क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

जॅकीजी, वरच्या पोस्टशी 100% सहमत. इतके नोबाॅल ( तेही स्पीनरसकडून) व शेपूट बॅटींगबददल इतकं उदासीन, हें अक्षम्यच !

शेपूट बॅटींगबददल इतकं उदासीन, हें अक्षम्यच !>> अगदी!!!

एक बाजु २-४ चेन्डू खेळत राहिले असते तर, सुन्दर ने अजुन बर्‍यापैकी धावा जमविल्या असत्या. त्यचे १०० देखिल झाले असते. शेवटच्या तिघांनी त्याला त्याच्या २० धावा जमविण्या इतकी देखिल साथ दिली नाही.

भाऊ, मी अँकी आहे हो...
जॅकी (श्रॉफ) नाही, आणि 'जी' तर बिल्कुल नाही

रच्याकने,
चहापानाला ११९/५, ३६० चा लीड (१२० ओव्हर्स शिल्लक)

मला वाटतं की अजून ४०-५० रन्स करून साधारण १०० ओव्हर्समधे ४०० चं टार्गेट देतील.

शहाबाज नदीमचा काहीच उपयोग झाला नाही. कसोटी दर्जाची ना गोलंदाजी ना फलंदाजी. निव्वळ कुलदीपला कुजवायचे म्हणून आत आहे असे वाटते.

तसेच जर रोहित या डावात धावांचा पाठलाग करताना 50 च्या आत खराब फटका मारून बाद झाला तर त्याने चेन्नई एक्सप्रेस ने मुंबईला परत पाठवावे.

*..आणि 'जी' तर बिल्कुल नाही.* - चांगल्या चेंडूना बॅकफूटवरच जाण्याची संवयच आहे मला !! Wink
*दुसर्‍या डावात सुंदरला का गोलंदाजी नाही देत कर्णधार?* - बहुतेक, लेग स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करून धांवांच्या गतीला खीळ घालायला नदीम उपयुक्त होता म्हणून असावं.

*अपेक्षेप्रमाणे रोहित येऊन गेलासुद्धा. * - कुणाची तरफदारी केल्याचा आयुष्यातला कमाल पश्चात्ताप मला रोहित शर्माने दिलाय ! ( पण तरीही त्याची फलंदाजी बघायला मीं आसुसलेला आहेच !)
आपल्या पोरांना शुभेच्छा ! जिगरी खेळा !!

" ज्यात फक्त १ नो बॉल होता." - इंग्लंड च्या बॉलिंग चा तो एक महत्वाचा घटक आहे गेली अनेक वर्षं. मला वाटतं फ्लेचर किंवा फ्लॉवर च्या काळात त्यांनी ती एक स्ट्रॅटेजी म्हणून स्विकारली होती. क्वचित नो-बॉल टाकतात इंग्लिश बॉलर्स.

सुंदर मस्त खेळला. ह्या मुलाला टेस्ट आणी वन-डे मधे कन्सिस्टंटली जागा मिळावी असं वाटलं गेल्या दोन मॅचेस मधे. सद्ध्या तरी पारडं इंग्रजांच्या दिशेनं झुकलंय. पण क्रिकेटच्या अनिश्चिततेवर आणी आपल्या टीमवर विश्वास ठेवून शेवटचा दिवस बघायचा आहे.

"अपेक्षेप्रमाणे रोहित येऊन गेलासुद्धा." - तो कुणाच्या तरी अपेक्षा पूर्ण करतोय हे महत्वाचं Happy

"पण तरीही त्याची फलंदाजी बघायला मीं आसुसलेला आहेच" - व्हाईट बॉल क्रिकेट चा तो दादा फलंदाज आहे. test cricket is just not his cup of tea.

नदीमने साफच निराशा केली ह्या टेस्ट मधे. सगळे सेट होते त्याच्यासाठी.

"अपेक्षेप्रमाणे रोहित येऊन गेलासुद्धा." - तो कुणाच्या तरी अपेक्षा पूर्ण करतोय हे महत्वाचं >> Happy

"पण तरीही त्याची फलंदाजी बघायला मीं आसुसलेला आहेच" - व्हाईट बॉल क्रिकेट चा तो दादा फलंदाज आहे. test cricket is just not his cup of tea. >> पुढच्या टेस्ट मधे तो धुमाकूळ घालेल बघ.

जिंकणे जाऊ दे, हरलो नाही उद्या म्हणजे मिळवले ,बस्स ! दिल है छोटासा, छोटिसी आशा Happy

उद्या आखाडा विकेटवर दिवसभर टिकण अवघड दिसतय. एकच आशा - आत्तापर्यंत अशिनने जेंव्हा जेंव्हा ५ विकेट एका डावात घेतल्या आहेत तेंव्हा आपण कधिही हरलो नाही.

इंग्लंड जिंकळ्यासाठी खेळण्यापेक्षा हरू नये असे खेळत होते असे तुम्हाला वाटले का ? दोन्ही इनिंग्स मधे त्यआंच्या शेपटाची बॅटींग विशेषतः बटलरपासून, अशी कमालीची स्लो का खेळली हे अजिबात कळत नाही. विचित्र डावपेच अगदी !

*पुढच्या टेस्ट मधे तो धुमाकूळ घालेल बघ.* -.संघात असला तर ! गावसकर तर मयांकला गिलपेक्षाही चांगला टेस्ट ओपनर म्हणतोय !
*इंग्लंड जिंकळ्यासाठी खेळण्यापेक्षा हरू नये असे खेळत होते असे तुम्हाला वाटले का* - नि:संशय. 'गाब्बा'मुळे झालंय तसं !!
*उद्या आखाडा विकेटवर दिवसभर टिकण अवघड दिसतय. * - खरंय पण 1) रूटलाही हें कळलं असुनही 419 ची आघाडीही त्याला आपल्या फलंदाजीसाठी पुरेशी वाटत नव्हती व 2) दिल है जो मानताही नही ! Wink

नवीन प्रकारचे SG बॉल्स अतिशय सुमार दर्जाचे आहेत. भारतात SG बॉल्स नी खेळण्याचा अट्टाहास BCCI नी सोडायला हवा

ईंग्लंडने डाव घोषित करायला ऊशीर केला कारण पंत फॅक्टर
एकदा चेन्नईलाच बहुधा सेहवागच्या झुंझार सुरुवातीने त्यांना झोपवले आहे.
तो सेहवाग तरी परवडला, पण हा पंत अगदी अक्कल नसल्यासारखा खेळतो
आणि वेडेच ईतिहास घडवतात.
उद्या विकेट जाताच कोहली आणि रहाणेच्या आधी पंतला पाठवावे.
जिंकायला नाही तर अनिर्णीत राखायलाच याचा फायदा होईल.
कारण पुजारा रहाणे कोहली मंडळींनी स्लो खेळून धावगती काहीच्या काही वाढवून ठेवली आणि दिवसाच्या मध्यात बाद झाले तर पंत अशीच आपली विकेट फेकून जाणार, कारण कदाचित त्याला ड्रॉ साठी खेळायला ईतकी मजा येणार नाही.
तेच पुढे आल्यास त्याचे मैदानावर उभे असणेही ईंग्लिश गोलंदाजांना दबावात ठेवेल. मग तो बाद झाल्यावर देखील सामना अनिर्णित राखायला बरे पडेल. जसे सिडनी कसोटीत झालेले.
बोलो आमीन Happy

चेंडू भरपूर वळतोय, मधेच उसळी घेतोय , त्यामुळे क्षेत्र रक्षकांचं कडं फलंदाजांभोवती लागणार हें निश्चित. निव्वळ बचावात्मक खेळून दिवस काढणं त्यामुळे महाकठीण. सर्वच फलंदाजांना बचाव-आक्रमण अशी दुहेरी निती तर अवलंबावी लागणारच ( पहिल्या डावात पुजाराने याचं कांहींसं प्रात्यक्षिक दिलंय.) असं करताना यशस्वी झाल्यास शेवटीं जिंकण्याची संधी आलीच, तर पंत-सुंदर त्या संधीचं सोनं करायला नेहेमीच्याच क्रमांकावर असलेले बरे, असं वाटतं.

४ गेले
आता जिंकणे फार कठीण वाटतेय

*आता जिंकणे फार कठीण वाटतेय* - या पीचवर तें महाकठीण आहेच/होतेच ! ((मान्य करणं आपल्याला कठीण जात होतं, इतकंच !). आपण टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी केली असती, तर उलटी परिस्थिती पहायला मिळण्याचीही दाट शक्यता होती !

६ गेले...

लंच पर्यंत तरी किल्ला लढवणार का?

भारताने brisbane किंवा सिडनी ला जे केले ते फार दुर्मिळ आणि म्हणूनच special होते पण भारतीय फॅन्स ला असे वाटले की नेहमी अशी कामगिरी होईल जे शक्य नाही. मी आधी म्हटले की इंग्लंड विरुद्ध आपल्याला फार कठीण जाणार आहे आणि आपले फलंदाज स्पिन चांगली खेळत नाहीत. रहाणे नी ऑस्ट्रेलियात capatainship चांगली केली पण त्याची फलंदाजी 2- 3 वर्षात घसरली आहे, भारतात स्लो pitches वर तर तो फार चाचपडतो

*मला वाटतं की भारतीय टीम पण भारतीय फॅन्स प्रमाणे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेले* - तिसर्या दिवसापासून पीचवर धूळ उडायला लागली होती व आपली संपूर्ण फलंदाजी तशाच पीचवर झाली. इंग्लंडची दुसर्या डावात तशा पीचवर तीच हालत झालीच ना ! ' आपण टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी केली असती, तर उलटी परिस्थिती पहायला मिळण्याचीही दाट शक्यता होती !*, हें नाकारतां कसं येईल ? निदान हया कसोटीवरून तरी आपल्या संघाची कुवत व वृत्ती याबाबत निष्कर्ष काढणं योग्य नसावं. ( माझ्यासारख्या प्रेक्षकांनी प्रत्येक सामन्यात अति मोठ्या अपेक्षा बाळगण्याला आंवर
घातला पाहिजे, हें मात्र खरं )

पुढच्या सामन्याची टीम काढायला घ्या आता

१ गिल
२ मयंक
३ पुजारा
४ कोहली
५ पंत (फलंदाज)
६ सुंदर
७ साहा (यष्टीरक्षक)
८ आश्विन
९ कुलदीप
१० सिराज
११ बुमराह

रहाणे आणि शर्माला बाहेर ठेवा. अवघड निर्णय आहे. पण घ्या. पुढचा सामना पुन्हा ईथेच आहे.
जेणेकरून पंतला निव्वळ फलंदाज म्हणून खेळवून साहाला यष्टीरक्षणाची जबाबदारी देता येईल.
पंतला किपींगवरून हटवणे त्याच्यातल्या कीपरला नाऊमेद केल्यासारखे होईल पण सध्या गरज आहे. गोलंदाजीत वळणारा बॉल आपली स्ट्रेंथ असेल तर तिला बॅक करायला कीपर तसाच हवा. पण ईतर टॉप ऑर्डर फलंदाजांचा फॉर्म पाहता पंत फलंदाज म्हणूनही गरजेचे आहे.
कुलदीप तर सरळ आत येईल आता तिथे प्रश्नच नाही.
ईशांतला आराम देत नव्या दमाचा आणि ऑस्ट्रेलियात आत्मविश्वास वाढलेला सिराज आत आणू शकतो. हा बदल ऑप्शनल आहे.

आता ईथून आपल्याला एकही सामना हरता येणार नाही. ३ पैकी २ जिंकावेच लागतील.

तिसर्‍या चौथ्या सामन्यात जडेजा आत आला तर त्याला कुठे फिट करायचे ते तेव्हा बघूया.

आपले दोन प्रोब्लेम आहेत. एकतर बोर्डाला अशी खेळपट्टी बनवता येत नाही की ज्यावर नाणेफेक सामन्यात निर्णायक ठरत नाही. आणि दुसर म्हणजे आपल्या कर्णधाराला नाणेफेक जिंकता येत नाही.

Pages