क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

"त्यानी उधळावी ना त्याच्या वागणयावर स्तुतिसुमनं " - बॅशिंग किंवा स्तुतीसुमनं इतके दोनच पर्याय आहेत का? it is irrelevant असाही ऑप्शन असेल की Happy असो.. कोहलीवर झालेले गटबाजीचे आणी स्वार्थी खेळाडू असण्याचे आरोप, शिवराळ भाषेबद्दल चं क्रिटीसीझम इथवरच माझा आक्षेप आहे.

टीम सिलेक्शन हा टीम मॅनेजमेंट चा निर्णय असतो. कॅप्टन जरी त्यातला महत्वाचा सदस्य असला तरी तो एकटाच सदस्य नसतो. प्लेयिंग ११ निवडताना स्वतःच्या आणि प्रतिस्पर्धी टीमच्या काँपोझिशन चा, कन्डीशन्स, पीच, फॉर्म, अनुभव, टीम बॅलन्स ह्या सगळ्याचा विचार होतो. किशन ला किंवा यादव ला खेळवण्या / न खेळवण्यामागे वैय्यक्तिक खुन्नस असेल हा आरोप पटण्यासारखा नाही.

मोठ्या खेळाडूंवर जवाबदार्या पण मोठ्या असतात. त्यांच यशापयश बरेच वेळा संघाच्या यशापयशाशी निगडीत असतं. 'स्वतःसाठी खेळतो' हा आरोप, गावसकर, तेंडुलकर, कोहली सगळ्यांवर झाले आहेत. पण त्यांचे मोठे स्कोअर्स झाले - सातत्यानं झाले, म्हणून त्यांना स्वार्थी म्हणणं योग्य नाही. त्यांचे स्कोअर्स टीम टोटल मधेच येतात, त्यांचे वेगळे स्कोअरबोर्ड्स ते घरून घेऊन येत नाहीत.

मैदानावर खेळाडूंच्या तोंडी शिवराळ भाषा असण्याचं जरी मी समर्थन करत नसलो तरी ती तशी नसावी / नसते हे मानणं अगदीच naïve वाटतं.

एक कॅप्टन म्हणून तो ज्या गोष्टी 'योग्य' करतो त्या 'अयोग्य' गोष्टींपेक्षा जास्त असाव्या म्हणून तो कॅप्ट्नपदी असावा. ज्या वेळी हा बॅलन्स उलटा होईल, तेव्हा त्याची कॅप्टन्सी पण जाईल.

पांड्याचे ऊदाहरण ह्यासाठी दिले की रेकॉर्ड, स्किल, मेहनत, फिटनेस एकीकडे आणि वागणूक दुसरीकडे. तुम्ही चुकीचे वागलात, बोललात तर बीसीसीआय अ‍ॅक्शन घेण्यास भाग पडू शकते. काही स्वार्थी कारणांमुळे त्यांनी आज ती घेतली नाही तरी दबाव आल्यास ती तिचा स्टँड बदलू शकते. आणि असा दबाव पब्लिक आणू शकते. जो न्याय पांड्या आणि राहुलला तोच कोहलीला त्याच्या वागण्यासाठी लावायला हवा.

कोहली हा विकणारा ब्रँड आहे हे च सत्य बीसीसीआय साठी महत्वाचे हे तुझ्या लक्षात येत नाही ही गम्मत आहे. तो विकत असेल तोवर कोहली काहीही बोलला तरी काडीचाही फरक पडणार नाही. >> ते सत्य आणि त्यातली गम्मत काहीही असो...मुद्दा कोहलीचे वागणे वर्बल अब्युज प्रकारात मोडते का, मोडत असल्यास ते योग्य आहे का आणि योग्य नसल्यास त्याने ते बदलावे का? हे मान्य करणे हा आहे.

त्याचे वागणे जसे आहे तसे आम्हाला आवडते आणि त्यात आम्हाला काही ऑफेन्सिव वाटत नाही असा जर आपला स्टँड असेल तर 'वी कॅन अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री' Happy

बीसीसीआय न्यायालय नाही . त्यांना सोयीस्कर भूमिका ते घेत आले आहे, घेत आहे नि घेत राहील. तुझ्या अपेक्षा अवाजवी आहेत.

मुद्दा कोहलीचे वागणे वर्बल अब्युज प्रकारात मोडते का >> ह्याचे उत्तर फक्त ते खेळाडू देऊ शकतात ज्यांना तुझ्या मते तो अब्युज करतो आहे. तू किंवा मी नाही, जे फक्त टी व्ही वर दिसणार्‍या चार घटकांवरून इमारतींचे इमले बांधतात. जोपर्यंत त्यापैकी कोणी मला कोहली ने वर्बल अब्युज केले आहे असे पब्लीकली सांगत नाही तोवर "कोहलीचे वागणे वर्बल अब्युज प्रकारात मोडते का" ह्याचे उत्तर फक्त ज्याच्या त्याच्या पर्स्पेक्टीव्ह वर ठरत राहील. तू म्हणशील की कोहलीच्या ऑराला घाबरून असे कोणी बोलणार नाही तर तेही मान्य आहे. पण जर खरच अब्युज असह्य असेल तर कोणी तरी माईचा लाल बोलेलच अशी माझी खात्री आहे. आणी कोणी बोलत नसेल तर निव्वळ दहशत हे एकच कारण असेल नि त्याच्या इतरत्र वागण्या-बोलण्यातून त्यांना 'ही फक्त खेळातली इंटेसीटी आहे - पर्स्नल नाही' ह्याची खात्री वाटात असेल असा संशयाचा फायदाही मी कोहली ला तोवर नक्कीच देईन.

मोडत असल्यास ते योग्य आहे का आणि योग्य नसल्यास त्याने ते बदलावे का? >> ह्याचे उत्तर माझ्या दिल्ली मधल्या जिवलग मित्राच्या शब्दात द्यायचे तर It took me NN years to be what I'm and I am not changing what it is for you, abcabc" (abcabc च्या जागी तुझ्या सेंसिबिलीटीला झेपतील असे शब्द समूदय तू घालून घे. ) कोहली हेच उत्तर देईल ह्याची मला खात्री आहे. Happy

टीम सिलेक्शन हा टीम मॅनेजमेंट चा निर्णय असतो. कॅप्टन जरी त्यातला महत्वाचा सदस्य असला तरी तो एकटाच सदस्य नसतो. >> ईन थिअरी हे खरे असले तरी कुंबळेला कोच पदावरून हटवण्यात आणि शास्त्रीला घेण्यात फक्त आणि फक्त कोहलीचा हात होता. सचिन, सौरव, लक्ष्मण ह्यांनी अनेकांचे ईंटर्व्यू घेतल्यानंतर शास्त्रीला रिकमेंड केलेले नसतांनाही कोहलीने हट्टाने हे घडवून आणले. दोनेक वर्षांच्या कोच निवडीत ही मनमानी तर एखाद्या दिवशीचे टीम सिलेक्शन किस झाडकी पत्ती असेल ह्याची कल्पना मला येऊ शकते.
तरीही मी कोहलीवर टीम सिलेक्शनमध्ये पक्षपात करतो हा आरोप कधीही केलेला नाही. माझे ऑब्जेक्शन त्याच्या मैदानावरच्या हॉट हेडेड वागणुकीला आणि मैदानाबाहेरच्या दुटप्पी वागणुकीला आहे जे आपण अनुष्का प्रकरणासंदर्भात बोललो.

स्वतःसाठी खेळतो हा आरोप मी सुद्धा कोणत्याच खेळाडूवर आजवर केला नाही. 'स्वतःसाठी खेळणे' (म्हणजे नेमके काय?) असा काही प्रकार अस्तित्वात आहे असेही मला खरे वाटत नाही. फॉर्म नसल्याने अतिसावध खेळणे, प्रेशर खाली फ्रीज होणे, काही वेगळे करायला जातांना ऑब्विअस आणि बेसिक चुका होणे, नरव्हस नाईंटीज वगैरे वगैरे खेळाचा भाग आहे. त्यात काही सेल्फिश मला वाटत नाही.

एक कॅप्टन म्हणून तो ज्या गोष्टी 'योग्य' करतो त्या 'अयोग्य' गोष्टींपेक्षा जास्त असाव्या म्हणून तो कॅप्ट्नपदी असावा. ज्या वेळी हा बॅलन्स उलटा होईल, तेव्हा त्याची कॅप्टन्सी पण जाईल.>> अरे मी कोहली कॅप्टन नसावा किंवा त्याला पदावरून काढून टाकावे असेही आजिबात म्हंटले नाही. त्याला त्याच्या वागणुकीबद्दल समज मिळावी आणि ती त्याने बदलावी एवढीच अपेक्षा आहे. आयपीएल मध्ये फेअर प्ले पॉईंट्स असतात, त्याअंतर्गत असे वागणे मॉनिटर केल्या जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय सामन्यात अशा वागणुकीसाठी डीमेरिट पॉईंट्स ची अंमलबजावणी करता येऊ शकते.
एक 'अयोग्य' गोष्ट अतिशय यशस्वी सीईओंना पायऊतार व्हायला पुरेशी असते...कंपनी कितीही योग्य रितीने चालवल्याने प्रॉफिटमध्ये असली तरी. राहुलनेही एकच अयोग्य गोष्ट केली तरीही त्याच्यावर डिसिप्लिनरी अ‍ॅक्शन घेतल्या गेली. हरभजन सिंग आणि सायमंड्स ...शिवराळ भाषेवरूनच (तेरी मां की चा विपर्यास केला वगैरे कथा माहित आहे) डिसिप्लिनरी अ‍ॅक्शन घेतल्या गेली ना?

. आणी कोणी बोलत नसेल तर निव्वळ दहशत हे एकच कारण असेल नि त्याच्या इतरत्र वागण्या-बोलण्यातून त्यांना 'ही फक्त खेळातली इंटेसीटी आहे - पर्स्नल नाही' ह्याची खात्री वाटात असेल असा संशयाचा फायदाही मी कोहली ला तोवर नक्कीच देईन. >> सगळे अर्ग्यूमेंट टेक्निकॅलिटीच्या बेसिसवर मान्य, 'आमच्याकडे जोवर कोणी तक्रार दाखल करत नाही तोवर आम्ही अ‍ॅक्शन घेऊ शकत नाही' हे 'पोलिसींग ईनॅक्शन', 'स्टॅटस को' टाईप्स अर्ग्यूमॅम्ट झाले. ह्याने पोझिशनवरच्या व्यक्तीच्या वाईट वागणुकीला खतपाणी मिळत राहते हे क्रिकेटेतर आयुष्यातही वेळोवेळी सिद्ध झाले आहे. खेळाचे व मैदानावरच्या वागणुकीचे सगळे नियम व शिक्षा rulebook मध्ये लिहिलेल्या आहेत. फक्त त्यांची अंमलबजावणी करण्याची इच्छा आणि धमक कोणितरी दाखवायची गरज आहे.

कोहली हेच उत्तर देईल ह्याची मला खात्री आहे. Happy >> Happy तुला कोहलीचा अ‍ॅटिट्यूड, स्वॅग वगैरे म्हणायचे आहे ते कळाले. ह्या अ‍ॅटिट्यूड मुळे तो यशस्वी झाला आणि त्यामुळे भारताने क्रिकेट मध्ये सध्याचे स्थान बनवले असे तुला सुचवायचे असेल तर ह्या क्वालिटीज नसणार्‍या अनेकांनी आपापल्या टीम्सना सर्वोच्च्य स्थानावर नेले आहे हे लक्षात घे. अलिकडच्या काळात स्टीव वॉ, रणतुंगा, ईम्रान, गुच, धोनी, कपिल आणि अनेक सगळे...अगदी रोहित आणि रहाणे सुद्धा. तर यशस्वी होण्यासाठी ह्या दिल्ली बॉय पर्सनॅलिटी ट्रेट्स जरूरी आहेत असे तुझे म्हणणे असेल तर ते खचितच चुकीचे आहे.

युद्धात सेनापती आपल्या सेनेची पीछेहाट होतांना बघून तिला प्रोत्साहन देतो की शिव्या शाप? Happy . लाईव टेलिविजनवर कोहलीच्या शिव्या खाऊन कोणाला अजून चांगला परफॉर्मन्स करायला चेव येत असेल तर मग 'वावा! छानच आहे की' असेच म्हणावे लागेल Happy

कोहली मधल्या काळात जरा सुधारला होता पण कदाचित टेस्ट मध्ये रहाणे आणि T20 मध्ये रोहित ला कप्तान करा असं लोक, समालोचक बोलायला काय लागले त्यामुळे असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे त्यामुळे जरा जास्तच अग्रेसिव अप्रोच झाला आहे.
सचिन वर झाले ही असतील आरोप की स्वतः साठी खेळतो पण आपल्याच खेळाडूंना शिवीगाळ करत नव्हता आणि मुद्दा हा आहे.
विराट ची फलंदाजी आवडते पण असं अती वागणं नक्कीच स्पृहनीय नाही.

अलिकडच्या काळात स्टीव वॉ, रणतुंगा, ईम्रान, गुच, धोनी, कपिल आणि अनेक सगळे...अगदी रोहित आणि रहाणे सुद्धा. तर यशस्वी होण्यासाठी ह्या दिल्ली बॉय पर्सनॅलिटी ट्रेट्स जरूरी आहेत असे तुझे म्हणणे असेल तर ते खचितच चुकीचे आहे. >> स्टीव वॉ, रणतुंगा, ईम्रान, गुच, धोनी, कपिल आणि अनेक सगळे...अगदी रोहित आणि रहाणे हे सगळे वागण्यामधे एकाच प्रकारचे खेळाडू होते असा तुझा समज आहे का ? ह्यांच्याव्यतिरिक्त पाँटिंग, लॉईड, रिचर्ड्स, बेनॉ, ब्रॅडमन, गंगू, कारदार, ग्रेस, नायडू, पतौडी इत्यादींनी अत्युक्रुष्ट सांघिक कामगिरी केलेली आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती हा साधा प्रकार असताना सगळ्यांनी एकाच प्रकारे वागावे हा अट्टाह्हास का नक्की ? हे क्रिकेट च्या रुलबुक मधे आहे ? कोहली ने कधीही 'मी आदर्श व्यक्ती आहे' असे ही म्हटल्याचे मला आठवत नाही.

युद्धात सेनापती आपल्या सेनेची पीछेहाट होतांना बघून तिला प्रोत्साहन देतो की शिव्या शाप? >> ईतर खेळाडू अगदीच बावळट असतात नि फक्त मैदानात होते तेव्हढेच खरे असेच धरुन वागतात असे तुला का वाटते नक्की ? साधा विचार कर. कोहली दहा वर्षे खेळतोय. तो ह्या स्टेटसला आठ वर्षे पोहोचलाय असे धर. एव्हढ्या वर्षांमधे एकही माईचा लाल निघाला नाही ज्याने त्याच्यावर तो म्हणतो ते आरोप केले आहेत. असे का असेल असे तुला वाटते ? त्याने कट कारस्थान करून काढलेल्या सो कॉल्ड खेळाडूंनी सुद्धा अस आरोप केल्याचे मी वाचले नाही. धोनीकडून एक चकार शब्द नाही. मांजरेकर किंवा गावसकर सारख्या स्पेड ला स्पेड म्हणणार्‍यांनी सुद्धा कधी एका शब्दाने उल्लेख केला नाहीये. आपल्याला दिसते त्यापलीकडे काहीच असू शकत नाही हा अट्टाहास का नक्की ? समोरच्याला संशयाचा फायदा अजिबात द्यायचा नाही ह्यातून वर फेरफटक्याने ठेवलेला ठपका च सिद्ध होतो बाकी काही नाही. बर एकंदर संघाची कामगिरी वाईट होते आहे , संघ तळागाळाला गेलेला आहे असे म्हणावे तर तसेही नाही . रीझल्ट हवे तसे आहेत तर त्याला मारून मुटुकून आदर्श व्यक्ती चा मुकुट घालायाची सक्ती कशाला बाबा ?

मी आधीही स्पष्ट म्हटलय की जेंव्हा खराब खेळेल किंवा संघ बोंबलेल तेंव्हा उडवा/उडेल त्याची दांडी. That's totally fair. पण त्याने आमच्या अपेक्षेप्रमाणेच बदललेच पाहिजे असा आग्रह का ? त्याला वाटले तर बदलेल नाही तर नाही. If he is ready to face consequences for his actions, नक्की प्रॉब्लेम काय आहे ?

प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो आणि कर्णधार पणाची शैली पण वेगळी असते कोणी स्लेजिंग ला उत्तर देतो जसे की गंभीर तर कोणी दुर्लक्ष करतो द्रविड. इमरान खान ची शैली पण aggresive होती आणि तो पण शिविगाळ करायचा, पण पाकिस्तानचा च नाही तर जगातील एक सर्वोत्कृष्ट कर्णधार गणला जातो

एकटं विराट नेच भारतीय संघाला एक नंबर बनवला आहे असं ?
कर्णधार म्हणून यशस्वी झाला कारण बाकी खेळाडूंनी संघाला विजय मिळवून दिला आहे.
कोणी ना कोणी मोक्याच्या क्षणी खेळला आहे. दुर कशाला मागच्या सामन्यात असा खेळाडू ३ नंबर ला उतरवला ज्यांला एक सामना खेळवुन बाहेर काढलं होतं इतकी महत्वाची मॅच की हरलो तर सिरीज जाणार. नशीब की तोच चालला.
नंबर एक ?... दोनपेक्षा जास्त संघ असताना कितीवेळा जिंकवल विराट ने ? RCB सारखी भारतीय संघाची अवस्था केली आहे. फलंदाजी येते त्या गोलंदाजांना संघात घेणार.
बुमराह नाही तरी नटराजन बाहेर... T20 साठी लायक आहे तो...
याला शार्दुल हवा का तर फलंदाजी करतो...

नटराजन injury rehabilitation साठी बंगलोर NCA ला होता, तो उशिरा अहमदाबाद ला पोचला. तो quarantine होता म्हणून पहिल्या 4 सामान्यांसाठी उपलब्ध नव्हता आता अखेरच्या सामना आणि तीन एकदिवसीय सामान्यांसाठी उपलब्ध आहे पण त्याला या सामन्यात खेळावण्याची शक्यता कमी वाटते

सध्या आपली टीम नविन स्ट्रॅटेजी ट्राय करतेय अस वाटत. ८- ९ नंबर पर्यंत फलंदाज असताना स्लॉग सुरूवाती पासूनच चालू करायचा. सेटल व्हायला दोन तीनच बॉल अलाउड. या पद्धतीत इशान, पंत, सूर्यकुमार बसतात. रोहितला सुद्धा ड्बल अप व्हायला सांगितलेले दिसते.
भारतात नक्की जिंकायचे असेल तर प्रत्येक वेळी १८० - १९० + स्कोअर हवा.

If there is a team who chase mammoth totals easily, that's England. मजा येणार आहे बघायला. विकेट्स गेल्या रेग्युलरली तर खरा कस लागेल.

*भुवी च झाला... सामनावीर* -
सदाचं दुखापतग्रस्त होण्याचं दुर्दैव या अत्यंत गुणी गोलंदाजाच्या नशिबी कां यावं ! तरीही, प्रत्येक वेळी पुनरागमन करून हा आपल्या प्रतिभेची व जिद्दीची झलक दाखवतोच ! आतां अखंडपणे त्याची गुणवत्ता बहरत रहावी म्हणून त्याला खास शुभेच्छा !!

क्लिनिकल परफॉर्मन्स होता फायनलमधला.
रोहित आणि विराट ओपनिंग कॉम्बिनेशन आवडलेच...आणि त्यामागचा विचार सुद्धा.
एकदा दोघांच्याही अरली डिपार्चर नंतर मिडल ऑर्डरने सांभाळलेला डाव बघायला आवडले असते. सिमिलर सिनॅरिओमध्ये पहिल्या मॅचमध्ये अय्यरची खेळी आश्वासक होती..आता पुन्हा तशा सिनॅरिओमध्ये वर यादव आणि खाली जडेजा आल्यावर पार स्कोर अचिव होऊ शकतो ह्याचा विश्वास वाटतो.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे रोहित आणि विराट ओपनिंग कॉम्बिनेशनमुळे थिंक टँकला सहा बोलिंग ऑप्शन खेळवण्याची ईच्छा आणि सुबुद्धी झाली हे खुपच मोठे पॉझिटिव झाले. सहा बोलिंग ऑप्शनमुळे बुमरा/भुवी पैकी ज्याचा दिवस चांगला आहे तो पावर प्ले बोलर ११-१५ मध्ये सुद्धा एखादी ओवर टाकू शकतो. फायनल मध्ये भुवीने १३ व्या ओवरमध्ये येऊन बटलरची विकेट काढली हे फक्त नटराजनच्या रूपाने सहावा बोलिंग ऑप्शन असल्याने शक्य झाले. नाही तर सुंदरला पुन्हा बटलरसमोर ऊभे करण्याशिवाय पर्याय नव्हता.
एकंदर ओपनिंग पेअर संदर्भात केलेल्या प्रयोगांची सांगता पॉझिटिव आऊटकम ने झाली, यादवला त्याच्यासाठी आयडियल स्पॉट मिळाला, धवन ऐवजी राहुल स्टँडबाय ओपनर आणि यादव/अय्यर/पंतला किशनच्या रूपाने एक स्टँडबाय ऑप्शन हा बॅलन्स चांगला आहे.
पांड्यासाठी पुन्हा वर्कलोड मॅनेजमेंट करावी लागणार असे दिसते आहे...याच्या कॅलिबरचा एक ऑलराऊंड ऑप्शन ह्या आयपीलमध्ये मिळाल्यास सोन्याहून पिवळे.
स्पीनमध्ये मात्र एखाद-दुसरी मॅच काढून देणारा नवा मिस्र्टी स्पीनर आवश्यक आहे असेच दिसते. चक्रवर्ती किंवा बिष्नोईने हा पर्याय आयपील मधून ऊपलब्ध करून दिल्यास भारताची टीम ईतर कुठल्याही टीमच्या मनात धडकी भरवणारी ठरेल ह्यात वादच नाही.

मांजरेकर किंवा गावसकर सारख्या स्पेड ला स्पेड म्हणणार्‍यांनी सुद्धा कधी एका शब्दाने उल्लेख केला नाहीये. >> 'देन यू आर नॉट रिडींग बीटवीन द लाईन्स' असे म्हणतो. गावस्करने ओढलेले ताशेरे ढीगाने सापडतील.

मी आधीही स्पष्ट म्हटलय की जेंव्हा खराब खेळेल किंवा संघ बोंबलेल तेंव्हा उडवा/उडेल त्याची दांडी. That's totally fair. पण त्याने आमच्या अपेक्षेप्रमाणेच बदललेच पाहिजे असा आग्रह का ? त्याला वाटले तर बदलेल नाही तर नाही. If he is ready to face consequences for his actions, नक्की प्रॉब्लेम काय आहे ?
Submitted by असामी on 19 March, 2021 - 23:13 > आग्रह ह्यासाठी की मोस्ट ऑफ द पब्लिक क्रिकेट बघायला येते कोहलीला नाही. कोहली हा त्या क्रिकेटचा महत्वाचा पण लहानसा भाग आहे. स्वत:च्या ईमोशन्सपुढे जाऊन क्रिकेटप्रती त्याची जबाबदारी आहे, त्यात तो कॅप्टन आणि लीजेंडरी स्टेटसचा असल्याने ही जबाबदारी जास्तच आहे असे माझे मत.
जर तुला त्याने कारण नसतांना पॅवेलिअनकडे निघालेल्या बटलरची खोडी काढून त्याला प्रोवोक करून अंपायरला मेडल करावे लागेल ईथपर्यंत सिचुएशन एस्कलेट केलेली दिसले नसेल तर आधी म्हणालो तसे तू...'आपला तो बाब्या' मोडमधून काही मोठे घडून आल्याशिवाय बाहेर येणार नाहीस हे मला कळते आहे Happy
वूडच्या बाऊंसरवर त्याने हूक ची सिक्स मारल्यावर दिलेले एक्स्प्रेशन तर फारच अशोभनीय होते.

जर तुला त्याने कारण नसतांना पॅवेलिअनकडे निघालेल्या बटलरची खोडी काढून त्याला प्रोवोक करून अंपायरला मेडल करावे लागेल ईथपर्यंत सिचुएशन एस्कलेट केलेली दिसले नसेल >> हे तो फक्त एकटाच करतो का ? क्रिकेटच्या इतिहासामधे हे फक्त कोहलीनेच केलय का ? आयसीसी ला ह्या प्रॉब्लेम वाटत असेल तर नक्की पेनल्टिमेट पॉईटंस मिळतील त्याला. बॅनही येईल. If he is ready to face consequences for his actions, इथे प्रश्न मिटला पाहिजे . अमक्याने कप्तान असे ल तर असेच वागले पाहिजे नि तसेच वागले पाहिजे हे कुठे लिहिलेले आहे का ? प्रोटोकॉल वगैरे ठीक आहे पण प्रोटोकॉल हा नेहमीच कायम असल्याचे मला आठवत नाही. बाद झाल्यावर 'लोक मला बघायला येतात, तुझे अंपायरीम्ग नाही ' अशी अंपायरला धमकी देणारा ग्रेस बाबा - हि क्रिकेट लीजंडस ची सुरूवात होती ह्या गोष्टी ची नम्र आठवण करून देतो.

हे तो फक्त एकटाच करतो का ? क्रिकेटच्या इतिहासामधे हे फक्त कोहलीनेच केलय का ? >> अरे पण तो लीजेंड आहे असे तूच म्हणालास ना. मग आता त्याला 'त्या तमक्याने केले म्हणून हा पण करणार' असे दुसर्‍या प्लेअर्सच्या रांगेत कशाला बसवायचे?
आणि प्रत्येक बिहेविअर पनिशेबल बाय अ‍ॅक्शन असेल तोवर टॉलरेट, जस्टिफाय करायचेच असे थोडीच असते. खेळाचे स्पिरिट, अ‍ॅथलीट्स कोड ऑफ शिवलरी म्हणून काही प्रकार असतो ना. खेळात विजिगिषु वृती असणे वेगळे प्रत्येकवेळी विजिगिषु वृत्तीच्या पडद्याआड अ‍ॅरोगंटली बॅड बिहेविअरचे प्रदर्शन करणे वेगळे.
अश्याचच अ‍ॅटिट्यूड मधून पाँटिंगचा माजोरडा ऑस्ट्रेलियन संघ ऊदयाला आला होता. सगळे काही जिंकूनही तो फॅन्सच्या बॅड बुक्समधेच राहिला.

आता एक असा विचार करून बघ रोहित कॅप्टन आहे आणि त्याने विराटला मिसफील्ड बद्दल वा सोडलेल्या कॅचबद्दल शिव्या घातल्या तर त्याचा स्टॅचरचा प्लेअर ते खपवून घेईल का? जर तो ते खपवून घेणार नाही तर ईतरांनी का म्हणून घायचे? त्याने ठाकुरला शिव्या घातल्या तश्या तो बुमराला घालेल का? किशन आऊट झाल्यावर दाखवलेले अशोभनीय वर्तन तसे तो धोनीला दाखवेल का? विल्यमसन एकदा आऊट झाल्यावर त्याने असेच अपशद्ब वापरलेले (ज्यावर बर्‍याच दिग्गज लोकांनी नापसंती व्यक्त केली होती. 'ते ईंटेसिंटीमधून घडले 'अशी नेहमीची लंगडी सबब देत सारवासारव त्याने केली) विल्यमसनला जशी वागणूक दिली तशी तो डीविलिअर्स साठी वापरेल का? एवढ्यात स्टोक्स आणि बटलरला त्याने प्रोवोक केले तसे तो आता मॅक्सवेल आणि फिंचला करेल का?...नाहीच करणार.
ही ईंटेशनली पिक्स अप ऑन पीपल... असे बुलिंग करणे ही त्याची ईमोशनल नीड आहे असेच दिसते.

अरे पण तो लीजेंड आहे असे तूच म्हणालास ना. >> म्हणजे तू नाही म्हणत आहेस का ? माझ्यापुरता क्रिकेटर लीजेंड आहे वागणूकीचा लीजेंड म्हणून मी कोहलीच काय कोणाकडेच बघत नाही. तुझी अपेक्षा कोहली ने आदर्श व्यक्ती म्हणून वागावे अशी आहे. 'त्या तमक्याने केले म्हणून हा पण करणार' असे नाही पण 'ह्याने हेच का केले' ह्याला माझे ऑब्जेक्शन आहे. मी तरी त्याला सिलेक्टिव्हली अ‍ॅब्युज केलेले पाहिले नाही. चूक झाल्यावर त्याला दणकून शिव्या घालायच्या नि मोकळे व्हायचे हा त्याचा खाक्या आहे. किशनचा बुलिंग दिसले पण तयाअधी मारलेली मिठी दिसली नाही तुला ? किती वेळा चहरला मिस्फिल्ड नंतर भकारी शिव्या दिलेल्या दिसल्या नाहीत का ? ठाकूर च्या ऑसी मॅच नंतर त्याला दिलेली दाद दिसली नाही ? तुला जे हवे तेच तू बघतोयस.

असो. मला कंटाळा आल आता. तुला कोहली बद्दल काय प्रॉब्लेम असतील त्या तू थेट त्याला त्याच्या ट्वीटर वर कळवू शकतोस.

खेळाडूंना कोहली बद्दल काय वाटते त्याचा आपण फक्त अंदाज लावतो, अश्विन खर तर त्याच्या गुड बुक मधला समजला जात नाही पण त्याने पण म्हटले की टेस्ट मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्या आधी कोहली आणि शास्त्री नी त्याला विश्वास दिला. कोहली सिलेक्टिव्ह abuse किंवा कौतुक करतो असे वाटत नाही

क्रिकेटिंग लीजेंड आहे आणि वागणुकीचा नाही हे काय कोडे आहे? माणूस असा हवा तसा गुण दोषांवर आधारित तात्पुरता वेगळा काढता येतो का? शिवाय वागणुकीतला लीजेंड असे कोण असते? संत लोक? द्रविड/लक्षमणला जंटलमन क्रिकेटर्सचा मापदंड मानले तर त्यांचेही मैदानावर खटके ऊडालेलेच आहेत. ते ऊडूनही त्यांच्या वागणुकीवर कोणी बोट ठेवत नाही. 'असे का?' त्याचे कारण समजणेही अतिशय सोपे आहे.

पुन्हा, क्रिकेटिंग लीजेंडस आदर्शवत वागतात असेही कोणी म्हणत नाहीये. आपल्या फेलो टीममेट्सना आणि अपोझिशन प्लेअर्स ना जो आदर आपल्याला मिळणे अपेक्षित आहे त्याच आदराने ट्रीट करणे ह्या भावनेला कुठलेही लीजेंडरी स्टेटस लागत नाही. आपण ज्यांना सहज दाबून टाकू शकतो थोडक्यात ' क्रिकेटमधल्या अजून सेकंड क्लास सिटिझन्सना' आधी भकारी शिव्या देऊन नंतर मिठ्या मारणे, थोडक्यात आपल्याला वाट्टेल तसे वागवणे ह्यालाच authoritarian regime म्हणतात. जिथे हा authoritarian regime चालून घेतला जात नाही तिथे कुंबळे, गंभीरसारखी प्रकरणे होतात. ईतरांचा अपमान करणे आणि त्यांना प्रेम दाखवणे ह्याच्याही आधी त्यांच्याप्रती आदरभावना दाखवणे हे बेसिक जेस्चर आहे. क्रिकेटचा खेळ तुम्हाला अपमानही मागत नाही आणि प्रेमही मागत नाही, आदर जरूर मागतो.
तू त्याचे स्कील, भावभावना सिलेक्टिवली मिक्सअप करून त्याचे बॅड बिहेविअर जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करतो आहेस.

Pages