क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

*गल्ली क्रिकेटने आपल्याला ईतके अन्याय सहन करायला शिकवलेत तर कुठे त्या पंतच्या चार रन्ससाठी रडायचे * +1 !
शिवाय, तुमच्यावर खुन्नस असलेला पोरगा 'अंपायरगिरी' स्वत:कडे घेवून तुमची वाट लावायला तयार असायचाच ! Wink

हार्दिक पंड्या नी T20 मध्ये 4 षटक टाकले, किमान तेवढे तरी त्याने टाकावे ODI मध्ये नाहीतर केवळ 5 गोलंदाजींनी खेळणे फार कठीण जाते. आज कुलदीप च्या जागी नटराजन आलाय तो चांगला बदल आहे.

बटलरला मानलं पाहिजे. एव्हड्या भर उन्हात तिनही वेळेला फिल्डिंग घेतली. एखादा असता तर बोलला असता कशाला या उन्हात मरायचं मस्त बॅटिंग घेऊ आणि संध्याकाळी फिल्डिंग करू.

रोहित शर्माची ढेरी खूपच वाढले. हा नवीन रूपातील रोहित शर्मा जास्तीत जास्त 40 ते 50 रन्स काढू शकतो. पहिल्यासारखे 100 200 रन्स काढणं आवाक्याबाहेर आहे.

भारतीय कर्णधाराला आपल्या खेळपट्टी चा अंदाज नाही..
नाबाद १०० नंतर ३ बाद १२०
तिन्ही बळी फिरकीला..
कोहली तर गल्लीत खेळल्यासारखा बाद झाला..

सॅम करनने जर वूडवर विश्वास ठेवून स्ट्राईक रोटेट केली असती तर निकाल वेगळा असता. पण शेवटी कसं चेन्नई मध्ये धोनीसोबत खेळतो ना त्यामुळे वाण नाही पण गुण लागला.

अभिनंदन ! इंग्लंडला तिन्ही फाॅरमॅटमधे हरवणं हें निखळ कौतुकास्पद !! त्यांतही , नवोदित खेळाडूंचा त्यातला भरीव सहभाग खासच आनंददायक !!
गंगेत घोडं न्हालं
आयपीएल आलं II Wink

जबरदस्त झाली मॅच! परफेक्ट फायनल! दोन्ही टीम्स मस्त खेळल्या. चार कॅचेस सुटायला नको होते. पण टीम इंडिया ने शेवटपर्यंत धीरोदात्तपणे आणि टिच्चून खेळ केला. पंत, पंड्या, राहूल, भुवी, शार्दुल, धवन, विराट सगळेच छान खेळले. कृणाल, प्रसिध आणि नटराजन ने चांगली साथ दिली. कॅप्टन्सी - बेअर्स्टॉ च्या विकेटची योजना, बॉलिंग चेंजेस सगळंच छान होती. तिन्ही सिरीज जिंकल्या - क्लीन स्वीप!! अभिनंदन टीम इंडिया!!

सॅम करनने जर वूडवर विश्वास ठेवून स्ट्राईक रोटेट केली असती तर निकाल वेगळा असता. पण शेवटी कसं चेन्नई मध्ये धोनीसोबत खेळतो ना त्यामुळे वाण नाही पण गुण लागला.
>>>>>>>

मला तर आवडते हि स्ट्रॅटेजी. हि राबवायला स्वतःचा फलंदाजी क्षमतेवर तसाच विश्वास लागतो. आणि तो दाखवताच आपलाही स्वतःवरचा विश्वास बळावतो आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे प्रतिस्पर्धी संघही मग डावपेच बदलतो किंबहुना तो तुम्हाला अचानक घाबरायला लागतो. हा सायकॉलॉजिकल बदल होतोच.
धोनी असे करायचा तेव्हा हेच व्हायचे. एका ओवरमध्ये चौदा पंधरा रन्स असले तरी मग प्रतिस्पर्धी बॉलर हाच विचार करायचा की याने दोन तीन मोठे शॉट खेळले की गेम खल्लास. आणि मग धोनी त्याच्यासमोर एखाद्या महेंद्र बाहुबलीसारखा उभा राहायचा की बॉलर आधीच धोनीची दादागिरी मान्य करायचा. आणि जगभरातल्या क्रिकेटमध्ये एक पद्धत असते. पेनअल्टीमेट ओवर तुमचा मेन बॉलर टाकणार. धोनी त्याला जाऊ द्यायचा आणि अखेरच्या ओवरसाठी तयार राहायचा. किंबहुना कोणत्या गोलंदाजाला ईज्जत द्यायची आणि कोणाला टारगेट करायचे हे माहीत असणारा आणि ते तसे राबवणारा धोनीसारखा दुसरा नाही Happy

पंतने मात्र आज पुन्हा मजा आणली
दोन कसोटी मालिका आणि आता ही वनडे मालिका. निर्णायक सामन्यात निर्णायक क्षणी प्रेशर सिच्युएशनमध्ये गेमचेंजिंग मॅचविनिंग खेळींची हॅट्रीक केली त्याने Happy

भारताला भारतात हरवणं अशक्यप्राय गोष्ट आहे.

Submitted by pravintherider on 26 January, 2021 - 04:17

निकाल सर्वांसमोर आहे...

*भारताला भारतात हरवणं अशक्यप्राय गोष्ट आहे.*, * म्हणजे तुमचा विराटच्या नेतृत्वगुणांवर पूर्ण विश्वास होता.* -
वरील दोन विधानांवरून दोन निष्कर्ष निघतात -
1) विराट = भारत :
2) भारतात भारताला हरवणं अशक्यप्राय- अगदीं विराट कर्णधार असला तरीही !
ज्याला जो निष्कर्ष पटेल, त्याने तो घ्यावा ! Wink

2) भारतात भारताला हरवणं अशक्यप्राय- अगदीं विराट कर्णधार असला तरीही !>>.

Lol

भाऊ, एक व्यंचि येऊ द्या ह्यावर!! Happy

विराट खेळाडू म्हणून नक्कीच Great आहे पण नेतृत्व आणि काही अंशी वागणुक बिलकुल आवडत नाही. अग्रेसिव अप्रोच हवाच पण गांगुली सारखा...
विराट कर्णधार असला तरीही !>> विराट कर्णधार नसता तर आपण जे एक दोनदा हरलो ते पण नसतो हरलो. कर्णधार कोणी असो भारतीय संघ मायदेशी सर्वांचा बाप आहे.

काल जिंकलो, त्यासाठी संघ अन संघ व्यवस्थापनाचं अभिनंदन
पण शास्त्रीबुवांच्या स्टाईलनी सांगायचं तर शेवटी थोड्या वेळासाठी काहितरी खालून कपाळात गेलं होतं.

ग्रेट इंनिंग्ज सॅम करन...

जिंकलो असलो तरी विराटच्या कप्तानीमधे सातत्यानी होणार्‍या काही गोष्टींकडे दुर्लक्ष करता नाही येत :
-- सहाव्या गोलंदाजाचा प्रयोग न करणं (हे वर्ल्डकप पासून चालू आहे. आणि याचं दुसर्‍या मॅच नंतर दिलेलं कारण फारच हास्यास्पद होतं). शेवटच्या सामन्यातही केवळ लोकांना बोलायला कारण नको म्हणून पांड्याला ओव्हर्स दिल्या
-- आपल्या खंद्या फलंदाजांना लेगस्पिन खेळायला अन गुगली जोखायला न जमणं
-- गेल्या काही काळात जबरदस्त बॅटिंग फॉर्म मधे असलेल्या रेग्युलर कीपर पंत ऐवजी पूर्ण टी२० सिरीज फॉर्मसाठी झगडणार्‍या अन कामचलाऊ कीपर असलेल्या राहुल ला पहिल्या सामन्या पंत च्या आधी संधी देणं (दुसर्‍या सामन्यातलं राहुलचं शतक मला खूप स्वार्थी वाटलं, ३३७ हा स्कोअर त्या खेळपट्टीवर कमीच होता. आधी पंत आणि मग इंग्लंडच्या बॅट्समन नी ते व्यवस्थित सिद्ध केलं)
-- लोअर मिड्ल ऑर्डरमधे आपण राहुल (जो चांगला तिसरा ओपनर असू शकतो, पण त्याला खेळवायचंच या आट्टाहासापायी ५-६ नंबरला पाठवणं, कीपिंग करवणं हे अती होतंय), पांड्या (बंधू ) आणि कुलचा च्या पलिकडे प्रयोग न करणं हे कुठेतरी बदलायला हवंय

तसंच, जागतिक पातळी वर, टेस्ट सिरीजच्या आसपास होणार्‍या ३-५-७ वनडे / टी-२० मॅचेसच्या ऐवजी किमान तिरंगी / चौरंगी सामने ठेवले पाहिजेत.
या दुरंगी लढती आताशा फारच मोनोटोनस व्हायला लागल्यात...

सॅम करनला सामनावीर म्हणून निवडायची काहिही गरज नव्हती. त्याने मॅच जवळ आणून दिली पण घालवली सुद्धा.
काल शार्दुल ठाकुरला सामनावीर द्यायला पाहिजे होता. मला वाटत तो एक अष्टपैलू खेळाडू म्हणून खूप चांगला प्रभाव टाकत आहे. जेंव्हा पंत किंवा इशान किशन सोडून पाच फलंदाज घ्यायची वेळ येइल तेंव्हा त्या पाचात एक खरा अष्ट्पैलू हवा. हार्दीक गोलंदाजी करणार नसेल तर दुसरा शोध घ्यायला हवा. अजून तसा खेळाडू दिसत नाहीये. हीच आपली खरी अडचण होणार आहे. आता चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सुटल्यात जमा आहे.
भारतातल्या विश्वचषकासाठी अश्विन (तो पर्यंत टिकून दिला तर) आणि जाडेजा उपयुक्त आहेतच.
कृणाल एक दिवशीय सामन्यासाठी उपयोगी नाही. (पुण्यातल्या सारख्या खेळपट्ट्यांवर)

एक दिवशीय सामन्याच स्वरूप पालटतय. आपल्याला नक्की जिंकायच असेल तर ३७५+ हेच लक्ष हव. तस खेळायच असेल तर राहूल, शिखर बसत नाहीत. अतिसावधगिरी मुळे आपण दुसरा सामना हरलो. सुरूवातीच्या १० षटकात ३०-४० धावांची कूर्म गती आता चालणार नाही. कमितकमी ६० + धावा हव्यात भारतात तरी
यासाठी टीम अशी हवी
रोहित, विराट, इशान, पंत, श्रेयस, हार्दीक, जाडेजा, शार्दूल, अश्विन, बुमरा, शमी (सूर्या, पॄथ्वी, पडिक्कल, वॉशिंगट्न, भूवी) अस चित्र आत्तातरी दिसतय. दोन वर्षात चित्र कस बदलतय हे पाहण मनोरंजक ठरेल. आपल्या मंडळींना सतत होणार्‍या दुखापती हा एक चिंतेचा विषय आहे. रोहित, शमी, बुमरा सगळे प्रकार खेळतात आणि जायबंदीही होतात.

काल शार्दुल ठाकुरला सामनावीर द्यायला पाहिजे होता. >> +१. कोहली पण स्पष्ट्पणे हेच म्हणाला. तसेच बेअर्स्ट्रो च्या जागी भुवी मॅन ऑफ द सिरीज हवा होता हे ही पटले. तीनशे च्या वरच्या सामन्यांमधे पाटा पिचेस वर त्याच्या तीस ओव्हर्स भरपूर फरक पाडून गेल्या.

काल जिंकलो, त्यासाठी संघ अन संघ व्यवस्थापनाचं अभिनंदन >> +१. काही वेळा केलेली फिल्ड प्लेसींग अभ्यास दाखवत होती. प्रसिद्ध ने मात्र निराशा केली. नुसता पेस असून उपयोग नाही - अजूनही रॉच वाटतो. आयपील मधे २-३ वर्षे घालवूनही फार फरक जाणवत नाहीये. असाच पहिल्या सीझन नंतरही वाटला होता. मुंबई कडून खेळला तर फरक पडेल Happy

आपल्या मंडळींना सतत होणार्‍या दुखापती हा एक चिंतेचा विषय आहे. रोहित, शमी, बुमरा सगळे प्रकार खेळतात आणि जायबंदीही होतात. >> ते कमीत कमी खेळून जायबंदी होत आहेत. त्यापेक्षाही न खेळता जायबंदी होणारे जास्त काळजीचा विषय आहेत Happy - नटराजन, चक्रवर्ती वगैरे

ऋन्मेश, फलंदाजाने मारलेल्या बॉलचा कॅच पकडायच्या आधी दोघांनी क्रॉस केला तर काय होते हे बघ तुला उत्तर मिळेल नियम कसा बदलता येईल हे.

फार बोअर झाली ही वन डे सिरीज.
थोडक्यात भारतातल्या वन डे आता २०-२० सारख्या खेळल्या जात आहेत. ज्या टीम्स टेस्ट मध्ये फ्रेश ट्रॅकवर २०० रन्स ऊभ्या राहू शकत नाही त्याच टीम्स, दहापैकी आठ गेम्समध्ये मारा--झोडा-ठोका स्टाईलने एका दिवसात ६००-७०० रन्स बनवतात, बोलर लोक सकेंड क्लास सिटिझन्स असल्यासारखे कायम डिसअ‍ॅडवंटेज होत राहतात...बॅलन्स कायम बॅटर्स च्या बाजूने झुकत एकंदर अनुभव चीप थ्रिल आणि एकसुरी होत आहे. बेल्टर ट्रॅक्स, लहान ग्राऊंड्स, अडम-तडम बॅट्समनचे सातत्याने प्रमोशन, स्ट्राईक रेटवर भर, ऑफस्टंप बाहेर वाईड लाईनवर बोलिंग, स्कील पर्फॉर्मन्सेस कमी आणि चान्स पर्फॉर्मन्सेस (खासकरून बोलिंग मध्ये) जास्त.
हे जुनेच अर्ग्यूमेंट आहे आणि नव्याने असे काही सांगणे नाहीये ...सलग आठावडाभर तीन्ही वेळ एकाच चवीची चवदार बिर्याणी खाऊन येईल तसे फीलिंग आले.

अशा खेळपट्टीवर चांगले spinners पाहिजेत, विशेत: wrist spinners. त्यांच्यावर सतत आक्रमण केल्यास बाद होण्याचा धोका जास्त असतो आणि विकेट्स गेल्या की सामना इंटरेस्टिंग होतो

बेल्टर ट्रॅक्स, लहान ग्राऊंड्स, अडम-तडम बॅट्समनचे सातत्याने प्रमोशन, स्ट्राईक रेटवर भर, ऑफस्टंप बाहेर वाईड लाईनवर बोलिंग, स्कील पर्फॉर्मन्सेस कमी आणि चान्स पर्फॉर्मन्सेस (खासकरून बोलिंग मध्ये) जास्त. >> तू सर्वात मह्त्वाची गोष्ट विसरलास ह्यात - बॅट्समन ना धार्जीणे केले नियम. तीन तीन पॉवर प्ले ! दोन बॉल्स ! शॉर्‍ट पिचवर बंधन !

अंपायर रीव्ह्यू घेतात तेंव्हा बाय डिफॉल्ट स्निको चेक का करत नाहीत ? की करतात पण आपल्याला काही वेळाच दाखवतात ?

*....दुरंगी लढती आताशा फारच मोनोटोनस व्हायला लागल्यात...* - +1
*अशा खेळपट्टीवर चांगले spinners पाहिजेत, विशेत: wrist spinners. * +1. wrist spinners.चा अभाव हें इतका सरस संघ असूनही आपलं मर्मस्थळ होऊं शकतं..

Pages