क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

खरंय. मीं शक्यता सांगितली. श्रेयस हा सर्वच बाजूनी मला संघात असणं आवडतं.
आज रंगतदार , चुरशीचा सामना होवून आपण जिंकावं अशी अपेक्षा व इच्छा !

अक्षरच्या ऐवजी राहूल टेवाटीयाला घेउन संधी द्यायला पाहिजे. नटराजन कुठे गेला?

नाणेफेक इंग्रजांनी जिंकली तिसर्‍यांदा ह्या मालिकेत आतापर्यंत नाणेफेक जिंकलेलाच संघ जिंकलाय मालिकेत. आजा काय होईल?

१ मीटर अंतरावर वर झालेल्या रन आऊट मध्ये अंपायर म्हणू शकतो मला दिसले नाही आणि त्यात त्याला सॉफ्ट सिग्नल देण्याची सक्ती नसते.
पण ईथे ५० मीटरवर काय घडले त्याबद्दल तो 'मला नीट दिसले नाही' असे म्हणू शकत नाही, आणि त्याला सॉफ्ट सिग्नल देण्याची सक्ती आहे.
काय अजब नियम आहेत.

अभिनंदन !
पोरंच दिवसेंदिवस भरवशाची होताहेत. आनंद आहे !!

सुर्यकुमारला तर ढापलाच. ऑन फिल्ड अंपायर आंधळे झालेत अस माझ मत आहे. आख्खा खेळाडू जरी क्रिज मधे पोचला असला तरी रन आउटसाठी रिव्हु मागतात. काल थर्ड अंपायर पण आंधळा झाला होता. रिप्ले मधे बॉल जमिनीला लागल्याच स्पष्ट दिसत होत. दोन्ही हाताची बोट बाजूला होती आणि बॉल परत वर उडुन आलेलाही दिसत होता. रशिदने झेललेला कॅच पण सिक्स होती. त्याचा पाय रोपला लागला तर होताच पण रोपही आधीच मागे ढकलला गेला होता. कोहलीने शेवटी मॅचनंतर प्रेझेन्टेशन मधे हा विषय काढला ते बर झाल.
रोहितला बोलिंग फिल्डिंग कॅपटन करावा. Happy
शार्दूल फारच उपयुक्त ठरला काल. पांड्यानेही फुल कोटा टाकला ते बर झाल. चहारनेही सुंदर बोलिंग टाकली
विरूद्ध टीमच्या खेळाडूची डिएमडी ( ढुं.... मागुन दांडी) पहाण्या इतक सुख नाही.
एकंदरीतच काल ऑल राउंड परफॉर्मन्स.

शेवटी रोहित कामी आला...
आजही मुंबई इंडियन्स च्या खेळाडूंनी जिंकवला सामना... हार्दिक आणि राहुल... गोलंदाजी, SKY ची फलंदाजी... रोहित ची शेवटी कप्तानी....

अंपायर / ICC चे नियम निव्वळ बिनडोक आहेत...

*रोहित ची शेवटी कप्तानी....* - मॅचनंतर घेतलेल्या मुलाखतीत शारदूलला विचारलं गेलं कीं शेवटची ओव्हर टाकताना पंडया व रोहितने त्याला काय सल्ला दिला. तो म्हणाला, शांत रहा व ' believe in your instinct ', असं रोहितने सांगितलं ! ही कप्तानीची खरी कसोटी असावी. कसोटीच्या क्षणीं गोलंदाजाला ' तूं कशी गोलंदाजी कर ' हें सांगणं व ' आतां कशी गोलंदाजी करायची तें ठरवायला तूंच खरा समर्थ आहेस ', असा त्याच्यात विश्वास निर्माण करणं , यानेच खरा फरक पडत असावा !!

त्याच्यात विश्वास निर्माण करणं , यानेच खरा फरक पडत असावा !!
हेच कोहलीला जमत नाही. बाहेर जाऊन बसला तरी हातवारे करत होता.

पण मुळात कालच्या संघात राहुल कशाच्या जोरावर आला?
१-०-० ???

गेल्या सामन्यात स्कायला विनाकारण बाहेर बसवणं आणि कालच्या सामन्यात राहुलला खेळवणं चूक होतं हे संघव्यवस्थापन मान्य करेल का?
काय खाऊन टीम सिलेक्ट करतात?

विराटचे ओव्हर अ‍ॅग्रेसिव्ह रिअ‍ॅक्शन्स आणि शिविगाळ परत अती व्हायला लागलंय
मधे काही वर्ष बर्‍यापैकी कंट्रोलमधे होता

विराटला कॅप्टन्सीवरून काढलं (आणि शर्मा - रहाणे ना कॅप्टन केलं) तर विराट चिडचिड करेल अन नीट खेळणार नाही / ग्रुपिझम होईल होईल्निवड समितीला भिती वाटत असेल काय?

मला तर स्पष्ट वाटतं, लिमिटेड ओव्हर्समधे श्रेयस ऐय्यर आणि टेस्टमधे रहाणेला कॅप्टन करावं.
(ते दोघंही सध्यातरी दुसर्‍या फॉर्मॅटमधे खेळत नाहीत, त्यामुळे ईगो क्लॅशेस टाळता येतील)

काल इशान किशन injured होता आणि राहुल ची कामगिरी या series च्या आधी व्हाईट बॉल क्रिकेट मध्ये चांगली होती, पंत फॉर्म मध्ये नसताना त्याने किपिंग करून चांगला बॅलन्स दिला होता टीम ला, त्यामुळे त्याला एखादी संधी जास्त दिली तर काही चूक नाही. माझ्या मते अजूनही श्रेयस आणि रहाणे चे स्थान अनुक्रमे लिमिटेड ओव्हर्स आणि टेस्ट मध्ये पक्के नाही त्यामुळे त्यांना कर्णधार करणे ठीक नाही

*त्यामुळे त्याला एखादी संधी जास्त दिली तर काही चूक नाही* - +1. शिवाय, त्याला बरेच दिवस आंतरराष्ट्रीय सामने खेळायची संधी मिळाली नव्हती, हेंही कारण असावं. पण त्याला संधी दिल्याचा एक महत्वाचा फायदाही आहे, असं मला वाटतं; नवनवीन प्रतिभाशील खेळाडू उदयाला येत असले तरीही निवडसमिती आपल्यावर घाईघाईने काट मारणार नाहीं, हा आश्वासक व अत्यावश्यक संदेश तरी यामुळे नक्कीच सर्व खेळाडूंपर्यंत पोचेल.

विराटचे ओव्हर अ‍ॅग्रेसिव्ह रिअ‍ॅक्शन्स आणि शिविगाळ परत अती व्हायला लागलंय
मधे काही वर्ष बर्‍यापैकी कंट्रोलमधे होता >> +१
त्याच्या स्वतःच्या घसरलेल्या बॅटींग परफॉर्मन्सचा वैताग तो काढत असावा असे दिसते. अ‍ॅग्रेशन जेव्हा बॅट, बॉल, फील्ड ऐवजी हातवारे आणि शिव्यांमधून व्यक्त व्हायला लागते तेव्हा ते खेळातले काँपिटिटिव स्पिरिट न वाटता पर्सनल लेवलवरची ईन्सिक्युरिटी, डिसअपॉईंटमेंट असावे हे लगेच कळते. पांड्याला सुद्धा अलिकडे आयपील मध्ये बरेचदा असे करतांना बघितले आहे. ह्या टेंपरामेंटच्या बाबतीत मला राहुल आणि अय्यर फार ऊजवे वाटतात. आज ना ऊद्या ते नक्की चांगले लीडर्स म्हणून पुढे येतील.

अजून एक दुर्दैवी प्रकार म्हणजे ईशान किशन, यादव, ठाकूर वगैरेंना मैदानावर जेव्हा कोहलीकडून एवढी अ‍ॅब्युझिव ट्रीटमेंट मिळाली त्यानंतर ह्या बिचार्‍यांना टीम मध्ये टिकण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स मध्ये वगैरे पुन्हा त्याचेच लांगूलचालन करावे लागते आहे. हे आजिबात हेल्थी टीम एनवायर्नमेंट वाटत नाहीये.

-------

सीरीज लाईनवर असतांना, किशन फिट असेल तर शेवटच्या प्रेशर गेममध्ये राहुलला फायनल ११ मध्ये घेऊ नये असे वाटते. त्याला पुन्हा त्याच्या ग्रुवमध्ये येण्यासाठी आयपीएल ही मोठी संधी आहे. WC सुद्धा भारतातच आहे त्यामुळे त्याला बरीच संधी मिळणार आहे फॉर्म परत मिळवण्यासाठी.

ऊद्यासाठी माझी ११ (सुंदर ऐवजी तेवातियाला बघायला आवडेल)
शर्मा, किशन, यादव, कोहली, अय्यर, पंत, पांड्या, सुंदर, ठाकुर, भुवनेश, चहार.

भारताच्या एवढ्या मोठ्या स्क्वाड मध्ये पोलार्डसारखा सहावा बोलिंग ऑप्शन देऊ शकेल असा एकही प्लेअर नाही हे दुर्दैवी आहे.
विजय शंकर, शिवम दुबे फारशी चमक दाखवू शकले नाही. तेवातिया झाकली मूठ टाईप्स प्रकार आहे.
माझ्या मते ह्या ईंग्लंड सिरीजने भारतीय टीप बॅलन्स मधले बरेच दोष ऊघडे पाडले आणि त्यावर ऊपाय करण्यासाठी वेळ व संधी आता शिल्लक नाही.

शर्मा
किशन/राहुल/धवन
कोहली,
यादव/अय्यर,
पंत,
पांड्या (कमीतकमी २ ओवर्स),
जडेजा/सुंदर/तेवातिया,
भुवनेश/ठाकुर,
शमी/नटराजन,
बुमरा,
चहल्/चहार/चक्रवर्ती

असाच बॅलन्स मला व्यवस्थित वाटतो.

सद्ध्या इथे कोहली बॅशिंग मोहिम जोरदार उघडलेली दिसतीय. बरेचसे 'मनाचे श्लोक' वाचून कमाल वाटली.

Numbers don't lie. ६० पैकी ३५ टेस्ट्स जिंकून तो भारताचा सर्वात यशस्वी कप्तान आहे. सगळ्या फॉर्मॅट्स चा विचार केला तर ९२ पैकी ६३ मॅचेस त्याच्य नेतृत्वाखाली भारतानं जिंकल्या आहेत (७०.५५% - किमान २० सामन्यांचा निकष लावला, तर ही सरासरी सर्वात सरस आहे).

सद्ध्याच्या पिढीतला, सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे (२२,०००+ आंतरराष्ट्रीय धावा). कितीतरी आनंदाचे, अभिमानाचे क्षण त्याच्या बॅटींगने भारताला दिले आहेत. एखाद्या खेळाडू चा खेळ न आवडणं ह्यात काही वावगं नाही. एखाद्या खेळाडूच्या फॉर्म वर किंवा तंत्रावर, कप्तानाच्या डावपेचांवर चर्चा / टीका होणं हे सुद्धा स्वाभाविक आहे but at least, let us not disrespect our legends.

हाब, तुझ्या टीम मधले जडेजा, शामी, नटराजन, चक्रवर्ती टीम मधेच नाहीयेत. तेवातिया फिटनेस टेस्ट पास झल्याची बातमी नाहीये.

भारतात यशस्वी आणि प्रसिद्ध लोकं विनम्र असले की जनतेला फार आवडतात त्यामुळे दुर्दैवाने विराट कितीही यशस्वी खेळाडू आणि कर्णधार असला तरी फारसा लोकप्रिय नाही, त्याची खूपदा अनावश्यक scrutiny होते

शेवटच्या सामन्यात टीम अशी असावी
1 रोहित
2 सुर्यकुमार
3 विराट
4 पंत
5 श्रेयस
6 हार्दिक
7 सुंदर
8 शार्दुल
9 दीपक चहर
10 भुवी
11 राहुल चहर

फेफ,
त्याच्या लीजेंड असण्याबाबत आणि भारताच्या यशात त्याच्या खेळाचा सिंहाचा वाटा असण्याबाबत सगळ्यांना त्याचा अभिमानच आहे. आणि मला त्याचा खेळ प्रचंड आवडतो ही फॅक्ट आहे बरं का. तो ग्रेटेस्ट ईंपॅक्ट प्लेअर आहे हे मी एवढ्यातच लिहिले की. पण टीकेचा विषय कोहली एक बॅट्समन नसून कोहली एक व्यक्ती म्हणून आहे.

तो लीजेंड आहे ह्याचा अर्थ असा नव्हे की त्याला मैदानावर ईतरांना अब्यूज करण्याचे लायसेंस मिळाले आहे. त्याच्यापेक्षाही मोठे लीजेंड्स होऊन गेले आहेत आणि पुढेही होतील पण क्रिकेट आणि त्या खेळाची गरिमा हे वैयक्तिक रेकॉर्ड्स आणि यशापेक्षा मोठे आहे. खासकरून तुम्ही सर्वोच्च्य पदावर असतांना कोट्यावधी लोक तुम्हाला प्रत्यक्ष बघत असतांना, लाखो मुले तुम्हाला अंधपणे फॉलो करत असतांना. आणि तुम्हाला डेसिंग रूम आहे की काय जे मिलिट्री स्टाईल अब्यूज करायचे आहे ते करण्यासाठी.
कॉर्पोरेट मध्ये टीममेंबरच्या हातून झालेल्या चुकीसाठी मॅनेजर जर त्याला पूर्ण फ्लोअरवरच्या लोकांसमोर अब्युजिव लँग्वेज वापरत फैलावर घेत असेल तर एच आर मॅनेजरवर अ‍ॅक्शन घेईल की नाही? ईतरांच्या डिग्निटी आणि सेल्फ एस्टीमचा अवमान करणारी कुठलीही वागणूक टीकेस आणि त्याविरूद्ध अ‍ॅक्शन घेण्यास पात्र आहे. गमावण्यासारखे बरेच काही असल्याने कोणी तक्रार करत नाही ह्याचा अर्थ होणारा व्हर्बल अब्यूज त्यांना मान्य आहे किंवा सहन करण्याची तयारी आहे असेही नाही ना.

but at least, let us not disrespect our legends. >> Happy Legend or not, first you gotta show respect to your fellow teammates.

हाब, तुझ्या टीम मधले जडेजा, शामी, नटराजन, चक्रवर्ती टीम मधेच नाहीयेत. तेवातिया फिटनेस टेस्ट पास झल्याची बातमी नाहीये.>> अरे मी ती टीम येऊ घातलेल्या टी२० वर्ल्ड कपच्या दृष्टीने लिहिली होती.

भारतात यशस्वी आणि प्रसिद्ध लोकं विनम्र असले की जनतेला फार आवडतात त्यामुळे दुर्दैवाने विराट कितीही यशस्वी खेळाडू आणि कर्णधार असला तरी फारसा लोकप्रिय नाही, त्याची खूपदा अनावश्यक scrutiny होते
नि
बरेचसे 'मनाचे श्लोक' वाचून कमाल वाटली. >> +१ मी मागेही लिहिले होते कि कोहली ची मेंटॅलिटी टिपीकल दिल्लीवाली आहे. ( तुम्ही तिथे राहिला असाल तर लक्षात येईल काय म्हणतो ते. ) 'शाब्दिक अ‍ॅब्युज' नि नंतर 'गळ्यात गळे घालणे' हा हातात हात घालून जाणारा प्रकार आहे. सगळेच जण सचीन, राहूल, कुंबळे सारखे न बोलता खमके वागून पॅसीव्हली अ‍ॅग्रेसीव्हनेस दाखवू शकतील असे जरुरी नाही. कोहली ने कमी केले तर उत्तमच, पण नाही केले तरी कमीत कमी मी तरी केवळ 'तो फक्त मैदानावर काय बोलतोय / वागतोय' ह्यावर अंदाजाचे इमले बांधण्यापेक्षा त्यापलीकडे जाऊन 'तो एकंदर नंतरही कसा वागतोय' ( ह्याचा अ‍ॅक्सेस मला तरी नाहीये) ह्यावर ठरवीन . दुसर्‍या सामन्यामधे कोहली किशनला प्रोत्साहन देत होता तर ते ही खोटे होते असेही लिहिलेले वाचले. कोहली ने राहुला बॅक केले तर त्याला शिव्या पडल्या आहेत. स्काय ला केले नाही म्हणून पडल्या आहेत. चहल ला आणले तर आर सी बी प्लेयर्स ना बॅक करतो असे म्हणतात. वर कोणी तरी दिल्लीच्या प्लेअर्स ना बॅक करतो म्हणून म्हटलय (किशन दिल्ली कडून डोमेस्टिक खेळतो नि पंत, अय्यर दिल्ली कॅपीटलकडून खेळतात.) राहाणे ला बॅक केले म्हणून इथेच शिव्या दिलेल्या वाचल्या आहेत. एकंदर काय 'नावडतीचे मीठ अळणी' असा प्रकार असे समजायचे. काहींना आवडणार, काहींना नाही.

त्यामुळे त्याला एखादी संधी जास्त दिली तर काही चूक नाही. माझ्या मते अजूनही श्रेयस आणि रहाणे चे स्थान अनुक्रमे लिमिटेड ओव्हर्स आणि टेस्ट मध्ये पक्के नाही त्यामुळे त्यांना कर्णधार करणे ठीक नाही >> +१. लिमिटेड ओव्हर्स मधे शर्मा नि कोहली वगळता बाकीचे बॅटसमन अजूनही १००% पक्के नाहित. शर्मा हाच पर्याय होउ शकतो.

अरे मी ती टीम येऊ घातलेल्या टी२० वर्ल्ड कपच्या दृष्टीने लिहिली होती. >> तू लिहिलेल्या टिममधे एव्हढे / आहेत नि सध्या इंजरी किंवा पर्सनल टाईम आऊट घेऊन बाहेर आहेत ते उपलब्ध झाले की सध्या असलेल्या टीमपेक्षा फार काही वेगळे नाही दिसत त्यात .

"खासकरून तुम्ही सर्वोच्च्य पदावर असतांना कोट्यावधी लोक तुम्हाला प्रत्यक्ष बघत असतांना, लाखो मुले तुम्हाला अंधपणे फॉलो करत असतांना." >> हे 'मान ना मेहन, मै तेरा मेहमान' प्रकरण आहे. म्हणजे कोहली ने स्वतःच्या खेळावर घेतलेली मेहनत, स्वतःचाच नाही तर एकंदर सगळ्याच टीम चा फीटनेस साठी आणलेला द्रुष्टीकोन, खेळताना दाखवलेली कमीटमेंट्- पॅशन, स्वतःची फिल्डींग सुधारण्यासाठी घेतलेली ढोरमेहनत , कप्तान म्हणून खेळाडूंना बॅक करणे - त्यांना पाठी मागे घालणे (त्याचे डावपेच मी लिहित नाही कारण ते कमी दर्जेदार आहेत असे मला वाटते) इत्यादी गोष्टी न बघता त्याला मिळणारे ग्लॅमर नि त्याने शिवीगाळ करत बोलणे ह्या अंधपणे फॉलो करणार असतील तर कठीण आहे एकूण. दोन्ही गट फॉलो करणार असतील नि अजून एक कोहली मिळणार असेल तर मी तरी दुसर्‍या गटापलीकडे जाऊन सेलीब्रेट करायला तयार आहे. आज तो कप्तान म्हणून जिंकतो आहे . उद्या हरायला लागला किंवा वागणे जास्तच डोक्यावरून जाते असे दिसले की काढतील त्याला कप्तान म्हणून.

"अरे मी ती टीम येऊ घातलेल्या टी२० वर्ल्ड कपच्या दृष्टीने लिहिली होती." - अरे, माझ्या वाचण्यात चुक झाली. सॉरी!

रिस्पेक्ट चा मुद्दा अमान्य नाहीये रे. कोहली हा सचिन, द्रविड मुशीतला खेळाडू नाहीये हे पण मान्य आहे. पण आपल्याला टीव्हीवर जे दिसतं त्याच्या मागे न दिसणार्या अनेक गोष्टी असतात हे मान्य करायला शिकलोय मी. असो. मी कुणा एकाच्या पोस्टवर लिहीलं असंही नाही. सगळं वाचून जे जाणावलं त्याविषयी लिहीलं.

उद्या परत ओपनर कोण (राहूल आणी रोहित, दोघंही ग्रेट टच मधे नाहीयेत, पण झालाच तर एकच - राहूल - बदल होईल), स्पिनर कोण ह्या चर्चेवर येऊ.

दरवेळी सचिन, राहुल, कुंबळेचेच ऊदाहरण घ्यायला हवे असे नाही. त्याचे कंटेपररी कॅप्टन्स पण आहेत, विल्यमसन, एबीडी, मॉर्गन, होल्डर, रूट अगदी वॉर्नर/स्मिथ सारखे ब्रुट लोकं सुद्धा..पण कोणालाही आपल्याच कंट्रीमेनना अब्युज करतांना पाहिलेले नाही. पाँटिंग वगैरेंचा एखादा 'ऑन अ बॅड डे' टॅन्ट्रम बघितला आहे, श्रीसंत्/भज्जी, रायडू, जडेजा/रैना वगैरे अल्टरकेशन्स बघितले आहेत पण त्यात पॅटर्न नाही.
एवढ्या सातत्याने आपल्याच टीममेट्सना/कंट्रीमेनना वाईट वागणूक देणारा खेळाडू बघितलेला नाही. आधी वर्बली अब्यूज करून नंतर गळ्यात हात घालणे वगैरे, 'ईट सिंपली डझंट कट ईट'. 'धोनी विल बी ऑलवेज माय कॅप्टन' हे त्याचे स्वतःचे वाक्य आहे. तो आणि धोनी दोन भिन्न विचारांची भिन्न माणसे असली तरी ह्यात त्याला धोनीकडून मिळालेली ट्रीटमेंट तरी कॅप्टन म्हणून त्याच्या जडघडणीत महत्वाची आहे असे मला वाटते.

पुन्हा टेनिसचे ऊडाहरण देतो,
सॅंप्रस-फेडरर-आगासी-मॅकेन्रो-जोकोविक असा चढत्या क्रमाने ईमोशनल डिस्प्लेचा स्पेक्ट्रम आपण बघितला. लोकांना खेळाडूंच्या ईमोशन्सचा मॉडरेट डिस्प्ले आवडतो. त्यांनाही खेळाडूला खेळापरे एक व्यक्ती म्हणून जाणून घ्यायचे असते. सॅम्प्राससारखे ईमोशनलेस खेळाडू किंवा मॅकेन्रोसारखे कोपिष्ट दोन्ही प्रेक्षकांकडून अव्हेरल्या जातात. (खेळ आणि रेकॉर्ड्स बाजुलाच ठेऊ, त्या परिमाणात हे चारही लीजेंड्स आहेत)
खेळापरे व्यक्ती म्हणून फेडरर जोकोविकपेक्षा मोठ्या स्केलवर अ‍ॅक्सेप्टेड आहे. जसे जोकोविकची ऑन-कोर्ट जोविअल मिमिक्री त्याचे टॅन्ट्रम आणि त्यातून ऊद्भवलेले दुर्दैवी प्रसंग पुसून टाकत नाही, तसेच कोहलीचे आहे.
जर तुम्ही त्याच्या चांगल्या जेस्चरची (ऊदा. गळ्यात हात घालणे, स्मिथ साठी लोकांना आवाहन करणे वगैरे) वाहवा करत असाल तर, फॉर द वेरी सेम रीझन ही डिझर्व्ज अ‍ॅटलीस्ट अ स्लॅप ऑन द रिस्ट फॉर हिज फ्रीक्वेंट यूज ऑफ अब्युजिव वर्डस अँड जेस्चर्स. बाकी अर्ग्यूमेंट मला 'आपला तो बाब्या' टाईप्स वाटले. Happy

तू लिहिलेल्या टिममधे एव्हढे / आहेत नि सध्या इंजरी किंवा पर्सनल टाईम आऊट घेऊन बाहेर आहेत ते उपलब्ध झाले की सध्या असलेल्या टीमपेक्षा फार काही वेगळे नाही दिसत त्यात >> हो, मोस्टली तीच टीम आहे पण माझे घोडे फायनल ११ मध्ये सहा बॉलिंग ऑप्शन्सवर अडले आहे. Happy

उद्या परत ओपनर कोण (राहूल आणी रोहित, दोघंही ग्रेट टच मधे नाहीयेत, पण झालाच तर एकच - राहूल - बदल होईल), स्पिनर कोण ह्या चर्चेवर येऊ. >>> राहुल ऐवजी रोहित बरोबर किशन ओपनिंगला अवडेल हे आधीच लिहिले. सुंदर ऐवजी अक्सर पटेलला बघायला आवडेल. चहारच्य अजागी पुन्हा चहलला आणण्यात फार मोठा फायदा किंवा नुकसान आहे असे दिसत नाही. सेकंड बोलिंग आली तर ड्यू फॅक्टर मुळे स्पीन मिळवणे अवघड होणार असेलच. तेव्हा अक्सरच्या डार्टींग डिलिवरीज जास्त ईफेक्टिव ठरू शकतील. तशीही त्याची आयपील मधली ईकॉनॉमी सुंदर ईतकीच आहे. एकच गोची आहे की...इंग्लंडमध्ये मलान, मॉर्गन्,स्टोक्स, करन, मोईन असा लेफ्ट हँडर्सचा भरणा आहे त्यामुळे अक्सरच्या बाबतीत काकु होत असेल.
टी२० बॅट्समन म्हणूनही सुंदर आणि अक्सर मध्ये फार फरक नसावा.

*सद्ध्या इथे कोहली बॅशिंग मोहिम जोरदार उघडलेली दिसतीय. बरेचसे 'मनाचे श्लोक' वाचून कमाल वाटली.*- ज्याना त्याचं कर्णधार म्हणुन वागणं आवडतं ( खेळ नव्हे , त्याबद्दल दुमतच नाहीं ), त्यानी उधळावी ना त्याच्या वागणयावर स्तुतिसुमनं ! तो त्यांच्याही देशाच्या संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे, त्याच्या बोलण्या-वागण्या बद्दल अपेक्षा असणारच. सतत अपेक्षाभंग झाला तर लोक अधिकाधिक बोलणारच. त्याला मोहिम नाहीं म्हणत.

सॉरी वाद म्हणून नाही तर एक चर्चा म्हणून आणि महत्वाचे म्हणजे हातात वेळ आहे म्हणून लिहितो आहे, कृपया गैरसमज नसावा..

मला हे अर्ग्यूमेंट फार ईंट्रेस्टींग वाटले. >>
हे 'मान ना मेहन, मै तेरा मेहमान' प्रकरण आहे. म्हणजे कोहली ने स्वतःच्या खेळावर घेतलेली मेहनत, स्वतःचाच नाही तर एकंदर सगळ्याच टीम चा फीटनेस साठी आणलेला द्रुष्टीकोन, खेळताना दाखवलेली कमीटमेंट्- पॅशन, स्वतःची फिल्डींग सुधारण्यासाठी घेतलेली ढोरमेहनत , कप्तान म्हणून खेळाडूंना बॅक करणे - त्यांना पाठी मागे घालणे (त्याचे डावपेच मी लिहित नाही कारण ते कमी दर्जेदार आहेत असे मला वाटते) इत्यादी गोष्टी न बघता त्याला मिळणारे ग्लॅमर नि त्याने शिवीगाळ करत बोलणे ह्या अंधपणे फॉलो करणार असतील तर कठीण आहे एकूण. >>> अशीच ढोरमेहनत, गरिबी असतांना मॅगी खाऊन दिवस काढणे, १०० रुपयांसाठी दिवसभर ईथेतिथे ऊन्हात क्रिकेट खेळणे वगैरे पांड्यानेही केलेले आहे. त्यालाही ग्लॅमर वगैरे भरपूर मिळाले...त्याचेही जसे फॅन्स आहेत तसेच टीकाकार आहेत... कोहली एवढा नाही पण तो सुद्धा एक यशस्वी आणि महत्वाचा भारतीय खेळाडू आहे. मुंबई ईंडियन्स तर त्याला कोहलीसाठी सुद्धा ट्रेड करणार नाहीत एवढा महत्वाचा Happy

त्याचे कॉफी विथ करण मधले त्याचे मिसोजिनिस्टिक बोलणे खुद्द क्रिकेट बोर्डाने दखल घेऊन पनिश केले आहे. पांड्याबरोबर राहुललाही पनिशमेंट मिळालेली आहे, जेव्हा खरे तर पांड्या जे बोलला त्यात राहुलचा दोष ईतकाच होता की तो पांड्या शेजारी बसला होता.
सांगायचा मुद्दा हा की, बीसीसीआय डझ केअर अबाऊट (अ‍ॅटलीस्ट व्हेन दे आर क्रिटिसाईझ्ड फॉर देअर ईनॅक्शन) व्हॉट यू से अँड हाऊ यू से ईट. तिथे मेहनत, यश, फिटनेस, रिझ्ल्ट्स, टीममधले महत्व, मैदानावर घडले की मैदानाबाहेर वगैरे गोष्टींचा हवाला कामी येत/आला नाही.
पण कोहलीबाबत वेगळा न्याय होतांना, त्याला झुकते माप मिळ्तांना सरळसरळ दिसत आहे. अर्थात हे टाईम बीईंग असावे, त्याच्या एकंदर ईमोशन्सचे एस्कलेशन बघता तो बोर्डाला पब्लिकली नसली तरी ईंटर्नल अ‍ॅक्शन घ्यावी लागेल असे काहीतरी करेल असे वाटते. तो दिल्लीचा आहे हे अर्ग्यूमेंटही फारसे हेल्पफुल नाही... 'तो भारताचा कॅप्टन आहे' ईतकेच ऊत्तर पुरेसे आहे.

कोहलीला अंधपणे फॉलो करण्याचाही प्रश्न नाही... जेव्हा तो मैदानावर असे काही करतो (जसे पांड्याने मैदानाबाहेर केले) आणि त्याला बोर्डाकडून रिप्रामाईंड केल्या जात नाही तेव्हा बोर्डाची ह्या वागण्याला मान्यता आहे असाच संदेश जातो. ईतर बोर्डांनी ह्याबाबत अनेकदा नाराजीही व्यक्त केली आहे. Because remember it's called a 'gentleman's game', which means no sledging, cheating, bodyline bowling , temper tantrums or excessive appealing.

कोहली एवढा नाही पण तो सुद्धा एक यशस्वी आणि महत्वाचा भारतीय खेळाडू आहे. मुंबई ईंडियन्स तर त्याला कोहलीसाठी सुद्धा ट्रेड करणार नाहीत एवढा महत्वाचा >> आता ह्यात पांड्ञा कुठे आला मधेच ? पांड्याने अमके केले म्हणजे इतरांनी केलेले कमी ठरते का ? पांड्याकडे फॉलो करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत नि नाहीही आहेत. परत कोण काय फॉलो करणार ह्यावरून पांड्याला जज करण्या आधी फॉलो करणार्‍यांना जज कर मग पुढे बोलू. तोच न्याय कोहली ला ही लाव. आता तू परत पांड्या कप्तान नाही, कोहली आहे असा मुद्दा मांडून कोलांटी मारशील Happy

कोहली हा विकणारा ब्रँड आहे हे च सत्य बीसीसीआय साठी महत्वाचे हे तुझ्या लक्षात येत नाही ही गम्मत आहे. तो विकत असेल तोवर कोहली काहीही बोलला तरी काडीचाही फरक पडणार नाही.

Pages