Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ 
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या 
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी सुद्धा काल पालक पनीरच केले
मी सुद्धा काल पालक पनीरच केले होते. पण मी मोहरीची पाने टाकते नेहमी. यावेळी जास्त पडली की काय नकळे. कडू झाली भाजी. टाकून दिली.
---------
नवर्याच्या पोटात भाज्या जाव्या म्हणुन ती मोहरीची पाने घालत असे. ती मस्त लपून जात पालकात. म्हणजे मॅश होतच पण स्वाद सुद्धा वेगळा लागत नसे. सो फार सो गुड.
पण काल भाजी कडू झाल्याने आता मोहरीची पाने टाकूच नकोस असे म्हणालेला आहे. आता बसा कोबी एके कोबी आणि कोबी दुणे घेवडा/पालक करत.
जरा म्हणुन भाज्या खात नाही.
मी मोहरी नाही पण थोडी कसुरी
मी मोहरी नाही पण थोडी कसुरी मेथी घालतो नेहमी. त्याने चांगली चव येते.
आप्पेफिन्स (आप्पे इन मफिन पॅन
आप्पेफिन्स (आप्पे इन मफिन पॅन)
>>>>मी मोहरी नाही पण थोडी
>>>>मी मोहरी नाही पण थोडी कसुरी मेथी घालतो नेहमी. त्याने चांगली चव येते.
ओह ओके. धन्यवाद
आप्पेफिन्स Very innovative !
आप्पेफिन्स = 👌
Very innovative !
बोट घालून सुदर्शनचक्रासारखे
बोट घालून सुदर्शनचक्रासारखे फिरवावेसे वाटतायत>>
आप्पेफिन्स भारी आयडिया.
धनि, नान घरी केलास का?
नान घरी नाय फकस्त भाजी
नान घरी नाय
फकस्त भाजी
आई (साबा) नॉनव्हेजबरोबर,
आई (साबा) नॉनव्हेजबरोबर, रोटले करत. रोटले म्हणजे त्रिकोणी अश्या दडदडीत म्हणजे घसघशीत पोळ्या असत. नाजूकसाजूकपणा नसे.
धनी तुझी पालक पनिरची रेसिपि
धनी तुझी पालक पनिरची रेसिपि दे छान हिरवा रन्ग आलाय..
केळ्याच पिठ फक्त जळगाव भागातच मिळत, माझ्या नणदेने दिल होत..त्याची उपवासाची थालपिठ,पुर्या अस काही काहि केल होत साबानी.केळीच उत्पादन भर्पुर असल्याने उत्तम वेफर्स पण मिळतात.
आप्पेफिन्स एक नंबर दिसतायत,
आप्पेफिन्स एक नंबर दिसतायत, मोरोबा!
प्राजक्ता >> तसे काही विशेष
प्राजक्ता >> तसे काही विशेष नाही. पण पालक ब्लांच करून मग मिक्सर मधून काढला. कांदा फ्राय करून घेतला, त्यावर आले, लसूण आणि मिरची वाटलेली घातली. मग टोमॅटो घातला. हे सगळे परतून घेतल्यावर मसाले घातले. मी एव्हरेस्ट चा गरम मसाला घातला. थोडी धणेपूड, मिरपूड आणि कसुरी मेथी. आणि थोडी जायफळ पूड नक्की घालायची. हे सगळे mix झाले की मग ५ मिनिटे पालक प्युरी घालून शिजवायचे. मग परत पनीर घालून ते थोडे मऊ होऊ पर्यंत शिजवायचे.
हिरवा रंग हवा असेल तर थोडे कमी शिजवायचे. ढाबा स्टाईल पाहिजे असेल तर मस्त भरपूर शिजवायचे आणि थोडे बटर घालायचे.
ओके ! आता ब्लान्च करुन बघेन
ओके ! आता ब्लान्च करुन बघेन
एरवी मी कान्दा, मिरची , टोमॅटो, आल-लसून सगळ परतुन घेते त्यावरच पालक टाकुन थोडा आक्रसला की लगेच गॅस बन्द, थन्ड झाला की मिक्सर मधुन काढते मग बटर वर किचन किन्ग , कसुरी मेथी वैगरे टाकुन परतुन घेते..पनिर टाकुन सगळ्यात शेवटि क्रिम, क्रिम टाकल की गॅस बन्द.
Yes, ब्लांच करून उपयोग होईल
Yes, ब्लांच करून उपयोग होईल आणि फक्त पालक बारीक करून तो कांदा वगैरे मसाल्यावर घालून बघ. बाकी गोष्टी मिक्सरमधून काढायची गरज वाटत नाही.
व्वा. जबरदस्त फोटो टाकलेत
व्वा. जबरदस्त फोटो टाकलेत सगळ्यांनी. मस्तच.
बरेच दिवसांनी फिरकलो इकडे.
तोंडाला पाणी सुटले
तिथे घरचा हट्ट सोडावा>>>
तिथे घरचा हट्ट सोडावा>>> अर्रे हट्ट नाहीये. पण बाहेरचा पदार्थ असल्याने कौतुका ला पास.
मेघा & सुनील धन्यवाद.
फ्रेश बोंबिलाबद्दल च विचारत होते. सुक्याला वास असतो तो आवडत नाही.
जुइ, केळ्याच्या पिठाची भाकरी पहिल्यांदा ऐकली, पाहिली. मस्त च.
सुक्याला वास असतो तो आवडत
सुक्याला वास असतो तो आवडत नाही >>> आणि मला उलट तोच आवडतो. सुक्या बोंबीलचा हवाबंद डबा उघडताच येणारा वास.. बंदराजवळ सुद्धा जो खाऱ्या वाऱ्यासोबत सुक्या मच्छीचा वास येतो.. आहाहा.. फक्त स्वच्छता हवी त्या जागी. अन्यथा अवघड होते.
काल बाजारातून ताजी, घट्ट,
काल बाजारातून ताजी, घट्ट, लहान लहान बीटं आणली खरी पण इथे बीटं कुणाला आवडतात! अहो कामावर गेलेल्या; घरी मी एकटाच. मग काय. त्यातली पाच बीटं काढली, मिक्सितून मस्त रस करून केवळ लिंबाचे चार-पाच थेंब लिंबू पिळून पिऊन टाकला! 😋
चला, निरोगी होऊ या! 💪
पावसाळी हवा, त्यात आज टिपिकल
पावसाळी हवा, त्यात आज टिपिकल “भंडारे का मेन्यू”
पूरी + तरीवाले आलू
वामन राव, मस्तच दिसतोय बीट
वामन राव, मस्तच दिसतोय बीट ज्यूस....
बीट राहिली असतील तर अनिंद्य यांची बीटची गुलाबो करून पहा.
अनिंद्य,
भंडारा मेन्यू मस्त आहे.
आज कांदे नवमी आहे.
कांदा भजी बेत आहे रात्री. फोटो टाकतो
कांदा भजी
कांदा भजी 😋
कांदा भजी + सोबत मीठ शिंपडलेल्या तळलेल्या हिरव्या मिरच्या = सुपर फेवरेट.
एन्जॉय !
वामनराव, अनिंद्य, मोरोबा
वामनराव, अनिंद्य, मोरोबा मस्तच. पालक ब्लांच केला की हिरवा रंग टिकतो. छान आहे रेसिपी. सगळे पदार्थ मस्तच असतील. ३१२ नव्या पोस्टी दिसल्या. सगळ्या काही बघितल्या नाहीत. माझी धाड सहन करा.
१. पालकची डाळ घालून केलेली पातळ भाजी, शिमला मिरचीची भाजी (तीळ, खोबरे, दाणे, लसूण)
२. बीटची कोशिंबीर, टमाटे आणि मेथ्या घालून वरण, फुलकोबीची भाजी. माझ्या बऱ्याच भाज्यात दाण्याचा कूट असतो.

३. कारल्याची चिंच गुळाची भाजी ( दाणे कूट, तीळ कूट, सुके खोबरे, काळा मसाला), टोमॅटोचे वरण
४. पुरी, आमरस, छोले ( मुलाने तळल्यात)

आमरस फोटोत नाही आला बहुतेक.
५. साबुदाण्याचे थालिपीठ, शेंगदाण्याची चटणी
६. पालकचे पराठे, बटाट्याची पातळ भाजी, कैरीची चटणी
७. फ्रोजन ओल्या तुरीची आमटी, लाल मिरचीचा ठेचा (नांदेडहून आणलेला), शिमला मिरचीची भरडा भाजी/ पीठ पेरून भाजी. दोन्ही भाषेत लिहिले.

८. पास्ता, बेगल, ग्वाकामोले, सावर क्रीम, बटाटे, ऑम्लेट

९. कांदा भजी
१०. दलियाची खीर

११. रव्याचा शिरा (केळी घालून - "तुला जपणार आहे" बघत कालच केला होता, अप्रतिम झाला होता.)

धाडेने धडकी भरली! आता एवढा
धाडेने धडकी भरली! आता एवढा स्वयंपाक होत नाही... नांदेडची एक मावशी टिकाऊ लाल ठेचा दरवर्षी द्यायची आम्ही भाजी सारखा खायचो ... गेले ते दिन गेले!
@ अस्मिता
@ अस्मिता
सर्व मेन्यू झकास.
ओल्या तुरीची आमटी आणि कांदा भजी तेव्हढी घेतो. 😋
छोले-पुरी घेतले असते पण ते झाले होते इतक्यात
@वामन राव, बीटरूटची फोटो-चित्तरकथा लई भारी.
अनिंद्य पुरी भाजी मस्त.
अनिंद्य पुरी भाजी मस्त.
अस्मिता काय एक से एक फोटो आहेत
आज सर्वांचे छान फोटो येत आहेत
आज सर्वांचे छान फोटो येत आहेत अशी पोस्ट टाकायचे मनात ठरवून स्क्रोल करत होतो... आणि करतच राहिलो..
मग अर्ध्या रस्त्यावर जाणवले कोणाची पोस्ट ती
अरे रामा !! वाचव. अत्याचार
अरे रामा !! वाचव. अत्याचार आहे हा.
आता पोस्टस् स्क्रोल करतांनाच
आता पोस्टस् स्क्रोल करतांनाच समजते कोणाच्या असतील ते.
नेहेमीचे यशस्वी तर हमखास
थॅंक्यू सर्वांना.
थॅंक्यू सर्वांना.
साबुदाण्याचे थालिपीठ काकडी घालून केले आहे. घरच्या बागेत भरपूर काकड्या आल्या आहेत. वाडा धाग्यावर लंपननी सुचवले होते. शिराही त्यांनी परवा फोटो टाकला मग मलाही करावा वाटला.
हो, बऱ्याच जणांची शैली ओळखीची झाली आहे. त्यामुळे सुरवातीलाच कळतं कुणाची पोस्ट असेल ते. त्याचा फायदा पोस्ट स्किप करून उडी मारायलाही होतो.
अस्मिताची फोटो धाड मस्त!
अस्मिताची फोटो धाड मस्त!
मस्त फोटोधाड.
मस्त फोटोधाड.
ती फुलकोबीची भाजी सोडून बाकी सगळं पाठव इकडे. शिरा आणि दलिया अगदी घासभरच दे. हे असं सगळं आयतं बसून खायला खूपच आवडेल मला.
Pages