क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर ला एकही ओव्हर नाही म्हणजे बॅट्समन म्हणून मुख्यत्वे नि बॅकप स्पिनर म्हणून खेळवलाय असे दिसतेय. >>>>> हो कोहलीने तेच सांगितलं बहुतेक टॉसच्या वेळी.

तसेही आश्विन संघात असताना सुंदरची स्पिनर म्हणून वेगळी जागा बनत नाही.
आश्विन आणि सुंदर एकत्र दोन्ही एंडने गोलंदाजी करत आहेत असे चित्रही दिसत नाही, आणि ते बघण्यात मजाही नाही अनलेस एखादा लेफ्टी ईतरांना चोपतोय आणि ऑफस्पिनला चाचपडतोय असे आढळत नाही.
आश्विन बॉलरही ईतका भारी आहे की त्याचा ऑफ डे असा क्वचितच असतो जे त्याची कमतरता भरायला सुंदर उपयोगात येईल.
आश्विन एकापाठोपाठ एक ईतक्या ओवर सटासट टाकतो की आजच्या कमी ओवरच्या सामन्यात सुंदरला बॉलिंग मिळणारच नाही याचा अंदाज लंचलाच आलेला..
थोडक्यात आश्विन आहे तोपर्यंत सुंदरला कसोटी संघात सातत्याने जागा मिळवणे अवघडच. आजच्या तारखेला त्याचा बॅटींगचा फॉर्म आहे म्हणून संघात आहे..
कुलदीप तर बिचारा आश्विनच्या दिशेनेच बॉल वळवतो म्हणून संघाबाहेर आहे Happy

बाई दवे,
आजच्या दिवसाने एक मात्र केले - आज रात्री छान भारत न्यूझीलंड फायनलची स्वप्ने पडतील Happy
दोन्ही सामने अहमदाबादलाच आहेत, दोन्ही आपलेच आहेत असा विश्वास आजच वाटू लागला Happy

आताच हायलाईटस पाहिली.. एलबीडब्ल्यूच्या सर्व अंपायर कॉल विकेट पंतनेच मिळवून दिल्या.. कसली खतरनाक अपील करतो.. स्टंपमागे मधोमध उभा राहून दोन्ही हात पसरवून ओरडतो.. अंपायरला वाटायला हवे की बॉल मिडल स्टंप उडवूनच चाललाय Happy

अशा पीचेस वर पाचव्या गोलंदाजाचा फारसा उपयोग नसतो म्हणून पंड्याचा समावेश करायला हवा होता असे मला वाटते. भारताने किमान 250 धावा तरी करायला हव्या.

*आज इंग्लंड पहिल्या डावात स्पिन न झालेल्या बॉल्स वर गारद झाला. आता पिच बद्दल काय बोलायचे ? * -

खतरनाक बाऊन्सर टाकणारया गोलंदाजाला त्याच्या गुडलेंगथ किंवा याॅरकर चेंडूवर बळी मिळतात, तेव्हा त्याचं श्रेय त्याच्या बाऊन्सरने फलंदाजाच्या मनात निर्माण केलेल्या भितीला अधिक असतं. लेगस्पीनरच्या गुगलीला विकेट मिळतात त्याचंही श्रेय असंच त्याच्या लेगस्पीन होणार्या इतर चेंडूनाही असतं. काल अक्षरचे फ्लाइट दिलेले गुडलेंगथवरचे चेंडू झपाट्याने वळत होते त्यामुळे मधेच टाकलेला आर्मर वळत नसूनही फलंदाजांना संभ्रमात टाकून भेदक ठरत होता. त्याचं खरं श्रेय त्याच्या इतर झपकन वळणारया चेंडूना व पीचलाही जातंच. इंग्रज फलंदाज सरळ चेंडूही खेळू शकत नवहते, असं सुचवणं तर अगदींच अन्यायकारक व पीचवर चेंडू वळत नव्हते म्हणणं , हा सत्याचा विपरयास .

अर्थात, ही आहे माझी खेळाची अर्धी - कच्ची समज. तज्ञांशी बरोबरी करण्याचा हास्यास्पद प्रयत्न मीं कशाला करूं! Wink

आपली गोलंदाजी नाही बघता आली पुर्ण पण फलंदाजी बघितली.... लीच चे चेंडू बर्‍यापैकी वळत होते आणि उसळत देखिल होते. कोहली शेवटच्या षटकात मात्र न वळलेल्या चेंडुवर सरळ खेळण्याऐवजी कट करायला गेला आणि यष्टी गमावून बसला...
दुसरे म्हणजे मला एक कळले नाही एक्स्ट्रा वेळेत दिवसाच्या शेवटच्या षटकात फलंदाज बाद झाला तर नवीन फलंदाजाला बोलावत नाहीत सहसा व दिवस संपल्याची घोषणा करतात पंच, तरी ४ चेंडू खेळायला रहाणेला का यायला लावले पंचांनी?

आज मुंबईने पुडुचेरी विरुद्ध विजय हजारे ट्रॉफी मधे ५० ओव्हर मधे ४५७ स्कोर केला आहे !!!! शॉ डबल अन सुर्यकुमार शतक !

३५ धावा आणि ६ बळी डाव सुरु झाल्यापासून!!!
आज संपेल का सामना?

मुळेने मुळालाच हात घातला....

केवळ ३३ धावांची आघाडी!

इंग्रजांनी दिडशे वैगेरे धावा केल्या तरी भारताला जड जाऊ शकतात शेवटच्या डावात खेळताना...

पिच backfire झाली का ? रूट 5 विकेट्स घेऊ शकतो ती पिच खरेच आदर्श आहे का ? आपण सगळयांनी आशा पीचेस चे समर्थन करणे बंद केले पाहिजे असे मला वाटते

२ बाद ०

पहिले षटक अक्षर पटेल..

रूट 5 विकेट्स घेऊ शकतो ती पिच खरेच आदर्श आहे का ?
>
एकदा क्लार्कने घेतलेल्या, ती खेळपट्टी सुद्धा आदर्श नव्हती

येडा आहे तिसरा अंपायर. जो रूटला नाबाद दिला बॅटपॅड म्हणून. स्वतः रूटला खात्री नव्हती हे घडलेय याची. तरी ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय फिरवला

रुट बाद...
२३ धावांचा लीड अजुन ५ फलंदाज बाकी...
१०० धावा जड जातील ह्या खेळपट्टेवर ४थ्या डावात... बघुया काय करतायेत गोलंदाज.

इंग्रजांनी गोरगरीब भारतीयांवर जेव्हढे अत्याचार केले त्याची भरपाई म्हणून पिच अशी बनवले. जेणेकरून क्रिकेट खेळणारा कुठलाच देश भविष्यात भारतावर राज्य करायची स्वप्न नाही बघणार.

खेळच धड नाही आणि कशाची हारजित? अवघ्या पावणेदोन दिवसांचा खेळ. असली कसली डोंबलाची कसोटी मॅच. इतकं जीवावर येऊन खेळण्यापेक्षा नाही खेळलेले बरे की.

एक रोचक निरीक्षण !

ईंग्लंड इनिंग सरासरी - ९१.५
रोहीत शर्मा सरासरी - ९१

शर्मा द बॉस ! Happy

Pages