क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

कोण इंपॅक्ट प्लेअर नाहीये? >> शब्दात अडकून बसू नकोस रे. रोहित जेंव्हा खेळतो तेंव्हा मॅच एकहाती जिंकून देतो हे मान्य आहे का ? असेल तर पुढे बोलू. बाकी तुझ्या पोस्ट मधले हे वाक्य आल्यावर "ह्यांचा कन्सिसटन्सी डेटा विरळ आहे किंवा आजिबातच नाही " पुढचे काही वाचले नाही नि वाचणार नाही. " रोहित इंपॅक्ट प्लेयर आहे त्यामूळे नुसत्या आकडेवारी मधे बसवून त्याची निवड करणे - न करणे चूकीचे ठरेल" ह्यातून तू असे निष्कर्ष माझ्या डोक्यावर ठेवणार असशील तर माझ्याकडे काहीच उत्तरे नाहित. हॅव फन मेट. आय अ‍ॅम नॉट इंटरेस्टेड.

मी अर्ग्यू करत नाही रे! मला रोहित ईंपॅक्ट प्लेअर म्हणजे काय कळत नाहीये ..सो टेक ईट अ‍ॅज मी थिंकिंग आऊट लाऊड.
रोहित २२४ ओडीआय मॅचेसमध्ये २१ वेळा मॅन-ऑफ-द-मॅच आहे आणि कोहली २५० मॅचेस मध्ये ३६ वेळा.
अ‍ॅवरेज, स्ट्राईक रेट, शतके सगळेच स्टॅट्स कोहलीचे मोठ्या फरकाने रोहितच्या वरचढ आहेत.
ह्यावरून आता तूच ठरव एक हाती मॅच कोण किती जिंकून देते आणि ईंपॅक्ट प्लेअर कोणाला म्हणायचे. Wink

रोहित ने १६० रन्स केल्याने भारताने ८० रन्सने मॅच जिंकली काय आणि कोहलीने ९० रन्स केल्याने भारताने २० रनांनी मॅच जिंकली काय...बायनरी ईंपॅक्ट सारखाच आहे.
तू जो ईंपॅक्ट म्हणतो आहेस... तो गेल, डीविलिअर्स, मॅक्सवेल, पंत, धोनी, पंड्या ह्यांच्या खेळातून दिसतो...पण हा शॉर्ट लिव्ड फीनॉमेनॉन आहे एखाद्या मॅच पुरता वा सिरिज पुरता, तो खेळाडूला डीफाईन करत नाही.. रोहित प्रॉपर ईंनिंग बिल्ड करून खेळतो जसा कोहली खेळतो. दोघांपुढे पोझिशन मुळे येणारे चॅलेंजेस वेगळे असतात..पण तितकेच.

जसे फिरोज खान म्हणत असे 'आधी मला ईन्स्पॅक्टर करा, मग तुमच्या सिनेमाची कथा लिहायला घ्या' तसे काहीसे तुझे 'आधी रोहितला ईंपॅक्ट प्लेअर म्हणा..मग नंतर स्टॅट्स बघा' अर्ग्यूमेंट आहे' Proud

*बेटींग नि उरलेल्या गोष्टी सारख्याच दर्जाच्या वाटत असतील भाऊ तुम्हाला तर पुढे बोलणे खुंटले.* आंकडेवारी व विक्रम हीं जर क्रिकेटची सौंदर्यस्थळं असतील तर बेटींगलाही तसं म्हणणं तितकंच हास्यास्पद आहे' . त्यांचा इतर बाबतीत दर्जा वेगळा असला तरीही.
*डेटा सायन्स चा वापर करून केलेले विश्लेशण कळल्याने खेळाची समज वाढत नाही * - डेटा सायन्स शिवाय क्रिकेट खेळ म्हणून असूं शकतो ( व तो तसा कितयेक तपं होताही) पण आतां त्या खेळाचा पाया व गाभाच जणूं डेटा सायन्स आहे असं भासवण्याचा प्रयत्न चाललाय , तो आक्षेपार्ह वाटतो. कारण, क्रिकेटचं डेटा सायन्स खेळामुळे आहे, खेळ तयामुळे नाहीं. आंणि त्या खेळाची समज वाढणं खरं महत्वाचं. . एक छोटं उदाहरण-
एका 'गली'मधल्या क्षेतररक्षकाकडून एक उंच उडालेला सोपा झेल सुटला. गावसकरसहीत सर्व काॅमेंटेटरसनी तें अक्षम्य असल्याचं म्हटलं. पण गावसकर पुढें म्हणाला कीं तो झेल दिसला तितका सोपा नवहता. कारणं, फलंदाजाने जोरात 'चाॅप' केलेला चेंडू प्रचंड स्पीन होत असतो व हातात आल्यावर तो उसळी घेवून निसटणं शक्य असतं. हें झालं क्रिकेटची समज वाढणं. ( त्याऐवजी, गेल्या 5 वर्षात 'गली'मथे सुटलेल्या झेलांमुळे फलंदाजानी काढलेल्या धांवा किती, हें सांगणंच हल्ली बेसुमार वाढलंय !)

पण आतां त्या खेळाचा पाया व गाभाच जणूं डेटा सायन्स आहे असं भासवण्याचा प्रयत्न चाललाय , तो आक्षेपार्ह वाटतो. >> मला तसे जाणवले नाही तेंव्हा पुढे काही बोलू शकत नाही. " क्रिकेटचं डेटा सायन्स खेळामुळे आहे, खेळ तयामुळे नाहीं. " ह्याबद्दल दुमत अन्क्कीच नाही पण तुम्ही जेव्हढ्या तुसडेपणाने (असे वाटतेय - तसे असेल असे नाही) क्रिकेटचं डेटा सायन्स बघताय तेव्हढे तुच्छ ते नक्कीच नाही.

आंकडेवारी व विक्रम हीं जर क्रिकेटची सौंदर्यस्थळं असतील > >एक असा विचार करून बघा भाऊ. आंकडेवारी व विक्रम ह्या गोष्टी आहेत ज्या बर्‍यापैकी क्वांटीफायेबल आहेत. काही वर्षांनी जेंव्हा प्लेयर चे मूल्यमापन केले जाते तेंव्हा ह्याच गोष्टींच्या आधारावरून आपण त्याची एकंदर कामगिरी अजमावत असतो. मी ब्रेडमनला खेळताना बघितले नाही पण त्याची ९९ सरासरी मला तो काय चीज आहे हे सांगून जाते. त्याच्या खेळातले सौंदर्य त्यातून मला जाणवले .

बर्गा तुझ्या सोयीसाठी माझे मूळ पोस्ट (जे माझे मूळ विचार होते - तुला माझ्यावर बळेच थोपवलेले माझे विचार नव्हते)
"रोहित इंपॅक्ट प्लेयर आहे त्यामूळे नुसत्या आकडेवारी मधे बसवून त्याची निवड करणे - न करणे चूकीचे ठरेल. प्रत्येक टीम मधे असे १-२ इंपॅक्ट प्लेयर असतातच. बाकीचे कंसिस्टंटली खळेणारे नि अशा इंपॅक्ट प्लेयर चा ईम्पॅक्ट जेंव्हा जुळून येतो तेंव्हा मॅचेस जिंकल्या जातात (किंबहुना शक्यता वाढते असे म्हणून शकतो)"

ह्यात बोल्ड केलेले वाक्य पहा. 'रोहित हाच एकमेव इंपॅक्ट प्लेयर आहे ' किंवा 'कोहली हा इंपॅक्ट प्लेयर नाही' असे तुला मी ह्यातून लिहिले आहे असे वाटत असेल तर तो खरच माझ्या कमकुवत लिखाणाचा भाग समज ह्यापलीकडे मी तरी काय बोलणार रे ! माझ्यापुरते तरी इंपॅक्ट चा अर्थ अशी खेळी खेळू शकणारे खेळाडू ज्यांच्या खेळीचा परीणाम निव्वळ मॅच च्या आउटकम वर न होणे जरुरी नाही तर प्रतिस्पर्धी मोराल वर पण होऊ शकतो (किंवा कधी दोन्हींवरही) असा मी घेतो. घणाघाती हल्ला करणार्‍या बॅटस मन एव्हढाच चांगला वाटणारा चेंडू सहजपणे 'नॉट अ बिग डील' ह्या स्टाईल मधे रोहित सारखा खेळाडू एफर्ट्लेसली कमीत कमी कष्ट घेऊन सीमापार पाठवत असतो त्याचा इंपॅक्ट तेव्हढाच होतो.

बरं ठीक आहे. आजच्या आपल्या वन-डे टीममध्ये रोहित सोडून अजून दुसरा ईंपॅक्ट प्लेअर कोण आहे असे तुला वाटते ते तुझ्या बोल्ड केलेल्या वाक्यानुसार सांग पाहू.
प्रत्येक टीममध्ये एक दोन इंपॅक्ट प्लेअर असतात ह्याचाच अर्थ ऊरलेले नऊ-दहा ईंपॅक्ट प्लेअर नसतात असा होत नाही का?

बाकीचे कंसिस्टंटली खळेणारे नि अशा इंपॅक्ट प्लेयर >> ह्या वाक्याचा अर्थ कंसिस्टंटली खेळणारे वेगळे आणि ईंपॅक्ट प्लेअर वेगळे असा होत नाही का? कंसिस्टंन्सी का दुसरा नाम विराट कोहली हे सत्य नाही का? म्हणजे तुझ्या विचारांच्या मते विराटपेक्षा जास्त कन्सिस्टंट प्लेअर भारतीय टीम मध्ये असेल तर मला त्याची कल्पना नाही बुवा. विराट कंसिस्टंट आहे म्हणजे तो ईंपॅक्ट प्लेअर नाही असे तू म्हणतो आहेस असा सरळ साधा अर्थ नाही निघत का? की कोहली कंसिस्टंट ईंपॅक्ट प्लेअर आहे असे नवे अर्ग्यूमेंट आता तू करणार आहेस Proud

चार-सहा महिने मायबोलीवर न फिरकल्याने माझी मराठी भाषेची समज एवढीही काही कमकुवत झाली नाहीये रे Wink

बर्गा माफ कर, मी काहीही लिहिले तरी त्यातून तू फक्त तुला हवा तोच अर्थ काढत राहणार नि शब्दात पकडण्यापलीकडे तुझा काही उद्देश दिसत नाही हे उघड आहे. म्हणून मला खरच तुझ्या पोस्ट ला उत्तर देण्याची इच्छा नाहीये. तेंव्हा वर जे मी काही लिहिले आहे ते माझ्या अल्पमतीप्रमाणे आहे नि तुझ्यासारख्या भाषाप्रभू च्या विचारांच्या लायक नाही असे समज नि तुझा बहुमूल्य वेळ इतर कामात सतकारणी लाव अशी नम्र विनंती करतो.

माझी मराठी भाषेची समज एवढीही काही कमकुवत झाली नाहीये रे >> मी कुठे तुझ्यासारख्या माणसाच्या कुठल्याच समजेवर शंका घेणार रे बाबा ! माझ्या अल्पबुद्धी नि विचार न मांडता येण्याचा पद्धतीबद्दल मला काडीचीही शंका नाही . म्हणून मी तुला माझे म्हणणे समजावायचा वायफळ प्रयत्न करत होतो . ते किती चूकीचे होते हे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद .

अरे शब्दात पकडणे काय, भाषाप्रभू काय काहीही..असे काहीच मला म्हणायचे नाही.
साधासा तर प्रश्न आहे.. रोहित सोडून अजून आपल्या टीममधले जे तुला ईंपॅक्ट प्लेअर्स वाटतात ते कोण असे साधेसेच विचारले रे.
मॅच सर्वाधिक ईंपॅक्ट करणार्‍या खेळाडूसाठी मॅनऑफदमॅच हे साधेसरळ मोजमाप असतांना (बाय द वे MoM स्टॅटबेस्ड मेजर नाही) तू ईंपॅक्ट म्हणजे अजून काय वेगळे म्हणतो आहेस ते समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे.
एखादी एफर्टलेस शॉट वगैरे मारल्याने ईंपॅक्ट वगैरे होतो का मला माहित नाही पण सातत्याने डझनावारी ८०+ मीटर्स लांब सिक्स मारल्याने होतो ...म्हणून मी गेल, पंड्या धोनीला ईंपॅक्ट प्लेअर म्हणालो.

अजून एक साधासा प्रश्न...रोहित बरोबर तू आमलाला ईंपॅक्ट प्लेअर म्हणशील का? स्टॅट्स आणि पोझिशन्स बघितले तर एकाला झाकावा आणि दुसर्‍याला काढावा अशी स्थिती आहे. आमला रोहित एवढाच एफर्टलेस नजाकती प्लेअर आहे...पण त्याच्याबाबतीत मी तरी ईंपॅक्ट प्लेअर ही टर्म कधी ऐकलेली नाही.

"एखादी एफर्टलेस शॉट वगैरे मारल्याने ईंपॅक्ट वगैरे होतो का मला माहित नाही पण सातत्याने डझनावारी ८०+ मीटर्स लांब सिक्स मारल्याने होतो ...म्हणून मी गेल, पंड्या धोनीला ईंपॅक्ट प्लेअर म्हणालो." ह्या वाक्यावर थोडा विचार कर नि लक्षात येते का बघ. मला जे काही लिहायचेय ते मी वर लिहिलेय. ह्यापलीकडे माझ्याकडे अ‍ॅड करायला अधिक काही नाही रे बाबा. वर लिहिलेल्या मजकूरातून मला काय म्हणायचेय ते तुला लक्षात येत नसेल तर खरच जाऊ दे, ईग्नोर कर.

अरे सातत्याने लांब सिक्स-फोर वगैरे मारल्याने बोलरची लाईन लेंग्थ बिघडते ज्याचा बोलरवर आणि पर्यायाने मॅच वर ईंपॅक्ट होतो, हे जगजाहीर सत्य आहे की. युवराज-ब्रॉड आठव, जयसुर्या-प्रभाकर आठव, अफ्रिदी-जयसुर्या आठव, गिल्ख्रिस्ट-शोएब अख्तर, मॅक्युलमची पहिली आयपीएल मॅच, सचिन-ओलोंगा ई.. ई.. , त्याला म्हणतात इंपॅक्ट. जो तुझ्या माझ्या डो़ळ्यांना दिसतो. बोलरच्या ईकॉनॉमी मध्ये, बॅट्समनच्या स्ट्राईकरेट मध्ये मोजता येतो.

रोहितच्या एफर्टलेस शॉटने मॅचवर ईंपॅक्ट होतो म्हणजे नेमके काय होते हे मला अजूनही कळत नाहीये. हे अर्ग्यूमेंट लारा, गांगुली अगदी ईंझमामला सुद्धा लागू पडते ते तिघेही असे एफर्टलेस शॉट्स मारत... पण शेवटी त्यांच्या एकंदर ईनिंगमुळे मॅच जिंकत किंवा हरत ना. मायकेल बेवनने असे कुठलेही एफर्टलेस शॉट्स मारले नाहीत की ८० मीटर लांब सिक्स मारल्या नाहीत..पण त्याने कित्येक गेम मध्ये त्याच्या रन-अ-बॉल खेळीने जिंकत ईंपॅक्ट पाडला.
बोकलतच्या स्टॅट्सवरच्या अर्ग्यूमेंटला तू म्हणालास 'रोहित हा ईंपॅक्ट प्लेअर आहे' अ‍ॅज ईफ ईट्स अ युनिवर्सल ट्रूथ...स्टॅट्स असे काहीही सांगत नसतांना तो ईंपॅक्ट प्लेअर कसा ते विचारले तर तू म्हणतो आहेस तुझ्या विचारांप्रमाणे तो एफर्टलेस शॉट मारतो म्हणून तो ईंपॅक्ट प्लेअर...ठीक आहे पण मग ह्याच न्यायाने आपण आमला, ईंझमाम, गांगुली, द्रविड सगळ्यांनाच आपण ईंपॅक्ट प्लेअर्स म्हणुयात. Proud

रोहितच्या एफर्टलेस शॉटने मॅचवर ईंपॅक्ट होतो म्हणजे नेमके काय होते हे मला अजूनही कळत नाहीये. >> मी तुला वरच म्हटल कि तुला फक्त शाब्दीक वाद घालायचा आहे. आधी कोहली नि आता एफर्ट्लेस ह्या शब्दावर तू अडकून बसला आहेस. तू तुला हवे त्यांना हवे ते म्हणायला मोकळा आहेस रे बाबा. माझा तुला काहीच आग्रह नाही.

*त्याची ९९ सरासरी मला तो काय चीज आहे हे सांगून जाते. त्याच्या खेळातले सौंदर्य त्यातून मला जाणवले .** - मीं क्रिकेटच्या नोंदी ठेवणारी आंकडेवारी म्हणत नाहीय तर त्या माहितीचा अति विश्लेषणात्मक उपयोग करून अवडंबर माजवणारी आंकडेवारी म्हणतोय, याबद्दल शंका असणयाचं कारणच नाहीं. क्रिकेट हा मैदानी खेळ आहे, त्याचा कंप्युटर गेम करूं नये. इतर कोणताच मैदानी खेळ तसा झालेला नाहीं, होत नाहीं व होणारही नाहीं. .पेलेपासून आजच्या मेसी, रोनाल्डो पर्यंत फक्त त्यांच्या असामान्य प्रतिभेबददल , त्यांच्या खेळाचं तंत्र व शैली याबद्दलच बोललं जातं व फोकस त्यांचा खेळ पहाणयावरच असतो.

इंपॅक्ट प्लेयर ची डेफिनेशन काँपिटीशन , वेन्यू याचा मापदंड लावून ठरवता येतो का बघा. भारतात आणि बाहेर आपल्याच टीम मधील प्लेयर्स ची नाव बदलतील.
म्हणजे उदा, इंग्लंड मधे पुजारा फेल गेला तर आपण हरू अस असेल , किंवा बुमराच्या यशावर आपल भवितव्य अवलंबून असेल तर तेथे ते इंपॅक्ट प्लेयर होतील.
भारतात अश्विन फेल गेला तर आपण हरू. म्हणजे त्याचे यशापयश आपल्या यशाशी निगडीत आहे. मग कोहली, रोहीत कितीही खेळोत, अश्विन ने जास्त विकेटस नाही घेतल्या तर आपण नक्की हरू, अस असेल तर त्या काँपीटीशन समोर त्या त्या वेन्यूला इंपॅक्ट प्लेयर बदलेल.

पूर्वी गावस्कर खेळले नाहीत तर मॅच नक्की हरायचो, तसेच.

भाउ डेटा अ‍ॅनॅलिसिस हे क्रिकेटचा अविभाज्य भाग आहे. त्याने खेळाचा स्तर सुधारण्यास मदतच होते.
डेटा अ‍ॅनॅलिसिस (मुख्यतः डावपेच ठरवण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी) आणि स्टॅटिस्टीक्स ( वरवर दिसणारे चित्र) हे दोन वेगळे आणि वेगळ्या कारणासाठी वापरले जातात.

*डेटा अ‍ॅनॅलिसिस (मुख्यतः डावपेच ठरवण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी)* -
विक्रमसिंहजी, ही आहे माझी 8 मार्चची पोस्ट- '..
'...त्याचा मर्यादित उपयोग डांवपेंच आंखताना करावा, प्रेक्षकांचा रसभंग करायला नको , हें माझं मत. '
*विक्रम हे सौंदर्य स्थळ .* Wink मला असा शैलीदार खेळ आवडतो !

बरोबर विक्रम.
दोन गाड्यांच्या अ‍ॅक्सिडेंटचा ईंपॅक्ट, बॉक्सरच्या अपर कटचा ईंपॅक्ट, शरीरात घुसलेल्या गोळीचा इंपॅक्ट जसा, वेग, अंतर, वस्तुमान, घनता वगैरे मेजर्स वापरून मोजता येतो तसेच ईंपॅक्ट फॅक्टर हे रिअल क्रिकेटिंग मेजर आहे आणि ते फक्त आणि फक्त प्लेअर च्या खेळाच्या स्टॅट्स वरून मोजता येतो. जे अ‍ॅज सिंपल अ‍ॅज ...MoM मोजणे असू शकेल किंवा आकाश चोप्राच्या ईंपॅक्ट ईंडेक्स पुस्तकातल्या प्रमाणे खेळललेली प्रत्येक मॅच तिच्या टाईम, कंडिशन, सरफेस, प्लेअर्स, स्कोअर्स ह्यांच्या नुसार एकाच लेवल प्लेईंग फील्ड वर आणून प्रत्येक प्लेअरचा त्या मॅचवरच्या ईंपॅक्टचे रिलेटिव अ‍ॅनालिसिस करणे अशा कॉम्प्लेक्स स्टॅट बेस्ड मॉडेलने मोजणे असू शकतो.

ही चोप्रा/लक्ष्मण/मांजरेकर ह्यांची ईंपॅक्ट ईंडेक्स पुस्तकावरच्या चर्चेची लिंक देत आहे
https://www.youtube.com/watch?v=CTdL9EF3jV8
चोप्रा बरेचदा पोस्ट मॅच अ‍ॅनालिसिस मध्ये ह्या इंपॅक्ट फॅक्टर बद्दल बोलतो.

साधे Ave,BSR,SSR वर बेतलेले ईंपॅक्ट ईंडेक्स आणि रॅकिंग हवे असेल तर ही एक लिंक
https://www.reddit.com/r/Cricket/comments/8661uy/odi_batting_impact_factor/
ज्यानुसार धवन सुद्धा रोहित पेक्षा वरचढ ईंपॅक्ट प्लेअर ठरू शकतो. आपण आपला स्वतःचा इंपॅक्ट फॅक्टर सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतोच.
तर रोहित ईंपॅक्ट प्लेअर आहे की नाही हा वादाचा मुद्दा नाही..(तो अव्वल इंपॅक्ट प्लेअर नाही असे माझे मत असले तरी)...
तो असेलही ईंपॅक्ट प्लेअर पण ते सांगतांना 'ऑब्जेक्टिव ईंपॅक्ट अ‍ॅनालिसिस' कसे केले सांगता येणे जरूरी आहे.
एफर्टलेस शॉटमुळे अपोनंट बोलर्सचे मोराल डाऊन होते वगैरे इंपॅक्ट होतो हे सबजेक्टिव, ओपिनिएनेटेड आणि महत्वाचे म्हणजे अनमेजरेबल स्टेटेमेंट झाले.
मोठी शतके बनवणे हाच एक ऊठून दिसणारा वेगळा ईंपॅक्ट फॅक्टर रोहितच्या खेळात आहे पण एकंदर कामगिरीचा विचार करू जाता कोहलीचे ६०, ८०, ५०, ९० रोहितच्या १०,२०,१६०,३० पेक्षा जास्त मॅच रिझल्टवर जास्त ईंपॅक्टफुल असतात. १०, ३० रन्स बनवतांना रोहितने लीलया, नेत्रदीपक फटके मारले काय किंवा नाही...त्याने कुठलाही मेजरेबल ईंपॅक्ट मॅचवर होत नाही.
कोहलीने कधीतरी रोहितला ईंपॅक्ट प्लेअर म्हंटलेले आठवते आहे... माझ्या मते ह्याला कुठलेही बॅकिंग नसून त्याच्या डल परफॉर्मन्सनंतर केलेले शुगर कोटेड स्टेटमेंट्स आहेत.

अ‍ॅवरेज, स्ट्राईक रेट, शतके सगळेच स्टॅट्स कोहलीचे मोठ्या फरकाने रोहितच्या वरचढ आहेत.
>>>>

कोहलीची २०-२० मधील शतके आणि एकदिवसीयमधील द्विशतके शर्मापेक्षा जास्त आहेत का? Happy
किंवा वर्ल्डकपमधील शतके जास्त आहेत का? Happy

शर्माचे योग्य मूल्यमापन करायचे असल्यास,
वन डे मध्ये शर्माचे रेकॉर्ड २०१३ नंतरचे घ्यावेत.. कारण तेव्हाच त्याने कात टाकलेली..
आणि कसोटीत सलामीला आल्यापासूनचे रेकॉर्ड बघावेत... अर्थात त्यादृष्टीने कसोटीत सुरुवातच आहे म्हणा..
पण मोठ्या फरकाने ऐवजी छोट्या फरकाने हे योग्य वाटेल..

अवांतर - ऑस्ट्रेलियात आपण वनडे मालिका हरलो. दोन वेळा ३५०+ चेस करता आले नाहीत. तेव्हा ते टारगेट बघूनच मला संघात एकवेळ कोहली नसला तरी चालला असता पण शर्मा हवा होता असे वाटलेले.

इंपॅक्ट प्लेयर ची डेफिनेशन काँपिटीशन , वेन्यू याचा मापदंड लावून ठरवता येतो का बघा. भारतात आणि बाहेर आपल्याच टीम मधील प्लेयर्स ची नाव बदलतील. >> चांगली कल्पना आहे विक्रम. नक्कीच काही प्लेयर्स बदलतील. त्याचा काहीच परीणाम न होउ देणारे लीजंडस धरले जावेत का ?

काही लोकांना विराट एवढा आवडतो की त्याचे दुर्गुण दिसत नाहीत. उदाहरणे पण आहेत पण .... असो.
रोहीत चा इंपॅक्ट एवढा आहे की 5 वेळा आयपील जिकंलाय तोच विराट 973 रन एका सिझन ला काढुन अजुन 1 विजेतेपद नाही मिळवु शकला. इंपॅक्ट तर त्याने खुप पाडला होता.
इंपॅक्ट फक्त फलंदाजी किंवा गोलंदाजी चांगली करून च पडत नाही तर तुम्ही मैदानात असताना खेळाडुं कडुन काय करून घेता यावर पण असतो.
जर एवढाच इंपॅक्ट खेळाडु आहे विराट तर अजुन एक तरी वर्ल्डकप का नाही जिकंला अरे एकटा रोहीत 5 शतके करत घेउन गेला से.फा. ला... विराट चा इंपॅक्ट कुठे होता.

दुर कशाला Australia विरुध्द विराट गेला आणि सिरीज जिकंलो कारण विराट इंपॅक्ट खेळाडुं वर जास्त पाडतो खेळात कमी.

अवांतर - ऑस्ट्रेलियात आपण वनडे मालिका हरलो. दोन वेळा ३५०+ चेस करता आले नाहीत. तेव्हा ते टारगेट बघूनच मला संघात एकवेळ कोहली नसला तरी चालला असता पण शर्मा हवा होता असे वाटलेले. >> प्रामाणिकपणे मला संघ निवडायला सांगितला तर त्यात पहिले सर्कल केलेले तीन खेळाडू रोहित, कोहली नि बुमरा असतील. स्कोअर हाताबाहेर जाऊ नये नि गेलाच तर चेस करता यावा ह्यासाठी हे तिघे जरुरी आहेत. रोहित मोठे स्कोअर चेस करण्यासाठी जे करतो त्याचबरोबर कोहली चे मधल्या ओव्हर्स मधे अन रेट मेंटेन करणे नि शेवटी एक्स्प्लोड होणे ह्याबाबत चे कौशल्य लागते ते तेव्हढेच जरुरी आहे. किंबहुना चेस "मॅनेज" करणे हा कोहलीचा जबरदस्त प्लस पॉईंट आहे (होता ?). *** ह्याचा अर्थ हेच तिघे सामना जिंकून देउ शकतात, ह्याच तिघांच्या जोरावर सगळे सामने जिंकू शकतो, इतर काही काँट्रीब्युट करतच नाहित वगैरे असे सुचवत नाहिये)

या 5 सामन्यांचे निकाल फारसे महत्वाचे नाहीत, भारत प्रयोग करून बघतोय >> हो , कोहली म्हणालाय की सुरूवातीपासून आक्रमकपणे खेळणार वगैरे. फक्त दोनच प्रॉब्लेम आहेत
१. जनरल आपण सेफटी फर्स्ट मधे खेळून स्त्राईक रेट नी स्कोअर मधे दुसर्‍या क्रमांकावर आहोत. इंग्लंड पहिल्या स्थानावर बर्‍यापैकी पुढे आहे. तेंव्हा जे नीट सुरू आहे ते ट्युन करायचे सोडून नवा पॅटर्न करायची गरज खरच आहे का ?
२ . पहिले चौघे - राहुल, कोहली, रोहित किंवा धवन पहिल्या बॉलपासून उचलून मारणारे नाहित त्यामूळे मोठी अ‍ॅडजस्टमेंट असेल तेंव्हा तसे खेळू शकणारे एक-दोन पुढे आणले तर अधिक योग्य ठरेल का ?

Pages