Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05
क्रिकेटवरील पहिले पाच धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
https://www.maayboli.com/node/67443
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
रहाणेला काढा म्हणणार्यांनी
रहाणेला काढा म्हणणार्यांनी रहाणेचे वर्ल्ड टेस्ट सिरीज सुरू झाल्यापासूनचे रेकॉर्ड कृपया बघावे. त्याच्या भारताकडून सर्वात जास्त धावा आहेत.
त्याची कालची बॅटींग क्लास होती. ऱोहित आणि रहाणेने कालच विजय पक्का केला. अर्थात त्यापूर्वी टॉस जिंकण्याची महत्वाची कामगिरी विराटची होती.
पंच गिरी बेकार असो शकते, पण तिसरा पंच सुद्धा इतके निर्णय चुकतो. आत्तापर्यंत या मॅच मधे तीन. रोहित, रहाणे पहिल्या इनिंग मधे आणि आज रोहीत . (मुख्य पंच)
*पाहुण्या संघाला निर्णय
*पाहुण्या संघाला निर्णय घ्यायला अधिकार द्यायचे. * - पर्याय बरा आहे पण हवामान बदलामुळे टाॅस महत्वाचा ठरत असेल, तर तो यजमान संघावर अन्यायकारक ठरेल. खेळपट्टीच्या किमान दर्जाबाबत कडक नियम हा पर्याय बरा वाटतो. अर्थात, खूप विचार यावर आवश्यक इहे.
या खेळपट्टीवर आपण टॉसच्या
खेळपट्टी अशी नसावी हे मान्य
पण या खेळपट्टीवर आपण टॉसच्या मुळेच जिंंकलोय असे बोलणे अन्यायकारक ठरेल. ईथे आपल्या गोलंदाजांनी ईंग्लंडला पहिल्या डावातही लवकर गुंडाळून आपल्या पहिल्या डावात आघाडी घेतली असती.
किंबहुना पहिल्या कसोटीच्या अनुभवानंतर खेळपट्टी बनवताना हाच विचार डोक्यात असावा की टॉस हरलो तरी बॉल पहिल्याच दिवशी वळू लागला तर आपण आपल्या स्ट्रेंथला जागत ईंग्रजांना पहिल्या दिवशी गुंडाळून सामन्यात टिकून राहू.
आज मी सामना फार पाहिला नाही. शेवटचे सत्र जराही नाही, पण स्कोअरकार्ड पाहता आपण दुसर्या डावातही चांगली सुरुवात केली आहे. कदाचित ईथे आता ईंग्लंडच्या पहिल्या डावातील इनिंगला आपण आपल्या दुसर्या डावात पार करू. जर उद्या ते आपण आरामात केले तर आपण आपले डॉमिनेशन सिद्ध करू.
पीच हे बर्याच अंशी मातीचे
पीच हे बर्याच अंशी मातीचे गुणधर्म, हवामान ह्यावर अवलंबून असतं. जर चेन्नई च्या पीच चा मूळ स्वभाव हा स्पिन फ्रेंडली असेल तर ह्यावेळी ते त्याच्या मूळ स्वभावाशी इमान राखून आहे.भारतीय संघ चांगला खेळला म्हणून आघाडीवर आहे. रोहित, रहाणे, पंत, अश्विन ने ती पोझिशन भारतीय संघाला मिळवून दिली आहे. इंग्लंड ला बॉल स्विंग होतो ह्याला जसं आपण काही करू शकत नाही तसंच भारतात बॉल स्पिन होतो आणी प्रत्येक होम टीम आपापल्या होम अॅडव्हांटेज चा फायदा घेते. घ्यावाच. तसं नसतं तर आज कदाचित न्यूझिलंड WTC च्या फायनलसाठी क्वालिफाय होऊन बसले नसते.
भारतातील pitches स्पिन
भारतातील pitches स्पिन फ्रेंडली असण्यास काही हरकत नाही. पण जेव्हा पहिल्या दिवशी पहिल्या तासात pitch उखडू लागते आणि स्पिन व्हायला लागते ते काही फार योग्य वाटत नाही. भारताने गेल्या 3-4 वर्षात अश्या पीचेस न बनवता सामने जिंकले आहेत
*इंग्लंड ला बॉल स्विंग होतो
*इंग्लंड ला बॉल स्विंग होतो ह्याला जसं आपण काही करू शकत नाही* - तो मला वाटतं हवामानाचा परिणाम आहे व त्याला सामोरं जाणं हा क्रिकेटचाच अविभाज्य भाग आहे. प्रत्येक खेळपटटीचा एक स्वाभाविक कल असतो हें मान्य करूनही तो कल किती मर्यादित ठेवायचा किंवा किती वाढवायचा हें यजमान संघ ठरवतो, हेंही तितकंच खरं. म्हणून, *प्रत्येक होम टीम आपापल्या होम अॅडव्हांटेज चा फायदा घेते. घ्यावाच. * हें करताना, अॅडव्हांटेज घेण्यासाठी 5 दिवसांच्या कसोटी क्रिकेटच्या मूळ ढाच्यालाच बाधा येणार नाहीं याची काळजी घेणं अपरिहार्य. ' जिंकण्यासाठी कांहीही ', हें क्रिकेटच्याच नाहीं पण क्रिडाक्षेत्राच्याच मूळावर घाव घालणारं आहे, याचं भान असावं इतकंच.
पहिल्या सामन्याची पिच जी दोन
पहिल्या सामन्याची पिच जी दोन दिवस अतिशय फ्लॅट होती ती पण योग्य नाही कारण त्या परिस्थितीत टॉस अतिशय महत्वाचा ठरतो, आणि दोन्ही सामने चेन्नई लाच असल्याने वातावरण , माती बाकी गोष्टी सारख्याच असल्या तरी पिच वेगळ्या आहेत, ही पिच मुद्दाम अशी बनवली आहे हे जाहीर आहे
पुजारा दुर्दैवीरित्या धावबाद!
पुजारा दुर्दैवीरित्या धावबाद!
१/५५ आणि आता ४ /६५. आज
१/५५ आणि आता ४ /६५. आज सायंकाळ पर्यन्त चालेल का सामना? कि चहापाना पर्यंत फक्त अर्थात इंग्रजांची फलंदाजी चांगली आहे..
६/१०६. ३०० पार धावा नेल्या!
आज कोहली फिरकी खेळायची खूप
आज कोहली फिरकी खेळायची खूप मानसिक नेट प्रॅक्टीस करून आला असावा. किती छान फूटवर्क व भेदक फिरकीला निष्प्रभ करायचं तंत्र !! अश्विनही छानच !! मस्त !!!
ब्रॉडसारख्या गोलंदाजाला
ब्रॉडसारख्या गोलंदाजाला ३७व्या षटकात गोलंदाजी साठी बोलावले... आहे की नाही भारतीय खेळपट्ट्यांची करामत!
400 धावांची आघाडी!!
400 धावांची आघाडी!!
400 धावांची आघाडी!!>>
400 धावांची आघाडी!!>>
अश्विन आणि कोहलीच्या ९६ धावांच्या भागिदारीचा परिणाम! ह्या खेळपट्टीवर चांगली फलंदाजी... अर्थात गोलंदाजांपाठी ४०० धावांचे पाठबळ म्हटल्यावर इंग्रज दडपणाखाली येणार आता!
अश्विन - कोहलीची भागिदारी
अश्विन - कोहलीची भागिदारी इन्ग्रजांच्या फायद्याची आहे म्हणायला हवे! दोघांनी दाखवून दिले ह्या खेळपट्टीवर अजुनी उभे राहून धावा करता येतात!
बघुया इंग्रज किती फायदा करुन घेतात ह्या दोघांच्या मार्गदर्शनाचा!
अश्विनचे शतक!!! वेल प्लेड!!!
अश्विनचे शतक!!! वेल प्लेड!!!
खेळपट्टी खेळण्यायोग्य झाली का? की इंग्रजांनी शस्त्रे म्यान केली?? ४७१ धावांची आघाडी!!!
*खेळपट्टी खेळण्यायोग्य झाली
*खेळपट्टी खेळण्यायोग्य झाली का? की इंग्रजांनी शस्त्रे म्यान केली?? * - या खेळपट्टीवर कोहली व अश्विन यांनी तंत्र व एकाग्रता, संयम व आक्रमण याचं सुरेख प्रदर्शन केलं, असं म्हणणंच योग्य.
Grinding England to Dust.
Grinding England to Dust. येवढाच लवकर डाव घोषित न करण्याचा उद्देश होता. मुंबईकर मॅनेजर ही संधी सोडतोय व्हय.
अश्विन सुपर्ब खेळला.
आज पुन्हा एकदा तिसरा अंपायर चुकला. यावेळेस फायदा रूटला. बॉल पॅडला लागला तेंव्हा ऑफ स्टंप सुद्धा दिसत असताना तो अंपायर्चा कॉल कसा होउ शकतो.?. प्लम्ब आउट होता रूट.
*आज पुन्हा एकदा तिसरा अंपायर
*आज पुन्हा एकदा तिसरा अंपायर चुकला* - डीआरएस हास्यास्पद करायचं हया मालिकेचं जणूं उद्दीष्टच आहे !
रूट क्लिअर आऊट होता पण मला
रूट क्लिअर आऊट होता पण मला वाटते की यात third umpire ची चूक नव्हती. DRS तंत्रज्ञानानी ठरवले की इम्पॅक्ट umpire कॉल म्हणून
कालची माझी पोस्ट
कालची माझी पोस्ट
>>>>
या खेळपट्टीवर आपण टॉसच्या मुळेच जिंंकलोय असे बोलणे अन्यायकारक ठरेल. .............. कदाचित ईथे आता ईंग्लंडच्या पहिल्या डावातील इनिंगला आपण आपल्या दुसर्या डावात पार करू. जर उद्या ते आपण आरामात केले तर आपण आपले डॉमिनेशन सिद्ध करू.
>>>>
आज तेच झाले, आणि ते आश्विनने केले हे कमालीचे आवडले.
त्याने खेळपट्टीवरचेच आरोप नाही मिटवले तर स्वतःच्या पाच विकेटवर लागलेले बालंटही मिटवले.
आणि अश्याप्रकारे आश्विन एकाच सामन्यात शतक आणि ५ बळी हि कामगिरी तीन वेळा करत जास्तीत जास्त वेळा अशी कामगिरी करणार्यांमध्ये दुसर्या क्रमांकावर आला आहे.
ज्याचे आपल्याकडे सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार आहेत.
पहिला बोथम आहे ज्याने ५ वेळा हा कारनामा केलाय.
आर आश्विन - भारताचा शापित ऑलराऊंडर ! वन ऑफ द ग्रेटेस्ट मॅचविनर, किंबहुना सिरीजविनर
*या खेळपट्टीवर आपण टॉसच्या
*या खेळपट्टीवर आपण टॉसच्या मुळेच जिंंकलोय असे बोलणे अन्यायकारक ठरेल. .....* - असं म्हणतां येईलही पण एखाद्याने अप्रतिम तारेवरची कसरत केली, तर ती तार नाॅर्मल फुटपाथ तर होत नाहीं ना !
३१७ धावांनी मोठ्ठा विजय!
३१७ धावांनी मोठ्ठा विजय!
शेवटी मोईन अलीने थोडीफार फटकेबाजीकरुन दिडशेपार नेले! नाही तर मागील डावपेक्षाही कमी धावसंख्या झाली असती!
जिंकलो
जिंकलो
ग्रेट !!! अभिनंदन !!!
ग्रेट !!! अभिनंदन !!!
कोहली म्हणतोय की टॉस या मॅच
कोहली म्हणतोय की टॉस या मॅच मध्ये आणि या पीचवर महत्वाचा नव्हता!
अश्विनला तमिळमध्ये बोलताना बघून मजेशीर वाटले
*कोहली म्हणतोय की टॉस या मॅच
*कोहली म्हणतोय की टॉस या मॅच मध्ये आणि या पीचवर महत्वाचा नव्हता!* - तो कशाला आपल्या जिंकणयाचं महत्व कमी करून घेईल ? या पीचवर भारतीय फलंदाजी व गोलंदाजी इंग्रजांपेक्षा निर्विवाद सरस होती. पण टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी केल्याचा फायदाही आपल्याला मिळाला, हें साफ नाकारायची गरज नसावी, असं मला वाटतं. त्याने या घसघशीत विजयाची किंमत जराही कमी होत नाहीं.
पण टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी
पण टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी केल्याचा फायदाही आपल्याला मिळाला,
>
जर आपण तिसर्या इनिंगला धावा बनवल्या तर त्यांना दुसर्या इनिंगला बनवायला कोणी अडवले होते.
आपणही तिसर्या इनिंगला अडखळलेलोच, पण चेंडू जुना होताच गेम तुलनेत सोपा झाला होता. ईंग्लंड त्यांच्या दोन्ही डावात फार तग धरूच शकली नाही.
चौथ्या इनिंगला शेवटी तो मोईन अली मारायला लागल्यावर अचानक मोठाले शॉट खेळणे किती सोपे वाटू लागलेले.
आश्विनच्या खेळीवर नजर टाका, ती नेहमीची ड्राईव्हवाली आश्विन खेळी नव्हतीच. स्वीप, अगदी रिव्हर्सस्वीप, पुढे येऊन उचलून मारणे, वेळप्रसंगी स्लॉग, गडी नेहमीच्या आपल्या शैलीच्या विपरीत वेगळाच खेळत होता. किंबहुना त्याने दाखवून दिले की ईथे कसे खेळायला हवे.
या सामन्यात दिसलेला आपल्या स्पिनरचा क्लास + त्यांचे फलंदाजी तंत्र विरुद्ध त्यांचा स्पिन अटॅक + आपले फलंदाज हे पाहता अश्या खेळपट्टीवर त्यांची पहिली फलंदाजी असती तरी आपणच जिंकलो आसतो. फार तर विजयाचा फरक कमी झाला असता असे म्हणू शकतो ते सुद्धा इंग्लंडच्या समाधानासाठी म्हणू शकतो, पण तेव्हाही सामना सुरुवातीपासून आपणच डॉमिनेट केला असता.
ईंग्लंडने तीनही स्पिनर खेळवायला हवे होते या सामन्यात. स्टोक्स असताना एकच वेगवान पुरेसा होता त्यांना. ब्रॉडला आरामच दिला असता. तसेही नवीन बॉलही स्पिनरच्या हातात देता येत असेल तर कश्याला हवे होते ईतके वेगवान गोलदाज. तो कोण तो एक स्पिनरने छान टाकलेली बॉलिंग त्याला का काढलेले, फिट नव्हता का तो.. कल्पना नाही.
उलट पहिल्या सामन्यात टॉस महत्वाचा होता. आणि अशी खेळपट्टी आपल्याच देशात बनवणे हे चूकीची आहे हे आपल्याला उमगले. कारण तुम्ही मायदेशात फेव्हरेट असतात अश्यात तुम्ही टॉस महत्वाचा बनवलात तर याचा अर्थ तुम्ही समोरच्यांनाच संधी देत आहात.
ईंग्लंडने खुश व्हावे की ते पहिल्या सामन्यात टॉस जिंकल्याने त्यांना सामना जिंकता आला.
*जर आपण तिसर्या इनिंगला धावा
*जर आपण तिसर्या इनिंगला धावा बनवल्या तर त्यांना दुसर्या इनिंगला बनवायला कोणी अडवले होते.* - मीं वरच्याच पोस्टमधे याचं कारण दिलंय - या पीचवर भारतीय फलंदाजी व गोलंदाजी इंग्रजांपेक्षा निर्विवाद सरस होती. पण याचा अर्थ आपल्याला टाॅस जिंकल्याचा फायदा झालाच नाहीं, असा होतो का ? अर्थात, इंग्लंडला पहिल्या टेस्टमधे टाॅस जिंकल्याचा झालेला फायदा व या पीचवरचा आपल्याला मिळालेला फायदा यात प्रचंड फरक आहेच.
पब्लिकला मायदेशात आपल्या
पब्लिकला मायदेशात आपल्या संघाला अनुकूल अश्या खेळपट्टीवर मिळवलेल्या कसोटी विजयाचे कौतुक राहिलेले नाही की काय?
फारसे कुणी फिरकले नाही इकडे भारतीय संघाचे अभिनंदन करायला
तो कोण तो एक स्पिनर
तो कोण तो एक स्पिनर
>>>. डॉम बेस
Pages