क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

इंग्लंड ची सद्ध्याची टेस्ट टीम जबरदस्तच आहे आणी काल ते खेळले पण फार छान. पण चेन्नई चं पीच फारच उदासीन होतं. बॉलर्स ना काहीच मदत नव्हती. इतकं रटाळ, एकतर्फी क्रिकेट (दोन्ही टीम्स खूप चांगल्या खेळल्या) बघायला कंटाळवाणं होतं. ह्यात स्लो स्कोअरिंग चा काहीही संबंध नाहीये. ऑस्ट्रेलियात सुद्धा दोन्ही टीम्स चा स्कोअरिंग रेट खूप कमी होता पण त्यात बॉलर्स ना मदत मिळत होती. असली पीचेस बॉलर्ससाठी डिमॉरलायझिंग आहेत. कदाचित तिसर्या दिवसापासून बॉल हातभर वळेलसुद्धा. पण टेस्ट च्या पहिल्याच दिवशी बॉल फक्त सरळ
जात असेल, स्पीड, बाऊन्स, टर्न नसेल तर त्या बिचार्या बॉलर्स ना दमवण्यापेक्षा बॉलिंग मशिन्स लावावीत. ह्या असल्या दोन चेन्नई टेस्ट्सनंतर अहमदाबाद च्या डे-नाईट टेस्ट पर्यंत बुमराह आणी इशांत थकले-भागलेले असतील.

*बॉलर्ससाठी डिमॉरलायझिंग आहेत.* - खरंय, सर्वांसाठीच, प्रेक्षकांसहित ! >> +१. तमिळनाडू असोसीएशनने कोणी तरी स्पेशल पण नवा क्युरेटर बोलावलाय ना. हे सगळे प्रयोग डोमेस्टीक मधे करा रे. आपल्या पहिल्या डावाच्या वेळी पिच असेच पाटा असेल तर बरे होईल. शेवटचे दोन दिवसआंमधे इथे रिव्हर्स स्विंग नाही झाला म्हणजे मिळवले.

शाबाज नदीम डोमेस्टिक मधे नि इंडिया आ मधून खोर्‍याने विकेट्स घेतो म्हणून चौथा स्पिनर म्हणून तो आलाय रे. ( पहिले तिघे - अ‍ॅश, जडेजा नि कुल्दीप), पाचवा जलज नि जयंत असावेत. अक्षर पटेल वगैरे स्पिनर्स पेक्षा बॉलिंग ऑल राऊंदर्स म्हणून त्या त्या संघातून खेळतात.

"शाबाज नदीम डोमेस्टिक मधे नि इंडिया आ मधून खोर्‍याने विकेट्स घेतो म्हणून चौथा स्पिनर म्हणून तो आलाय रे" - मला वाटतं कुलदीप, सुंदर आणी अश्विन एकाच दिशेनं बॉल वळवतात म्हणून एक व्हरायटी बॉलर हवा होता. चहर आणी नदीम मधे नदीम ला फर्स्ट क्लास क्रिकेट चा अनुभव जास्त असल्यामुळे त्याला प्रिफर केलं.

"तमिळनाडू असोसीएशनने कोणी तरी स्पेशल पण नवा क्युरेटर बोलावलाय ना" - त्याने म्हणे आजपर्यंत एकही फर्स्टक्लास पीच बनवलं नाहीये, टेक्सटाईल्स बिझनेसमन आहे - काहीही!!! पटेल (मनाला, अक्षर नव्हे) असं बोला रे. ... आणी हे खरं असेल, तर असं वागू नका. तो क्युरेटर काहीतरी इंग्लंड सारखं पीच बनवणार होता.. सगळाच झोल आहे.

एकाच दिशेनं बॉल वळवतात >> अर्थातच. वर कोणि तरी म्हटलेले कि नदीम ला कसे घेतले त्याबद्दल बोलत होतो.

पिचबद्दल तर बोलायलाच नकोय. सगळाच सावळा गोंधळ आहे.

*..एकाच दिशेनं बॉल वळवतात म्हणून एक व्हरायटी बॉलर हवा होता.* - त्याकरतां भारतासारख्या ' फिरकी सम्राट ' देशाकडे एकही सक्षम, ऑरथोडाॅकस लेगस्पीनर नसावा, ही दु:खद व चिंतेची बाब आहे.

काल लंच नंतर १४ ओव्हर्स बुमरा-अश्विन नी (भन्नाट) टाकल्या, पण रूट अन सिब्ली नी पुजारा मोड ऑन करून खेळून काढल्या, नजर स्थिराऊन घेतली अन मग दोन्ही बाजूनी नवखे नदीम-सुन्दर सुरू झाल्यावर गिअर्स बदलले. नंतर अश्विन-बुमरा परत आल्यावर परत सेट नजरेचा फायदा करून घेतला. विरोधी टीमचे असले तरी मस्त बॅटिंग टॅक्टिक्स.

आपण मात्र बोलिंग चेंजेस नीट केले नाहीत असं मला वाटतं.
आजही कालचीच पुनरावृत्ती चालू आहे.

कुलदीप बद्दल बोलायचं झालं तर त्याची शेवटची टेस्ट दोन वर्षांपूर्वीची सिडनी टेस्ट होती, ज्यात त्यानी पहिल्या इनिंग्ज मधे ५ विकेट्स घेतल्या होत्या. पण नंतर आधी सर जडेजा आणि मग सुंदरच्या बॅटिंग स्किल्स मुळे डावलला गेलाय.

*विरोधी टीमचे असले तरी मस्त बॅटिंग टॅक्टिक्स.* +1 . ते स्पीन खेळायचं ( बचावात्मक व आक्रमक खेळायचं) तंत्र घोटून घेण्याची संधीही साधून घेताहेत !

*...कोणी तरी स्पेशल पण नवा क्युरेटर बोलावलाय ना" - * -

'माळी' किंवा ' ग्राउंडसमन' ऐवजीं त्याना ' पीच क्यूरेटर' म्हणायला लागल्यापासून हीं त्यांचीं नाटकं सुरूं झालीत !!
20181215_133742_6.jpg

शेवटी एकदाचा ५७८ वर आटोपला इंग्लंडचा डाव... हुश्श्श्श...!!!

आता आपल्या लोकांनी या स्कोअर चं प्रेशर न घेता खेळायला पाहिजे. ते करू शकतात तर आपण नक्कीच करू असा मोड हवा.
शेल मधे जाऊन खेळलो तर अँडरसन-आर्चर आणि कं. भूत होऊन डोक्यावर बसतील.

*ते करू शकतात तर आपण नक्कीच करू असा मोड हवा.* +1. आपलीं पोरं पण तशी तयारही आहेत. धांवा काढताना वेळही काढला पाहिजे, हें महत्वाचं.

इंग्लंडच्या आठव्या गड्यानी १०५ आणि दहाव्यानी ५७ बॉल्स खेळून काढले

आपल्या १, २, ४, ५ नी अनुक्रमे ९, २८, ४८ आणि ६ खेळले...

पंत-पुजारा मस्त खेळत होते.
आता फक्त फॉलोऑन आज मिळणार की उद्या हेच बघायचं...

आपले 'टेस्ट' बॅट्समन गेल्या ७-८ वर्षांमधे सातत्यानी रणाजी खेळत नाही आहेत.
त्यामुळे चांगल्या स्पिनर समोर टर्निंग ट्रॅक वर फेफरं येतं... होम अ‍ॅडव्हांटेज वगरे फक्त पाटा विकेट्स वर...

रणजी खेळत नसाल तर टेस्ट टीम मधे निवड होणार नाही असा नियम आणायची वेळ आली आहे.

भारताचे सध्याचे फलंदाज फिरकी चांगली खेळत नाहीत, रहाणेला तर खूप प्रॉब्लेम येतो, विराट पण आजकाल फार काही आश्वासक वाटत नाही फिरकी समोर

पंत कसोटीला टीआरपी देतोय. मजा आली आज. पण शतकाजवळ आला आणि त्या विचारात पुन्हा नव्वदीत बाद झाला. पुढच्यावेळी त्याचा स्कोअर दहाने कमी दाखवायला हवा स्कोअरबोर्डवर..

बाकी आज विंडीज बांग्लादेश कसोटीतही एक चिमित्कार झाला. पदार्पणात विदेशी भूमीवर चौथ्या डावात ४०० चे टारगेट चेस करताना द्विशतक आणि विजय ! हॅटस ऑफ..

भारताला भारतात इंग्लंड च्या स्पिनर्स विरुद्ध खेळताना फॉलो-ऑन स्विकारावा लागणार ह्या कल्पनेनंच कसंतरी होतंय. वर कुणीतरी म्हट्ल्याप्रमाणे कोहली आणी रहाणे स्पिनर्स समोर चाचपडतात (हे नविन नाहीये) हे चिंताजनक आहे.

एक (इथेच) चावून चोथा झालेला विषयः अजूनही रोहित शर्माकडून एक भक्कम टेस्ट ओपनर म्हणून अपेक्षा आहेत? he’s done enough to prove otherwise.

*भारताला भारतात इंग्लंड च्या स्पिनर्स विरुद्ध खेळताना फॉलो-ऑन स्विकारावा लागणार ह्या कल्पनेनंच कसंतरी होतंय. *
आपण फिरकी खेळण्याची परंपरागत कला विसरलोय, या विषयाचा चोथा रोहितकडूनच्या आपेक्षेपेक्षा किती तरी अधिक वेळ ,व वेळां, इथे चघळला गेलाय !

अजूनही रोहित शर्माकडून एक भक्कम टेस्ट ओपनर म्हणून अपेक्षा आहेत?
>>
बिल्कुल नै, बिल्कुल नै...
पुढच्या टेस्टला मयंक आत हवा
जर पृथ्वी शॉ एका अन मयंक दोन टेस्ट्सच्या अपयशावर बाहेर जाऊ शकतो, तर शर्मा ला पण तोच न्याय लागू व्हायला हवा
पण नाही होणार. कारण रोहितचा व्हाईट बॉल गेम महान आहे, तो टेस्ट टीम मधे नसणं हे टेस्ट टीमचं नुकसान आहे, त्याने गेल्या डोमेस्टिक सीझनला कशा खोर्‍यानी रन्स काढल्या होत्या... वगैरे वगैरे...
पुढच्या तीन्ही टेस्ट्स ना पाटा विकेट्सचा कमबॅक होऊन आपण सिरीज जिंकू...

अश्विन द बॅट्समन ला काय झालंय?
गेल्या २-३ वर्षांमधे तो पहिल्यासारखा खेळत नाहीये.

अश्विन अन सुन्दरच्या प्रयत्नांना अपयश.
पहिल्या चौघांप्रमाणे शेवटच्या तिघांनीही बॅटिंग करायचे जराही कष्ट घेतले नाहीत.
त्यांचा नं १० ५७ चेंडू खेळतो, अन आपले ९, १०, ११ अनुक्रमे १२, ११, २

रूट टाईप एक मोठी इनिंग्ज आणि शेपटाचं न हलणं हे जसे दोन मोठे फरक आहेत त्यांच्यात आणि आपल्यात, तसंच आपण त्यांना ४५ अवांतर धावा दिल्या (२० नो बॉल्स, ज्यातले ११ स्पिनर्स नी टाकले). त्यांनी आपल्याला फक्त ६ अवांतर धावा दिल्या ज्यात फक्त १ नो बॉल होता.

Pages