Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05
क्रिकेटवरील पहिले पाच धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
https://www.maayboli.com/node/67443
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
धवन पहिल्या आणि शेवटच्या
धवन पहिल्या आणि शेवटच्या मॅचमध्ये चांगला खेळतो,
-एक निरीक्षण.
विराट वर पुस्तक आले आहे
विराट वर पुस्तक आले आहे मराठीत
https://www.aksharnama.com/client/article_detail/5026
आभिनदन , राहूल ! छान शतक !!
आभिनदन , राहूल ! छान शतक !!
अरे, हा पंत काय खावून येतो खेळायला ! काय फटकेबाजी !!आणि तीही सातत्याने !! दोन डीआरएस घेतले अंपायर निर्णया विरूद्ध , दोनही यशस्वीपणे! मानलं !
दोन डीआरएस घेतले अंपायर
दोन डीआरएस घेतले अंपायर निर्णया विरूद्ध , दोनही यशस्वीपणे! मानलं !
>>
ज्यात बॅट लागून फोर गेलेला त्यात त्याचे ४ रन्स गेले पण फुकट एलबीडब्ल्यू दिल्याने
आजने पंतने ४० चेंडूत ७७ धावा
आजने पंतने ४० चेंडूत ७७ धावा मारले = १९२.५० स्ट्राईकरेट
भारतातर्फे ७७ पेक्षा जास्त धावांची एकही इनिंग नाही जी यापेक्षा जास्त स्ट्राईकरेटने आली आहे
पंत हल्ली खेळायला उतरतो ते एखादा विक्रम करायलाच. शतक हुकले पण साल्याचे.. तीनेक सिक्स मारायचे होते फक्त
समजा विषचशकाचा शेवटचा सामना
समजा विश्वचशकाचा शेवटचा सामना चालू आहे. एका चेंडूवर 4 धावा पाहिजेत. फलंदाजा ने खणखणीत चौकार मारला परंतु गोलंदाज ने LBW review मागितला पण पॅड आणि bat चा संपर्क ही झालेला दिसला नाही, परंतु नियमाप्रमाणे 4 धावा फलंदाजाला आणि त्याच्या टीम ला मिळणार नाहीत आणि fielding करणारी टीम 3 धवांनी match जिंकेल. हा नियम बदलला पाहिजे.
हा नियमच चुकीचा आहे . त्या
हा नियमच चुकीचा आहे . त्या रिव्ह्यु घेण्यालाही अर्थ नाही कारण रिव्ह्यु पद्धत पंचाची चूक दुरुस्त करण्यासाठी आहे...
चार धावा मिळायलाच हव्या होत्या. पंचाची चूक सुधारली तर!
फलंदाजा ने खणखणीत चौकार मारला
फलंदाजा ने खणखणीत चौकार मारला परंतु गोलंदाज ने LBW review मागितला
>>>>
तसं नाही ओ, गोलंदाज रिव्यू अंपायरने नाबाद दिल्यावर मागतो. त्यात केसमध्ये बॉल डेड होत नाही. तर अंपायरने बाद दिल्यावर बॉल डेड होतो.
आता हे बॅडलक म्हणू शकतो, पण लॉजिकली बरोबरही आहे कारण एकदा अंपायरने बाद दिल्यावर फिल्डर कश्याला बॉलमागे धावत तो पकडायला जातील हा त्यामागचा विचार.
काही खरं नाही..जबरदस्त झोडलंय
काही खरं नाही..जबरदस्त झोडलंय !
नशीब एक रन आऊट झाला नाहीतर
नशीब एक रन आऊट झाला नाहीतर दहा विकेटनीच हरलो असतो.
कोहली शेवटच्या फेजमध्ये जे
कोहली शेवटच्या फेजमध्ये जे बॉलिंग चेंजेस करतोय ते बघून खरेच डोके पिसाळून उठतेय.
कुलदीपने मिडल ओवर्समध्ये दोन चांगल्या ओवर टाकल्या, लय मिळाली असे वाटले तेव्हा त्याला बंद केले होते.
पण जेव्हा १७ रन्स झोडले, त्याची बॉडी लँगवेज पुर्ण डाऊन दिसत होती तेव्हा अजून एक ओवर दिली. पुन्हा त्या ओवरलाही सहज ३ सिक्स आले.
हे ही कमी म्हणून कृणाल पांड्यालाही आणले. तेच रिपीट झाले. सहज काही सिक्स आले.
मग अगदीच नाईलाज झाल्यासारखे वेगवान गोलंदाज आणले. त्यात भुवीने एक आणि कृष्णाने एकाच ओवरला दोन विकेट काढल्या. अगदीच नीरस झालेल्या सामन्यात आनंदाचे क्षण आणले.
तर त्यांना पुढच्या ओवरला बसवून पुन्हा एकीकडून कृणाल आणि दुसरीकडून पुर्ण कॉन्फिडन्स गेलेला कुलदीप.. पुन्हा काही ईजी रन्स. नवीन फलंदाजांवरचे प्रेशर रीलीज.
कोहली फलंदाजीतही आज स्वतःच्या शतकासाठी खेळतोय असे वाटत होते. ना तो गेअर चेंज करत होता ना राहुलकडून तशी अपेक्षा करत होता. तो बाद झाला म्हणून पंत आला आणि मग इनिंगचा गेअर चेंज होत ३०० च नाही तर थेट ३३६ झाले. पण अखेरीस ते पुरणार नाहीत याची काळजी कोहलीच्या खराब नाही म्हणणार मी तर अनाकलनीय कप्तानीने घेतली.
सामना हरून अखेरचा सामना निर्णायक करायचे फिक्स केलेले का अशी शंका येतेय आता..
पण लॉजिकली बरोबरही आहे कारण
पण लॉजिकली बरोबरही आहे कारण एकदा अंपायरने बाद दिल्यावर फिल्डर कश्याला बॉलमागे धावत तो पकडायला जातील हा त्यामागचा विचार. >> नो बॉल दिल्यावर फिल्डर्स कॅच पकडत नाहीत का ? बॅटस्मन रिव्ह्यू घेऊ शकतो नि निर्णय बदलला जाऊ शकतो हे मान्य झाल्यावर वरचा डेड बॉलचा निर्णय बदलणे जरुरी आहे.
नो बॉल दिल्यावर बॉल डेड नाही
नो बॉल दिल्यावर बॉल डेड नाही होत. बॅटसमन धावत असतातच. रन्स मिळवत असतातच. बॉल पकडावा लागतोच.
एलबीडब्ल्यू बाद दिल्यावर बॉल डेड होतो.
अन्यथा मग दरवेळी कुठेतरी पायाला लागून गेलेला बॉल अंपायरने बाद देऊनही आनंद व्यक्त करायचा सोडून आधी तो बॉल पकडावा लागेल आणि मग बॅटसमन सुद्धा त्या काळात रिव्यूचा ईशारा करत धावत बसतील. रिव्यूत वाचले तर ते धावलेले एक दोन रन्स लेग बाईज म्हणून जमा होतील.
हे पुन्हा 'ये रे माझ्या
हे पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या' व्हायला लागले की काय? ह्या सिरीजच्या तीनही मॅचचा रिझ्ल्ट सोडून देऊन पण चँपिअन्स ट्रॉफी फायनल मधून धडा घेऊन अश्विन्/जडेजाची जोडी बाजुला सारून कुलचा आणले. आधीच्या घवघवीत यशानंतर आता कुलचा सुद्धा सातत्याने ईनेफेक्टिव (ते सुद्धा भारतीय ट्रॅक्सवर) ठरल्यावर पुढे काय त्याचे काही प्लॅनिंग दिसत नाही. एकंदर स्पीन डीपार्टमेंट बोलिंग ऑप्शन कमी असल्याने की काय ऑप्शनलाच टाकल्यासारखे दिसत आहे. विकेट्स मिळत नसल्यास ईकॉनॉमी स्क्वीझ करू शकणारेही कोणी स्पीनर्स दिसत नाहीत. जडेजा आल्यावर हा ईकॉनॉमीचा स्वीझ मिळू शकेल पण रिस्ट स्पीनर्स कुठलीच थ्रेट पोझ करू शकत नसतील तर फ्लॅट ट्रॅकवर सीमर्स ४०० सुद्धा कसे डिफेंड करू शकतील?
२००९ च्या सिरीज मधली ही मॅच आठवली. जेव्हा ४१४ ही मोठ्या मुष्कीलीने डिफेंड झाले होते.
https://www.espncricinfo.com/series/sri-lanka-tour-of-india-2009-10-4286...
अर्थात एकदीवसीय क्रिकेट आता बराच काळ होणार नसल्याने तातडीने काही करण्याची गरज नसावी... पण पुढचा एकदीवसीय वर्ल्डकप भारतात होणार आहे आणि व्यावसायिक कारणांसाठी ईन्क्रिंजगली बेल्टर ट्रॅक्स बनतांना दिसत आहेत तर विकेट टेकिंग स्पीनर्सचा दुष्काळ पडणार नाही हे बघणे ओघाने आलेच.
पांड्या का बोलिंग करत नाही? आणि आपली व अपोझिशनची एवढी स्ट्राँग बॅटिंग लाईनअप असतांना ५ बोलर्सच खेळवण्याच्या हट्टं का? असे अवघड प्रश्न कोण विचारणार?
त्या चँपिअन्स ट्रॉफी फायनल नंतर अश्विनचे आयपीएल आणि टेस्ट मध्ये दिसून आलेले नवे बोलिंग वेरिएशन्स , त्यातून त्याने मिळवलेले भरपूर यश आणि अनुभव बघता, भारतातल्या मॅचेससाठी एक महत्वाचा ऑप्शन म्हणून त्याचा पुन्हा विचार व्हावा असे वाटते.
कुलदीप चा फॉर्म पूर्णपणे गेला
कुलदीप चा फॉर्म पूर्णपणे गेला आहे आणि कृणाल फ्लॅट पीचेस वर अजिबात चालत नाही, भारताने फास्ट bowlers सारखे फिरकी मध्ये ऑपशन्स लवकर शोधायला हवेत, कृष्णप्पा गौतम आणि अक्षर ला संधी देऊन बघायला हवी पूढील series मध्ये
कुलदीप चहल जोडी आल्याआल्या
कुलदीप चहल जोडी आल्याआल्या धुमाकूळ घालत होती तेव्हाच मी म्हटलेले की स्पिनर जोखायचा तर तो दोन तीन वर्षांनी.
आज कुलदीप संपल्यासारखा झालाय आणि चहल कोहलीच्या कृपेने तग धरून आहे.
पण मुळात एव्हाना आश्विनच यायला हवा होता परत. वन डे ला तर नक्कीच. पण आपल्याला कदर नाही. ईगो क्लॅशेस आहेत कोहलीचे. त्यामुळे आश्विनचा मार्ग सोपा नाही.
नो बॉल दिल्यावर बॉल डेड नाही
नो बॉल दिल्यावर बॉल डेड नाही होत. बॅटसमन धावत असतातच. रन्स मिळवत असतातच. बॉल पकडावा लागतोच.
एलबीडब्ल्यू बाद दिल्यावर बॉल डेड होतो. >> तुला समजेल असे उदाहरण देतो. बॉल टाकल्यावर पायाला लागून बाऊंडरी कडे जातोय. अंपायर विचार करतोय. ह्या वेळात फिल्डर "अंपायरला निर्णय देऊ दे, मग बॉल अडवायचा का ते ठरवू ? आऊट दिले तर बॉल डेड तर ठरेलच" असा विचार करत वाट बघतोय असे कधी बघितलस का ? असेल तर सोडून दे. नसेल तर आता परत एकदा मी काय लिहिलेले समजून उत्तर दे.
कुलदीप चा फॉर्म पूर्णपणे गेला
कुलदीप चा फॉर्म पूर्णपणे गेला आहे आणि कृणाल फ्लॅट पीचेस वर अजिबात चालत नाही, >> क्रुणाल फॉर्म मधे असलेली जाडेजाची डायरेक्ट रिप्लेसमेंट म्हणून आत आला होता. चक्रवर्ती कडे एक स्पिनर म्हणूण बघत होते पण त्याचा फिटनेस पारच गंडलेला दिसतोय. गौथम आयपील मधे पण हग्या मार खातो त्यामूळे त्याला संधी दिली नसावी.
गौतम कधी स्पीनचा प्रॉमिसिंग
गौतम कधी स्पीनचा प्रॉमिसिंग कँडिडेट वाटला नाही. श्रेयस गोपाल म्हणायचे आहे का?
गोपालने आयपीएल मध्ये कोहली, एबीडीला बरेचदा गिर्हाईक बनवले आहे. त्याचा गुगली चांगला आहे पण बाकी त्याच्याकडे जास्त व्हेरिएशन्स नाहीयेत. तो बर्यापैकी आदिल रशिदच्या पठडीतला बोलर आहे.
तेवातिया पण असा काही बिग टर्नर ऑफ द बॉल नाहीये. चहार पण गोपाल, चहल पेक्षा लीप्स अँड बाऊंड्स वेगळा वाटत नाही. मिश्रा,चावला वगैरेंचे करियरच संपले आहे. मार्कंडे त्याच्या आयपील साईडमध्येच फायनल ११ मध्ये स्थान मिळवू शकत नाही. सुंदर फक्त स्टॉक बॉलर आहे.
मला चक्रवर्ती चांगला वाटला पण कोहलीच्या बुक मध्ये आधी फिटनेस मग स्कील असेल तर त्याला बरेच काम करावे लागेल.

माझ्या मते दोनच ऑप्शन्स आहेत... 'ओल्ड ईज गोल्ड' अश्विन आणि बिश्नोई.
नाही तर बीसीसीआय ने सरळ राशिद आणि मुजीबला आर्चरसारखे विकत घेऊन टाकावे ...
ताहिरला पोस्ट रिटायरमेंट स्टिंट हवा असेल किंवा सुनील नारायणला (तसेही त्याला विंडीज संघात घेत नाहीत आणि नावामुळे तो देसीच वाटतो) तसेही विचारून बघावे
तुला समजेल असे उदाहरण देतो.
तुला समजेल असे उदाहरण देतो.
>>>
या जगात जे जे आहे ते सगळे मला समजते. तुम्ही कुठलेही उदाहरण द्या. नो प्रॉब्लेम
आता तुमचेच उदाहरण बघूया
>>>>>>
बॉल टाकल्यावर पायाला लागून बाऊंडरी कडे जातोय. अंपायर विचार करतोय. ह्या वेळात फिल्डर "अंपायरला निर्णय देऊ दे, मग बॉल अडवायचा का ते ठरवू ? आऊट दिले तर बॉल डेड तर ठरेलच" असा विचार करत वाट बघतोय असे कधी बघितलस का ?
>>>>>>>
बिलकुल पाहिले नाही असे.
पण अंपायरने बाद दिल्यावर देखील फलंदाज रन घ्यायला धावत आहेत. आणि फिल्डर बॉल पकडायला धावत आहेत असे आपण पाहिले आहे का?
नक्कीच नाही.
कारण आजच्या नियमानुसार बॉल डेड झाला आहे.
मग आता नियम बदलला तर होईल काय बघा
अंपायरचा विचार करून झाला आहे. त्याने आऊट दिला आहे. बॉल पॅडला लागून लांब गेला आहे. अश्यावेळी फलंदाज तरीही धावत आहेत. कारण रिव्यू घेऊ आणि त्यात वाचलो तर धावा मिळतील. त्याचवेळी फिल्डर देखील बॉल पकडायला मागे धावत आहेत कारण फलंदाजाने रिव्यू घेतला आणि वाचला तर तो धावत असलेल्या धावा त्याला मिळतील.
असे तुम्हाला अपेक्षित आहे का?
अर्थात नवा नियम बनवायला हरकत नाही.
परत यात रिव्यू कधी घ्यायचा हे सुद्धा ठरवायला हवे. म्हणजे फलंदाजाचे धाऊन झाल्यावर त्याचा टाईम स्टार्ट करायचा की धावता धावताच त्याने विचार करावा, नॉनस्ट्राईकरला हाक मारून विचारावे मी बाद होतो कारे, रिव्यू घेऊ का रे?
आणि हो, मजा बघा यात आणखी काय होईल एक
एखाद्या बॅटसमनला बाद दिलाय एलबीडब्ल्यू. तोपर्यंत तो अर्ध्यावर धावला आहे. अंपायरने बाद देताच तो तिथेच थबकला., अर्ध्या रस्त्यातच थांबला आणि त्याचा फायदा घेत त्याला फिल्डींग साईडने रन आउट केले. तर मग रिव्यू मध्ये तो नाबाद ठरला तरी त्याला धावबाद द्यावे लागेलच. भले मग अंपायरने बाद दिल्यामुळे अर्ध्या सेकंदासाठी त्याचे लक्ष विचलित झाले आणि तो धावबाद झाला तरी बादच द्यावे लागेल.
मग असे होऊ नये म्हणून बघा काय करावे लागेल. तर अंपायरने धाव पुर्ण झाल्यावरच आपला निर्णय द्यावा जेणेकरून धाव घेताना फलंदाजाने गोंधळून जाऊ नये.
अर्थात असाही नियम बनवायला काही हरकत नाही. पण काय नियम अपेक्षित आहे त्याचे डिटेल तरी द्या. मग बघूया शक्य आहे का?
पण अंपायरने बाद दिल्यावर
पण अंपायरने बाद दिल्यावर देखील फलंदाज रन घ्यायला धावत आहेत. आणि फिल्डर बॉल पकडायला धावत आहेत असे आपण पाहिले आहे का? >> अरे असे किती तरी वेळा होते की. म्हणजे अंपायर चा निर्णय येईतोवर फलंदाज रन घेण्यासाठी धावत असतात नि फिल्डर्स बॉल पकडून त्यांना रन आऊट करण्याचा प्रयत्न करत असतात. घेतलेला रन किंवा रन आऊट अंपायरच्या आधीच्या निर्णयावर बाद ठरते.
कारण रिव्यू घेऊ आणि त्यात वाचलो तर धावा मिळतील.>> माझ्या समजाप्रमाणे रिव्यू घेण्यासाठी ठराविक कालावधी आहे नि परत रिव्यू घेताना फलंदाजाने ईतरत्र न बघणे (मुख्यत्वेकरून) मैदानाबाहेर च्या घटकांची मदत न घेता रिव्यू घेणे अपेक्षीत आहे, अन्यथा रिव्यू बाद ठरतो. रिव्यू घेतला कि सगळे थांबणे अपेक्षित आहे. ह्या सगळ्या अटींमूळे रिव्यू घेतल्यावर धावा घेणे किंवा धाव घेईन रिव्यू मागणे शक्य नाही.
असामी,
असामी,
तुम्ही माझे मुद्दे खोडत आहात की आपलेच
कोणाचेही मुद्दे खोडत नाही आहे
कोणाचेही मुद्दे खोडत नाही आहे तर होणार्या बदलांप्रमाणे कॉमन सेन्स वापरून सद्य नियम बदलले पाहिजेत असे म्हणतोय. प्रत्येक कॉर्नर केस कव्हर करा असा माझा आग्रह नाही. पण वर दिलेल्या उदाहरणाप्रमाणे हा वर्ल्ड कप चा शेवटचा सामना असता नि भारत (भारत फक्त उदाहर्णार्थ आहे) चार धावांनी हरला असता तर ते कितपत योग्य ठरले असते ? गेल्या कप मधे अशाच विचित्र नियमाचा फटका किवीज ना बसलाच आहे. झालेय ते सद्य नियमांनुसारच झाले आहे फक्त नियम खेळासाठी आहेत खेळ नियमांसाठी नाही असा माझा विश्वास आहे. म्हणून नियम अपुरे पडत असतील तर बदलायला हरकत नाही. ते आधीही बदलत आले आहेत त्यामूळे ते बदलण्याने आभाळ कोसळत नाहीये,.
विराट ने अप्रतिम कप्तानी करत
विराट ने अप्रतिम कप्तानी करत इग्लंड ला सामना जिंकुन दिला...
T20त चहल ला बाहेर काढलं पण एकदिवसीय साठी पुन्हा तोच...
तसंही काल कुलदीप आणि कुणाल चा छान बकरा केला त्याने.
गौतम कधी स्पीनचा प्रॉमिसिंग
गौतम कधी स्पीनचा प्रॉमिसिंग कँडिडेट वाटला नाही. श्रेयस गोपाल म्हणायचे आहे का?>>>>> भारतात चांगल्या स्पिनर चा सध्या दुष्काळ आहे, गौतम फार प्रॉमिसिंग वाटत नसला तरी तो थोड्या वेगात ऑफब्रेक टाकतो, त्यामुळे डावखोऱ्या फलंदाजांना त्याला सतत मारणे थोडे धोकादायक ठरू शकते भारतीय पीचेस वर, आणि तो सातव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. चक्रवर्ती चांगला वाटतो पण फिटनेस मुळे येणार नाही. गोपाल, तेवतीया, चहल, चहर, कुलदीप सगळे सारखेच. या मुरुगन अश्विन, बिष्णोई कडून थोड्या अपेक्षा आहेत. या IPL मध्ये कोणी मिळायला हवा
*भारतात चांगल्या स्पिनर चा
*भारतात चांगल्या स्पिनर चा सध्या दुष्काळ आहे, * खरंय व दुर्दैवही. फिरकी आपलं पारंपारिक शक्तीस्थळ आहे, आपल्या खेळपट्टया त्याला पोषक आहेत , तरीही आपण त्याकडे हवं तेवढं लक्ष देत नाहीं, हें सत्य आहे. उलट, इतर देश केवळ उपखंडातील सामन्यांसाठीच नाहीं तर प्रभावी हत्यार म्हणून फिरकीचा अधिकाधिक उपयोग करताहेत. यावर खरंच गंभीरपणे विचार होणं आवशयक.
असामी, म्हणून म्हणालो,
असामी, म्हणून म्हणालो, तुम्हाला काय नियम अपेक्षित आहे ते तर सांगा. कारण नियम बनवतानाचे जे अडथळे मी सांगितले त्यांनाच तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये अनुमोदन दिल्यासारखी पोस्ट लिहिली. म्हणून म्हणालो नक्की कोणाचा मुद्दा खोडत आहात. नुसते नियम बदलला पाहिजे, अन्याय झाला हे बोलायला सोपे आहे. पण नवीन नियम कसा झाला पाहिजे हे उलगडतानाच्या अडचणींना मात्र उत्तर नाही.
तसं नाही ओ, गोलंदाज रिव्यू
तसं नाही ओ, गोलंदाज रिव्यू अंपायरने नाबाद दिल्यावर मागतो. त्यात केसमध्ये बॉल डेड होत नाही. तर अंपायरने बाद दिल्यावर बॉल डेड होतो.>>>>> मग ठीक आहे, नियम समजुन घेताना माझी गफलत झाली. परंतु काल च्या 4 धावा ह्या पंत च्या हक्काच्या होत्या. नविन नियम बनवायचा असेल तरी अडचण आहे.
आमच्या गावी आम्ही सामने ठेवतो
आमच्या गावी आम्ही सामने ठेवतो त्यात लागोपाठ सिक्स मारले तर ३ रन्स ने स्कोर वाढतो. म्हणजे पहिल्या बॉलला सिक्स मारला तर ६ धावा. लगेच दुसऱ्या बॉलला परत सिक्स मारला तर ९ धावा. तिसऱ्या बॉलला परत सिक्स मारला तर १२ धावा अँड सो ऑन.
आमच्या गावी आम्ही सामने ठेवतो
आमच्या गावी आम्ही सामने ठेवतो त्यात लागोपाठ सिक्स मारले तर ३ रन्स ने स्कोर वाढतो.

>>>>>>
आम्ही लुडो खेळताना सलग तीनदा सहा पडले तर डाव जातो
तर क्रिकेटमध्ये आमच्याकडे सिक्स समोरच असतो, डावीकडच्या एका ईमारतीला कुठेही मारा फक्त २ डिक्लेअर मिळतात, जर पार केली तर चौकार मोजला जातो आणि उजवीकडे असलेल्या कंपनीच्या पत्र्यापलीकडे गेला तर सरळ बाद देतात.
गल्ली क्रिकेटने आपल्याला ईतके अन्याय सहन करायला शिकवलेत तर कुठे त्या पंतच्या चार रन्ससाठी रडायचे
Pages