Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05
क्रिकेटवरील पहिले पाच धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
https://www.maayboli.com/node/67443
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आजच्या पहिल्या दोनही विकेटसचं
आजच्या पहिल्या दोनही विकेटसचं पूर्ण श्रेय अक्षरच्या गोलंदाजीलाच ! इंग्रज आज निदान क्रिज सोडून पुढे येवून फिरकी गोलंदाजांची लय बिघडवण्याचा प्रयत्न तरी करताहेत,
सिराज ने रूट ला मस्तच सेट अप
सिराज ने रूट ला मस्तच सेट अप केला. एका नवख्या गोलंदाजानं रूटसारख्या कसलेल्या, अनुभवी फलंदाजाला असं सापळा रचून आऊट करणं फारच कौतुकास्पद होतं.
स्टोक्स आणि बेअरस्टॉ चांगले खेळताहेत. ही जोडी भारतासाठी धोकादायक ठरू शकते.
बेअरस्टॉला काढले सिराजने
बेअरस्टॉला काढले सिराजने पायचित....
* रूट....फलंदाजाला असं सापळा
* रूट....फलंदाजाला असं सापळा रचून आऊट करणं फारच कौतुकास्पद होतं.* - आगदीं खरं ! सिराज अप्रतिम!
इंग्लंड 200 पार करून सर्वबाद
इंग्लंड 200 पार करून सर्वबाद ! आपली फिरकी अभिमानास्पद !! पीच अजून तरी बरं वाटतःय.
चेंडू स्विंग पण होतोय, विशेषत: सकाळी. बघूं इंग्लीश तेज गोलंदाज किती फायदा उठवतात याचा.
शुभमन तर परतला भोपळा घेऊन..
शुभमन तर परतला भोपळा घेऊन..
कमीतकमी उद्या दिवसभर खेळण आणि
कमीतकमी उद्या दिवसभर खेळण आणि १०० च अधिक्य आवश्यक. खेळू आपण. कर्णधाराला सुसंधी.
आजच्या पहिल्या दोनही विकेटसचं
आजच्या पहिल्या दोनही विकेटसचं पूर्ण श्रेय अक्षरच्या गोलंदाजीलाच + . एका नवख्या गोलंदाजानं रूटसारख्या कसलेल्या, अनुभवी फलंदाजाला असं सापळा रचून आऊट करणं फारच कौतुकास्पद होतं. >>+१ . दुर्दैवाने उमेश ऐवजी सिराज ला घेण्यावर बोटं ठेवली गेली आहेत. पण सिराज ने तो निर्णय योग्य होता हे दाखवलय. कमीत कमी आत्ता तरी भारतीय बॉलर्स नी मिळेल ते पिच अधिक परफेक्ट पणे वापरले आहे ह्याचे निर्विवाद श्रेय त्यांना दिले जाईल अशी आशा धरूया.
मायकेल वॉन ज्याने तिसर्या सामन्याच्या पिचबद्दल बोंब मारली होती त्याचे आजचे वक्त्यव्य " पर्फेक्ट पिच आहे. ह्या पिचवर आज बॉल टर्न झाला नाही. इंग्लंड ने अॅडवांटेज फुकट घालवला, पथेटीक बॅटींग" थोडक्यात काय तर बॉल स्पिन झाला नाही की ते परफेक्ट पिच. टर्न नंतरच्या दिवसांमधे कसिस्टंटली होत राहातो का ? बॅटस्मन ना स्पिन खेळता येतो का ? अशा गोष्टी नगण्य धराव्यात अशी अपेक्षा दिसतेय त्याची.
पोलार्ड सुटलाच काल. धनंजया ने
पोलार्ड सुटलाच काल. धनंजया ने शेवटचे दोन बॉल अगदीच नवख्या बॉलर्स सारखे टाकले. कमीत कमी एकटे नसून ब्रॉड सारख्या चांगल्या गोलंदाजाच्या पंक्तीमधे आहोत एव्हढाच रिलीफ बिचार्यासाठी.
कोहली भोपळा!
कोहली भोपळा!
गांजा ओढला म्हणून बापाने
गांजा ओढला म्हणून बापाने पोराच्या कानफटात मारली तर पोराने आपण गांजा ओढलाच नव्हता याची बापाची खात्री पटशावी किंवा परत ओढणार नाही म्हणावं. रोज येवून गांवात आणखी कोणाच्या पोराने गांजा ओढला, हें बापाला सांगून काय गांजा आरोग्यदायक ठरतो का
>>
म्हणजे कुठल्याही होम टीमनी स्वत: ला फेवरेबल पिच बनवायचं नाही का?
मग होम - अवे यानी काय फरक पडतो (टेस्ट चँपियनशिपच्या ओरिजिनल नियमांनुसारही प्रत्येक संघाला ३ होम अन ३ अवे सिरीज खेळायच्याहोत्या), म्हणजे कुठेतरी आयसीसी ही या गोष्टी धरून चालतंय ना)
जर इंग्लंडमधे हिरवं पिच अन भारतात आखाडा पिच असणं हा गुन्हा वाटत असेल तर मग एकाच प्रकारचं पिच जगभरात कुठेही गेलं तरी असावं असं मागणं आहे का? यानी खेळाची क्वालिटी ढासळते असं वाटत नाही का? की फक्त गोर्यांना आखाडा पिचेस वर स्पिन समोर खेळता नाही आलं की पिच वाईट? अन जबरदस्त हिरव्या पिचवर एशियन टीम्सनी गाशा गुंडाळला की ती गोर्यांची जबरदस्त बोलिंग अॅबिलिटी?
मी आधीही हे म्हणालो आहे, अन परत म्हणेन, की जोपर्यंत केवळ टॉसच्या जोरावर हारजीत ठरत नाही (चेन्नैचं पहिलं पिच, बोम्बाबोम्ब करायची तर त्याच्यावर करा), अन पिच दोन्ही टीम्सना समान संधी देतं, तो पर्यंत पिचबद्द भोकाड पसरण्यापेक्षा टीम सिलेक्शन - काँपोजिशन, भलत्या रोटेशन पॉलिसीज वगैरेंवर विचार करावा.
भारतीय फलंदाजही काही फारसा
भारतीय फलंदाजही काही फारसा उजेड पाडत नाहीत सध्या... किमान ६०-७० धावांची आघाडी हवी तर अजुनी ६० धावांची पिछाडी कितपत लीड कमी करु शकतात पहायला हवे आता...
६ बाद झाले!
अशक्य पॅरलल चालली आहे मॅच
अशक्य पॅरलल चालली आहे मॅच
इंग्लंड : १०/१, १५/२, ३०/३, ७८/४, १२१/५, १६६/६
भारत : ०/१, ४०/२, ४१/३, ८०/४, १२१/५, १४६/६
फॉर्म, पिच काहीही असूदेत,
फॉर्म, पिच काहीही असूदेत, क्लास इज पर्मनंट हे जेम्स अँडरसनचा आजचा स्पेल बघताना जाणवलं.
After long time!!
रोहित सोडून बाकीचे जसे या
रोहित सोडून बाकीचे जसे या सिरीज मध्ये खेळत आहेत तसा च रोहित खेळला असता तर आतापर्यंत त्याला घरीच बसवला असता इथे पण तो सोडून बाकीचे आहेत तर फक्त पिच वर चर्चा
आणि परत एकदा दोन्ही संघांमधला
आणि परत एकदा दोन्ही संघांमधला मुख्य फरक ठरतोय...
ॠषभ राजेन्द्र पंत
जिमीला नविन बॉलवर रिव्हर्स
जिमीला नविन बॉलवर रिव्हर्स स्वीप. पंत बुवा काहिही करू शकतात.
गावस्कर म्हणतायत ९३ वर आहेस. शांत रहा. कसोटी शतके दररोज होत नाहीत.
पंतने गावस्करचे न ऐकता मुळेला
पंतने गावस्करचे न ऐकता मुळेला षटकार खेचून १०० पुर्ण केले!
त्यासह ५० च्या वर धावांची आघाडी आता पुढील प्रत्येक धाव इंग्रजांसाठी धोक्याची...
१००. गावस्कर खुष.
१००. गावस्कर खुष.
यडा आहे, पंत.
पंत ची धाव शंभर पर्यंत..
पंत ची धाव शंभर पर्यंत..
वॉशिंग्टनचे पण सुंदर अर्धशतक
वॉशिंग्टनचे पण सुंदर अर्धशतक आता त्यानेही शतकात रुपांतरीत करावे!
नवीन बॉल घेताच अॅडरसन येताच
नवीन बॉल घेताच अॅडरसन येताच पहिल्या बॉलला पुढे सरसावत समोर फोर... हा विचारच अंगावर शहारा आणतो पंतने पोहोचवून दाखवले.. आणि मग अजून एक.. मग रिव्हर्स स्वीप.. नंतर स्टोक्सलाही येडे केलेले.. सिक्स मारून बघता बघता अर्धशतकाचे शतक केले.. पण या खेळपट्टीवर अॅडरसनला असा स्वॅग दाखवणे.. चुम्मा प्लेअर आहे पंत

ईम्ग्लिश गोलंदाजांचे मानसिक
ईम्ग्लिश गोलंदाजांचे मानसिक खच्चीकरण केले आहे पंतने.. आता सुंदर अक्षरने शांतचित्ताने त्याचा फायदा उचलत लीड पुढे न्यायला हवा. आणि सुंदरकडे ते टेंपरामेंट आहेच.
दिवस अखेर ८९ धावांची
दिवस अखेर ८९ धावांची इन्ग्रजांच्या मनात भिती निर्माण करु शकणारी आघाडी.. अजुन ३ बळी बाकी.
रोहित, पंत, सुन्दर यांची फलंदाजी उत्तम!
*म्हणजे कुठल्याही होम टीमनी
ही टेस्ट क्रिकेटरसची नवीन पिढी अफलातून आहे ! सलाम व शुभेच्छा !!
*म्हणजे कुठल्याही होम टीमनी स्वत: ला फेवरेबल पिच बनवायचं नाही का?* - असं कुणीच म्हणत नाहीं, मीं तर नाहींच नाही. टेस्टच्या लायकीच म्हणता येणार नाहीं, इतकं टोकाचं पीच बनवूं नये इतकंच. पण 'या 'लायकी'ला निश्चित असे निकष नसल्याने, गेल्या कसोटीच्या पीच बद्दल कीतीही चर्चा झाली तरी मतभेद मिटणार नाहीत. ( आपण म्हणतां तो टाॅसचा निकषही तोकडाच पडतो ) म्हणून प्रत्येकाने ''त्या ' पीचबददल आपलं प्रामाणिक मत बनवावं व इतरांच्या प्रामाणिक मताचा आदर करावा. ' ते करतात, आपण कां नको', ' अमुक तमुक काय म्हणतो ', अमुक सालीं किंवा हल्ली इथे/तिथे असंच झालं होतं' इ.इ. हें गेल्या मॅचच्या पीच बद्दलच्या प्रश्नाला बगल देणं आहे, असं मला वाटतं.
अर्थात, ' पीच कसंही असेना, दोघांनाही समान संधी मिळते ना ', हें आझाद मैदानावरच्या मॅचेससाठीही लागू करणं अनुचित, टेस्ट क्रिकेटला तर नाहीच नाही, यावर मीं ठाम आहे.
कमीतकमी उद्या दिवसभर खेळण आणि
कमीतकमी उद्या दिवसभर खेळण आणि १०० च अधिक्य आवश्यक. खेळू आपण. कर्णधाराला सुसंधी.>> माझ्या भाकिताप्रमाणे टीम खेळली. कर्णधार नाही. काही हरकत नाही. दुसर्या डावात उपयोगाला येइल, वेळ पडल्यास.
पण मला बीसीसीआयची एक गोष्ट
पण मला बीसीसीआयची एक गोष्ट अजिबात आवडली नाही. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम सामन्यात जाण्यासाठी म्हणून तुम्ही सामन्याच्या ठिकाणाच तपमान ३८ सें. पर्यंत वाढवता. हा अगदीच अखिलाडूपणा आहे. दमले ना बिचारे पाहुणे.
* ... स्पर्धेत अंतिम
* ... स्पर्धेत अंतिम सामन्यात जाण्यासाठी म्हणून तुम्ही सामन्याच्या ठिकाणाच तपमान ३८ सें. पर्यंत वाढवता.. . * - खरः तर मंगळावरच खेळवायचा होता बीसीसीआयला तो सामना. पण पीच क्युरेटर स्वस्तात तसंच पीच करून देईल म्हणून त्यालाच दिलं कंत्राट !
सामन्याच्या ठिकाणाच तपमान ३८
सामन्याच्या ठिकाणाच तपमान ३८ सें. पर्यंत वाढवता. हा अगदीच अखिलाडूपणा आहे. दमले ना बिचारे पाहुणे >>
पोलार्ड ने भारी मारले तिकडे. बॉलरचा हॅटट्रीक घेण्याचा आनंद फार काय टिकू शकला नाही. त्याचा चेहरा काय केविलवाणा झाला होता. आता काय करू आणि याचे सिक्स थांबवू
सामन्याच्या ठिकाणाच तपमान ३८
सामन्याच्या ठिकाणाच तपमान ३८ सें. पर्यंत वाढवता. हा अगदीच अखिलाडूपणा आहे. दमले ना बिचारे पाहुणे >>
पण 'या 'लायकी'ला निश्चित असे निकष नसल्याने, गेल्या कसोटीच्या पीच बद्दल कीतीही चर्चा झाली तरी मतभेद मिटणार नाहीत. >> भाऊ, निश्चित असे निकष नाहीत म्हटल्यावर पिचबद्दल चर्चा करणेच फिजूल आहे . सर्वच पिचेस आदर्श म्हणायाची
पंतचा रिवर्स स्वीप बघून कधीही न हसलेल्या अॅण्डरसनच्या चेहर्यावर उपहासाचे का होईना हास्य जसे उमटले . टोटल वेडा आहे पंत. तो जसा खेळतो तसेच खेळत राहावे त्याने. उगाचच गावस्कर, नि तेंडुलकर नि धोनी बनायची गरज त्याला नाही.
Pages