Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05
क्रिकेटवरील पहिले पाच धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
https://www.maayboli.com/node/67443
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ह्या ट्रोलमधे तूही एक आहेस
ह्या ट्रोलमधे तूही एक आहेस ह्याची तुला कल्पना आहे का ?
>>>>
मी वरची पोस्ट ज्या फेसबूक ग्रूपवर टाकलेली तिथे सचिनचे चाहते आणि अर्जुनचे हितचिंतक असणारयांनीच त्याला लाईक करत सहमती दर्शवली आहे.
आणि जे सचिन-अर्जुनचे विरोधक आहेत ते माझ्याशी वाद घालायला आलेत.
ईथे मात्र उलटाच अनुभव येतोय. याचे कारण तुम्ही माझ्याकडे बघताना जो चष्मा चढवला आहे त्यामुळे तुम्हाला ती पोस्ट तशी दिसत आहे. आणि यात मी काही करू शकत नाही
दिल्लीचा माझा संघ असा बनेल
दिल्लीचा माझा संघ असा बनेल
मल्टीपल ऑप्शनमध्ये ज्याचे पहिले नाव आहे तो माझ्या पहिल्या अकरात असेल. मग नंतर फॉर्म आणि रिझल्टनुसार... किंवा ते आपले हॉर्सेस फॉर कोर्सेस आले.
धवन
शॉ/रहाणे
स्मिथ/हेटमायर
अय्यर
पंत
स्टॉईनिस
अक्षर पटेल/अमित मिश्रा
वोक्स/नॉर्किए/टॉम करन
आश्विन
रबाडा
उमेश यादव/ईशांत शर्मा/आवेश खान
रहाणेला opening बहुधा मिळणार
रहाणेला opening बहुधा मिळणार नाही. धवन बरोबर shaw/Smith ही कदाचीत opening असु शकेल. राहणे optional असेल.
इशांत किशनच्या 94 चेंडूत 173
इशांत किशनच्या 94 चेंडूत 173 धावा आणि भारतीय संघात निवड सुद्धा.
तिसऱ्या कसोटीचा संघ असा असावा
तिसऱ्या कसोटीचा संघ असा असावा
1 गील
2 रोहित
3 पुजारा
4 कोहली
5 रहाणे
6 पंत
7 पंड्या
8 अक्षर
9 अश्विन
10 बुमराह
11 इशांत
गवत उडवले जाईल नि रीवर्स
गवत उडवले जाईल नि रीवर्स होणार नाही बॉल तरी पंड्या का ? बॅटींग मजबूत करताय का ?
मला वाटते की पाचव्या
मला वाटते की पाचव्या गोलंदाजाला भारतात फारशी गोलंदाजी करावी लागत नाही जर पीच गोलंदाजी ला मदत करणारी असेल तर, त्याला दिवसाला 8- 10 ओव्हर्स करावे लागतील. पंड्या 4-4 ओव्हर्स चे 2 स्पेल दिवसाला करू शकतो अशी बातमी आहे. दिवस रात्र सामना असल्यामुळे फलंदाजी मजबुत करावी असे मला वाटते कारण 2- 3 विकेट्स रात्री च्या सत्रात पटकन जाऊ शकतात. इंग्लंड मला वाटते की एकच स्पिनर खेळवतील, लीच आणि 4 फास्ट bowlers, अँडरसन, आर्चर, वोअक्स, स्टोक्स त्यामुळे भारताने पंड्या च्या रुपात एक फलंदाज वाढवावा असे मला वाटते
आणि पिच जर पहिल्या दिवसापासून
आणि पिच जर पहिल्या दिवसापासून turn झाली तर अश्विन आणि अक्षर sufficient आहेत
भाउ, काळजी करू नका. भारतीय
भाउ, काळजी करू नका. भारतीय क्रिकेट चांगल्या माणसांच्या हातात आहे. आजकाल, भुमरा, शम्मी, उमेश, इशांत, सिराज, भूवी अशा आपल्या मार्यामुळे फास्ट विकेट बनवून आपल्याला खिंडित गाठायचे दिवस इतिहास जमा झालेत. उदा : ऑस्ट्रेलियाचा दौरा. शिवाय आयपीएल मुळेही आपल्याशी कोणी जास्त पंगा घेत नाही.
(हे लिहायला किती बर वाटतय)
आपल्या मंडळींच्या फिटनेस बाबत मात्र गाडी अजून रूळावर येत नाहीये.
तिसर्या टेस्टला पुन्हा एकदा आखाडा असण्याची शक्यता आहे. रोहितने ती हिंट दिलेली आहे आणि आंडरसनने ही त्यात काही गैर नाही असे सांगून आलिया भोगासी असावे सादर.. हा पवित्रा घेतलाय.
*फास्ट विकेट बनवून आपल्याला
*फास्ट विकेट बनवून आपल्याला खिंडित गाठायचे दिवस इतिहास जमा झालेत* व * तिसर्या टेस्टला पुन्हा एकदा आखाडा असण्याची शक्यता आहे. * -
मला काळजी पडलीय वरच्या दोन विधानांचा मेळ कसा घालायचा याची. शिवाय, 'विकेट आखाडा होती' , असं सुचवलं म्हणून मीं टपल्या खावून झाल्या आणि आतां तुम्ही तर सरळ सरळ म्हणतांय विकेटपुनहा एकदा आखाडा असण्याची शक्यता !! तेव्हा, इथं आतां कळर्जी मला नाहीं, तुम्हालाच करायची आहे !
मला काळजी पडलीय वरच्या दोन
मला काळजी पडलीय वरच्या दोन विधानांचा मेळ कसा घालायचा >> भाउ याचा मेळ असा -- आपल्याला (भारताला) फरक पडत नाही. भारतात फिरकी असो वा बाहेर फास्ट. इतरांना पडतो.
उदा चेन्नाइ आणि ऑस्ट्रालिया.
माझ येवढच मत आहे की टॉस जिंकणे हा फक्त एकच फॅक्टर नको सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी. म्हणून पहिल्या टेस्टची विकेट बाद. (तिथे आपण टॉस जिंकला असता तर मॅच नक्की जिंकलो असतो.) पण दुसर्या टेस्टला तसे नव्हते. टॉस त्यांनी जिंकला असता तरी आपणच जिंकलो असतो. ( हे त्यांच्या पहिल्या इनिंगच्या व आपल्या दुसर्र्या इनिंग च्या स्कोअर वरून स्पष्टपणे अनुमान निघते.). म्हणजे दोघांनाही समान संधी होती. ज्याच्या कडे स्कील होते, ते जिंकले. so it was a sporting wicket for the second test.
ऑस्टेलियात आपण चौथी टेस्ट शेवटी बॅटिंग करून जिंकली आहे. तसे. ऑस्ट्रेलियात माझ्यामते चारही टेस्टला स्पोर्टींग विकेट होत्या.
पर्थची जुनी विकेट आता आपल्या विरूद्ध पहायला मिळत नाही याचे कारण तेच आहे. सध्यातरी आपल्या फस्ट बोलर्स ना लोक घाबरतात. ( तरी आपण ऑस्ट्रेलिया सारखी बॉडी लाइन बोलिंग करत नाही. ) आहा काय बर वाटल पुनः एकदा लिहायला.
.* so it was a sporting
.* so it was a sporting wicket for the second test* - 'आखाडा' विकेटही टेस्टसाठी sporting wicket असते हें उमजलं नव्हतं मला, म्हणून चूक झाली माझी. पहिल्याच दिवसापासून पीचवर उडणारी धूळ डोळयात भरल्यामुळे असेल बहुतेक.
शिवाय , आपल्याकडे जर ऐवढा भेदक फास्ट बोलींग अटॅक आहे तरीही येत्या टेस्टसाठीही 'आखाडा' विकेटच असेल अंसं कां, तेंही कळलं नाहीं मला. फास्ट विकेट sporting wicket नसते, असं कांहीं आहे का ?
आपल्याकडे जर ऐवढा भेदक फास्ट
आपल्याकडे जर ऐवढा भेदक फास्ट बोलींग अटॅक आहे तरीही येत्या टेस्टसाठीही 'आखाडा' विकेटच असेल अंसं कां, तेंही कळलं नाहीं मला. फास्ट विकेट sporting wicket नसते, असं कांहीं आहे का ? >> पहिल्याच दिवसापासून पीचवर धूळ उडाली पण विकेट पाचही दिवस कसीस्टंट राहिली तर sporting wicket नसते का भाउ ?
आणि पिच जर पहिल्या दिवसापासून turn झाली तर अश्विन आणि अक्षर sufficient आहेत >> संधीप्रकाशात नि रात्रीच्या उजेडामधे कुलदीप ला रीड करायला प्रॉब्लेम येतील असे नाही वाटत ? शार्दूल ला रिलीज केल्यामूळे पांड्या सेफ चॉईस आहे हे नक्कीच.
फास्ट विकेट sporting wicket
फास्ट विकेट sporting wicket नसते, असं कांहीं आहे का ?>> ऑस्ट्रेलियात माझ्यामते चारही टेस्टला स्पोर्टींग विकेट होत्या, हे मी वर लिहिलेलच आहे. अशा फास्ट विकेटस वर सुद्धा आपण वरचढ ठरलो. अॅडलेल्डला सुद्धा ती ४५ मिनिटे सोडली तर त्या आधी आपण सरस होतो.
पहिल्याच दिवसापासून पीचवर उडणारी धूळ डोळयात भरल्यामुळे असेल बहुतेक.>> रोहितच्या १६१ आणि अश्विनचे शतक त्याच धुळीत काढले होते हो.
इंग्लंडची परिस्थिती नाचता येइना अंगण वाकडे अशी झाली होती. 
विक्रमसिंहजी, आपण आता
विक्रमसिंहजी, आपण आता कोणत्याही प्रकारच्या पीचेसवर समर्थपणे खेळतो, याचा आनंद व अभिमान कुणाही इतकाच, कदाचित जास्तच, मलाही आहे. दुसरी कसोटी आपण इंग्रजांपेक्षा त्या विकेटवर सरस खेळूनच जिंकली, हें तर मीं ठळक फाॅट वापरूनही परत परत लिहीलंय. फक्त, ती विकेट 5 दिवसांच्या टेस्ट क्रिकेटला साजेशी नव्हती, एवढाच मतभेद आहे. इतक्या टपल्या खावूनही, मला तो मतभेद मिटला असं खरंच वाटत नाहीं . दुर्लक्ष करा झाल माझ्या हेकेखोर भूमिकेकडे.
आजच्या सामन्यासाठी आपल्या पोरांना शुभेच्छा.
भाऊ तुमचे म्हणणे मला पटते.
भाऊ तुमचे म्हणणे मला पटते. आपण मागे पण इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, विंडीज ला अशा पीचेस न बनवता पण भारतात हरवले आहे, दुसऱ्या कसोटीतील पिच मैदान, वातावरण, वगैरे मुळे नाही तर मुद्दाम आपण underprepared बनवली. होम advantage वगैरे सगळे ठीक आहे, आपण इंग्लंडपेक्षा निर्विवाद चांगले खेळलो हेही खरे पण तरीही त्या पिच ची कसोटी साठी योग्य पिच अशी भलावण करू नये असे वाटते
बर मग आजचे पीच कसे असेल
बर मग आजचे पीच कसे असेल म्हणता?
5 दिवसांच्या टेस्ट क्रिकेट>>
5 दिवसांच्या टेस्ट क्रिकेट>> माझ्या दृष्टीने ५ दिवसांच्या क्रिकेटचा अर्थ गोलंदाजांवर कुठ्लिही बंधने नाहीत हा आहे. मर्यादीत षटकात ज्या गोष्टी करता येत नाहीत त्या करता येतात. उदा.:
एखाद्या फलदाजांचा दोष हेरून त्याप्रमाणे आक्रमण करणे,
धावा दाबून दबाव आणणे,
क्षेत्रत्ररक्षक कुठेही लावता येणे इत्यादी.
यासर्वांमुळे फलंदाजी गोलंदाजी यांचा पूर्ण क्षमतेने कस लागणे हा आहे. मग सामना तीन दिवसात संपला काय की ५ दिवसात. फक्त खेळपट्टी दोन्ही संघांना समान संधी देणारी हवी.
भाउ, पण तुमचेही एक म्हणणे मान्य. तीन दिवसांमधे पाच दिवस खेळण्याची , २०० धावा करण्याची क्षमता सिद्ध होत नाही.
इंग्रजांची प्रथम फलंदाजी!
इंग्रजांची प्रथम फलंदाजी!
एक बळी गेला इशांतच्या खात्यात... सिबल/सिब्ले/सिबली शुन्यावर बाद!
आजची विकेट बरी वाटतेय पण
आजची विकेट बरी वाटतेय पण चेंडू खाली रहातोय असं जाणवतं. पण आत्ताच निश्चित बोलणः आगाऊपणाचं.
टर्न आणि बाउन्सी. अन ईव्हन.
टर्न आणि बाउन्सी. आणि अनईव्हन. इग्लंडला २५० करून द्यायला नकोत.
क्राउली छान खेळतोय.
धुळ उडायला लागलीय. पण विकेटवर
धुळ उडायला लागलीय. पण विकेटवर अजून नाही.
81 मध्ये निम्मा संघ गारद
81 मध्ये निम्मा संघ गारद झाला त्यांचा
८/९८
८/९८
इन्ग्रज सर्वबाद ११२
इंग्रज सर्वबाद ११२...
पुढे काय होणार?
आपली शतकी ओपंनिग.... अजुन काय
आपली शतकी ओपंनिग.... अजुन काय
रोहित शर्माच्या
रोहित शर्माच्या अर्धशतकाबद्द्ल भाऊंचे अभिनंदन!!
शर्मा एकदिवसीयमधील लिजंड आहेच
शर्मा एकदिवसीयमधील लिजंड आहेच ..
पण भारतातल्या कसोटीतही जवळपास तेच आहे !
सुंदर ला एकही ओव्हर नाही
सुंदर ला एकही ओव्हर नाही म्हणजे बॅट्समन म्हणून मुख्यत्वे नि बॅकप स्पिनर म्हणून खेळवलाय असे दिसतेय.
आज इंग्लंड पहिल्या डावात स्पिन न झालेल्या बॉल्स वर गारद झाला. आता पिच बद्दल काय बोलायचे ?
*हे केवळ वरचे वाचून मस्करी मधे लिहिलेले आहे, कोणाचीही हेटाळणी करायचा हेतू प्रत्य्क्ष किंवा अप्रत्यक्षपणे नाही.
आपण मागे पण इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, विंडीज ला अशा पीचेस न बनवता पण भारतात हरवले आहे, >> भाऊ प्रत्येक भारतीय दौर्यानंतर भारतीय पिचेस आदर्श नसल्याबद्दल तक्रार करत आले आहेत गेले काही वर्षे
दुसर्या टेस्टच्या पिचेस पेक्षा आदर्श पिच बनवून आपण कुठल्या सिरीज जिंकल्या आहेत मला आठवत नाहीत. त्याच किंवा त्यापेक्षा खराब (खर्या अर्थाने आखाडा पिचेस) जिथे पहिल्या इनिंग मधे बॅटींग करायला मिळणे ह्यात सामना ९०% जिंकल्यात जमा असणे हा डावपेच असल्याचे आठवतेय.
कोहली ने गेल्या कसोटी मधे
कोहली ने गेल्या कसोटी मधे थर्ड अंपायरने रूटला बाद न दिल्याबद्दल ऑन फिल्ड अंपायर शी वाद घातला होता म्हणून त्याला डीमेरीत पॉईंत देण्याचा आग्रह डेव्हीड लॉईड ने धरला होता. मॅच रेफ्रीने तो मानला नाही (बहुधा). मागच्याच कसोटी मधे नि आज गिलच्या कॅच नंतर रूट ने हे च केलेले दिसले. आज दिवसाअखेर नितीन मेननशी वाद घालताना दिसला. आता डेव्हीड लॉईड ला फॉलो करणे भाग आहे
Pages