहुतेक सगळ्यांना चिकन पिझ्झा वाटत होता.. Happy

अनिंद्य, व्हेज सूप वेगळंच वाटतंय. काय काय घातलं होतं त्यात?

जुई, तो खरंच चिकन पिझ्झा वाटतोय Lol पण छान दिसतोय बर्का.

सुप मस्त दिसतय...मला सुप ,सॅन्डविचेस भयकर आवडतात.इकडे एक souplantaion नावाची चेन होती.माझी फेवरेट बफे स्टाइल असल्याने कोविड काळात बन्द झाली.
जुईचा पिझ्झा एकदम लोडेड दिसतोय, भरपुर टॉपिन्ग टाकलेत..यम्म!

@ jui.k होम मेड पिज़्ज़ा = 👌

@ प्राजक्ता सूप + सॅन्डविचेस भयंकर आवडतात …

Ditto, खूपदा लंच हाच असतो माझाही

@ rmd ,

chef तिबेटी मुलगा होता, standard मेन्यूत नसलेले व्हेज वर्जन ऑफ तिबेटियन थुकपा सूप बनवले त्याने, on request.

Zucchini, Carrots, boiled rice noodles, roasted water chestnuts असे काय काय होते त्यात. बटर / ऑइल मात्र थोडे जास्तच पडले होते.

जो भी हो, मज़ा आ गया.

थुप्पा/थुक्पा मस्तच लागते. इथे मिळणार नाही. करायला हवे.

पिझ्झाही मस्त दिसतोय. तोही कित्येक वर्षात खाल्ला नाहीय.

एवढ्यातल्या एवढ्यात बनवलेले केक्स.. नुकतंच शिकलीय म्हणून फिनिशिंग इतकी छान नाहीये..
Screenshot_2025-07-12-12-30-37-09_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpgScreenshot_2025-07-12-12-31-08-10_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg
चॉकलेट केक
Screenshot_2025-07-12-12-33-49-95_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg
bento cake

@ bento cake

सध्या बेंटो बॉक्स लंच / बेंटो केक खूपदा ऐकतो. कधी चाखला नाही.

शेप छोटा असतो तसे बेंटो केक/ कृती काही वेगळी असते का ?

साधना, धनवंती थँक्यू Happy
अनिंद्य फक्त आकार छोटा असतो आणि डिझाइन मिनिमल असते बाकी सगळं नॉर्मल केक सारखंच असतं..

आज नाष्ट्याला कोळाचे पोहे आणि मिरगुंडं

.
दुपारच्या जेवणात ऋन्मेषच्या रेसिपीने केलेले तांबाट्याचे सार, भात आणि पापलेट फ्राय.
म्हणजे पापलेट फ्राय मी केले आहे आणि सार धनिने केले आहे Happy

.

.
@ऋन्मेष,
जबरदस्त रेसिपी आहे साराची. आम्हाला खूप आवडलं. भन्नाट झालं होतं. जास्तीचं केलंय म्हणजे उद्यासुद्धा खाता येईल Happy

कोळाचे पोहे आणि मिरगुंड अत्यंत लाळगाळू दिसताहेत हे या ठिकाणी नमूद करतो. जबरी !

हॅरी पॉटर मधली मॉली वीजली फायरप्लेस मधे उगवलेल्या एका पात्राच्या तोंडात कोणसासा पदार्थ भरवते तशी जादू आली असती तर तुमच्या फायरप्लेस मधे किंवा अवन मधे नक्की आ वासून "इफ यू इन्सिस्ट..प्लीज" म्हणालो असतो. Happy

जुई केक सुरेख आहेत. हार्ट शेपचे वडे Happy

कोळाचे पोहेही छान दिसताहेत. मी दिवाळीला केले होते. दिवाळीनंतर खाल्लेच नाहीत.

साराचा रंग छान आलाय.

थँक्यू सुनील! यू मेड माय डे Wink

धन्यवाद साधना. मी पण बरेच दिवसांनी केले कोळाचे पोहे. एरवी कांदेपोहेच केले जातात.

जुई, रोमँटिक साबुवडे भारीच! Happy

@rmd प्लेटिंग व फोटो एकदम कातील!

कोळाचे पोहे म्हणजे काय? मिरगुंडं म्हणजे तांदुळाच्या पापड्या का?

@jui.k प्रेमळ वडे आवडले!

कोळाचे पोहे आणी मिरगुन्ड भारी दिसतायत. दुसरा फोटो एखाद्या फुड मॅगझिनच्या कव्हरवरचा वाटतोय.
साबुदाणा वडे मस्त.

कोळाचे पोहे म्हणजे काय >>> नारळाचे दूध, चिंचेचा कोळ, गूळ आणि चवीपुरते मीठ असा कोळ करून घेतला, या कोळाला वरून तूप, जिरे, आणि हिरवी मिरचीची फोडणी दिली. त्यात भिजवलेले जाड पोहे मिक्स केले. वरून कोथिंबीर घातली.

मिरगुंडं म्हणजे पोह्याच्या छोट्या पापडांसारखी असतात. थोडी चव वेगळी असते.

रमड मस्तच! आणि तुमच्या धनीना सुद्धा धन्यवाद..
सारभात मासे बघूनच भूक लागते नेहमी.. आणि वासाने लाळ गळायला सुरुवात होते.

जास्त केले हे चांगलेच केले. मी तर सलग चार दिवस सहज न कंटाळता खातो. दरवेळी माश्याची तुकडी तेवढी ताजी तळून द्यावी.

जुई, साबुदाणा वडे छानच पण ते हार्ट शेप अजून मस्त दिसत आहेत.

Pages