क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

गिल शून्यावर
शर्मा अर्धशतक ४७ चेंडूत
जॅक लीचचे दोन तीन बॉल माती ऊडवत उसळले
आता जरा वाटतेय सामना भारतात आहे..

पुजारा बाद!!
खेळपट्टी 3 दिवसात सामना संपविणार असे दिसतेय..
कोहली शून्य!! त्रिफळा...

पुजारा गेला
पाठोपाठ कोहली बदक
उसळणारे बॉल आता घुसायला लागले
आता त्यांचे स्पिनर आपल्याला नाचवतील

*पहिल्या दिवसापासून टर्न वगैरे - भाऊंचे फेव्हरीट 'पिच'*- अजिबात नाहीं ! फिरकीला तिचं मानाचं स्थान मिळावं पण असं दान दिल्यासारखं नको !!

लंच १०६-३
शर्मा ८० नाबाद

ही कसोटी कदाचित २५० धावा पर इनिंग सरासरीने होईल.
अश्यात शर्माची हि इनिंग निर्णायक ठरू शकते.

इम्पॅक्ट प्लेअर !

*रोहित आज 200 करणार.* - तथास्तु! आमेन !!
रहाणे पण 100 करण्याच्या मूडमधे ! शुभेच्छा.

रोहितचं अभिनंदन! रहाणेचंही होऊ दे. ही मॅच ३-४ दिवसांपेक्षा जास्त लांबणं कठीण दिसतंय. पहिल्या डावातल्या धावा महत्त्वाच्या असतील.

रोहित चांगला खेळला एकदाचा!
भाऊ तुमचे अभिनंदन Happy

रहाणे ही चांगला खेळला..... रिषभ पंत ज्या प्रकारच्या फॉर्ममध्ये आहे; त्याला जरा वर खेळवायला हवे!
अर्थात तीन आणि चार नंबरला धक्का न लावता निदान पाचव्या नंबरवर पाठवायला हवे त्याला.

बाय द वे भारताचे आणि इंग्लंडचे खेळाडू एका फ्रेममध्ये असताना रिन किंवा सर्फ एक्सेलची जाहिरात पाहिल्यासारखे वाटत होते Wink

शर्मा साहेबाना फक्त भारतात खेळवा. त्याची भारतामधील सरासरी दणकून 88 आहे. फक्त ब्रॅडमनची सरासरी घरच्या टेस्ट्स मध्ये जास्त म्हणजे 98 आहे.
शिवाय रोहितची सर्वच्या सर्व 7 शतके भारतातच आहेत.

*भाऊ तुमचे अभिनंदन * - जिथे अभिनंदन जायला हवं तिथे पाठवतो, माझ्या धन्यवाद व शुभेच्छांची त्यांत भर घालून ! Wink
आजचे रोहितचे स्वीप शाॅट कमालीचे सफाईदार व कडक होते ! ( बाद त्याच शाॅटवर व्हावा हें दुर्दैव!)
रहाणे आज छानच खेळला. ऑफसपीनला बॅकफूटवर जावून मारलेले कव्हर ड्रायव्हज लाजवाब ! आज तो पुढे येवून विश्वासपूर्वक फिरकी खेळत होता. मस्त !!

"बाय द वे भारताचे आणि इंग्लंडचे खेळाडू एका फ्रेममध्ये असताना रिन किंवा सर्फ एक्सेलची जाहिरात पाहिल्यासारखे वाटत होते" - Happy

शर्मा रहाणे मस्त खेळले. पंतकडून अजून एक इंपॅक्ट खेळीच्या प्रतिक्षेत आहे.

शर्मा साहेबाना फक्त भारतात खेळवा.
>>>>
हे मी मागेही म्हटलेले की जसे मायदेशात आणि परदेशात गोलंदाज कोण असावेत हे निवडताना खेळपट्टी आणि परीस्थितीनुसार बदल करतात तसेच फलंदाजीतही त्यानुसारच संघनिवड करायला हरकत नाही. यात मग मायदेशात खेळताना शर्माचे नाव आधी लिहायला हवे रहाणेचे नंतर तर परदेशात हे उलटे करायला हवे आणि त्यानुसार फॉर्म नसल्यास वगळायलाही हवे.. पण असो, अशी पद्धत नाहीये आपल्यात.

बाकी रोहीतने आपल्याला गेममध्ये बरेच पुढे नेऊन ठेवलेय. तो खेळताना गेम खूप सोपा वाटतो. पण तितका तो नसतो. कमालीचे टॅलेंट आहे.

पंतने सुद्धा आज पुन्हा ईम्प्रेस केले. शेवटच्या सत्रात बॉल स्क्वेअर वळत होता. रूटने नवा बॉल न घेता स्पिनरच लावलेले. त्याचा स्वत:चाही चेंडू उसळत होता. तरीही पंत दटून उभा राहिलेला. मध्येच पुढे सरसावत चेंडू भिरकाऊन देत होता आणि गोलंदाजांना डोईजड होऊ देत नव्हता. अखेरच्या दोन ओवर ऑफस्टंपच्या बाहेरचे बॉल कसलीही हुशारी न करता छान जज करत सोडून देत होता. निश्चितच तो आता प्रगल्भ देखील होत आहे.

उद्या तो फटकेबाजी करेल वा लवकर बाद होईल. खेळ आहे काहीही होऊ शकते. पण आज त्याचे नाबाद राहणे ब्रिटीशांना शांत झोप लागू देणार नाही हे नक्की Happy

इंग्लंडने आज एका ‌वेगळ्याच जागतिक विक्रमाची नोंद केली. ३२९ ही धावसंख्या एकही अवांतर धाव न देता झालेली सर्वात जास्त आहे. ह्याआधी ती ३२८ होती, पाकिस्तानने आपल्याविरूद्ध १९५४-५५मध्ये केली होती.

असे ५ डाव उतरत्या क्रमाने पुढीलप्रमाणे -

329 TODAY
328 Pakistan vs India Lahore 1954/55
252 South Africa vs England Durban 1930/31
247 South Africa vs England Trent Bridge 1960
236 Australia vs England Melbourne 1891/92
234 Bangladesh vs New Zealand Hamilton 2018/19

रूट ला बाद करून इंग्रजांच्या फलंदाजीचा मुळाला हात घातला असे म्हणायला हरकत नाही.. स्टोक्स आणि मोईन आहेत चांगले फलंदाज अजून..

टेस्ट सामन्यात नाणेफेक जिंकली म्हणजे अर्धा सामना जिंकल्यात जमा आहे. मला वाटतंय नाणेफेक सिस्टीम क्रिकेटमधून बाद करावी. क्रिकेट हा मेहनतीचा खेळ आहे या खेळाची सुरवात लक फॅक्टरने व्हायला नको. सामन्याच्या सुरवातीला दोन्ही कॅप्टनची धावण्याची शर्यत, पंजा किंवा लांब षटकार मारण्याची स्पर्धा ठेवावी जो जिंकेल त्याने ठरवावं काय करायचं आहे.

*नाणेफेक सिस्टीम क्रिकेटमधून बाद करावी.* - पांच दिवस दोन्ही संघाना बव्हंशी समान संधी मिळेल अशी खेळपट्टी असावी, हें गृहीत घरून टाॅसचा नियम बनवला असावा. या गृहीतालाच सुरूंग लावणारी पीचेस बनवून टाॅसला दोष कां द्यायचा.

छान ऊपाय आहेत बोकलत.
गोट्या खेळताना आम्ही चकायचो. ज्याची गोटी लाईनजवळ तो पहिला.
भोवरा खेळताना एकजण सगळ्यांचे भोवरे जमा करून फेकणार. मग धावत जाऊन आपला भोवरा आणायचा आणि रशी गुडाळून फिरवून तो झेलायचा. त्यानुसार नंबर..
ईथे काही नाही तर थ्रो करून स्टंप उडवता येतील..

हे उपाय करून टाॅसमधलं ' लक एलिमेंट' कमी होईल पण ' टेस्ट सामन्यात नाणेफेक जिंकली म्हणजे अर्धा सामना जिंकल्यात जमा आहे ' हा मुख्य प्रश्न कसा सुटेल, हें नाहीं कळलं .

चार कसोटी असतील तर दोन दोन सामन्यात दोन्ही टीम ला पाहिले काय करायचे ते ठरवू द्यावे. 5 सामने असतील तर पाहुण्या संघाला 3 वेला आणि यजमानांना 2 वेळा असे करावे

टेस्ट सामन्यात नाणेफेक जिंकली म्हणजे अर्धा सामना जिंकल्यात जमा आहे. मला वाटतंय नाणेफेक सिस्टीम क्रिकेटमधून बाद करावी. >>अगदी बरोबर बोकलत. यावर एक छान पर्याय आहे. पाहुण्या संघाला निर्णय घ्यायला अधिकार द्यायचे. सगळे देश झक्कत ५ दिवस टिकणारी खिलाडू खेळपट्टी बनवतील. आपण पण सुधारू. माझ पहिल्यापासन मत आहे. आपल्याकडे एकतर पाटा किंवा आखाडा. एखाद्या वेळेसच मुंबई, मोहालीला वगैरे खिलाडू खेळपट्टी आठवतेय.

Pages