Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05
क्रिकेटवरील पहिले पाच धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
https://www.maayboli.com/node/67443
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
रोहीत चा इंपॅक्ट एवढा आहे की
रोहीत चा इंपॅक्ट एवढा आहे की 5 वेळा आयपील जिकंलाय
>>>>>
तो नक्कीच चांगला कर्णधार आहे,पण आयपील मध्ये त्याला चांगले खेळाडू मिळाले आहेत. त्यामुळे विजयात त्यांचाही वाटा आहे.
कसोटीत t२० खेळत होते आणि आज
कसोटीत T२० खेळत होते आणि आज T२० मध्ये कसोटी.
विराट कडे कुठे वाईट खेळाडु
विराट कडे कुठे वाईट खेळाडु आहेत... असो. काल पण खाल्ली माती. रोहीत ला आराम... का अरे बाबा Aus ला मध्ये फक्त 2 आणि भारतात 4 कसोटी खेळलाय तो... स्वत: माञ Oneday,T20 आणि एक कसोटी पण, भारतात पण सर्वच कसोटी खेळला. तरी आराम नाही. पहिल्या 3 T20 खेळव त्याला आघाडी घे आणि बस प्रयोग करत. एवढंच वाटतंय तर पंत ला आराम द्यायचा सलग 8 कसोटी खेळलाय पण ईशान RCB कडुन खेळत नाही तर त्याला कसं घेणार.
विराट वर होणारी टीका अनाठायी
विराट वर होणारी टीका अनाठायी आहे, रोहित सबोत सलामीला राहुल ले खेळवायचे की शिखर ला याचे decision घ्यायचे आहे म्हणून त्या दोघांनाही खेळवले आणि रोहित ला रेस्ट दिली तर काहीच गैर नाही. R C B च्या सैनी ला नाही खेळवले. तसंही series चा पहिला।सामना भारत आजकाल हरतो ☺️
(No subject)
खरंय. आमची निवडसुद्धा कामगिरीमुळेच असते. म्हणून तर आम्ही थर्ड अंपायरकडे बोट दाखवत रहातो. पण निवडीसाठी तुला तशी कांहीं सोय नाहीं ना !!
ॲप्रोच खरेच चेंज करायचा असेल
ॲप्रोच खरेच चेंज करायचा असेल तर पंतला ओपनिंगला टाका. लायसन देऊन. काल आलेला तेव्हा दोन विकेट पडलेल्या. तिसरी पडताच उगाच सावध खेळू लागला आणि त्यातच गेला.
फक्त प्रश्न असा आहे की आधीच ओपनिंगला तीन जण दोन जागांसाठी मारामारी करत आहेत त्यात हा चौथा पर्याय कश्याला चाचपा असे झालेय. मग कोहलीच्या जागी वन डाऊन टाका. झालाच पंत बाद तर कोहली अय्यर बघतील कसे डाव सावरून खेळावे. आणि पांड्या जडेजा शेवटी फिनिशरचे काम करतील.
दुसरे म्हणजे पंतला धोनीसारखे फिनिशर रोलमध्ये बघू नका. तो सुद्धा फिनिशर आहे पण स्टाईल वेगळी आहे. निदान कारकिर्दीच्या या टप्प्यावर तरी त्याच्याकडून टिकून राहणे, मॅच शेवटपर्यंत नेणे, कॅलक्युलेटेड फटकेबाजी करणे अशी अपेक्षा करू नये.
अर्थात हे २०-२० साठी झाले
वन डे ला मात्र पंतला मागच्या क्रमांकावरच बघायला आवडेल.
शर्मासोबत राहुलला खेळवायचे की
शर्मासोबत राहुलला खेळवायचे की धवनला या प्रश्नाचे उत्तर शोधायल राहुल धवन दोघांना समान संधी मिळावी म्हणून शर्मालाच बसवले असे वाटते.
पण मुळातच हा विचार चुकीचा आहे.
एकतर शर्माचा जोडीदार कोण असावा हे शर्मासोबतच आलटून पालटून दोघांना खेळवून योग्य प्रकारे ठरवता येईल. टीम कॉम्बिनेशन त्यातूनच सेट होईल.
वेगळे दोघांनाच खेळवून त्यांचा फॉर्म जोखायचा तर वर्ल्डकप आधी आयपीएल आहे त्यासाठी.. आणि क्षमता म्हणाल तर राहुल धवन दोघेही नवखे नाहीयेत. त्यांची क्षमता तुम्हाला ठाऊक आहेच.
पण कोहली आपला मुद्दा रेटायला पुन्हा आज तसेच करेल असे वाटतेय. त्यात जिंकलो आपण तर खुश सुद्धा होईल.
एक बालीश शंका -
एक बालीश शंका -
फक्त 20 षटकं, 10 विकेटस, निवडलेले सर्व संभाव्य फलंदाज आक्रमक, असं असताना टी20 मधे फलंदाजीची क्रमवारी कसोटी/ एक दिवसीय सामन्यांइतकी विचारपूर्वक, वेगवेगळे प्रयोग करून नक्की करणं खरंच आवश्यक आहे का ? मला तर वाटतं , टी-20त क्रमवारीत भरपूर लवचिकता ( flexibilty) मुद्दामच ठेवावी; बसूंदे विरूद्ध संघाला डोकं खाजवत, कोणत्या गोलंदाजाला केंव्हां बोलींग द्यायची यावर !
अभिनंदन !
अभिनंदन !
भुवनेश्वरा पुन्हा अप्रतिम गोलंदाजी करताना पाहून बरं वाटलं.
आज विराट बहरात होता व, आनंदाची बाब, हंसतही होता !!
नवीन पोरांचा काय आत्मविश्वास आहे ! मानलं किशन व पंतला !! सूर्यकुमार उगवण्या पूर्वीच सामना संपला.
पंत, किशन आणि सुंदर - अंडर १९
पंत, किशन आणि सुंदर - अंडर १९ नंतर पहिल्यांदाच एकत्र नॅशनल टीम मधे खेळले आणि तिघांनी घसघशीत कामगिरी केली.
काल इशान मस्त खेळला पण एकाच
काल इशान मस्त खेळला पण एकाच ओवर मध्ये दोन वेळा एकच फटका चुकुनही पुन्हा तोच फटका खेळताना बाद झाला. विराटने त्याला एकदाही समजावले नाही...
त्याला वाटलं असेल हा जर शेवट पर्यंत खेळला तर माझे काही 50 होणार नाही...
कोहलीं विक्रमा साठी खेळत नाही असं कोणाला वाटत असेल तर सरळ IPL मध्ये शतका साठी स्वतः कडे स्ट्राइक ठेवुन शतक केलं होतं...
*विराटने त्याला एकदाही
*विराटने त्याला एकदाही समजावले नाही...* - काल कधी नव्हे तो विराट खेळाचा मनापासून आनंद घेतोय, स्वत:च्या व इतरांच्या, असं जाणवलं. त्यामुळे बहुतेक कुणाला ' समजवायचा' मूड नसावा त्याचा.
काल इशानने षटकाराने ५० पुर्ण
काल इशानने षटकाराने ५० पुर्ण केले तेंव्हा धवनवर कॅमेरा नेला बहुदा मुद्दाम! बिचारा बारीक चेहरा करून टाळ्या हळू हळू वाजवित होता!
समजा बुमराह, रोहित संघात आले
समजा बुमराह, रोहित संघात आले आणि अजुन एक दोन आले तर तर कदाचित थोड्याच दिवसांत बराचसा मुंइं ची संघ खेळायला लागेल २०-२० मध्ये भारताकडून!
शिखरला बेनिफीट सामना देण्याची
शिखरला बेनिफीट सामना देण्याची वेळ आली आहे.
इशानने पदार्पणाचे तसेच इंग्लंडचे काहीच दडपण घेतले नाही. आयपीएलचा परिणाम. छान खेळला.
काल पृथ्वी पण फायनलला मस्त खेळला. शाळेतल्या मुलांशी खेळावे तसे खेळत होता.
आदित्य तरेचे ३-४ वर्षांपूर्वी चांगले नाव झाले होते. तोही छान खेळला. त्याचे पहिलेच शतक होते हे ऐकून आश्चर्य मात्र वाटले.
कित्येक नवीन, तरूण खेळाडू
कित्येक नवीन, तरूण खेळाडू फलंदाजीत कमालीची कामगिरी करताहेत. फलंदाज निवडीत निवडसमितीचीच विकेट जाणार आहे !!
काल कधी नव्हे तो विराट खेळाचा
काल कधी नव्हे तो विराट खेळाचा मनापासून आनंद घेतोय, स्वत:च्या व इतरांच्या, असं जाणवलं. >> "इतरांच्या" मूळे हा नक्की टोमणा आहे कि तारीफ कळले नाही
किशन ची मुलाखत ऐकली का कोणी ? कोहली- शास्त्रीने काय सूचना दिल्या होत्या हे कोणी कोणी वाचले?
कोहली काल जसा खेळला तसाच खेळत राहिला तर बाकीच्यांना दुसर्या बाजूंनी हवा तो - हवा तसा धुमाकूळ घालण्याचे लायसेन्स मिळेल. उगाच नुसताच अॅग्रीसीव्ह नेस आणण्यापेक्षा हे अधिक बरे वाटतेय एकंदर धोरण म्हणून. कोहली (नि श्रेयस ने गरज पडली तर ) नांगर टाकावा. ते तसेही दोघे फास्ट खेळतात नि स्ट्राईक रोटेट करत राहतात. बाकीच्यांना इंग्लिश फलंडाजांसारखे खेळता येईल. ठाकूर कडे स्लो बॉल चे किती व्हेरीएशन आहेत नक्की देव जाणे.
कित्येक नवीन, तरूण खेळाडू फलंदाजीत कमालीची कामगिरी करताहेत. फलंदाज निवडीत निवडसमितीचीच विकेट जाणार आहे >> +१ आनि शॉ डोकेदुखी ठरणार आहे आता
शॉ चा परतलेला फॉर्म ही फारच
शॉ चा परतलेला फॉर्म ही फारच सुखावह गोष्ट आहे.
ठाकूर ची कालची बॉलिंग त्याच्या आत्तापर्यंतच्या लिमिटेड ओव्हर्स मधल्या परफॉर्मन्स मधली one of the best म्हणता येईल अशी होती.
काल खूप दिवसांनी विराट ची बॅटींग पहातोय असं जाणवत होतं. फार बरं वाटलं. विराट असं खेळतो तेव्हा खूप आश्वासक वाटतं.
*इतरांच्या" मूळे हा नक्की
*इतरांच्या" मूळे हा नक्की टोमणा आहे कि तारीफ कळले नाही * - चांगलं तें चांगलच. तिथे मिठाचा खडा नाहीं टाकायचा. विराट जर असा आनंद घेत व देत खेळत राहिला तर माझ्या ' टाॅप फेव्हरेट ' यादीत !
काल विराट पोस्ट मॅच
काल विराट पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये अशा अर्थाचे म्हणाला की 'अनुष्का ईथे असल्याने मला फोकस्ड राहण्यास मदत झाली. ती माझ्याशी खेळाविषयी, मी काय करायला हवे वगैरे बोलत राह्ते'
आता लोकांनी 'विराटच्या खेळाशी त्याच्या यशापयशाशी माझा सबंध जोडू नये.. मी कॅप्टनची बायको आहे ही फक्त एक फॅक्ट आहे पण एक व्यक्ती म्हणून मी स्वतंत्र वगैरे आहे' अशी गावस्कर प्रकरणात पराचा कावळा करत केलेली स्टेटमेंट्स किती गांभीर्याने घ्यायची? (नॅशनल टेलिविजनवर गावस्करच्या स्टॅचरची व्यक्ती आपल्यावर केलेले तथ्यहीन आरोप फेटाळण्यासाठी कोर्टात ऊभे केल्यासारखे स्वतःला एक्स्प्लेन करत होती ते पहाणे फार दयनीय होते)
हे अनुष्का आणि विराट दोहोंचे सिलेक्टिव/दुटप्पी वागणे नव्हे का?
एक तर तुम्ही स्वतः यश हातात असतांना क्रिकेट विषयात नाहक फॅमिली लाईफ आणून (प्रसिद्धी व अजून कुठल्या क्रिकेटेतर कारणासाठी) लोकांना चर्चेला विषय देता. यश अपयशात बदलले आणि टेबल टर्न झाले व टीका करतांना लोकांनी फॅमिलीचा ऊल्लेख केला की मात्र लगेच ट्विटरवर आक्रमक होता.
विराटला स्वतःला त्याच्या
विराटला स्वतःला त्याच्या बायकोबद्दल काहीही म्हणू दे, तो त्या दोन व्यक्तींच्या नात्याचा भाग आहे. इतरांनी त्यांच्यातल्या नात्याचा आणि खेळाचा संबंध लावायचा प्रश्न उद्भवतच नाही कारण इतरांना त्यांच्या घरात काय घडतं हे काही माहिती नाही, इतकं सरळ आहे ते. उगाच काहीही वडाची साल वांग्याला लावायची.
विराटे ने त्याच्या बायकोच्या
विराटे ने त्याच्या बायकोच्या सपोर्ट विषयी कृतज्ञतेनं बोलणं आणी गावसकर ने पब्लिकली बोलताना त्यांची चेष्टा करणं ह्यात फार फरक आहे. कुठल्याच अँगलने गावसकर चं बोलणं जस्टीफाय होत नाही. आयपीएल चा काहीसा कॅज्युअल प्लॅटफॉर्म असल्यामुळे आणी त्यातूनही हिंदी कॉमेंट्री (तिथे बाकी सुद्धा बराच पाचकळपणा चालतो) चॅनेल असल्यामुळे गावसकर सभ्यतेच्या आणी संकेतांच्या सीमेबाहेर गेला असावा . असो. तो विषय आता संपला आहे.
उद्यापासून उरलेल्या टी-२० ला प्रेक्षक नसणार आहेत. लाल मातीची विकेट असल्यामुळे स्पिनर्स ना जास्त मदत मिळण्याची शक्यता आहे. भारताची टीम काय असेल हे बघण्याची उत्सुकता आहे.
विराटला स्वतःला त्याच्या
विराटला स्वतःला त्याच्या बायकोबद्दल काहीही म्हणू दे, तो त्या दोन व्यक्तींच्या नात्याचा भाग आहे. >> हे खालचे वाच. त्यात तिची तिला कोणीही कुठल्याही क्रिकेट संदर्भातल्या चर्चेमध्ये ओढू नये अशी अपेक्षा आहे. विराटच्या पर्फॉर्मन्सच्या संदर्भाने तिचा ऊल्लेख करू नये अशीही सौजन्यशील अपेक्षा आहे.
आणि मित्रा, सार्वजनिक जीवनात सौजन्य ही दुहेरी भावना असते. आपण पाळले तर समोरच्याकडूनही ते पाळले जाईल अशी अपेक्षा करू शकतो.
pic.jpg (132.92 KB)
तुझे असे म्हणणे आहे की प्रेझेंटेशन सेरेमनी सारख्या पब्लिक इवेंटमध्ये तुम्ही कोट्यवधी लोकांसमोर आवर्जून बायकोचा तिची ईच्छा नसतांना (जे तिने कॅटेगोरीकली सांगितलेले आहे) क्रिकेट संदर्भाने ऊल्लेख करता तेव्हा एकतर विराटने स्वतः बायकोच्या ईच्छेचा अनादर तरी केलेला असतो किंवा अनुष्का ट्वीट मध्ये 'विराट सोडून कोणी मला क्रिकेट मध्ये ड्रॅग केलेले चालणार नाही' असे स्पेसिफिकली लिहायला विसरलेली असते.
मला कोणी कोणाबद्दल काय म्हणावे ह्याबद्दल काहीही आक्षेप नाही. मी वागण्यातला दुटप्पीपणा दाखवून दिला ईतकेच.
नुकतीच गावस्कर ची एक मुलाखत
नुकतीच गावस्कर ची एक मुलाखत वाचली ज्यात त्याने कपिलला कानपूर मधे ड्रॉप केले नव्हते तर तो निर्णय सिलेक्टर्स्चा होता असे सांगीतलेय. सुमारे ३५ वर्षांपूर्वीच्या गोष्टींचे स्पष्टीकरण गावस्कर आत्ता देतोय. अनुषकाबद्दल तो जे काही बोलला त्याचे स्पष्टीकरण अजून पस्तीस वर्षांनंतर मिळेल.
आणि मित्रा, सार्वजनिक जीवनात सौजन्य ही दुहेरी भावना असते. आपण पाळले तर समोरच्याकडूनही ते पाळले जाईल अशी अपेक्षा करू शकतो. >> 'कोहली-अनुष्का नि गावस्कर एकमेकांबद्दल काय बोलले ' नि 'कोहली नि अनुष्का एकमेकांबद्दल काय बोलले ' ह्यात रेसिप्रोकिसिटी सारखीच का असावी ? गावस्कर मजेत का होइना चार चौघांमधे अनुष्काबद्दल जे बोलला ते मार्शनील बद्दल कोणी बोलले असते तर गावस्करची प्रतिक्रिया काय असती देव जाणे .
अनुष्का शर्मा ऑलरेडी पब्लिक
अनुष्का शर्मा ऑलरेडी पब्लिक लाईफमध्ये पब्लिक फिगर आहे रे, त्यांचे लग्न हे सुद्धा पब्लिक नॉलेज आहे. तिच्या नावाचा कॅज्युअल ऊल्लेख होऊ शकतो. तो काही टॅबू विषय थोडीच आहे. बाकी क्रिकेटर्सच्या स्पाऊजेसचा रिअल लाईफ्मधला अॅपिअरन्स प्रायवेट असेल तर त्यांच्या बद्दल कोणीही काहीही बोलण्याचे काहीच कारण नाही. (ऊदा..मला रोहित शर्माची बायको चेहर्याने माहित आहे पण तिचे नाव माहित नाही. जाणून घेण्याची गरजही वाटत नाही.)
ह्यात रेसिप्रोकिसिटी सारखीच का असावी ? >> कारण क्रिकेटशी तिचे नाव जोडण्याचे कॉन्सिक्वेन्सेस सारखेच आहेत. लक्षात घे, अनुष्काने ट्विटर सारखे सोशल माध्य्म निवडले होते गावस्कर प्रकरणात तिचे मत मांडायला. एनिथिंग रिलेटेड दॅट फॉलोज, फॉर ऑर अगेन्स्ट - विल रिमेन ओपन ईन द पब्लिक डोमेन.
It's 2020 and things still don't change for me. When will I stop getting dragged into cricket and stop being used to pass sweeping statements?
टेनिस विसरलास का? फेडररच्या बायकोचा जसा बरेचदा ईतिहास सांगितला जातो, ब्रुक शील्डस आगासीची मॅच बघायला आली की तिच्याबद्दलही बोलल्या जाते. ह्याऊलट मरे किंवा जोकोविकच्या गर्लफ्रेंडसचा अगदीच कॅमेरामध्ये दिसल्यास जुजबी ऊल्लेख केला जातो.
फरक एवढाच की मिरका आणि ब्रुक पब्लिक फिगर्स आहेत/ होत्या.
अनुष्काच्या दुर्दैवाने तिच्या वाट्याला विराटच्या अपयशातच वाटेकरी होण्याची कायम वेळ आली. त्यामुळे त्या वाईट अनुभवातून गावस्कर जे काय बोलले त्याचा अर्थ अनुष्काने काढला तसा (चेष्टा, टिप्पणी की कसे?) एवढा सबजेक्टिव असेल तर पुढे गैरसमज टाळण्यासाठी मला तिचा 'क्रिकेट संदर्भातल्या चर्चेमध्ये माझे नाव ओढू नका' हा स्ट्राँग स्टान्स पटतो.
पण मग हा स्टान्स सिलेक्टिव असणे मला खटकते, दुटप्पी वाटते. आणि खुद्द विराटने गरज वा अपेक्षा नसतांना तिचे नाव पुन्हा चर्चेत ओढणे (व्हॉटेवर हिज ईंटेंशन्स मे बी) टोटली अनकॉल्ड फॉर वाटले.
ऊदा. शमीने त्याच्या चांगल्या पर्फॉर्मन्सचे कारण त्याच्या कौटुंबिक वादातून आलेली मानसिक अस्वस्थता आणि त्याने त्यातून मिळवलेली पॉझिटिव एनर्जी असे प्रेझेंटेशनमध्ये सांगितलले प्रोफेशनल वाटेल का? ते खरे कारण असले तरी? त्याची चर्चा मिडियामध्ये लाईव झाली (आणि झालेलीच आहे) मग तिथे भा चे 'शमी आपल्या बायकोबद्दल काहीही बोलू शकतो, तो त्यांच्या नात्याचा प्रश्न आहे' हे अर्ग्यूमेंट चालायला हवे. जर बायकोविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे ईमोशन्स चालतात तर ईतरही चालू शकतील, नाही का.
अँड देन ईट बिकम्स अ डेंजरसली स्लिपरी स्लोप.
बर्गा वरच्या पोस्ट चा मी
बर्गा वरच्या पोस्ट चा मी मांडलेल्या मुद्द्याशी संबंध नाही, नवरा बायको ने आपापसातल्या संबंधाच उल्लेख नि तिर्हाईत व्यक्ती ने त्याबद्दल बोलणे ह्यात मला तरी फरक वाटतो. पब्लिक फिगर असो वा नसो, गावस्कर ने सीमा ओलांडली असे माझे मत आहे. तो कमेंट निव्वळ क्रिकेट संबंधी ठेवला असता तर एकवेळ चालले असते पण टंग ईन चीक विनोद करताना त्याने एक मर्यादा ओलांडली .
पण मग हा स्टान्स सिलेक्टिव असणे मला खटकते, दुटप्पी वाटते. आणि खुद्द विराटने गरज वा अपेक्षा नसतांना तिचे नाव पुन्हा चर्चेत ओढणे (व्हॉटेवर हिज ईंटेंशन्स मे बी) टोटली अनकॉल्ड फॉर वाटले. >> खरच ? नवर्या बायकोने आपल्या यशात श्रेय देण्यासाठी असा उल्लेख केला तर खटकले ? अपयशाच्या वाटेकर्यांचा उल्लेख एक डिसेंट माणूस म्हणून न करणे साहजिक वाटत नाही ? असो पिंडे पिंडे मतःर्भिन्नता !
विराटने अनुष्काला श्रेय दिले
विराटने अनुष्काला श्रेय दिले तो ऊल्लेख नाही खटकला रे...आजवर अनेकांनी दिले आहे. बायकोच काय, आंद्रे रसेल गर्लफ्रेंड बद्दल सुद्धा बोलला आहे. पोलार्ड सुद्धा बायकोबद्दल बोलला आहे. टेनिसमधेही तर दरवर्षीच असते. वडिलांना, भावाला, कोचला श्रेय देण्यासारखेच बायकोला श्रेय देणे वेगळे थोडीच आहे त्यात खटकण्यासारखे काही नाही...ऊलट आपल्या मेहनतीत सहभागी असलेल्यांची आठवण ठेवणे, सन्मानाने ऊल्लेख करणे मोठ्या मनाचे लक्षण आहे. कोणीही सदगृहस्थ तो करेन, नव्हे त्याने करायलाच हवा. पण,
When will I stop getting dragged into cricket हे तिचे पब्लिक फोरमवरले वाक्य आणि त्याच्या अराऊंड घडलेले रिअल लाईफ नाट्य ध्यानात ठेऊन कोट्यावधी पब्लिकसमोर पुन्हा हा ऊल्लेख का करावा असा प्रश्न आहे.
राहता राहिली गावस्करची
कॉमेंट्रीकॉमेंट तर,पॅडेमिक मध्ये स्मृती मानधनाने फक्त घरात भावाबरोबर बॅटिंग प्रॅक्टिस केली किंवा मिथाली राजने नवर्याच्या (तिचे लग्न झाले की कसे मला माहित नाही. जस्ट एक अर्ग्यूमेंट म्हणून) गोलंदाजीवर बॅटींग प्रॅक्टिस केली, पृथ्वी शॉने वडिलांबरोवर केली, हे जेवढे कॅज्युअल स्टेटमेंट्स आहेत तेवढेच विराट आणि अनुश्काच्या बाबतीतले आहे. त्यात चेष्टा, खोचक टिप्पणी वगैरे काही असावी असे मला तरी वाटत नाही.
कमेंट्री करणारे तिर्हाईतच नटराजनला मुलगी झाली, विराटला मुलगी झाली, पंड्याचे लग्न झाले, जाँटीने मुलीचे नाव ईंडिया ठेवले वगिरे वगिरे कॅजुअल गोष्टी सांगत असतात. तुला वाटते तसे क्रिकेटेतर बोलायचेच नाही असा काही कॉमेंट्रीचा हार्ड अँड फास्ट रूल नाहीये.
गावस्करकडून असे रबिश बोलणे पुर्वीही कधी घडलेले नाही आणि त्याने नंतर स्पष्टीकरण सुद्धा दिले आहे. गैरसमज होऊ शकतात हे मान्य पण ईंटेंट दिसत नसतांनाही त्याला 'नाही हा बाष्कळ विनोदच होता' म्हणत धारेवर धरणे मला योग्य वाटत नाही.
पण शेवटी ज्याच्याबद्दल स्टेटमेंट आहे त्याचे पर्स्पेक्टिव महत्वाचे आहे. आणि त्या व्यक्तीला ती खोचक वाटणे त्याबद्दल तिने काही स्टँड घेणे ह्यातही काही गैर काही नाही... पण ह्या स्टँडचा त्या व्यक्ती आणि तिच्या कुटुंबियांसहित सगळ्यांनी मान ठेवावा... यशात वा अपयशात सारखाच हे योग्य आहे असे मला वाटते.
तू म्हणतोस तसे पिंडे पिंडे मतःर्भिन्नता हेच खरे.
लेटस ऑल मुव ऑन टू टॉकिंग अबाऊट रिअल क्रिकेट.
उद्यापासून उरलेल्या टी-२० ला प्रेक्षक नसणार आहेत. लाल मातीची विकेट असल्यामुळे स्पिनर्स ना जास्त मदत मिळण्याची शक्यता आहे. भारताची टीम काय असेल हे बघण्याची उत्सुकता आहे. >> राहुल ऐवजी रोहित आत येईल एवढाच पॉसिबल बदल होईल असे वाटते. ऑन अ डिस्टंट चान्स पीच मुळे पंड्या ऐवजी पुन्हा अक्सरला घेऊ शकतात. यादवला ३ किंवा ४ वर नाही खेळवले तर त्याला घेण्याने वर्ल्ड्कप साठी संघबांधणी नक्की कशी होते आहे हे मला कळत नाहीये.
प्रत्येक नाण्याला दोन बाजू
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. विराटने कालच्या खेळीसाठी अनुष्काला श्रेय दिले याचा अर्थ तो जेव्हा खराब खेळला तेव्हा अनुष्का त्याच्याशी भांडलेली असणार किंवा क्रिकेट खेळाबद्दल बोलायचं सोडून भलत्याच विषयावर बोलून विराटच्या एकाग्रतेत भंग टाकलेला असणार. विराट ऋषीमुनींप्रमाणे ध्यान करतोय आणि अनुष्का अप्सरा तपस्या भंग होण्यासाठी त्याच्यासमोर नाचते असं काहीसं असावं. असो जे काही असेल ते. तर लोकांना नाण्याची तीच बाजू बघायला आवडते जी त्यांना बघायची आहे. विराटने ती बाजू दाखवली जी लोकांना बघायची होती आणि गावस्करने दुसरी. बस्स हाच काय तो फरक.
अरे असामी,
अरे असामी,
"गावस्करचा कमेंट चुकीचा रिपोर्ट केला गेला होता आधी. त्यात द्वर्थी काहीच नव्हते. बरोबर बॉलिंग शब्द होता. नंतर कोणी तरी खोडसाळपणे बदलला असे वाचले. असो." हे तू 20 सप्टेंबर 2020 रोजी आयपीएल बाफवर म्हणाला होतास. ती अतिशय साधी कमेंट होती आणि रिपोरटींग मधल्या खोडसाळपणामुळे वाद झाला ह्या तुझ्या त्यावेळच्या मताशी मी सहमत होतो. आता अचानक सीमा कशी काय ओलांडली गेली ?
हे बघा. https://www.youtube
हे बघा. https://www.youtube.com/watch?v=12hESz88NSs @२५:३०
आता अनुष्का झहीरची 'वॉच द बॉल' कमेंट, वॉन/जहीर/भिमानीचे सहजच की खोडसाळपणे हसणे, भिमानीचे 'तिने खरोखरच क्रिकेटविषयक सल्ला दिला असेल का?' असे मिष्किलपणे विचारणे' ह्याचा ऑफेन्स घेऊन पुन्हा ट्विटरवर मत प्रदर्शन करेल का? (यू सी ईट ऑल डिपेंड्स ऑन हाऊ वन चूझेस टू ईंटरप्रिट दीज थिंग्स) मग हा नॉन ईश्यूचा ईश्यू हॉइल का?
झहीर- अॅन अब्सॉल्यूट जंटलमन ऑफ द गेम, कुठल्याही खोडसाळपणे हसला नाही की त्याचे बोलणे किंचितही द्वयर्थी नव्हते हे आप्ल्याला नक्की कळते. मग अनुष्काचा गैरसमज झाला हा बेनेफिट ऑफ डाऊट आपण गावस्करच्या बाबतीत देऊ शकत नाही?
क्रिकबझ वरच्या क्रिकेट विश्लेषणात अनुष्काचा विषय येतोच का? ह्या आधी मी कुठल्याही क्रिकेटरच्या बायकोचा ऊल्लेख तिथे ऐकला नाही. कारण विराटने कारण नसतांना हा कॅन ऑफ वर्म पुन्हा ओपन केला. मे बी मागे घडले ते त्याच्या मनात अजून राहिले असावे. मागे घडले तसे पुन्हा घडणारही नाही आणि घडूही नये कारण ह्याचे रिअल लाईफ कॉन्सिक्वेन्सेस मोठे आणि गंभीर आहेत.
म्हणून मी अजूनही म्हणेन प्रेझेंटेशन सेरेमनी मध्ये विराटचे अनुष्काबद्दल बोलणे दुटप्पी, अनप्रोफेशनल आणि टोटली अन्कॉल्ड फॉर होते.
Pages