क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

टेस्ट चँपियनशिप मधले गुण बघता किवीज फायनल मधे असणे अगदीच अनफेयर वाटले. भारत, ऑस्ट्रेलिया नि इंग्लंड ह्यापैकी दोन असणे योग्य वाटते. किवीज च्या सिरीज विन्स मुख्यत्वे त्यांच्याच देशात आहेत नि कठीण अपोनंट्स विरुद्ध विरुद्ध देशात हार्डली काही आहे. भारताचा ऑसी मधला विजय किंवा पॉम्स चा लंके मधला अधिक गुणवत्ता मिळवणारा असायला हवा होता.

चौथ्या सामन्याची खेळपट्टी पुण्याच्या नेहरू स्टेडियम मधून उचलून नविन स्टेडियम मधे नेली आहे अशी अंदरकी बात है. अगदी पाटा. पाचव्या दिवशी दोघांचे पहिले डाव संपणार. घ्या लेको. Happy
मग बोंबलू नका, भारताला फायनलमधे जाण्यासाठी अनुकूल खेळपटी बनवली म्हणून.

भारत, ऑस्ट्रेलिया नि इंग्लंड ह्यापैकी दोन असणे योग्य वाटते. >> भारत तर नक्कीच. आपणच सर्वात जास्त सामने जिंकले आहेत. Happy

*टेस्ट चँपियनशिप मधले गुण बघता किवीज फायनल मधे असणे अगदीच अनफेयर वाटले. * खरंच क्ळलं नाहीं 'आनफेअर' कसं तें. आयसीसी ने मंजूर केलेल्या कार्यक्रमानुसार जर ते सामने खेळले असतील, चॅपियनशिपचया नियमांनुसार गुण मिळवून फायनलसमधे आले असतील, तर 'अनफेअर' कसः ? कांहीं मखलाशी केल्याचं तर वाचनात नाहीं आल॔श

आयसीसी ने मंजूर केलेल्या कार्यक्रमानुसार जर ते सामने खेळले असतील, >> भाउ, कोविद मुळे सुरुवातीच्या वेळापत्रकाप्रमाणे सामने झाले नाहीत. न्युझिलंड त्यापूर्वी फक्त घरचेच सामने खेळले होते बहुतेक.
त्यानंतर कोविद मुळे आधिचा नियम बदलून % विजयाप्रमाणे क्रमवारी लावली गेली. त्यात न्युझिलंडला फायदा नक्कीच झाला असावा. (मी तपासल नाही)

त्यानंतर कोविद मुळे आधिचा नियम बदलून % विजयाप्रमाणे क्रमवारी लावली गेली. त्यात न्युझिलंडला फायदा नक्कीच झाला असावा. >> बरोबर आहे. नियम बदलले आहेत मधे. त्यांनी फेयर करायचा प्रयत्न केला % वगैरे घेऊन पण खुद्द किवीज सुद्धा स्वतः म्हणणार नाहीत की ते नंबर १ किंवा २ क्रमांकाचा संघ आहेत असे. ऑसीज नी दाणादाण उडवली होती किवीजची जो शेवटचा दौरा बाहेर खेळले त्यात.

चौथ्या सामन्याची खेळपट्टी पुण्याच्या नेहरू स्टेडियम मधून उचलून नविन स्टेडियम मधे नेली आहे अशी अंदरकी बात है. अगदी पाटा. पाचव्या दिवशी दोघांचे पहिले डाव संपणार. >> खरच तसेच करावे. वैताग आला आहे पिचबद्दल वाचून. काल नॅथन लॉयन, रिचर्ड्स नि पीटरसन ह्यांनी ह्या पिचच मधे त्यांना काहीच खटकले नाही असे वक्त्यव्य केले. टेस्ट म्हणजे कुठेही खेळता येण्याची टेस्ट असे रिचर्ड्स म्हणाला. पीटरसन ने इंग्लंद मधे किती ठिकाणी सिमिंग विकेट्स च असतात जिथे स्पिनर ला काहीही काम नसते नि डाव २-३ दिवसआंमधे संपतात असे म्हटलय. लॉयन एक पाऊल पुढे जाऊन विचारतोय कि हे वाद फक्त इंग्लंड भारतात खेळायला गेले कीच का होता. गेल्या दोन वर्षांमधे सिमिंग ट्रॅकवर शंभरीच्या आत आटोपलेले ३ डाव आहेत तेंव्हा हे प्रश्न का उद्भवले नाहीत ? मला शक्य असते तर हे पिच सिडने मधे नेईन असेही पुढे जाऊन म्हणालाय . Happy ह्याउलट वक्तव्ये युवराज, कुक नि डेव्हिड लॉईड ह्यांची आहेत. थोडक्यात इंग्लंड ने त्यांची 'तोडा नि फोडा' हे इथेही यशस्वीपणे राबवले आहे.

प्रत्येकाने स्वत:ला प्रामाणिकपणे 'त्या' पीचबद्दल काय वाटते याचा गंभीरपणे विचार करावा व त्यावर ठाम रहावे, हेंच उत्तम!

खबरदार पुढची मॅच लावाल टीव्हीवर तर ! तो टिव्ही मेकॅनिक काल एक तास बसून धुळ साफ करून गेलाय आंतली !!aghabara_0.jpeg

दर वर्षीचा 5 दिवसांचा गणपती यंदा दीड
दिवसांचाच ठेवायचं खूळ कुठून शिरलंय यांच्या डोक्यात !!
20200522_164821 (1)_0.jpg

भाऊ दोन्ही व्यंगचित्रे Lol

अखेरच्या सामन्याला अकरा दिवसांचा गणपती बसवावा आणि मालिका २-१ ने जिंकत फायनलला जावे..

मूर्खा, मुद्दाम सोडलाय मीं तो झेल ! आतांच मॅच संपवून काय फुल दिवस 'सिक्युरिटी बबल' मधे काढायचाय का !! acrick_2.jpeg

*अखेरच्या सामन्याला अकरा दिवसांचा गणपती बसवावा * - अहमदाबाद आहे, पीच दांडिया , गरबासाठी टेलर-मेड आहे, मला वाटतं गणपतीपेक्षां नवरात्र-दसराच बरा !! Wink

भाऊ इंग्लिश बॅट्समन क्रिजमधे हलत नाहीत, दांडिया कसे खेळणार हो ? Happy पिंक बॉल ऐवजी रेड बॉल आल्याने सामना चार दिवस तरी चालेल असे धरायला हरकत नसावी.

*भाऊ इंग्लिश बॅट्समन क्रिजमधे हलत नाहीत, दांडिया कसे खेळणार हो ?* - म्हणूनच त्यांच्यासाठी ' दांडी'या !! Wink

पीच कसंही असूंदे, टेस्ट 5 दिवस चालेल; फक्त, अंपायरना खेळ होईल त्याच दिवसांचंच मानधन मिळेल असं बजावायचं व तें डीआरएस बंद करायचं !!20190124_232828.jpg

भाउ - धुळीच कार्टून अ फा ट. Happy Happy पेपरमधे छापायला पाठवा. किंवा बीसीसीआय / इसीबी कडे पाठवा
गणपती पण मस्त.

*...गणपती पण मस्त.* -
आतां पीचवर सगळयांचं सगळं बोलून झालंय. म्हटलं, इथे' लाईट रोलर ' फिरवून जरा पाणी शिंपडावं !! Wink

आतां पीचवर सगळयांचं सगळं बोलून झालंय. >> भाऊ विराट विचारत होता कि न्यूझिलंड मधे तिसर्‍या दिवशी ३६ ओव्हर्स मधे सामना संपला तेंव्हा पिचबद्दल कोणी का काहीच विचारले नाही ? ह्याबद्दल एक कार्टून येऊ द्या आता. Happy

उमेश यादव भारतात चांगला बॉलिंग करतो हा एक समज होता. त्याचे आकडे बघून अबब झाले. तब्बल अश्व्नि नि जाडेजापेक्षाही जास्त सरस ठरलाय तो. सर्व जलदगती बॉलर्स मधे (कपिल पासून) त्याने देशाअत अधिक विकेट्स घेतल्या आहेत भारताबाहेर घेतलेल्या विकेट्स पेक्षा).

*.... पिचबद्दल कोणी का काहीच विचारले नाही ?ह्याबद्दल एक कार्टून येऊ द्या आता. * - घ्या-

सर, मलाच नेहमी मेमो कां ? त्या नायगांवकरलाही द्या; तोही गेल्या 23 तारखेला एकदां लेट आला होता ऑफीसला !!20190103_072130_0 (1)_0.jpg

भाऊ,मस्तच.

न्यूझिलंड मधे तिसर्‍या दिवशी ३६ ओव्हर्स मधे सामना संपला हे चूकच आहे.
भारतात तसे झाले की सर्व बोलतात हा दुजाभाव आहे.

"हो पण चूक ही दोघांची आहे". मुद्दाम हिरवे पीच ठेवणे हे चुकीचे आहे व मुद्दाम आखाडा पीच ठेवणे हे देखील चुकीचे आहे.
दूजाभाव जरी होत असला तरी त्याने चुकीचे समर्थन होऊ शकत नाही.

मला नाही वाटत ते समर्थन आहे. तेंव्हा प्रश्न न विचारता फक्त भारताबद्दलच प्रश्न कसा विचारला जातो असा तो प्रश्न आहे. हा प्रश्न त्यानेच नाही तर बर्‍याच जणांनी विचारला आहे नि त्यातले काही खुद्द इंग्लिश आहेत. न्याय दोन्ही बाजूंना समानच लावावा ही अपेक्षा फारशी गैरलागू नसावी . तुम्ही मूळ पोस्ट वाचून बघा त्याचे.

टेस्ट अनेक कारणांमुळे कमी दिवसांत संपू शकते. ती कृत्रिम रित्या निर्माण केलेल्या घटकांमुळे संपली , तरच तो ' रडीचा डाव ' होतो. तिसरया टेस्टचं पीच टेस्टला साजेसं बनवलं होतः कीं नाहीं , हा खरा मुद्दा आहे. निदान माझ्यापुरता तरी.
*आज अफगाण झिम्बाब्वे सुद्धा दोन दिवसात संपला* - गांजा ओढला म्हणून बापाने पोराच्या कानफटात मारली तर पोराने आपण गांजा ओढलाच नव्हता याची बापाची खात्री पटशावी किंवा परत ओढणार नाही म्हणावं. रोज येवून गांवात आणखी कोणाच्या पोराने गांजा ओढला, हें बापाला सांगून काय गांजा आरोग्यदायक ठरतो का ?
*हम करे तो साला कॅरेक्टर ढिला है* - कॅरेक्टर आपलं आपणच बनवावं, क्युरेटरला बनवायला सागू नये, इतकंच !!
आजच्या सामन्यासाठी आपल्या पोरांना शुभेच्छा!

आत्तापर्यन्त तरी पीच ने काहीही ट्रिक्स केलेल्या नाहीत. क्रॉली च्या विकेटमुळे हे सुद्धा कळलं की predetermined shots मुळे बॅट्समन कसा संकटात सापडू शकतो. सिराज आणि इशांत मस्त बॉलिंग करतायत.

Pages