क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

*भाऊ, निश्चित असे निकष नाहीत म्हटल्यावर पिचबद्दल चर्चा करणेच फिजूल आहे . सर्वच पिचेस आदर्श म्हणायाची *-
लाॅजिक नाहीं पटलं. बाहेर फिरताना कुणी काय कपडे वापरायचे, याचेही निश्चित निकष नाहींत पण किमान अपेक्षा निश्चितच आहेत. कुणी विदूषकाचे कपडे किंवा नागा साधूंसारखं नुसतीच अंगाला राख फासून फिरलं, तर चर्चा ही होणारच व ती फिजूलही म्हणता येणार नाहीं ! Wink

चर्चा करून काय साध्य होणार आहे ? नागा साधू उघडेच फिरतात नि अरब स्तानामधे एकावर एक लेयर घालून फिरतात. कसल्या किमान अपेक्षा भाऊ !

*चर्चा करून काय साध्य होणार आहे ? * -
इथे क्रिकेटवरील चर्चेत वर्षानुवर्षे हजारो पोस्टी पडतात (तुम्ही व मीं पण असतोच त्यात सहभागी ), तें कांहीं साध्य होण्यासाठी? तसं खरःच झालंय कांहीं साध्य, आपली व्यक्त होण्याची खुमखुमी भागण्या व्यतिरीक्त !! Wink

अमदाबादच्या उन्हातला उष्मा अन् खेळपट्टीतली फिरकी पंत सुंदरने काढुन घेतले.. आता इंग्रजाना खेळणे सोपे जाईल बहुदा....

पंतच व्हायचं होतं ना तुम्हाला ! मग आजच हाॅलऐवजी किचनपासून सुरवात करा , घर झाडायला !! तुमचाही मस्त ' रिव्हर्स स्विप ' मारून !!!20200403_194727.jpg

१ डाव २५ धावांनी विजय!

छे आपल्या गोलंदाजांना पोषक खेळपट्ट्या बनवून जिंकले! छे मग आपल्यात आणि त्या २ इंच गवत ठेवून हिरवीगार खेळपट्टी ठेवणार्‍या गोर्‍यांत काय फरक राहिला मग???
बिच्चारे इंग्रज! दिमाखदार सुरुवात करून ३-१ पराभूत झाले!

आपण खरं तर आपले चांगले प्लेयर्स खेळवले हेच अनफेयर आहे. आपण आपली बी टीम खेळवायला हवी होती म्हणजे मग इंग्लंडशी बरोबरीची टक्कर झाली असती.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिऑनशीप फायनल 3 सामन्यांची हवी होती, कारण पहिल्या सामन्यात आपण सर्वोत्तम खेळत नाही

आपण आपली बी टीम खेळवायला हवी होती >>>>
बी टीमच खेळली. आपली फेअर चान्स दिला इन्ग्रजांना कोहली, रहाणे, पुजारा ह्यांनी फलंदाजी करताना काळजी घेतली दुसर्‍या फळीतील फलंदाजाना संधी द्यायची. एक अश्विन आणि रोहित सोडला तर सगळे ब संघातीलच खेळले ह्या मालिकेत! अक्षर तर पुर्ण नवखा गोलंदाज. त्यानेच २७ बळी टिपलेत.

भारतीय संघाचे अभिनंदन!!

पंत बरोबरच ३ खरेखुरे फिरकी अष्टपैलू हा दोन संघातला फरक होता!

चला. अपेक्षेप्रमाणे मालिकेचा शेवट झाला. पहिली टेस्ट सोडली तर त्यांना फक्त काल संधी होती.

कसोटी विजेतेपदासाठी संघ निवडण्यातील डोकेदुखी.

पुजारा, विराट, रहाणेला लवकर फॉर्म घावो. त्यात आता पहिले दोघ थेट कसोटी सामना खेळतील.
गिलच काय करायच. इंग्लंडमधे ४ किंवा ३ जलद गोलंदाज लागतील. त्यातला एक पांड्या असावा तरी बाकी तीन फलंदाजीत शुन्य (एकास काढावा आणि दुसर्‍यास झाकावा. (बुमरा, शम्मी, उमेश, इशांत) . मग पाचवा कोण अश्विन, जडेजा, अक्षर की सुंदर? भूवी सध्या काय करतो. विहारीच काय. गेल्या वेळेस त्याचे इंग्लंडमधे शतक होते.

ग्रेट !!! अभिनंदन !!
एक आवडलं या नवीन पोरांचं. सगळं शिकतात द्रविड सारख्या गुरूकडून पण स्वत:ची खासियत नाहीं सोडत, अगदीं कठीण परिस्थितीत व उच्चतम पातळीवरचं क्रिकेट खेळतानाही !! शुभेच्छा.

रोहित शर्माचं सगळ्या t20 ईनिंगचं स्टॅंडर्ड डेव्हीएशन 30 च्या आसपास आहे आणि सरासरी 32.6 आहे म्हणजे शर्मा येत्या 20-20 सामन्यात कमीतकमी 3 आणि जास्तीत जास्त 63 रन्स काढू शकतो आणि याची शक्यता(3 ते 63 यामध्ये कुठलीही धावसंख्या असण्याची) 68% आहे. जर स्टॅंडर्ड डेव्हीएशन अजून पुढे वाढवलं तर शर्मा कमीत कमी 0 आणि जास्तीत जास्त 93 रन्स काढू शकतो आणि याची शक्यता(0 ते 93 यामध्ये कुठलीही धावसंख्या असण्याची) 95% आहे. मला वाटतंय सरासरी बरोबर खेळाडूचं स्टॅंडर्ड डेव्हीएशन किती आहे हा मुद्दासुद्धा विचारात घेतला जावा. ज्या खेळाडूची सरासरी जास्त आणि स्टॅंडर्ड डेव्हीएशन कमी तो खेळाडू जास्त कंसिस्टन्स खेळतोय.

कोहलीचं डेव्हीएशन 25 आणि सरासरी 50 म्हणजे 25 ते 75 मध्ये रन्स काढण्याची शक्यता 68% आणि 0 ते 100 मध्ये रन्स काढण्याची शक्यता 95%

खेळ, मग तो कोणताही असो, आंकडेवारी व सरासरीनुसार चालत नाही, हाच तर त्यातला खरा रोमांस असावा. खेळाडू आंकडेवारी घडवतात, उलटं नसतं, हा आपला माझा एक जुनाट पण आवडता समज. आत्तांच नवीन पोरांनी, व कांहीसं रोहितनेही, ऑस्ट्रेलियात आंकडेवारीवरील भाकिताना सुरूंग लावलाच ना !!

भाऊ मी फक्त आपली एक प्रोबॅबलिटी मांडली.ज्या प्रमाणे ऍव्हरेज आणि इतर स्टॅट्स मांडतात त्यात डेव्हिएशन ऍड केलं तर खेळाडू किती कन्सिस्टंट खेळतोय हे कळेल. बाकी तुम्ही म्हणताय तसं काळा राजहंस कधीही दिसू शकतो.

*फक्त आपली एक प्रोबॅबलिटी मांडली.* - साॅरी, माझा खरा रोख हल्ली आंकडेवारीचं जें अवडंबर क्रिकेटच्या विश्लेषणात टीव्हीवर माजवलं जातं त्यावर होता. क्रिकेटची खरीं सौंदर्यस्थळं बाजूला सारून फक्त रटाळ, निर्जीव आंकडेवारी, विक्रम इ.इ.लाच चघळलं जातं, हें मला जाम खटकतं. मग तें असं कुठेतरी बाहेर पडतं. साॅरी.

क्रिकेटची खरीं सौंदर्यस्थळं बाजूला सारून फक्त रटाळ, निर्जीव आंकडेवारी, विक्रम इ.इ.लाच चघळलं जातं, >> भाऊ, खरीं सौंदर्यस्थळं म्हणजे नक्की काय हे कोण ठरवणार ? आकडे तज्ञांना आकडेवारी हे सौंदर्यस्थळं वाटु शकते. फॅन्स ना विक्रम हे सौंदर्यस्थळं वाटु शकते. सध्या डेटा सायन्स चा वापर करून जे विश्लेशण दिले जाते ते बर्‍यापैकी अचूक नि नुसत्या रटाळ आकडेवारीपेक्षा अधिक वेगळे असते असे नाही वाटत का ?

बोकलत, रोहित इंपॅक्ट प्लेयर आहे त्यामूळे नुसत्या आकडेवारी मधे बसवून त्याची निवड करणे - न करणे चूकीचे ठरेल. प्रत्येक टीम मधे असे १-२ इंपॅक्ट प्लेयर असतातच. बाकीचे कंसिस्टंटली खळेणारे नि अशा इंपॅक्ट प्लेयर चा ईम्पॅक्ट जेंव्हा जुळून येतो तेंव्हा मॅचेस जिंकल्या जातात (किंबहुना शक्यता वाढते असे म्हणून शकतो)

*आकडे तज्ञांना आकडेवारी हे सौंदर्यस्थळं वाटु शकते. फॅन्स ना विक्रम हे सौंदर्यस्थळं वाटु शकते.* - तसं बेटींग करणारयाना बेटींगचे बदलते ऑडसच सौंदर्यस्थळ वाटेल म्हणून तेही मॅच प्रक्षेपणाचा भाग बनवायचा का ? :डोमा::
*बर्‍यापैकी अचूक नि नुसत्या रटाळ आकडेवारीपेक्षा अधिक वेगळे असते असे नाही वाटत का ?* - त्याचा मर्यादित उपयोग डांवपेंच आंखताना करावा, प्रेक्षकांचा रसभंग करायला नको , हें माझं मत. खेळाची समज व रसगरहण सुधारेल यावरच कमाल भर असावा.

रोहित इंपॅक्ट प्लेयर आहे >> कोण इंपॅक्ट प्लेअर नाहीये? कोणी मॅचच्या परिणामावर इंपॅक्ट पाडू शकण्याची शक्यता नसेल तर त्याला फायनल ११ मध्ये सोडा स्क्वाड मध्ये का घेतात?
सिराज, अक्सर, सुंदर,पंत, ठाकुर, नदीम, गिल, शॉ ह्यांचा कन्सिसटन्सी डेटा विरळ आहे किंवा आजिबातच नाही मग ह्या सगळ्यांना ईंपॅक्ट प्लेअर म्हणायचे का?
पुजारा, रहाणे, ईशांत शर्मा, कोहली, अश्विन, जडेजा कन्सिस्टंट आहेत म्हणून ते ईंपॅक्ट प्लेअर्स नाहीत का? कोहली आणि रहाणेची कन्सिस्टन्सी सध्या घसरलेली आहे तर त्यांना ईंपॅक्ट प्लेअर ईन मेकिंग म्हणायचे का?
एक किंवा दोनच का?, ११ इंपॅक्ट प्लेअर्स घेतले आणि त्यातल्या एखाद्याने जरी ऊजेड आपलं ईंपॅक्ट पाडला तरी निघाली की मॅच.
की, कन्सिस्टंट प्लेअरने अबोव अँड बीयाँड जात अजून ईंपॅक्ट पाडावा अशी अपेक्षा असते आणि इंंपॅक्ट प्लेअरने ईंपॅक्ट पाडण्यात कस्निस्टन्सी आणावी अशी अपेक्षा असते. Uhoh

तसं बेटींग करणारयाना बेटींगचे बदलते ऑडसच सौंदर्यस्थळ वाटेल म्हणून तेही मॅच प्रक्षेपणाचा भाग बनवायचा का ? : > बेटींग नि उरलेल्या गोष्टी सारख्याच दर्जाच्या वाटत असतील भाऊ तुम्हाला तर पुढे बोलणे खुंटले.

खेळाची समज व रसगरहण सुधारेल यावरच कमाल भर असावा. >> नाही कळले. डेटा सायन्स चा वापर करून केलेले विश्लेशण कळल्याने खेळाची समज वाढत नाही ? रसग्रहण करणे अधिक सुधारत नाही का ? म्हणजे अमका प्लेयर अमक्या बॉल वर अमका शॉट खेळताना उप्पीश खेळतो हे लक्षात आले म्हणून त्या ट्रॅप वर त्याला पकडले अशा गोष्टी कळल्याने प्रेक्षकांची समज वाढणार की कमी होणार ? तुम्हाला अशा गोष्टी आवडत नसणे समजू शकतो पण सरसकट कमेंट वाचून आश्चर्य वाटले.

Pages