क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

कोहलीची चर्चा रोचक चालू आहे. ईथेच नाही तर व्हॉटसप फेसबूक ग्रूपवर सुद्धा कोहली विरोधक आणि समर्थक तावातावाने भांडत आहेत.
फॅक्ट असे आहे की सध्या त्याचे विरोधक जास्त आहेत. पोलचे निकाल असे पाहिले आहेत की कसोटीत कप्तानी रहाणेला द्या आणि लिमिटेड फॉर्मेटमध्ये शर्माला. आता एकवेळ शर्माचे समजू शकतो कारण तो लिमिटेडचा लिजंड आहे आणि कप्तानीत आठपैकी पाच आयपीएल विजेता. पण रहाणेच्या परफॉर्मन्समध्ये बरेपैकी चढऊतार असतानाही लोकांना कोहलीच्या जागी तो कर्णधार हवा आहे यावरून समजते की कोहलीबद्दल सध्या जनमत कलुषित आहे.

पर्सनली मला स्वतःलाही कोहलीची वर्तणूक कधीही आवडली नव्हती. मात्र खेळ अफाट आवडतो. हि ईज रिअल ग्रेटेस्ट मॅचविनर ऑफ ऑल टाईम.
फलंदाजीत तो सचिनचे सारे रेकॉर्ड तोडू शकतो. पण ते तोडूनही तो सचिनची जागा घेऊ शकत नाही. कारण सचिनचा जो स्वभाव आहे त्याने लोकांच्या हृदयात सचिनबद्दल एक वेगळेच स्थान आहे. सचिनच नाही तर या बाबतीत तो धोनीचीही जागा घेऊ शकत नाही. आणि हे जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा त्याने आपल्या अहंकारी स्वभावाला आणि आक्रस्ताळी वृत्तीला लगाम घालायला सुरुवात केली.

पण मूळ स्वभावाला औषध नसते. साहेब कप्तान झाले आणि त्या उद्दामपणाला आक्रमक अ‍ॅटीट्यूडचे सकारात्मक लेबल लागू लागले. हळूहळू मुखवटा गळून पडला. कोहली हा पुन्हा कोहली झाला.

सध्या तो संघसहकार्‍यांना योग्य वागणूक देत नाही आणि बरेचसे राजकारण करतो या कारणाने खेळाडू म्हणून मलाही आवडत नाही. तो संघात नसला तर ईतर लोकं मनमोकळेपणाने खेळून आपला खेळ उंचावून ओवरऑल आणखी चांगले रिजल्ट देऊ शकतात. त्यामुळे तो नसला तर त्याची कमतरता भासणे दूर पण एकूणात संघाला फायदाही होऊ शकतो. जे गेल्या दोन मालिकात दिसूनही आले.

त्याने स्वत:ही धोनीबाबत राजकारण करून त्याला कप्तानीवरून बाजूला सारले आहे. त्याच्याही बाबतीत हे झाले तर आनंद होईल असे म्हणत नाही, पण काही वाईट वाटणार नाही. पण सध्या ते शक्य वाटत नाही. त्याची ब्रॅण्ड वॅल्यू पाहता त्याचे कप्तान असणे बरेच जणांच्या आर्थिक फायद्याचेच असणार. त्यामुळे अजून काही वर्षे तोच कप्तान राहणार.

*he is ready to face consequences for his actions, इथे प्रश्न मिटला पाहिजे *. अजिबात नाहीं. He is the captain of the national side and he will be rightfully questioned about how he carries himself on the field as a player, as a leader and as an ambassador ! अहो, आपला कर्णधार सोडाच पण पाँटिंगच्या वागण्याला उद्दामपणाचा वास येतो म्हणून त्याच्यावरही आपण टीका करतोच ना ! त्याच्या नांवावरही 41 शतकं, 60 अर्ध शतकं व 13000 च्यावर कसोटी धांवा आहेतच ! ( माझे ऑस्ट्रेलियातले नातेवाईक म्हणतात कीं बर्याच ऑसीजना पाॅटींग त्यामुळे आवडत नसे. उलट, सचिनच तिथे खूपच लोकप्रिय आहे. अर्थात, ही ऐकीव माहिती )

शिवाय, त्याचे बालीश व दिखाऊ आक्रमक हावभाव, दांतओठ खाणं, डोळे वटारणं, इ.इ. जर सतत क्रिकेट पाहण्याच्या माझ्या आनंदात मिठाचा खडा होत असेल, तर मला व हें खटकणारया प्रत्येक क्रिकेटप्रेमीसाठी हा प्रश्न केवळ ' he is ready to face consequences for his actions, ' म्हणून मिटत नाहीं, अगदीं हें खटकणं इतरांना चूकीचं वाटलं तरीही !!

पराग,
तू नेहमीप्रमाणे चर्चेत भाग न घेता काहीतरी पचकून शेपूट घालत काढता पाय घेणार हे आताशा प्रेडिक्टेबल झालेले आहे. ह्यावेळी तरी तू माझ्या क्रिकेट विषयक लिखाणाबद्दल तुला नेमका काय आक्षेप आहे ते सांगशील, अशी आशा मी करत होतो. मोठ्या काळापासून मी कुठेही तुझ्याशी कसलाही थेट संवाद साधणे टाळत असतांना ह्या काळात तू अनेकवेळा असामीच्या पोस्टीच्या नथीतून तीर मारत मला ऊद्देशून प्रोवोकिंग लिहित आला आहेस. असे बायकी ऊद्योग करणे ही तुझ्या अंगची ऊपजत कळा आहे की पार्ल्यात जास्त काळ घालवल्याने ही कळा तुझ्या अंगात ऊतरली आहे मला माहित नाही. मी ईथे क्रिकेट बाफवर ईतरांशी चर्चा करत असतांना तुला नेमक्या कुठल्या अवघड जागी ठसठसते हे तू स्पष्ट सांगितल्यास मी माझ्या परीने तुझे दुखणे वाढवण्याचा नक्की प्रयत्न करेन.

यावेळी तरी तू माझ्या क्रिकेट विषयक लिखाणाबद्दल तुला नेमका काय आक्षेप आहे ते सांगशील >>>> ?????
मी असामीची पोस्ट कोट करून त्याला प्रतिसाद लिहिलेला असताना, तुझ्या क्रिकेट विषयक लिखाणाबद्दल मला आक्षेप असून ते मी सांगायाची अपेक्षा असणं कुठून आलं माहित नाही. पोस्टीच्या बाकी भागाबद्दल तसच आधीच्या पोस्टीबद्दल काहीही लिहिण्याची इच्छा नाही.

मी असामीची पोस्ट कोट करून त्याला प्रतिसाद लिहिलेला असताना, >> Lol Man up dude. ज्या ईंटेशनने पोस्ट लिहिलेसस ते ईंटेशन ओन करण्याचा निर्भीडपणा तरी दाखव, की तेवढाही कस आता ऊरला नाही. पोष्टीचा मार जास्तच वर्मी लागला असल्यास तुला कुठल्या ग्रूप वर मलम लाऊन मिळेल हे मी सांगण्याची गरज नाही.
पोस्टीच्या बाकी भागाबद्दल तसच आधीच्या पोस्टीबद्दल काहीही लिहिण्याची इच्छा नाही. >> गुड! पुढे सुद्धा माझ्या कुठल्याच पोष्टीबद्दल अगदी मनातल्या मनात सुद्धा काहीही लिहिण्याची बारीकशी सुद्धा ईच्छा होऊ देऊ नकोस.

उद्याच्या मॅच साठी माझी टीम
रोहित
धवन
कोहली
अय्यर
राहुल
हा. पांड्या
कृ. पांड्या
ठाकूर
भुवनेश्वर
चहल
कुलदीप

उद्याच्या मॅच साठी माझी टीम>>>>>>>> मला राहुल च्या जागी कीपर म्हणून पंत आणि चहल च्या जागी नटराजन असे असावे असे वाटते

SENA देशात 3 फुल टाईम पेसर्स मेक सेन्स. पुण्याचे पीच कसे असणार आहे कल्पना नाही पण नटराजन मिडल ओव्हर्स मध्ये स्कोअर बोर्ड स्लो डाऊन करण्यासाठी चांगला ऑप्शन असला तरी दोन्ही पांड्या आणि तिसरा पेसर मिळून 20 ओव्हर्सच करणार असतील तर नटराजन ऐवजी शार्दूलला त्या मिक्समध्ये आणून, नवीन बॉलवर भुवनेश्वर बरोबर सिराज किंवा कृष्णाचा पेस वापरणे जास्त फायदेशीर आहे. फक्त 5 बॉलर्स घेऊन खेळणार असू तर मात्र नटराजन नक्कीच बेटर ऑप्शन आहे.
पंतला squad मध्ये घेण्यात थोडी घाई केली असे मला वाटते.
तो backup keeper म्हणुनच राहण्याची जास्त शक्यता आहे. कोहलीने एखाद दुसरा गेम स्किप केला तर यादव किंवा पंतचा नंबर लागू शकेल.

KKR

He is the captain of the national side and he will be rightfully questioned about how he carries himself on the field as a player, as a leader and as an ambassador ! >> भाऊ ह्याबद्दल मी वर आधीच लिहिलेले आहे त्यामूळे त्यात परत लिहिण्यात काही हशिल नाही. मतभिन्नता असणे समजू शकते.

रिझल्ट आणि अ‍ॅनालिसिसच्या दृष्टीने ह्या ३ मॅचेस फार महत्वाच्या आहेत असे नाही पण हार्दिकला कुलदीपच्या आणि कृणालच्या कोटामधल्या ऊरलेल्या दोन-चार ओवर्स देऊन बघायला हव्यात.
अय्यरची ईंजुरी बघता यादवचा डेब्यु होण्याचे चान्सेस दिसत आहेत पुढच्या मॅचमध्ये.

in another turn of events, किवी वि. बांग्ला मॅच मध्ये थर्ड अंपायरने तमिमचा जेमिसनने घेतलेला क्लीन कॅच (माझ्या मते) आणि अंपायरचा 'आऊट' असा सॉफ्ट सिग्नल ओवररूल केला. कॅच घेतल्यानंतर जेमिसनचा बॉलवर, मलानने यादवच्या घेतलेल्या कॅचपेक्षा कितीतरी अधिक कंट्रोल होता आणि बोटेही बॉलखाली होती.
दोन्हीही रिप्ले बघता, फ्रिंज केसेसमध्ये थर्ड अंपायर सुद्धा १००% कन्सिस्टंटली रिलायबल डिसिजन देत नाही असेच दिसते.

https://www.youtube.com/watch?v=nvBzalxk6jE

"हा कृष्णा कोणत्या टीम कडून खेळतो ?" - ह्यावर स्वरूप ने KKR उत्तर दिलेलं पाहून गंमत वाटली. Happy प्रसिध कृष्णा ची होम टीम कर्नाटक असली तरी त्याची आयपीएल ची टीम च आठवली (स्वरूप ला च नव्हे, बर्याच जणांना), ह्यातून आयपीएल प्रभाव किती मोठा आहे हे जाणवतं.

आजची मॅच फारशी पहाता आली नाही त्यामुळे खेळाविषयी काही टीप्पणी नाही. पण रिझल्ट छान लागला. तुफानी सुरूवात मिळालेल्या आणि खोलवर बॅटींग करणार्या इंग्लंड संघाला असं पराभूत करणं अजिबात सोपं नाहीये. वेल डन टीम इंडिया!

अय्यरची ईंजुरी बघता यादवचा डेब्यु होण्याचे चान्सेस दिसत आहेत पुढच्या मॅचमध्ये.
>>>>>>
माझ्याही नेमके हेच डोक्यात आलेले ते बघून.. पण मग अजून मनात एक विचार आला की राहुल आणि पंतही एकत्र खेळताना बघू शकतो जर सुर्याशी भाऊंचे वाकडे आहे यात तथ्य आहे असे गृहीत धरल्यास.

प्रसिध कृष्णा ची होम टीम कर्नाटक असली तरी त्याची आयपीएल ची टीम च आठवली >>> Happy प्रसिध खरच एव्हडा प्रसिद्ध आहे का? रणजीला हल्ली कोणी फारसं महत्त्व देत नाही पण गेल्या आयपीएलमध्ये त्याने एव्हडा प्रभाव पाडला होता का ?

रणजीला हल्ली कोणी फारसं महत्त्व देत नाही पण गेल्या आयपीएलमध्ये त्याने एव्हडा प्रभाव पाडला होता का ? >> त्याच्या पहिल्या सीझन मधे चांगला खेलला होता तो. गेल्या आयपीएल मधे मला तरी फारसे काही केल्याचे आठवत नाही. पण त्या आधीच्या रणजी मधे चांगला खेळला होता.

*प्रसिध खरच एव्हडा प्रसिद्ध आहे का?* - माहित नाहीं. पण सातत्याने 140+ गतीने गोलंदाजी त्याला त्या वाटेवर नेईलच !
*सुर्याशी भाऊंचे वाकडे आहे यात तथ्य आहे असे गृहीत धरल्यास.* - तो मीं नव्हेच (भाऊ ) ! Wink

" रणजीला हल्ली कोणी फारसं महत्त्व देत नाही" - असं म्हणू नकोस रे....निदान इथे तरी!! Happy

भारतीय संघाची निवड अजूनही (का अजून तरी?) डोमेस्टिक / ए टूर्स च्या परफॉर्मन्स वर होते असं मानायला वाव आहे. मागच्या वर्षी आयपीएल मुळे बबलमधे असलेले खेळाडू निवडले गेले हे मात्र खरं. आयपीएल मुळे खेळाडूंना मिळणारं एक्स्पोजर, पैसा, आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर रहाण्या-खाण्या-खेळण्याची संधी मिळते हे जरी खरं असलं, तरी मोठ्या मॅचेस खेळण्याची शारिरीक आणी मानसिक तयारी करण्यासाठी डोमेस्टिक क्रिकेट (रणजी / विजय हजारे) पण महत्वाचं आहे.

मागच्या वर्षी आयपीएल मुळे बबलमधे असलेले खेळाडू निवडले गेले हे मात्र खरं. >>>> हां. म्हणूनच हल्ली म्हंटलं. Happy गेल्या ऑस्ट्रेलिया टूरमधे टेस्ट टीममधले नवे खेळाडू जेमतेमच रणजी खेळले आहेत.

मला स्वतःला रणजी आणि हजारे ट्रॉफी फॉलो करायला (आणि मुंबई जिंकलेली बघायला Proud ) आवडतेच !

>>ह्यावर स्वरूप ने KKR उत्तर दिलेलं पाहून गंमत वाटली.

प्रामाणिकपणे कबूल करतो की आयपीएलच्या आधी मला प्रसिध कृष्णा माहित नव्हता.... २०१८ च्या आयपीएलमध्येही सगळ्यांचे लक्ष U-19 वर्ल्डकप गाजवलेल्या नागरकोटी आणि मावीकडे असताना ते दोघेही injured झाल्यामुळे चान्स मिळालेल्या प्रसिध कृष्णाने चांगली कामगिरी करुन लक्ष वेधून घेतले होते हे आठवतय!

बाय द वे, पराग तुला कुठला संघ अपेक्षित होता? Wink

पहिल्या एक दिवशीय सामन्याची खेळपट्टी चांगली होती. आपल्या फलंदाजांना आणि विशेषतः जलद गोलंदाजांना साजेशी, म्हणूनच आपण जिंकू शकलो. चेंडूला चांगली उसळी मिळत होती. विश्वचषका साठी अशीच खेळपट्टी पाहिजे. पाटा खेळपट्टीवर आपण जिंकण्याची शक्यता ५० ट्क्क्यावर येउन ठेपते.
कृणाल आणि प्रसिद्धचे स्वप्नवत पदार्पण. आपल्या इतके आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी तयार खेळाडू इअतर कुठेही नाहीत. अगदी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघांनाही मुख्य खेळाडू नसल्याचा मोठा फटका बसतो. बंगलोरची प्रशिक्षण संस्था, तळागाळातील क्रिकेटला प्रोत्साहन या गोष्टी नीटपणे चालवल्या बद्दल भारतीय क्रिकेट व्यवस्थेचे आभारच मानावे लागतील. Happy

पाटा खेळपट्टीवर आपण जिंकण्याची शक्यता ५० ट्क्क्यावर येउन ठेपते. >> बरोबर, आपले फलंदाज (पांड्या, पंत वगळता) पॉवर हिटींग मधे तुलनेने कमी पडतात नि बहुतेक बॉलर्स लॅक ऑफ मोअर पेस मूळे. पिच जर थोडे जरी बॉलर्स ला मदत करत असेल तर बॉलिंग एकदम जबरदस्त वाटायला लागते.

गेल्या ऑस्ट्रेलिया टूरमधे टेस्ट टीममधले नवे खेळाडू जेमतेमच रणजी खेळले आहेत. >> पदार्पण केलेल्यांमधे गिल, सिराज, ठाकूर, सैनी बरेच डोमेस्टीक क्रिकेट खेळलेले आहेत. फक्त सुंदर नि नटराजन अतिशय कमी अनुभव असलेले होते.

पदार्पण केलेल्यांमधे गिल, सिराज, ठाकूर, सैनी बरेच डोमेस्टीक क्रिकेट खेळलेले आहेत. फक्त सुंदर नि नटराजन अतिशय कमी अनुभव असलेले होते. >>>>> गिल, ठाकूर बद्दल माहित होतं. सिराज, सैनी रणजी, दुलिप, हजारे ट्रॉफ्यांमध्ये खेळले आहेत का ? चेक करतो.

बाय द वे, पराग तुला कुठला संघ अपेक्षित होता? >>>> मला रणजी आणि मग आयपीएल असे संघ अपेक्षित होते. Happy मी वर म्हटलं तसं गेल्या आयपीएलमध्ये त्याचं नाव ऐकल्याचं आठवत नाही.

पण मग अजून मनात एक विचार आला की राहुल आणि पंतही एकत्र खेळताना बघू शकतो जर सुर्याशी भाऊंचे वाकडे आहे यात तथ्य आहे असे गृहीत धरल्यास.

^^^^^^^^^

अय्यरच्या जागी पंत आहे आज Happy

Pages