Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05
क्रिकेटवरील पहिले पाच धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
https://www.maayboli.com/node/67443
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आपण खरंच मस्त खेळलो. जर
आपण खरंच मस्त खेळलो. जर दोन्ही संघांनी खेळलेल्या ओव्हर्स पाहिल्या तर लक्षात येईल की इंग्लंडला मैदानात उभं रहाताच आलं नाही (गेल्या सा. मन्यात आपण जरी पहिल्या डावात इंग्लंडपेक्षा लवकर आऊट झालो तरी १०० एक ओव्हर्स खेळून काढल्या होत्या.
)
इंग्लंडच्या रोटेशन पॉलिसीबद्दल न बोललेलं बरं. (आपल्या फायद्याची आहे ना
"पब्लिकला मायदेशात आपल्या
"पब्लिकला मायदेशात आपल्या संघाला अनुकूल अश्या खेळपट्टीवर मिळवलेल्या कसोटी विजयाचे कौतुक राहिलेले नाही की काय?" -
तसं काही नाही रे. बिझी होतो. फॅब्युलस!!! मस्तच जिंकली टीम इंडिया!! पीच वगैरे विषयी चा वाद फिजूल आहे. वेगवेगळ्या वातावरणात, वेगवेगळ्या पीचेसवर खेळण्याचं आव्हान हेच 'टेस्ट' क्रिकेट आहे. पाटा विकेट्स (पहिली टेस्ट, पहिले दोन दिवस) बनवू नये इतपत मान्य. पण पहिल्या दिवशी सीम मूव्हमेंट देणारी विकेट आणी पहिल्याच दिवशी टर्न देणारी विकेट ह्या सारख्याच आव्हानात्मक आहेत. स्पिन बॉलिंग हा सुद्धा बॉलिंगचाच प्रकार आहे. स्पिनर्सने काढलेल्या विकेट्स ना सुद्धा टेस्ट विकेट्सचा च दर्जा असतो. मस्त खेळली भारताचे टीम आणी जबरदस्त जिंकले. अभिनंदन!!!
पुढील कसोटी साठी भारतीय टीम
पुढील कसोटी साठी भारतीय टीम मध्ये केवळ एक बदल. शार्दुल ठाकूर ला डच्चू आणि उमेश यादव चा समावेश
*पहिल्या दिवशी सीम मूव्हमेंट
*पहिल्या दिवशी सीम मूव्हमेंट देणारी विकेट आणी पहिल्याच दिवशी टर्न देणारी विकेट ह्या सारख्याच आव्हानात्मक * - पहिल्याच दिवशीं सारख्याच आव्हानात्मक असतीलही. पण नंतर टर्न देणारी विकेट अधिकाधिक खराबच होत जाते व म्हणून पांच दिवसांच्या कसोटीत दुसरी फलंदाजी करणारया संघासाठी ती सारखीच आव्हानात्मक रहात नाहीं, हा मुद्दा असावा.
आज आयपीएलचे मिनी auction आहे
आज आयपीएलचे मिनी auction आहे
चौथ्या दिवशी लॉर्ड्सवर पाऊस
चौथ्या दिवशी लॉर्ड्सवर पाऊस पडला आणि हवामान ढगाळ असेल, तर पाचव्या दिवशी अँडरसन आणि पब्लिक "आम्हाला नको बुवा ह्या फोर्थ इनिंग्ज विकेट्स! आम्ही समान संधी असल्या तरच जिंकू" म्हणत नाहीत, तोवर स्पिनिंग ट्रॅक्स वगैरे सगळे ठीकच आहेत.
आज आयपीएलचे मिनी auction आहे
आज आयपीएलचे मिनी auction आहे Happy
>>>>
दोन वाजता आहे ना. मी डब्ल्यूएफएच आहे. तर बघणार. धागा काढा मग आजच नवीन आयपीएलचा
मुंबई सचिनच्या पोराला घेईल.
मुंबई सचिनच्या पोराला घेईल. २० लाख बेस प्राईझ आहे.
*चौथ्या दिवशी लॉर्ड्सवर पाऊस
*चौथ्या दिवशी लॉर्ड्सवर पाऊस पडला आणि हवामान ढगाळ असेल, तर अँडरसन आणि पब्लिक "आम्हाला नको बुवा ह्या फोर्थ इनिंग्ज विकेट्स! आम्ही समान संधी ....*
हवामाननिर्मित परीस्थिती व मानवनिर्मित पीचचा दर्जा यात मुलभूत फरक आहे. माझ्या 14 फेब.च्या पोस्टमधे मीं हें सपष्ट केलंय - ' हवामानाचा परिणाम आहे व त्याला सामोरं जाणं हा क्रिकेटचाच अविभाज्य भाग आहे. '
( आपली फलःदाजी व गोलःदाजी इंग्रजांपेक्षा सरस होती म्हणूनच आपण दुसरा सामना जिंकलो, यावर मी पण आग्रहीच आहे. टाॅस व पीचचा दर्जा हा वेगळा व जनरल विषय आहे. )
प्रिती झिंटाने शाहरूखखानला ५
प्रिती झिंटाने शाहरूखखानला ५.२५ करोड रुपयात विकत घेतला
मुंबई सचिनच्या पोराला घेईल.
मुंबई सचिनच्या पोराला घेईल. २० लाख बेस प्राईझ आहे.>>>>बोललो होतो ना. आता हा रोहन गावस्कर V2 मुंबईला चार पाच सामने हरवूनच गप्प बसेल.
*मुंबईला चार पाच सामने हरवूनच
*मुंबईला चार पाच सामने हरवूनच गप्प बसेल.* - कुणी सांगावं, आयपीएल मथे चमकून राष्ट्रीय संघातही येवूं शकेल. केव्ळ सचिनचा मुलगा म्हणून गावस्करच्या मुलासारखंच त्याचंही होणार ?
ज्युनियर तेंडुलकरला शुभेच्छा . किंबहुना, कोणत्याही क्षेत्रात करिअर करूं पहाणारया प्रत्येक नवोदितास नेहमीच अगदीं मनापासून शुभेच्छा !!
मुंबईच्या डगआउट मध्ये बसणे
मुंबईच्या डगआउट मध्ये बसणे आणि MI च्या प्लेअर्सबरोबर नेटमध्ये खेळणे हेच त्याच्यासाठी मोठे शिक्षण असेल.... लगेच त्याला सामन्यात वगैरे खेळवतील असे वाटत नाही!
सचिनच्या मुलाला मुंबई
सचिनच्या मुलाला मुंबई ईंडियन्सने बेस प्राईज २० लाखालाच विकत घेतले. ईतर कोणी बोली लावायला आले नाही आणि मुंबईने त्याला नाकारले नाही. क्रिकेट समजणाऱ्या आणि क्रिकेटबाह्य घडामोडींची पुरेशी जाण असणाऱ्या कोणालाही हे अपेक्षितच असावे.
आता म्हटले तर ही आयपीएल आहे. त्याच्याकडून चमकदार कामगिरी घडावी यासाठी एक दोन सामन्यात सेटींगही ईथे सहज लावली जाऊ शकते. किंवा बिचारयाने खरेच चांगली कामगिरी केली तरी शंका तशीच घेतली जाणार. सचिनने मध्यंतरी जे शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केले त्याचाही संबंध तुझ्या पोराचे करीअर सेट करून देतो याच्याशी जोडला जातोय. यामागचे राजकारण हा आपला विषय नाही. पण नुकतेच त्याने कुठल्याश्या गल्ली क्रिकेटमध्ये एका सामन्यात षटकारांची आतिषबाजी करत पन्नासेक धावा मारल्या. तीन विकेट घेतल्या.मग काय, फेसबूक, न्यूजहंट वगैरे वर जिथे तिथे तीच न्यूज त्याची हवा करायला फिरत होती.
पर्सनली मात्र मला त्याचे कौतुक वाटते. मिडीया हाईप करेनात पण पोरगा फार मेहनती आहे. खेळाडू म्हणून गुणी वाटतो. आता देशभरात करोडो मुले क्रिकेट खेळतात. लाखो चांगले खेळतात. त्यातले मूठभर आंतरराष्ट्रीय दर्जाचे असतात. त्यात सचिनचा मुलगा असलाच पाहिजे या अपेक्षा अवास्तवच आहेत.
हा खेळ आहे. ईथे नेपोटीजमला जास्त वाव नाही. बाप बॉलीवूडचा हिरो असेल तर पोरालाही हिरो बनवायला खिशातले पैसे खर्च करून स्वत:च निर्माता बनून त्याला चान्स देऊ शकतो. ईथे ते ही शक्य नसते.
तरीही तो पोरगा वडिलांच्या नावाचे, त्यांच्या वलयाचे दडपण न घेता आपला खेळ प्रामाणिकपणे खेळतोय. कुठे पेज थ्री वा स्पोर्टस मॅगझिनवर चमकोगिरी न करता मैदानात घाम गाळतोय. त्याची या खेळाप्रती असलेली निष्ठा तरी त्याने नक्कीच सचिनकडून उचलली आहे. त्यामुळे तो या खेळात वरच्या स्तरावर चमको न चमको, पण हा खेळ त्याला आनंद आणि समाधान देत राहो याच त्याला शुभेच्छा
अवांतर - आमच्याकडे मी लिलाव बघत असताना मला काय ते बघतोस म्हणून थोड्यावेळाने टीव्ही बंद करायला लावला. नंतर जेव्हा मी घरी सांगितले की यात सचिनचाही मुलगा आहे लिलावात तेव्हा आमच्या घरचा टीव्ही पुन्हा चालू झाला
"पर्सनली मात्र मला त्याचे
"पर्सनली मात्र मला त्याचे कौतुक वाटते. मिडीया हाईप करेनात पण पोरगा फार मेहनती आहे. खेळाडू म्हणून गुणी वाटतो." नि " त्याच्याकडून चमकदार कामगिरी घडावी यासाठी एक दोन सामन्यात सेटींगही ईथे सहज लावली जाऊ शकते" हे एकत्र लिहिण्याचा नतद्रष्ट पणा नि करंटेपणा फक्त तूच करू शकतोस .
हवामाननिर्मित परीस्थिती व मानवनिर्मित पीचचा दर्जा यात मुलभूत फरक आहे. माझ्या 14 फेब.च्या पोस्टमधे मीं हें सपष्ट केलंय - ' हवामानाचा परिणाम आहे व त्याला सामोरं जाणं हा क्रिकेटचाच अविभाज्य भाग आहे. ' >> मानवनिर्मित पिचवर पण हवामानाचा परीणाम होतो ना ? पहिल्या टेस्ट मधे २-३ दिवसांनंतर पिच ओपन होत गेले, दुसर्या टेस्ट्मधे कन्सीस्टंट होते. अश्विनच्या एका इनिंगने ह्या कसोटी मधल्या पिचबद्दलचया सगळ्या शंका कुशंका दूर केल्या आहेत. टॉस हरलो असतो तरी इथे फार फरक पडला असता असे वाटत नाही. Daemons were in English minds than in pitch.
असामी, आयपीएलमध्ये सर्रास
असामी, आयपीएलमध्ये सर्रास चालणारया सेटींगबद्दल लिहील्यास तुमच्या भावना दुखावतात हे माहीत आहे मला. त्यामुळे माफी मागतो आपली.
पण मला ते मांजरीसारखे डोळे मिटून दूध पिणे जमत नाही. जे आहे ते आहे. मी नेहमी माझी प्रामाणिक मतेच मांडतो.
माझी वरची पोस्ट मी एका फेसबूक ग्रूपवर सुद्धा टाकलेली. कोणालाही त्यात खटकण्यासारखे काही वाटले नाही. उलट तासाभरात २०-२५ जणांनी लाईकच केले. उद्या स्क्रीनशॉट टाकतो हवे तर.. शुभरात्री
प्रश्न बाबा, माझ्या भावना
प्रश्न बाबा, माझ्या भावना दुखवण्याचा नाही आहे त्यामूळे माझी माफी मागायची गरज नाही. तुझ्याकडे काडिचाही पुरावा नसताना कोणाच्या मोरॅलिटीवर निव्वळ "तुला इंटरनेट अॅक्सेस आहे नि सोशल मिडीयावर फुकट मेसेजेस टाकता येतात" ह्या अधिकारावर तू ह्या पिंका जेंव्हा तेंव्हा टाकतोस त्याबद्दल त्या संबंधितांची माफी माग, तुला खरच माफी मागायची इच्छा असेल तर.
अहो आयपीएलमध्ये फिक्सिंग होते
अहो आयपीएलमध्ये फिक्सिंग होते हे उघड आहे, लोकं पकडले गेलेत, शिक्षा झालीय त्यांना
आयपीएल सोडा ईंटरनॅशनलमध्येही फिक्सिंग होते हे आता उघड झालेय, लोकं पकडले गेलेत, शिक्षा झालीय त्यांना
या पार्श्वभूमीवर संशयास्पद आढळले की ते बोलून दाखवणारच
ज्या लोकांनी क्रिकेटप्रेमींच्या विश्वासाला तडा दिलाय त्यांच्याबद्दल पुराव्याशिवाय संशयही व्यक्त करायचा नाही हे अजब आहे.
त्यांनीच आत्मपरीक्षण करून आता क्रिकेटप्रेमींचा विश्वास कसा मिळवता येईल हे बघायला हवे.
*अश्विनच्या एका इनिंगने ह्या
*अश्विनच्या एका इनिंगने ह्या कसोटी मधल्या पिचबद्दलचया सगळ्या शंका कुशंका दूर केल्या आहेत.* - त्यामुळे अश्विनचं त्या पीचवरचं त्या दिवशींचं असामान्य कसब व एकाग्रता सिद्ध होतात, असं म्हणणं अधिक औचित्यपूर्ण. ! किंबहूना, अशा पीचवर शतक केलं, ह्याचंच मुख्य कौतुक आहे !! उलट,पीचबद्दलच्या कुशंका इतरांच्या खेळामुळे बळावल्याच
असाव्यात.
'कसोटी' ही कमी अधिक प्रमाणात सर्वच प्रकारचं कसब अजमावणारी असावी, फक्त एकाच प्रकारची गोलंदाजी व ती खेळण्याच॔ कसब याची परिक्षा नव्हे. म्हणून तर कसोटी सामने 5 दिवसांचे असतात. निदान माझी तरी अशी धारणा आहे व म्हणून एकतर्फी बनवलेल्या पीचेस मला खटकतात. मग त्या इथल्या असोत कीं बाहेरच्या.
२००
२००
कसोटी' ही कमी अधिक प्रमाणात
कसोटी' ही कमी अधिक प्रमाणात सर्वच प्रकारचं कसब अजमावणारी असावी, फक्त एकाच प्रकारची गोलंदाजी व ती खेळण्याच॔ कसब याची परिक्षा नव्हे
>>>>>
मग प्रत्येक कसोटीचा एकेक दिवस पाच वेगवेगळ्या देशांत जाऊन तिथल्या मातीत आणि वातावरणात खेळावा लागेल
*मग प्रत्येक कसोटीचा एकेक
*मग प्रत्येक कसोटीचा एकेक दिवस पाच वेगवेगळ्या देशांत जाऊन तिथल्या मातीत आणि वातावरणात खेळावा लागेल* -- त्यापेक्षा, पतयेक कसोटी ' ही फिरकीची', 'ही फास्ट व उसळी घेणारया गोलंदाजीची'; ' ही कडक थंडीतली'....असं नेमून देवून, तशा खेळपट्टया बनवणं , तसा संघ निवडणं हें अधिक सोईचं. शिवाय, कसोटी 3 दिवसांचीच ठेवावी . आणि, कसोटी क्रिकेट हेच खरः क्रिकेट म्हणत स्वत:ची पाठही थोपटत बसावं !!!
'कसोटी' ही कमी अधिक प्रमाणात
'कसोटी' ही कमी अधिक प्रमाणात सर्वच प्रकारचं कसब अजमावणारी असावी, फक्त एकाच प्रकारची गोलंदाजी व ती खेळण्याच॔ कसब याची परिक्षा नव्हे. म्हणून तर कसोटी सामने 5 दिवसांचे असतात. निदान माझी तरी अशी धारणा आहे व म्हणून एकतर्फी बनवलेल्या पीचेस मला खटकतात. मग त्या इथल्या असोत कीं बाहेरच्या. >> हिओ थोडी जास्त अपेक्षा आहे भाऊ. इंग्लंड मधे लीड्स किंवा सा. आफ्रीकेमधे डर्बनमधे जाडेजा-अश्विन च्या फिरकी ने धुमाकूळ घातला की ह्या वाक्याला अधिक वजन येईल. मला वाटते वेगवेगळ्या देशांमधे वेगवेगळ्या वातावरणात वेगवेगळ्या प्रकारच्या पिचवर वेगवेगळ्या हवामानात पाच दिवस सतत सेशन बाय सेशन उच्च दर्जाचे क्रिकेट खेळणे हे जास्त कसबपूर्ण ठरावे. मुख्य मुद्दा "दुसर्या कसोटिचे पिच खराब होते का ?" हा असेल तर त्याचे उत्तर अश्व्निअच्या खेळी नंतर नाही असे मान्य करायला काहीच प्रत्यवाय नसावा. सहा क्रमाकांचा खेळाडू जे करू शकला ते इंग्लिश टीम मधला कोणी करू शकले नाही, त्यांचे बॉलर्स कमी पडले ह्यात पिचपेक्षा मानसिक भाग मुख्य नाही का ? मोईन प्रत्येक ओव्हर मधे एक फुल्टॉस टाकत होता - त्यातला आश्चर्याचा भाग एकदा सोडला की त्या डावपेचाचा काय उपयोग होता नक्की ? बॅटींग मधे किती जण प्रीडीटरमाईन्ड स्वीप खेळताना बाद झाले ? अतिशय रिजिड रोटेशन पॉलिसी ? अँडरसन ला जबरदस्ती बाहेर ठेवणे ? ... असो
ज्या लोकांनी क्रिकेटप्रेमींच्या विश्वासाला तडा दिलाय त्यांच्याबद्दल पुराव्याशिवाय संशयही व्यक्त करायचा नाही हे अजब आहे. > >तू ईंजिनीयर आहेस असे म्हणतोस ना ? ह्या वरच्या वाक्यात किती लॉजीकल लोचा आहे ह्यावर एकदा विचार करून पाहा.
तू ईंजिनीयर आहेस असे म्हणतोस
तू ईंजिनीयर आहेस असे म्हणतोस ना ?
>>>>
मी आधी एक माणूस आहे.
मग क्रिकेटप्रेमी
ईंजिनीअरसुद्धा आहे तसा.. पण त्याचा नंबर फार उशीरा आहे
असो
सचिनचा मुलगा नाहक ट्रोल होतोय सोमिवर
त्याच्या बचावाला महेला आणि खुद्द अंबानी आले आहेत.
पण मला ईण्टरेस्ट आहे ते स्मिथ आणि पंतला एका संघात खेळताना बघण्यात
त्या आधी पंतने उर्वरीत कसोटी मालिका गाजवून आयसीसी क्सोटी मानांकनात पहिल्या दहात झेप घ्यावी.
तसेच येता २०-२० विश्वचषक पाहता भारतीय २०-२० संघातही जागा पक्की करावी.
पण सगळ्यात पहिले पिंक बॉल टेस्ट जिंकणे गरजेचे आहे. ती जिंकलो तर कसोटी चॅम्पियनशिपमधील आपले स्थान जवळपास पक्केच.
मग लास्ट अगदी पाटा बनवत पाच दिवस आपणच खेळत बसायचे
अर्जुनला मुंबईने घेतले तेव्हा
अर्जुनला मुंबईने घेतले तेव्हा बाकीचे सगळे फ्राचाईझीं चेष्टेत हसत होते यातच सगळं काही आलं.
भारताकडून डोड्डा गणेश, सुजिथ
भारताकडून डोड्डा गणेश, सुजिथ सोमसुंदर, नोएल डेविड, डेविड जॉन्सन, गगन खोडा , आशिष कपूर वगैरे आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामुळे अर्जुन तेंडुलकर एखादा सामना भारताकडून सुध्दा खेळला तर काही हरकत नाही, IPL मध्ये तर त्याहून नाही
सचिनचा मुलगा नाहक ट्रोल होतोय
सचिनचा मुलगा नाहक ट्रोल होतोय सोमिवर >> ह्या ट्रोलमधे तूही एक आहेस ह्याची तुला कल्पना आहे का ? एक माणूस म्हणून, एक क्रिकेटप्रेमी म्हणून सुद्धा तुला हे शोभते का हा प्रश्न तू स्वतःलाच विचार.
पण मला ईण्टरेस्ट आहे ते स्मिथ आणि पंतला एका संघात खेळताना बघण्यात >> गेल्य वर्षी दिल्लीला चार ओव्हरसीज प्लेयर्स ठेवायला जी कसरत करायला लागत होती ती बघून स्मिथ आल्यावर अजून मजा येणार आहे.
*त्यांचे बॉलर्स कमी पडले
*त्यांचे बॉलर्स कमी पडले ह्यात पिचपेक्षा मानसिक भाग मुख्य नाही का ? * अहो, आणखी किती वेळा सांगू कीं आपली फलंदाजी व गोलंदाजी गेल्या सामन्यातलया पीचवर निर्विवाद इंग्रजांपेक्षा सरस होती, हें ! पण त्यावरून व आश्विनच्या असामान्य खेळीवरून तें पीच टेस्टसाठी आदर्श ठरतं का, हा खरा मुद्दा आहे, मीं जें पाहिलं त्यावरून मला खात्रीपूर्वक तसं नाहीं म्हणता येत.
*लीड्स किंवा सा. आफ्रीकेमधे डर्बनमधे जाडेजा-अश्विन च्या फिरकी ने धुमाकूळ घातला की ह्या वाक्याला अधिक वजन येईल. * - प्रत्येक देश एकमेकांची उदाहरणं देत आपल्या सोईची टोंकाची पीचेस बनवतात हें टेस्ट क्रिकेटसाठी घातक आहे, हेंच तर मी कळवळून साःगतोय. हवामान व पीचेसचा स्वाभाविक कल याचा फायदा यजमान संघाला मिळणं व त्यावर पाहुण्या संघाने मात करणं, हा तर टेस्ट क्रिकेटचा अविभाज्य भाग आहे, हेही मी अधोरेखित केलंय. हें सर्व मुद्दाम दुर्लक्षून माझी टर उडवणारी पोस्ट टाकणं दु:खद आहे.असो.
सर्वप्रथम भाऊ, तुमची कुठेही
सर्वप्रथम भाऊ, तुमची कुठेही टर उडवलेली नाहिये. तुम्हाला तसे वाटले असेल तर मनापासून सॉरी.
"प्रत्येक देश एकमेकांची उदाहरणं देत आपल्या सोईची टोंकाची पीचेस बनवतात हें टेस्ट क्रिकेटसाठी घातक आहे, हेंच तर मी कळवळून साःगतोय. हवामान व पीचेसचा स्वाभाविक कल याचा फायदा यजमान संघाला मिळणं व त्यावर पाहुण्या संघाने मात करणं, हा तर टेस्ट क्रिकेटचा अविभाज्य भाग आहे" >> गेले शंभर वर्षे हे करूनही टेस्ट क्रिकेट हे जिवंत आहे त्यामूळे घातकपणाचा मुद्दा खरच कळला नाही.
पण त्यावरून व आश्विनच्या असामान्य खेळीवरून तें पीच टेस्टसाठी आदर्श ठरतं का, हा खरा मुद्दा आहे, मीं जें पाहिलं त्यावरून मला खात्रीपूर्वक तसं नाहीं म्हणता येत. >> मला वाटते तुमची आदर्श पीच ची व्याख्या फारच आदर्श असावी. भारतीय इंग्लंडपेक्षा चांगले खेळले, इंग्लंड बर्याच गोश्टींमधे कमी पडले हे मान्य असेल तर पिचचा मुद्दा येतोच कुठे ह्यात हे लक्षात येत नाही. नक्की हे पिच फास्ट बॉलर्स ला उपयुक्त नव्हते नि स्पिनर्स धार्जिणे होते हे मान्य पण त्याचा अर्थ रामभरोसे पिच होते असेही नाही. पहिल्या दिवसापासून् बॉल नीट स्पिन होत होता. पिच सगळे दिवस कंसीस्टंट होते. 'पिच चांगले होते का ? ' ह्याचे उत्तर तुम्हीही हो असे द्याल असे वाटते. त्यामूळे " तें पीच टेस्टसाठी आदर्श ठरतं का" हा प्रश्न अचंबित करून टाकणारा आहे.
प्रेम पन्निकर च्या लेखातली पिचबद्दलची काही वाक्ये
Post-Script: Given all the noise surrounding the pitch, a couple of points: This game has already lasted way more than the one between Australia and India at Adelaide. Where, on day two, one team lost four wickets, then the other team got bowled out, then the first team lost a wicket before close -- 15 in the day, exactly the same as day two here in Chennai.
And then there is Brisbane. Where Tim Paine, on winning the toss and opting to bat, said :
" Very good toss to win. Looks a fair bit harder than it normally does and there's a crack down the middle."
You rate pitches on the potential for danger -- not on the basis of whether a particular team has the requisite skill set. And surely a crack running the length of the pitch is surely more fraught than dust off the surface?
Just to underline the point, Labuschagne at the end of the first day's play said "The crack is widening already".
Remember anyone having a word to say then?
*तुमची कुठेही टर उडवलेली
*तुमची कुठेही टर उडवलेली नाहिये.* - तुमच्या पोस्टबददल कधीच असं वाटणं शकय नाहीं.
हल्लीच टेस्ट क्रिकेट परत लोकप्रिय होतंय पण मध्यंतरी कल उलटा होत चालला होता असं जाणवायचं.
माझ्या टेस्ट क्रिकेटबद्दलच्या अपेक्षा जरा वेगळ्या असाव्यात असंही जाणवतं. त्या माझ्यापुरत्याच रहाव्या हे उत्तम.
Pages