क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

जिंकल्यावर दणादण पोष्टी येतात इथे हरल्यावर एकही पोस्ट नाही. जे हरल्यावर पण संघाचं कौतुक करतात तेच खरे फॅन्स असतात.

पुढचा सामनाही याच चेन्नई च्या मैदानात आहे. तोच क्यूरेटर, तशीच खेळपट्टी असं होऊ शकतं.
टॉस जिंकणं फार जास्ती महत्वाचं आहे (निदान अहमदाबादला ही परिस्थिती नसावी)

मयांक - गिल
पुजारा - कोहली - रहाणे (३ सामन्यांपूर्वी केलेल्या शतकामुळे मी तरी त्याला ही सिरीज देईन, पण जर या सिरीजच्या बाकी टेस्ट्समधे भरीव कामगिरी नसेल तर पुढचं सांगता येत नाही).
पंत
सुंदर - अश्विन - कुलदीप
बुमरा - सिराज

भुवनेश्वर कुमारला काय झालंय?
जानेवारी २०१८ नंतर तो एकही टेस्ट खेळला नाहिये

पहिल्या डावात फलंदाजी करणे तुलनेने सोपे होते, त्यामुळे आपण पहिला डाव लांबवणे योग्य ठरले असते.
पण त्यासाठी,
"कसोटीचा" अर्थ नव्या फलंदाजांना कळायला हवा.

सुनील गवस्कर
अजित आगरकर
मार्क बुचर
मुरली कार्तिक
निक Night
दीप दासगुप्ता
Shivaramakrishnan
ही अतिशय रद्दी कॉम्मेंटरी टीम आहे. हर्षा, मांजरेकर, नसीर हुसेन हवे होते. फार कमी खर्च केला आहे टीम वर. गावस्कर नी आता निवृत्त व्हायला हवे समालोचक म्हणून. काहीहि नवीन सांगत नाहीत

आपण टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी केली असती, तर उलटी परिस्थिती पहायला मिळण्याचीही दाट शक्यता होती ! >> +१. अँडरसन नसता तर आपण कदाचित अनिर्णितही राखू शकलो असतो. त्याच्या पहिल्या दोन विकेट्स नि सग्ळी हवाच काढली. काय स्विंग होता तो. गम्मत म्हणजे सामन्याच्या आधी २५ ओव्हर्स नंतर बॉल रिव्हर्स होईल असे तो म्हणाला होता, २८ का २९ व्या ओव्हरला तो आला नि बॉल रिव्हर्स करून गिल नि राहाणेला उडवून गेला.

एक स्टेडी ओपनर नसणे नि पाचव्या क्रमांकावर काहीच सपोर्ट नसणे हा मोठा प्रॉब्लेम आहे, किमान कोहली परत फॉर्म मधे येइतो. रोहित नि राहाणे ह्यापैकी नक्कीच एक जाण पुढच्या टेस्ट मधे नसावा. नदीम ची जागा कुलदीप घेईल. बुम्रा नि शर्मा ला हात लावायला नको.

IND VS ENG: ऋषभ पंत की वजह से इंग्लैंड ने घोषित नहीं की पारी, जो रूट ने कहा-वो एक सेशन में खेल बदल देता
India vs England: इंग्लैंड की टीम ने 400 से ज्यादा रनों की बढ़त होने के बावजूद पारी घोषित नहीं की जिसके बाद उसकी इस रणनीति की आलोचना हुई. अब चेन्नई टेस्ट जीतने के बाद जो रूट (Joe Root) ने इसकी वजह ऋषभ पंत (Rishabh Pant) को बताया.

सुनील गवस्कर डाऊन अंडर मधे शर्मा चे गोडवे गात होता >>>> सुरुवातीला गायले गोडवे (सामना खेळायच्या आधी) पण नंतर जोरदार शिव्या घातल्या ना तो बेजबाबदार फटका मारल्यानंतर...

*इंग्लंड जिंकळ्यासाठी खेळण्यापेक्षा हरू नये असे खेळत होते असे तुम्हाला वाटले का* - नि:संशय. 'गाब्बा'मुळे झालंय तसं !!* -
डाव घोषित न करण्याचं समर्थन म्हणे रूटने दिलंय - रिषभ पंत !

सुरुवातीला गायले गोडवे (सामना खेळायच्या आधी) पण नंतर जोरदार शिव्या घातल्या ना तो बेजबाबदार फटका मारल्यानंतर... >> हो पण ते आपण पण करतो, हे करायला गावस्कर कशाला हवा रे ? एक ओपनर नि एक स्मार्ट क्रिकेटर म्हणून काही तरी अधिक अपेक्षित होते त्याच्याकडून.

डाव घोषित करायला केलेल्या उशीराचं समर्थन म्हणे रूटने दिलंय - रिषभ पंत ! >> ते लक्षात आलेले फक्त पहिल्या डावत समजू शकत होतो पण दुसर्‍या डावात पण केले म्हणून आश्चर्य वाटले.

*... हे करायला गावस्कर कशाला हवा रे ? >* -
मीं ठराविक साबण लावून रोज आंघोळ करतो, मग हेंच करायला टीव्ही वर टाॅवेल अर्धवट पांघरलेल्या सुंदरीच कशाला हव्या? लोकांना तेंच हवं असतं म्हणून व फक्त तेंच खरं वाटतं म्हणून !! Wink

बकवास कॉमेंट्री टीम असण्यापेक्षा भयानक गोष्ट ही आहे की कॉमेंटेटर्सना भारताच्या चुकांबद्दल कठोर बोलण्यास आणि खूप खोलात जाऊन त्याचं विश्लेषण करण्यास मनाई.
हर्षा भोगले वर अमिताभ बच्चनचं ट्वीट अन धोनीची तक्रार प्रमाण मानून बंदी घालणं, नंतर माफीनामा घेऊन बंदी उठवणं, काहीसं असंच (पनवती) मांजर्‍यासोबत करणं, हे फार वाईट आहे. आणि हा ट्रेण्ड आता सेट झाला आहे हे त्याहून दुर्दैव.

(मांजर्‍याला लाईफटाईम बंदी घातली पाहिजे, पण ती टीका केली म्हणून नको)

*भारताच्या चुकांबद्दल कठोर बोलण्यास आणि खूप खोलात जाऊन त्याचं विश्लेषण करण्यास मनाई.* +1.
मलां एक खूप पूर्वीचां, रेडिओ जमान्यातला, किस्सा वाचल्याचं आठवतं -
एक इंग्लीश नामवंत काॅमेंटेटर दिवसाचा खेळ संपल्यावर थोडक्यात खेळाचा नेमका विश्लेषणात्मक आढावा घेत असे व तो ऐकायला सर्व खूपच उत्सुक असत. एका दिवशींचा खेळ इंग्लंडने रटाळ व कल्पकताशून्य केला. या महाशयांनी आढावा घेताना फक्त दिवसाच्या सुरवातीचा व शेवटचा स्कोअर वाचला व ' थॅकयू ! ' म्हणून माईक बंद केला ! आपलया देशाच्या संघाच्या खेळाचंही असं निषठूर विश्लेषण व त्याचा असा तीव्र निषेध करता आला तरच तें खरं !!

हल्लीच्या comentaors मध्ये इयान chappel, नासेर हुसेन, होल्डींग, Shane वॉर्न, Artherton, मांजरेकर, हर्षा भोगले, मार्क निकोलस, संगकारा यांची कॉम्मेंटरी आणि विश्लेषण मला आवडते

जॅकीजींच्या आवडत्या काॅमेंटेटरसमधे मी व्ही व्ही एसचंही नांव घालीन.
*माझ्या मते गावस्करांईतक कुणिही खोलात जाउन समर्पक विश्लेषण करत नाही.* - खेळातले/ तंत्रातले बारकावे तो नेमके टिपतो हे 100% खरः असलं, तरीही हल्ली मात्र त्याच्या काॅमेंटस कांहींशा कॅज्युअल वाटतात. कदाचित, मींच या निरिक्षणात चुकत असेनही.

*माझ्या मते गावस्करांईतक कुणिही खोलात जाउन समर्पक विश्लेषण करत नाही.* - खेळातले/ तंत्रातले बारकावे तो नेमके टिपतो हे 100% खरः असलं, >> हे सगळे भूतकाळातले आहे. सध्या तो पाट्या टाकतो बरेचदा असे वाटत राहते वाचताना.

*भारताच्या चुकांबद्दल कठोर बोलण्यास आणि खूप खोलात जाऊन त्याचं विश्लेषण करण्यास मनाई.* +1> +१००

"भारताच्या चुकांबद्दल कठोर बोलण्यास आणि खूप खोलात जाऊन त्याचं विश्लेषण करण्यास मनाई." - मला वाटतं संघनिवडीबद्दलही काही बोलायला परवानगी नाहीये.

"हे सगळे भूतकाळातले आहे. सध्या तो पाट्या टाकतो बरेचदा असे वाटत राहते वाचताना." - थोडासा सहकार्यांचाही परिणाम होत असावा असं वाटतं. मुरली कार्तिक वगैरे लोकं ते सारखं 'सनीभाई, सनीभाई' करत त्याच्या गौरवशाली भूतकाळातल्या आठवणीत त्याला घेऊन जातात त्यामुळे सुद्धा डिस्ट्रॅक्शन होत असावं.

इथे सगळ्यांना कितीही वाटले की रोहित आणि राहणे ला वगळावे, पण विराट च्या बोलण्यावरून तसे वाटत नाही. मला असे वाटते की केवळ एक बदल करतील नदीम च्या जागी राहुल चहर किंवा अक्षर पटेल ला घेतील. कुलदीप ला घेणार नाही असे वाटते

इथे सगळ्यांना कितीही वाटले की रोहित आणि राहणे ला वगळावे, पण विराट च्या बोलण्यावरून तसे वाटत नाही.
>>>>>>>

विराटचे बोलणेही ऐकायची गरज नाही. त्याचे विचार तसेही ठाऊक आहे. शर्मा आणि रहाणेला असे पहिल्या सामन्यानंतरच काढणे म्हणजे भारत एक सामना हरला आणि सैरभैर झाला, मुळापासून हादरला असा ठपका तो आपल्यावर येऊ देणार नाही.

कुलदीप ला घेणार नाही असे वाटते
>>>>>>

त्या सिराजने कुलदीपची कॉलर पकडली तो विडिओ पाहिला का कोणी?
त्यावर काही स्पष्टीकरण आलेय का?
गंमतीतले वाटत नव्हते ते.. कुलदीपची गळचेपी होतेय का संघात? तसे काही असेल तर भयंकर आहे हे.. Sad

आपली बॅटिंग साइड अजिबात बदलणार नाहीत. माझ्या मते कुलदीपला संधी दिली पाहिजे.
अक्षर एकदम मोठा स्पिनर कसा झाला ते समजले नाही.

व्युहरचना अणि खेळ चालू असतानाचे आकलन याबद्दल मुरली कार्तीक किंवा दीप दासगुप्ता यांना कितपत कळते याबद्दल मला शंका आहेच.
संघावर टीका करणे हेच फक्त काम करायचे असएल तर पनवतीला ६ तास समालोचन करायला लावणे हा उत्तम उपाय आहे.

चॅपेल, होल्डिंग, नासीर उत्तम आहेतच. पण ऑस्ट्रेलियन बर्‍याच वेळेस बायस्ड असतात.

विश्वसनीय सूत्रांकडून असे कळतेय की भारत एकच बदल करणार आहे. नदीम च्या जागी अक्षर पटेल. उद्या बघू खरे काय ते

चहर हा पण एक पर्याय आहे अस म्हणतात. ( for Ball leaving right handed batsman will bring more variation.)
माझ्या मते सुंदरला ड्रॉप करावे व ५ खरे गोलंदाज खेळवावेत. बुमरा, इशांत, अश्विन यांच्या बरोबर कुलदीप,चहर आणि अक्षर यापैकी दोन.
आखाडा असेल तर अश्विन, कुलदीप सद्धा पुरतील.

आखाडा असेल तर >> आखाडाच असेल असे वाचले. पहिल्या दिवसापासून टर्न वगैरे - भाऊंचे फेव्हरीट 'पिच' Happy

त्यामूळे दोन्ही प्रकारचे दोन- दोन बॉलर्स पुरे असे वाटते. सातवा अक्षर पेक्षा साहा ला घेऊन किपिंग चा प्रॉब्लेम सुधारता येईल. आखाड्या वर पंत वर प्रेशर नको. आकाडा असेल तर राहाणे चा परत कस लागणार.

Pages