Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05
क्रिकेटवरील पहिले पाच धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
https://www.maayboli.com/node/67443
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आज रोहित खेळेल का?
आज रोहित खेळेल का?
राहुलने एकदा १ आणि एकदा भोपळा घेतला. त्याच्यावर कोहली पुन्हा त्याच मैदानावर आघाडी फलंदाजीच्या नेतृत्वाची जबादारी देईल का?
मधली फळी बदलणे अशक्य वाटतेय कारण श्रेयस चांगला खेळलाय. यादवला फलंदाजीची संधी मिळालीच नाही पंड्या आहेच त्यामुळे बदलाची शक्यता कमी वाटते. गोलंदाजी मध्ये कदाचित बदल होऊ शकतो एखादा.
राहूलबद्दल अपेक्षा असणं
राहूलबद्दल अपेक्षा असणं स्वाभाविक आहे व त्यामुळे त्याला आणखी एक संधी मिळणंही. आजचा सामना मालिकेचा निर्णायक नसल्याने, ती संधी याच सामन्यात देणं उचित.
गेल्या सामन्याचाच संघ आज खेळवला जाईल असं वाटतंय.
शुभेच्छा, विशेषतः राहूल व यादव यांना .
म्हणून मी अजूनही म्हणेन
म्हणून मी अजूनही म्हणेन प्रेझेंटेशन सेरेमनी मध्ये विराटचे अनुष्काबद्दल बोलणे दुटप्पी, अनप्रोफेशनल आणि टोटली अन्कॉल्ड फॉर होते.>>>>+१११
राहुलला ठेवले पण यादवला
राहुलला ठेवले पण यादवला बसविले खेळायची संधी न मिळताच बाहेर बिच्चारा!
राहुला आता सिद्ध करावेच लागेल!
फक्त एकच खेळाडू प्रत्येक
फक्त एकच खेळाडू प्रत्येक सामना खेळणार... विराट कोहली.
त्याला आरामाची गरज नाही...
बाकीच्यांनी विराट कोहली च्या
बाकीच्यांनी विराट कोहली च्या फिटनेस ची लेवल गाठली की त्यांना पण आराम देण्याची गरज उरणार नाही
अत्यंत भिकार बॅटींग केलीय
अत्यंत भिकार बॅटींग केलीय आत्तापर्यंत इंडिया ने. इथून पुढे काय होतं ते पहायचं(?)
बिच्चाऱ्या पंतने कोहली साठी
बिच्चाऱ्या पंतने कोहली साठी बळी दिला.. बघूया कोहली काय करतो आता...
"बिच्चाऱ्या पंतने कोहली साठी
"बिच्चाऱ्या पंतने कोहली साठी बळी दिला" - असं नाही वाटलं. कोहली hesitant होता. पंत बराच पुढे गेला होता. पळायला नकोच होतं तिथे.
अय्यर पण गेला.
बाकीच्यांनी विराट कोहली च्या
बाकीच्यांनी विराट कोहली च्या फिटनेस ची लेवल गाठली की त्यांना पण आराम देण्याची गरज उरणार नाही.....
त्याला भिती वाटते कप्तानी जाण्याची... दुसरं काय ?
आपले बहुतांश खेळाडू आयपीएल
आपले बहुतांश खेळाडू आयपीएल मध्ये चांगले खेळतात,
पण संघाकडून चांगले खेळत नाहीत,
बाहेरचे खेळाडू संघाकडून चांगले खेळतात पण आयपील मध्ये खेळत नाहीत.
उदा. के एल राहुल आणि जॉर्डन
कोहलीला सलाम !
कोहलीला सलाम !
५ सामने ५ वेगवेगळ्या सलामी
५ सामने ५ वेगवेगळ्या सलामी जोड्या खेळणार असं दिसतंय. पुढील सामना राहुल तर बाहेर जाणार असं दिसतंय....
पराग "आता अचानक सीमा कशी काय
पराग "आता अचानक सीमा कशी काय ओलांडली गेली ?" ह्याचे कारण साधे आहे. तेंव्हा मी ती फक्त वाचली होती. नंतर ती कमेंट्स नि त्याबद्दल गावस्कर जे बोलला ते ऐकले. जनरल गावस्करचे बोलणे (विशेषतः त्याचा टोन) जे ऐकले आहे त्यावरून त्याचे स्पष्टीकरण मला नंतर सारवासारव केलेले वाचले त्यामूळे आधी दिलेला बेनीफीट ऑफ डाऊट चूकीचा होता असे वाटले.
आज यादव च्या जागी रोहित ला आणणे ऑड वाटले. राहुलच्या जागी आणायला हवे होते. असो, पुढच्या दोन मधे तरी राहुल बाहेर जाऊन स्काय ला संधी मिळेल अशी आशा धरूया.
कोहली काय खेळलाय. खरच त्याने रॅम्प वगैरेच्या भानगडी मधे पडू नये. त्याला अशा प्रकारांची गरज नाही वाटत.
कोहली ला असं खेळताना पाहून
कोहली ला असं खेळताना पाहून एकदम 'नयनरम्य' वगैरे विशेषणं आठवतात. जबरदस्त!
इंग्लंड ची एक एकदम वेगळीच पद्धत आहे. त्यांचा ओपनर बटलर मागच्या मॅच मधे शून्यावर आऊट झाल्यावर पुढच्या मॅच मधे एकदम हाफ सेंच्युरी मारतो. राहूल सारखी कन्सिस्टंसी नाहीये.
आपल्या बॉलिंग मधे भेदकता वाटत नाहीये बघताना. चहल गूगली / टॉपस्पिन वगैरे काहीच टाकत नाही का?
इंग्लंड ची एक एकदम वेगळीच
इंग्लंड ची एक एकदम वेगळीच पद्धत आहे. >>
आज सहावा बॉलर नसल्याची उणीव जाणवतेय.
चहलच्या जागी चक्रवर्तीला
चहलच्या जागी चक्रवर्तीला टेस्ट करण्यासाठी ही चांगली संधी होती. पण तो फिटनेस टेस्ट पास करू शकला नाही म्हणे.
चहल खरं चांगला बोलर आहे, वेरिएशनही बरेच आहेत, सुपर एक्स्पोज्ड झाल्याने त्याची एफिशिअंसी कमी झाल्यासारखी वाटते.
पण हेही तितकेच खरे की बटलर सुद्धा वन ऑफ द बेटर प्लेअर आहे स्पिनचा.
कोहलीची आजची ईनिंग चांगली होती पण थोडे ओवरट्राईंग मध्ये अडकल्यासारखा वाटला. अॅवरेज बॉल्सवर ज्या त्याच्या रेग्युलेशन बाऊंड्री शॉट असतात त्यात ओवरट्राईंग मुळे नेहमीपेक्षा स्मूथनेस कमी होता. पण वुडला पाठोपाठ मारलेल्या सिक्स खरच अमेझिंग होत्या.
रोहित कॅप्टन असता तर अत्यंत
रोहित कॅप्टन असता तर अत्यंत चतुराईने क्षेत्ररक्षण लावून आणि कल्पकरित्या गोलंदाजी बदलून सामना जिंकवला असता.
*रोहित कॅप्टन असता तर * -
*रोहित कॅप्टन असता तर * - चेंडू स्विंग व बाउंस होत होता, आपली फलंदाजीची पाळी पहिली होती - रोहित तें बदलूं शकला असता का ?
आपलं हवामान उष्ण व कोरडं असुनही आपण अशा विकेट भर उन्हाळ्यातही बनवूं शकतो, हेंही कळलं या सामन्यामुळे.
चहल खूप predictable झालाय,
चहल खूप predictable झालाय, IPL मध्ये पण सगळयांनी त्याला खेळलाय आणि तो गुगली अजिबात टाकत नाही. कुलदीप ला त्याच्या एवढे chances मिळायला हवे होते, असो, भारताने दुसरे गोलंदाज try करायला हवे. चक्रवर्ती चांगला वाटतो पण नवीन फिटनेस लेवल त्याला या वयात गाठणे थोडे कठीण आहे कारण तो प्रोफेशनल प्लेअर नाहीये. रवी विषनोयी ला संधी देऊन बघायला हवी
फिटनेस टेस्ट पास करूनही जर
फिटनेस टेस्ट पास करूनही जर पर्फॉर्मंस करत नसेल तर काय कामाचा फिटनेस... चहलची फिल्डिंगसुद्धा डोकेदुखीच आहे...
पंत ऐवजी विराट बाद झाला असता
पंत ऐवजी विराट बाद झाला असता तर ... पुर्ण मैदान डोक्यावर घेऊन थयथयाट केला असता...
ठाकुर कडुन चुक झाली १२ व्या षटकात... ओवर थ्रो ची, तर त्याला चक्क शिवीगाळ केली...
कोहलीने आत्मपरीक्षण करायला
कोहलीने आत्मपरीक्षण करायला हवे की आपल्या कॅप्टनशिपखाली प्लेयर्स घाबरून का खेळतात.
*कोहलीने आत्मपरीक्षण करायला
*कोहलीने आत्मपरीक्षण करायला हवे * - त्याच्या सदाचं बालीश दांत ओठ खावून खुन्नस दाखवण्याचं इतर देशातल्यानी ' intensely competitive ', ' passion for winning ' इ.इ. म्हणून कौतुक केलं व कर्णधार म्हणून इथल्या कोणी त्याला झापला नाही. त्यामुळे, त्याला आहे त्या स्वत:च्या प्रतिमेचं कौतुकच वाटत असावं.
बरोबर भाऊ.
बरोबर भाऊ.
कोहलीने किशन आणि पंतच्या गळ्यात हात टाकून पीच वगैरे ऊभे राहणं हे सुद्धा अतिशय अनप्रोफेशनल आणि तेवढंच खोटं वाटलं.
ईशान किशनला अॅनिमेटेड बॉडी लँग्नेज सहित शिव्यांची लाखोली वाहतांनाचा (तेही एकदा नव्हे दोनदा) कोहली अगदी दोनेक वर्षे सुद्धा जुना नाहीये. कोहली तेव्हाही क्रिकेटमधला बडे प्रस्थ होता आणि किशन ऊगवता खेळाडू, पण गल्लीतल्या राऊडी प्लेअरसारखी कोहलीची वागणूक होती. कोहलीला रोखणारे तेव्हाही कोणी नव्हते आणि आताही कोणी नाही. कुंबळे, गंभीर वगैरे लोकांनी मनमानी विरूद्ध पावित्रा घेतला तर त्यांना अज्ञातवासात जावे लागले. त्याच्या पॅटर्निटी लीवबद्दल बोलल्ल्याने गावस्करही आता कुंबळेच्या मार्गाने जाण्याची शक्यता आहे...अर्थात गावस्करचा समालोचनापुरताच सहभाग असल्याने त्यांचे फार काही नुकसान होणार नाही.
शास्त्रीतर ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या टाईप्स प्रकार आहे.
आणि ह्यावर कडी म्हणजे कोहली म्हणतो एबीडी माझा क्रिकेट सोलमेट आहे...पुन्हा दुटप्पी बोलणे. एबीडीने कधीही कोणाला असे वागवलेले पाहिलेले नाही.
आपल्य खेळपट्ट्यांचा अंदाज
आपल्य खेळपट्ट्यांचा अंदाज आपल्यापेक्षा इंग्रज अचूक लावतात असे दिसले. ४- ५ जलदगती गोलंदाज घेऊन खेळले. आपण आपल्या पंड्याच्या आखूड टप्प्याच्या मार्यावर विसंबून! आणि चहलच्या फिरकीवर. राहूल त्या मैदानात यशाने सलग ३र्यांदा हूल दिली. आज काही बदलाची शक्यता आहे का?
इंग्रजांकडे आर्चर, वूड सारखे गुडलेंग्थवरून चेंडू उसळविणारे गोलंदाज आहेत इथे आमची भिस्त एकट्या भुवीवर. बाकी गोलंदाज भुईवर.
कोहली अजुनी कर्णधार म्हणून सहकार्यांशी अपरिपक्वच वागतो. आधीचा कर्णधार धोनी किंवा बदली कर्णधार रहाणे वा रोहितच्या पार्श्वभुमीवर हे जास्तच ठळकपणे जाणवते!
*आज काही बदलाची शक्यता आहे का
*आज काही बदलाची शक्यता आहे का?* - मालिकेत 1-2 असं पिछाडीवर गेल्यावर आतां प्रयोग बंद होवून शक्यतो सध्या फाॅर्म असलेलेच खेळाडू खेळवले जातील. सूर्यकुमारला संधी देणं योग्य. पीचचा अंदाज घेवून भुवीच्या साथीला एखादा तेज गेलंदाज हार्दीकऐवजी यावा. चहलचया जागीं अक्षर येणयाची दाट शक्यता.
अशी टीम खेळवायला हवी
अशी टीम खेळवायला हवी
1 ईशान किशन
2 रोहीत
3 विराट
4 पंत
5 श्रेयस
6 हार्दीक
7 सुंदर
8 अक्षर
9 दीपक चहर
10 ठाकुर
11 भुवी
*अशी टीम खेळवायला हवी* - +1 .
*अशी टीम खेळवायला हवी* - +1 . ( हार्दीक किंवा सुंदर ऐवजी सूर्यकुमार यादवला संधी देणं कदाचित शक्य व योग्यही होईल. संघ कमकुवत न होतां आणखी एक चांगला पर्याय जोखून पहाता येईल ).
सुर्यकुमार ला हार्दिक किंवा
सुर्यकुमार ला हार्दिक किंवा सुंदर च्या जागी संधीं दिलीं तर 5 गोलंदाज च खेळवावें लागतील जे थोडेसे risky आहे, सुर्यकुमार ला घ्यायचे तर श्रेयस ला वगळावे लागेल ते पण योग्य नाही कारण श्रेयस चांगला खेळतोय
Pages