खाऊगल्ली - आजचा मेनू - (६)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ Happy

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415

तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चटण्या सकाळीच करून ठेवल्या होत्या.सांबर साठी डाळ पण सकाळीच शिजवून ठेवली होती. उकडलेले बटाटे फ्रीजमध्ये असतात.
मेन्यू खरंतर इडली सांबर चटणी हा ठेवायचा होता सोप्पा. पण घरातल्या दुसऱ्या मेंबराना ऐनवेळी डोसा खायची आणि बनवायची इच्छा झाली.

श्रद्धा तुम्ही काय छळ मांडलाय हो Sad
एकसे बढकर एक लाळगाळू फोटो.
मी ढोकळा कायम चुकणे गटातली आजिवन मेंबर Sad
पिवळा ढोकळा.
गिलकं भजी खाऊन पाहिलियेत का कुणी? मागे मानसी ह्यांच्या फोटोत तसच काहीसं दिसलं.. खूप आवडीचा पदार्थ.

ऋन्मेष बाहेरून आणलेल्या डिश चे कौतुक नाय करत जा Lol रमड, सुगरण आहेसच पण नवरा काय कौतुकाने सांगतोय हे ही नसे थोडके. मश्रूम राईस करणेत येईल.
अनेकांना तर गिळा गप्प, असा लूक असतो एरवी Lol

अस्मिता मिसींग आहे...

आज धनिच्या रेसिपीने मश्रुम फ्राईड राईस. सोबत चिकन बॉल्स. ग्रिल्ड ॲप्रिकॉटस् ही होते पण फोटो नाही काढला.IMG_8676.jpeg

भारीच माझेमन!!

ग्रिल्ड ॲप्रिकॉटस् कसे केले? ताजे की ड्रायफ्रुट ? आणि ओवन मध्ये ग्रील केले का?

रमड, सुगरण आहेसच पण नवरा काय कौतुकाने सांगतोय हे ही नसे थोडके. मश्रूम राईस करणेत येईल. >>> Happy नक्की करून पहा.

माझेमन, मेन्यु तोंपासू दिसतोय अगदी.

थॅंक यू अनिंद्य, धनि, रमड

धनि ताजे ॲप्रिकॉटस्. ओटीजीमध्ये ग्रिल केले. मी जनरली साखर, दालचिनी पावडर आणि गरज वाटली तर लिंबू पिळते. पण यावेळी जरा आंबट वाटले म्हणून लिंबू पिळले नाही. दालचीनी ऐवजी जायफळ/चक्री फुल पावडर किंवा थोड्या दुधात केशर मिसळून शिंपडलं तरी पण छान लागतं.

खरं तर ॲप्रिकॉट क्रंबल करणार होते पण ऐनवेळी क्रंबल बनवायचा कंटाळा आला मग नुसतेच ग्रिल केले. मध्ये साय साखर फेटून घातली किंवा व्हॅनिला आईस्क्रीम घातलं तरी छान लागतं.

आम्ही असेच साखर आणि दालचिनी पावडर घालून पीच ग्रील केलेले आहेत. आता एप्रिकॉट पण करून बघणार. दूध केशर आयडिया भारी आहे. मस्त लागेल ते. आणि साय ... एक नंबर

@ अल्पना, मॅरी मी चिकन धासू दिसतंय. टेंप्टिंग!!

@मोरोबा, पोयो असाडो यम्मी दिसतंय.

आमच्याकडे आज श्रीखंड पुरी Happy

मॅरी मी चिकन नावा मागची कहाणी रोचक दिसतेय:
In 2016, when Lindsay Funston was an editor at Delish, she created a recipe video for a Tuscan-style chicken dish that attracted millions of views. When she was done cooking, Ms. Funston's video producer took a bite and declared, “I'd marry you for that chicken!” She named the dish “Marry Me Chicken.”
~NY Times 2 Oct 2023

श्रीखंड हे माझा सर्वात आवडता गोडाचा पदार्थ आहे. सोबत पुरी, पोळी किंवा काहीही नसले तरी चालते. लालूप्रसादांच्या गालासारख्या टम्म फुगलेल्या पुऱ्या so tempting! 💖

नाश्त्याच्या प्रकारात इडली सर्वात आवडती! सोबत मेदू वडा म्हणजे धारोष्ण दुधात खडी साखर! वड्याचा perfect आकार पाहून तुमच्या हस्तकौशल्याचा हेवा वाटतोय! 💖

मायबोलीवरच्या जुने धागे चाळत असताना एका ठिकाणी निवगऱ्या दिसल्या. आधीही एखादे वेळी निवगऱ्या हा शब्द वाचण्यात आला होता पण तेंव्हा काही मनावर घेतलं नव्हतं. आता करून पाहायचं ठरवलं. मायबोलीवर निवगऱ्याची रेसिपी शोधण्याचा प्रयत्न केला. पण काही सापडलं नाही. मग इतरत्र शोधाशोध केली असता निवगऱ्या म्हणजे इडिअप्पम् हा मल्लू प्रकार आहे असे दिसले.

त्यातून या निवगऱ्या करण्याचा प्रयत्न अहोंनी केला आहे. चवीला तर चांगल्याच लागत होत्या. जमल्यात का हे माबोकरांनी फोटो पाहून सांगावे. 🙏

निवगऱ्या

वामनराव, तुम्ही फोटो टाकला आहे त्या शिरवळ्या.

निवगर्‍या तांदळाची उकड काढून करतात. उकडीत जीरे, मिरची आणि मिठ यांची भरड मळायची आणि पार्‍या करून वाफवायच्या. खाताना बरोबर कच्चे गोडे(शेंगदाणा) तेल - रिफाइन्ड नसल्यास उत्तम.

मस्त फोटो आलेत एकेक या पानावर.. आणि व्हरायटी ऑफ फूड.. विचार करतोय कोणी खायला दिले हे सारे तर कुठून सुरुवात करावी.
रोस्टेड चिकन बघून तर नेहमीच पाणी सुटते माझ्या तोंडाला. तिथूनच होईल सुरुवात Happy

वामनराव, छान दिसत आहे. मी बरेच वर्षापूर्वी रिलायन्सला असताना माझ्या मल्लू मित्रासोबत बरेचदा खाल्ले आहे हे. आवडते मला. चवीपेक्षाही त्याच्या स्ट्रक्चरमुळे ते खायला मजा येते.

Wow.. कोंबडीवडे मटणवडे या पलीकडे काहीच नसते.
आमच्याकडे कोणी स्पेशल गेस्ट येणार असले की हा ठरलेला मेनू असायचा. तसेच पाचपरतावन म्हटले तरी हेच.
फक्त आमचे वडे भोकवाले नसतात.. गोल टमटमीत असतात.

सगळे फोटो मस्त. मेदूवडे सुबक.
वामनराव, तुमचं इडियप्पम = शिरवळ्या कोकणात गूळ घातलेल्या नारळाच्या दुधा/रसासोबत खातात.
मला वाटतं नुसत्या निवगर्‍या मुद्दाम करत नाहीत. मोदकाची उकड उरली तर करतात किंवा निवगर्‍या करण्यासाठी उकड जास्त प्रमाणात करतात.
तेवढाच रुचीपालट.

Wow.. कोंबडीवडे मटणवडे या पलीकडे काहीच नसते.
आमच्याकडे कोणी स्पेशल गेस्ट येणार असले की हा ठरलेला मेनू असायचा. तसेच पाचपरतावन म्हटले तरी हेच.>>>>>>> +1
आमच्याकडे पण कधी कधी गोल फुगलेले वडे करतात.. चिकन नसेल तर काळ्या वाटाण्याचा रस्सा असतो..
हा मायबोलीवरच्या रेसिपी ने बनवलेला सुरती पनीर घोटाळा
Screenshot_2025-06-29-21-44-36-60_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg

चिकन नसेल तर काळ्या वाटाण्याचा रस्सा असतो..
>>>>>
मी सुद्धा हे लिहिणार तितक्यात आईने हाक मारल्याने तेवढेच पोस्ट केले Happy

पनीर घोटाळा सुद्धा छान दिसतोय..

मॅरी मी चिकन मला दुसरं काहीतरी शोधताना सापडलं होतं. खूप जास्त टॉमॅटो नसलेला चिकन चा माइल्ड स्ट्यु शोधत होते बहूतेक. या नावामागची गोष्ट मानव नी लिहिली आहे तिच वाचली आहे मीसुद्धा. एरवी यात भाज्या फारश्या घालत नाहीत आणि भरपूर क्रिम आणि चीज घातलं जातं. माझ्याकडे घरी थोडं क्रीम उरलं होतं. ते + भाजलेली कणिक आणि थोडं दुध आणि बटर चा एक तुकडा घातला होता. भरपूर पार्मेजान चीज घालतात यात. माझ्याकडे पार्मेजान नव्हतं, मी घरातलं किसलेलं प्रोसेस्ड चीज थोडंसं घातलं होतं आणि थोड्या भाज्या पण घातल्या होत्या.

कालच्या लंचमध्ये मटण होते. ही नवर्‍याची रेसेपी आहे. काय, कसं त्याला विचारावं लागेल किंवा पुढच्या वेळी तो बनवत असताना सोबत उभं राहून बघावं लागेल.
mutton thali.jpg

आजच्या डिनरमध्ये व्हेज बरिटो बोल होता. लेमन कोरिएंडर राईस चा बेस आणि मग त्यावर बाकी सगळं.. काल घरात आलेला अव्हाकाडो अजून पिकला नसल्याने बरिटो बोल मध्ये वापरला नाही.
mexican lemmon corriender rice.jpg
हा लेमन कोरिएंडर भात..

burrito bowl.jpg

Pages